Friday 26 January 2024

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्रातील सोमय मुंडे या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे.

◆ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे.

◆ भारताच्या पहिल्या महिला माहूत पार्बती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्या आसाम राज्याशी संबधित आहेत.

◆ भारताच्या पहिल्या सिकलसेल ऍनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे प्रणेते यासदी मांनकेशा इटालिया यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश एम फातेमा बिबी यांना यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर.आश्विन ने 150 विकेट पूर्ण केल्या आहेत.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 150 विकेट पूर्ण करणारा आर.आश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणुन शपथ घेतली आहे.

◆ प्रसन्ना वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 34वे न्यायाधिश ठरले आहेत.

◆ राष्ट्रपती द्रोपद्री मर्मु यांच्या हस्ते 'डॉ. विपीन इटनकर' सर्वोत्कृष्ट मतदार नोंदनी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ राष्ट्रपतीच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. विपीन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

◆ ब्रिक्स बिझनेस एक्सलंस् अवॉर्ड मध्ये मुथुट फायनान्स ला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Thursday 25 January 2024

चालू घडामोडी :- 25 जानेवारी 2024

◆ अँन अनकॉमेन लव्ह: द अर्ली लाईफ ऑफ सुधा मूर्ती अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक "चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी" आहेत.

◆ नवी दिल्लीतून जगदीप धनखड यांच्या हस्ते हमारा संविधान, हमारा सन्मान हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

◆ "गृह ज्योती" :- तेलंगणा सरकार मोफत वीज योजना सुरू करणार आहे.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 टोजी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले.

◆ रोशिबिना यांना IWUF द्वारे महिला वुशू खेळाडू म्हणून घोषित केले.

◆ देशात 2011 वर्षापासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतात येतो.

◆ 2024 वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम "Nothing like voting I vote for Sure" आहे.

◆ जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये वॉलमार्ट कंपनी प्रथम स्थानावर आहे.

◆ जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये भारतीय कंपनी TCS 8व्या क्रमांकावर आहे.

◆ RBI च्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत देशात सर्वाधिक FDI मॉरिशस देशाकडून आला आहे.

◆ श्री रामाच्या माता कोषल्या यांचे देशांतील एकमेव मंदीर छत्तीसगढ राज्यांतील चंदखुरी गावात आहे.

◆ रोहन बोपण्णा भारतीय टेनीस पटू ने आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे.

◆ आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा रोहन बोपण्णा हा चौथा भारतीय टेनीस पटू ठरला आहे.

◆ रोहन बोपण्णा हा 43 व्या वर्षी आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहचणार पहिला खेळाडू ठरला आहे.

◆ भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या "टू किल अ टायगर" डॉक्युमेंट्रीला 2024 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

◆ देशात नागालँड या राज्यात 24 व 25 जानेवारी 2024 रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

◆ G-77 गटाची तिसरी शिखर परिषद युगांडा या देशात होत आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Tuesday 23 January 2024

चालू घडामोडी :- 23 जानेवारी 2024

◆ स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अंतराळयानाच्या यशस्वी उपयोजनासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारा जपान हा 5 वा देश ठरला आहे.

◆ मनसुख मांडविया यांनी राजकोटमध्ये कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली.

◆ आशिया ऑलिम्पिक शॉटगन क्वालिफायरमध्ये रायजा-गुजोंत जोडीने कांस्यपदक मिळवले.

◆ जैसलमेर 22-24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या वार्षिक डेझर्ट फेस्टिव्हलची तयारी करत आहे. [थीम :- "वाळवंटाकडे परत"]

◆ भारतीय धावपटू मानसिंग आशियाई मॅरेथॉन विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

◆ संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस पाच दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार रवी शास्त्री यांना जाहीर झाला आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शुभमन गिल ची निवड केली आहे.

◆ 23 जानेवारी हा दिवस भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ भारतात 23 जानेवारी हा दिवस 'सुभाष चंद्र बोस' यांच्या सन्मानार्थ पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये मान सिंह भारतीय धावपटू ने सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप 2024 हाँगकाँग देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ भारत आणि किर्गिस्थान यांच्यात हिमाचल प्रदेश राज्यात खंजर 11 हा युद्ध सराव आयोजीत करण्यात आला आहे.

◆ उत्तरप्रदेश राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो.

◆ हिपॅटायटीस A या रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस 'हेविश्योर' ही हैद्राबाद ठिकाणच्या इंडियन immunological Ltd ने विकसित केली आहे.

◆ बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरोणत्तर भारतरत्न जाहीर.

◆ तलाठी भरतीचे 23 जिल्ह्यांचे निकाल जाहीर

चालू घडामोडी :- 22 जानेवारी 2024

◆ असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत देशात प्रथमच 24 जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER मध्ये देशांत 8व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक चंदीगड येथे आहे.

