Friday 9 December 2022

20 महत्त्वाचे अंकगणित सराव प्रश्न उत्तरे

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार

 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची

 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K

 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार

 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा

 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच

 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक

 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा

 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S

 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393

 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51

 12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15

 13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE

 14. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस

 15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास

 16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514

 17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा

 18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5

 19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12

 20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

अंकगणित प्रश्नसंच 21/10/2019

1) राहुलने 15000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4500 रु. व्याज दिले, तर व्याजाचा दर दसादशे किती असेल?

(1) 10
(2) 15
(3) 9
(4) 8

स्पष्टीकरण -
म = 15000, क = 3 , द = ?, व्याज = 4500
द = (100 x व्याज) : (15000 x 3)
उत्तर - 10 येईल.
——————————————————-
(2) रोहितला द. सा. द. शे 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळव्याज रु. 2520 मिळाले, तर मुद्दल किती (2018)
(1) 15000
(2) 21600
(3)1500
(4) 12000

स्पष्टीकरण =
द = 7 क = 3, व्याज = 2520
मुद्दल =?
मुद्दल = (100 x व्याज) : (द x क)
= (100 x 2520) : (7 x 3)
मुद्दल = 12000 रु.
पर्याय क्र. 4 बरोबर
———————————————————————
(3) 500 रु. मुद्दलाचे दसादशे 8 दराने 3 वर्षाचे सरळव्याज किती? (2018)
(1) 240
(2) 120
(3) 500
(4) 400

स्पष्टीकरण -
म = 500, द= 8, क= 3
व्याज = ?
व्याज = (म x द x क) : 100
= (500 x 8 x 3) : 100
व्याज= 120 रु.
म्हणून पर्याय क्र. 120 बरोबर
————————————————————
(4) स्वराने दसादशे 7 दराने 20000 रुपयांचे 5 वर्षासाठी बॅँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल? (2017)
(1) 5000
(2) 700
(3) 7000
(4) 500

स्पष्टीकरण =
म =20000, द = 7, क = 3
व्याज = ?
व्याज = (म x द  x क)x 100
= (20000 x 7 x 5) : 100
व्याज = 7000 रु.
पर्याय क्र. 3 बरोबर
—————————————————--
नमुना प्रश्न :

(1) दसादशे 8 दराने 5000 रु. मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती?
(1) 1200
(2) 1400
(3) 1250
(4) 1120
——————————————————
(2) एका बॅँकेमध्ये 12500 रुपयांचे 4 वर्षात 15500 होतात, तर व्याजाचा दर किती?
(1) 3 %
(2) 4 %
(3) 5 %
(4) 6%
————————————————
(3) दसादशे 12 दराने 5000 रुपयांचे अडीच वर्षाचे व्याज किती?
(1) 150
(2) 1500
(3) 750
(4) 1200
————————————————--
(4) 10 दराने एका रकमेचे किती वर्षात दामदुप्पट होईल?
(1) 5
(2) 10
(3) 20
(4) 3
————————————————--
(5) अनिलने दसादशे 12 दराने 5000 रु. मुद्दल कर्जाऊ घेतले, तर 3 वर्षांनी त्याला किती सरळव्याज द्यावे लागेल?
(1) 600
(2) 1800
(3) 1200
(4) 1506
————————————————
(6) मुद्दल 8500 रु. व व्याज 1200 रु. असल्यास रास किती?
(1) 9700
(2) 9000
(3) 9500
(4) 9200
———————————————
(7) दसादशे 12 दराने 4000 रुपयांचे किती वर्षात 1440 रु. सरळव्याज होईल?
(1) 3
(2) 2
(3) 4
(4) 1
——————————————--
(8) दसादशे 13 दराने 4000 रु. मुद्दलाचे दोन वर्षाचे सरळव्याज किती होईल?
(1) 520
(2) 1040
(3) 1400
(4) 1080
———————————————
(9) दसादशे काही दराने 3020 रुपयांचे 3 वर्षांचे सरळव्याज 1080 रु. होते, तर व्याजाचा दर किती ?
(1) 36
(2) 24
(3) 12
(4) 18
———————————————--
(10) एक रकमेची रास 6300 रु व व्याज 540 रु आहे, तर मुद्दल किती?
(1) 5700
(2) 5760
(3) 5707
(4) 6940
—————————————————————
—————————————————————
उत्तर सूची :
(1) 1
(2) 4
(3) 2
(4) 2
(5) 2
(6)1
(7) 3
(8) 2
(9) 3
(10) 2
——————————————

पोलिस भरती-खनिजद्रव्य त्याचे उपयोग व होणारे परिणाम

1. *फॉस्फरस* :   


स्त्रोत : अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या.

उपयोग : हाडे व स्नायू यांचे संवर्धन, ए.टी.पीची निर्मिती.

