Friday 26 January 2024

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत.

◆ महाराष्ट्रातील सोमय मुंडे या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे.

◆ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे.

◆ भारताच्या पहिल्या महिला माहूत पार्बती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्या आसाम राज्याशी संबधित आहेत.

◆ भारताच्या पहिल्या सिकलसेल ऍनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे प्रणेते यासदी मांनकेशा इटालिया यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश एम फातेमा बिबी यांना यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर.आश्विन ने 150 विकेट पूर्ण केल्या आहेत.

◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 150 विकेट पूर्ण करणारा आर.आश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणुन शपथ घेतली आहे.

◆ प्रसन्ना वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 34वे न्यायाधिश ठरले आहेत.

◆ राष्ट्रपती द्रोपद्री मर्मु यांच्या हस्ते 'डॉ. विपीन इटनकर' सर्वोत्कृष्ट मतदार नोंदनी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ राष्ट्रपतीच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. विपीन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

◆ ब्रिक्स बिझनेस एक्सलंस् अवॉर्ड मध्ये मुथुट फायनान्स ला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...