◆ LIC ने शुभारंभ केलेल्या जीवन धारा-2  पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी 20 वर्षे वयाची अट आहे.

◆ इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारताच्या बॅडमिंटन जोडीने उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ इंडीया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद चीन या देशाच्या 'शा युकी' ने पटकावले.

◆ बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

◆ अयोध्या येथे श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने 19 लाख दिवे लावण्यात येणार आहेत.

◆ टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 मध्ये पहिले तीन क्रमांक इथोपिया या देशाच्या धावपटूंनी पटकावले.

◆ मुंबई मध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 चे हे 19वे वर्ष आहे.

◆ भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प सुरत येथे स्थापन करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातून वस्तू व सेवांची निर्यातीत 0.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

◆ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात पर्यटन मंत्रालय व्दारे "भारत पर्व" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय पर्यटन मंत्रालया द्वारा 23 ते 31 जानेवारी कालावधीत देशात भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ 50 वा कुर्बी युवा महोत्सव आसाम राज्यात आयोजित करण्यात आला होता.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या "नगाडा" शैलीतील आहे.

◆ अयोध्या मध्ये राम मंदिरा मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कर्नाटक राज्याशी संबधित आहेत.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 या दिवशी होत आहे.

◆ 2024 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम "विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी" ही आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Saturday 20 January 2024

नवीन पुस्तके आणि लेखक

💬 नेशन कॉलिंग
➖ सोनल गोयल

💬 द बुक ऑफ लाइफः माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस
➖ विवेक रंजन अग्निहोत्री

💬 कमिशनर मॅडम
➖ मीरा बोरवणकर

💬 Fire on the Ganga: Life among the Dead in Banaras
➖ राधिका अय्यंगार

💬 How Prime Ministers Decide
➖ नीरजा चौधरी

💬 Smoke and Ashes
➖ अमिताव घोष

💬 Breaking the Mould
➖ रघुराम राजन

💬 Pranab, My Father: A Daughter Remembers
➖ शर्मिष्ठा मुखर्जी

💬 Why Bharat Matters
➖ एस जयशंकर

💬 Anger Management: The Troubled Diplomatic Relationships Between India And Pakistan
➖ अजय बिसारिया
--------------------------------------------------

Thursday 18 January 2024

चालू घडामोडी :- 18 जानेवारी 2024

◆ चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी यांचे नवीनतम पुस्तक, "ॲन अनकॉमन लव्ह: द अर्ली लाइफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती" आहे.

◆ नवीन पटनायक यांनी श्री जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौरऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे.

◆ दीव मध्ये आयोजित केलेल्या पाहिल्या द बीच गेम्स 2024 स्पर्धेत मध्यप्रदेश या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

◆ पहिल्या द बिच गेम्स स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने 14 पदके जिंकली आहेत.

◆ स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक अर्थीक परिषद 2024 ची थीम "Rebuilding trust" आहे.

◆ भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन हरियाणा या राज्यात करण्यात आले आहे.

◆ 17 ते 20 जानेवारी या कालावधीत हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ 2024 चा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार मुंबई ऐवजी गांधीनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने बेल्जियम देशाची कंपनी एबीआयएन बेव्ह सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी 600 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.

◆ ग्लोबल फायरपॉवर लष्करी ताकद यादी 2024 च्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात अमेरिका देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ ग्लोबल फायेरपॉवर लष्करी ताकद यादी 2024 नुसार जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक आहे.

◆ जगात भूतान या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे.

◆ जल्लीकटू ही बैलाची झुंज तामिळनाडू या राज्यात आयोजित करण्यात येत असते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Wednesday 17 January 2024

चालू घडामोडी :- 17 जानेवारी 2024

🔷

◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने डिसेंबर 2023 साठी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने महिला गटात जिंकला.

◆ दीप्ती शर्मा ही आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ठरलेली दुसरी 'भारतीय महिला खेळाडू आहे.

◆ आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार यागोदर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (ऑक्टोबर 2022) हिने प्राप्त केला होता.

◆ पॅट कमिन्स(ऑस्ट्रेलिया) हा डिसेंबर 2023 साठी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार विजेता ठरला.

◆ यजमान महाराष्ट्राने नाशिक येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात विविध कला प्रकारात चमकदार कामगिरी करुन सांघिक विजेतेपद मिळवले.

◆ राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र प्रथम तर हरियाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

◆ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि हरदीप सिंग पुरी यांनी दावोस येथील WEF येथे विलीड लाउंजचे उद्घाटन केले.