अभावी होणारे परिणाम : चयापचय क्रियेत अडथळे व हाडे ठिसुळ होतात.


2. *पोटॅशियम* :


स्त्रोत : सुकी फळे.

उपयोग : चेतापेशीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : चेतापेशीवर परिणाम होतो.


3. *कॅल्शियम* : 


स्त्रोत : तीळ व पालेभाज्या.

उपयोग : हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : हाडे कामकूवत व नरम होतात. तसेच ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.


4. *लोह* : 


स्त्रोत : हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी.

उपयोग : रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनचे पोषण, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणणे व प्रतिरोध संस्थेला मदत करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  


5. *तांबे* :


स्त्रोत : पालेभाज्या.

उपयोग : हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.


6. *सल्फर* :


उपयोग : प्रथिनांची निर्मिती करणे. अस्थी व नखे यांचे आरोग्य राखणे.

अभावी होणारे परिणाम : केस, हाडे कमकूवत होतात.


7. *फ्लोरिन* : 


उपयोग : दातांचे रक्षण करणे.

अभावी होणारे परिणाम : दंतक्षय होतो.


8. *सोडीयम* : 


उपयोग : रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे.

अभावी होणारे परिणाम : रक्तदाबावर परिणाम होतो.  


9. *आयोडीन* :   


उपयोग : थायराईड ग्रंथीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : गलगंड नावाचा आजार होतो.

भारतातील बेरोजगारी चे मोजमाप

✍मोजमाप करण्यासाठी तीन प्रमुख स्त्रोत आहेत.

1)दशवार्षिक जनगणनेचे अहवाल

2) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे अहवाल

3) रोजगार व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडील नोंदणीची आकडेवारी                       

✍यापैकी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेची आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे केली जातात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते.

🌹1)  नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा –
                        नित्य प्रमुख दर्जा या संकल्पनेत एका वर्षांमध्ये व्यक्ती अधिक काळासाठी आर्थिक कृतीशी संबंधित असतो. त्यामध्ये 365 दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी जे व्यक्ती आर्थिक कामात गुंतलेले असतात. ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे समजले जाते.
                या 365 दिवसांमध्ये एखादी दुय्यम आर्थिक कृती त्या व्यक्तींनी केली तर तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ही दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचे मानले जाते. या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून नित्य प्रमुख व दुय्यम दर्जाच्या ठरवला जातो. भारतातील बेरोजगारी

🌹2)  चालू आठवडी दर्जा –
                        सात दिवसांच्या कालावधीमधील एका व्यक्तीच्या आर्थिक कृतींचा समावेश चालू आठवडी किंवा साप्ताहिक दर्जा यामध्ये होतो. सात दिवसांच्या कालावधीमध्ये एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारी समजले जाते.

🌹3)  चालू दैनिक दर्जा –
                    चालू दैनिक दर्जाच्या या पद्धतीमध्ये व्यक्ती दररोज आर्थिक कृतीमध्ये किमान चार तास काम करणे आवश्यक असते. याच्या आधारावर ती चालू दैनिक दर्जा काढला जातो.

मुद्रा बँक योजना1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.


2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.


3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.


4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.


5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.


6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.


7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.


8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :


शिशु गट

   

10,000 ते रु. 50,000

किशोर गट


50,000ते 5 लक्ष

तरुण गट


5 लक्ष ते 10 लक्ष


9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.


10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

______________________________________

सामान्य विज्ञान & पर्यावरण

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.


2) अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.


3) अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.


4) अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.


5) अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.


6) अक्रा – घाना या देशाची राजधानी.


7) अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.


8) अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.


9) अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.


10) अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी


11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.


12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.


13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.


14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.


15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.


16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.


17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.


18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.


19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.


20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.


21) अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.


22) अबुजा – नायजेरियाची राजधानी.


23) अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.


24) अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.


25) अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.


26) अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.


27) अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.


28) अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.


29) अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.


30) अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.


31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.


32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.


33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.


34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.


35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.


36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.


37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.


38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.


39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.


40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.


41) अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.


42) अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.


43) अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.


44) अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.


45) अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.


46) अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.


47) अहमदनगर – प्रसिद्ध साई शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.


48) अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.


49) आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.


50) आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.


10 डिसेंबर : ‘मानवाधिकार दिन’


युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स


● 1945 मध्ये संयुक्‍त राष्ट्रसंघटनेची स्थापना झाली.


●  मानवी हक्‍कासाठी आणि मानवाच्या प्रगतीसाठी कार्य सुरू झाले.


●  अखिल मानव जातीला शांततामय प्रगतिशील, उन्‍नत जीवन जगता यावे यासाठी 1948 मध्ये 58 देशांनी मानवी अधिकाराच्या प्रस्तावाला मान्यता दिली. 


● म्हणून 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवाधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. 


