Sunday 27 August 2023

तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षाही वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या!

Nashik Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेनंतर आता वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. कारण....

नाशिक : तलाठी परीक्षेत (Talathi Exam) हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर (Hightech Copy) अनेक अपडेट समोर येत आहेत. अशातच नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. याबाबत खुद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.  

नाशिकच्या (Nashik) तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले. पिंपरी चिंचवड परीक्षेतही हा पाहिजे आरोपी आहे. तसेच इतर परीक्षांत त्याने घोळ केल्याचे समोर आले होते. अशातच काल गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं आले. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर आज नाशिक पोलिसांकडून (Nashik) धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका गुसिंगेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या आहेत. 

दरम्यान नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam 2023) घोटाळ्यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका देखील सापडल्या. इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या (Talathi Exam) जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचं दिसून आलं. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. त्यामुळे नुकत्याच मेरिट लिस्ट जाहीर झालेल्या DMER परीक्षेची देखील चौकशी होणार असून नाशिक पोलीस खोलवर तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं दिसून येतंय. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 

संशयित गणेश नुसिंगे कोण? 
तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश नुसिंगे (Ganesh Nusinge) हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश गुसिंगे आणि त्याचे साथीदार असल्याचा आरोप संघटनेकडून केला जातो आहे. 

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...