◆ I-STEM (भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधा नकाशा) लॅब आणि सुविधांमध्ये प्रवेश प्रदान करून संपूर्ण भारतातील संशोधन सहयोग सुधारण्यासाठी बंगळुरुमध्ये समवेषा प्रकल्प सुरु करत आहे.

◆ थिरुवल्लुवर दिवस सामान्यतः तामिळनाडू राज्यात 15 किंवा 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

◆ उबरने अयोध्येत आपली इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सेवा सुरू केली.

◆ CII नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन रोड सेफ्टी नवी दिल्लीत पार पडली.

◆ मॅडिसन मार्थ या 22 वर्षीय यूएस एअर फोर्स ऑफिसरने मिस अमेरिकाचा किताब जिंकला.

◆ आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये, भारतीय नेमबाज योगेश सिंगने 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत 573 गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

◆ गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेंन्स या पुस्तकाचे लेखक "एम जे अकबर" आहेत.

◆ केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्वार आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा सामावेश करण्यात आला आहे.

◆ जागतिक हवामन संस्थेच्या माहितीनुसार 2023 हे वर्षे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे.

◆ लिओनेल मेस्सी या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल 2023 चा पुरस्कार पटकावला आहे.

◆ फुटबॉल पटू लिओनेल मेस्सी ने आठव्यांदा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू चा पुरस्कार मिळवला आहे.

◆ Aitana Bonmati ही स्पेन या देशाची फुटबॉलपटू फिफाची 2023 ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे.

◆ गेल्या 35 वर्षात कोणत्याही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये मानांकित खेळाडूला पराभूत करणारा "सुमित नागल" हा पहिला भारतीय टेनिस खेळाडू ठरला आहे.

◆ देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प महाराष्ट्र या राज्यात होणार आहे.

◆ भारताचा टेनिस पटू सुमित नागल जागतिक टेनिस क्रमवारीत 137व्या क्रमांकावर आहे.

◆ PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच आंध्रप्रदेश राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर व अमली पदार्थांच्या अकदामीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे असून उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळात "रस्ते सुरुक्षा अभियान" राबविण्यात येणार आहे.

◆ आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 इंडोनेशिया या देशात पार पडली आहे.

◆ इंडोनेशिया मध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 19 पदके जिंकली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Tuesday 16 January 2024

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2024

◆ राज्य शासनाकडून सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर.

◆ भारतीय नौदलाची चित्ता, गुलदार आणि कुंभीर, पोलनोकनी श्रेणीतील लैंडिंग जहाजांचा भाग, जवळजवळ चार दशकांच्या समर्पित सेवेनंतर बंद करण्यात आली.

◆ तैवानच्या नागरिकांनी विल्यम लाई यांना त्यांचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडले.

◆ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सुरु केलेल्या 'अपना विद्यालय'चे उद्दिष्ट सरकारी शाळा सुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय नेते आणि व्यावसायिक यांच्यात सहकार्य वाढवणे आहे.

◆ केरळच्या ऑपरेशन AMRITH चे उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिकाराचा सामना करणे आहे.

◆ AMRITH म्हणजे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स इंटरव्हेंशन फॉर टोटल हेल्थ.

◆ केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लाइफ सायन्सेस पार्क येथे ग्लोबल सायन्स फेस्टिव्हल केरळचे उद्घाटन केले.

◆ वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र(मृत-48) प्रथमस्थानी असून मध्य प्रदेश दुसऱ्या तर उत्तराखंड तिसऱ्या क्रमंकावर आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2021 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हिराबाई कांबळे यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2022 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पणजी येथे आयोजीत करण्यात आले आहे.

◆ लोकप्रिय उर्दू शायर मुनुव्वर राणा यांचे नुकतेच लखनऊ या ठिकाणीं निधन झाले आहे.

◆ ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगातील गरीबी संपण्यासाठी 229 वर्षाचा कलावधी लागणार आहे.

◆ "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारतीय टेनिस जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ 2024 ची स्विझरलँड मधील दोवोस येथे world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद 54व्या क्रमांकाची आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2024

◆ राजस्थानमधील बिकानेर या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.

◆ महाराष्ट्र शासनाने नुकतेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात 'आटपाडी संवर्धन राखीव' नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

◆ भारतीय सैन्य 2024 हे तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणून पाळणार आहे.

◆ भारतीय आणि जपानी तटरक्षक दलांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर 'सहयोग केजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत.

◆ तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

◆ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या.

◆ हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना 2002 वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना मध्यप्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2023 मध्ये "अटल संस्कृती पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.

◆ जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ 102व्या स्थानावर आहे.

◆ 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडला.

◆ राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी मॉरिशस देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा मंजूर केली आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ 18 वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात अमळनेर येथे होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 18 विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली आहे.

◆ भारतीय सेना दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...