● मानवी व्यक्‍तिमत्त्वाची जन्मजात प्रतिष्ठा, योग्यता आणि स्त्री-पुरुषांचे समान हक्‍क तसेच मानवास भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, भय आणि अभावापासून मुक्‍ती अशी सर्वसाधारण लोकांची सर्वोच्च आकांक्षा शाबूत राहण्यासाठी संयुक्‍त राष्ट्राच्या परिषदेमध्ये 10 डिसेंबर 1948 रोजी ‘मानव अधिकारांची सार्वभौम घोषणा’ करण्यात आली.


●  यालाच आपण ‘युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स’ असे म्हणतो. या जाहीरनाम्यात एकूण 30 अनुच्छेद आहेत.


मानवी हक्‍क आयोगांची स्थापना


● 1992 मध्ये राष्ट्रकुल परिषदेने प्रत्येक देशामध्ये मानवी हक्‍कांच्या विकासासाठी मानवी हक्‍क आयोग सर्व राष्ट्रांमध्ये स्थापण्याची घोषणा केली. 


● आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर मानवी हक्‍क संरक्षण कायदा 1993 ला संमत झाला. या कायद्यान्वये 28 सप्टेेबर 1993 राष्ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची स्थापना करण्यात आली. 


● राज्य मानवी हक्‍क आयोगांची प्रत्येक राज्यांमध्ये स्थापना करण्यात येत आहे.


●  6 मार्च 2001 रोजी महाराष्ट्रात मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला. 


● लोकसेवकांना केवळ संविधानाच्या महादेशानुसारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रथेनुसार उचित प्रकारचे कर्तव्य बजावण्याची नवीन वैधानिक जबाबदारी त्यांच्यावर सोेपविली आहे. 


नियमावलीचे आव्हान


● बिगर शासकीय संघटनांच्या कामाने मानवी हक्‍क लोकप्रिय करण्यात फार मोठे योगदान दिले आहे.


●  मानवी हक्‍कांसंबंधी एकसमान नियमावली तयार करणे हे अजूनही आव्हानात्मक काम आहे. 


● पूर्वीपेक्षा मानवी हक्‍कभंगाचे प्रमाणही खूप वाढलले आहे. आशिया आणि आफ्रिकेच्या अनेक भागांत वांशिक शुद्धीकरण या प्रकाराने भयानक रूप धारण केेले आहेे.


●  अनेक प्रदेशांमध्ये फॅसिस्ट राजवटी अजूनही अस्तित्वात आहेत. अगदी विकसित समाजांच्या उपशहरी भागांमध्येही वांशिक भेदभाव जोपासला जात आहेे.


●  श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या सदस्यांनी नव्या शतकासाठीची विकास उद्दिष्टे स्पष्ट केलेली असली तरी दारिद्र्याचे निर्मूलन करणे अजूनही शक्य झालेले नाही. 


● सन 1993 च्या मानवी हक्‍कांवरील व्हिएन्‍ना जागतिक परिषदेने आपल्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थांचा विचार न करता मानवी हक्‍कांचे संवर्धन आणि जतन हे सर्व राज्यांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट केले. 


हक्‍कांबद्दलच्या जाणिवांमध्येही वाढ 


● मानवी हक्‍कांच्या वैश्‍विक जाहीरनाम्यातील ‘सर्व लोकांसाठी समान नियम’ हे ध्येय अजूनही सत्यात न उतरलेले एक स्वप्न आहे.


●  मानवी हक्‍कांच्या संवर्धन आणि संरक्षणातील संयुक्‍त राष्ट्रांच्या कृतींची भूमिका आणि व्याप्‍ती या दोन्हींमध्ये गेल्या सहा दशकांमध्ये प्रचंड विस्तार झाला आहे. 


● हक्‍कांबद्दलच्या जाणिवांमध्येही मोठी वाढ झाली आहेे. फार मोठ्या संख्येने व्यक्‍ती, संख्या, अभिकरणे तसेच राज्ये या कामात गुंतली आहेत. 


● संयुक्‍त राष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नांखाली स्वीकारार्ह अशा राष्ट्रीय वर्तवणुकीचे जागतिक परिमाण निश्‍चित झाले आहे. 


● मानवी हक्‍क आणि मूलभूत स्वातंत्र्य प्राप्त व्हावीत म्हणून सक्रिय आणि पाठिंबादर्शक भूमिका आपण पार पाडली पाहिजे, असे राज्यांना वाटू लागले आहे.

महत्त्वाच्या दऱ्या


🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे. 


🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

 

🚣🏻कलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.


🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.


🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

 हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते. 

छोटा नागपूरचे पठार

-बाघेलखंड पठाराच्या पूर्वेला खनिज संपत्तीने समृद्ध छोटा नागपूरचे पठार आहे

-छोटा नागपूर पठाराची सरासरी उंची सातशे मीटर असून येथे प्राचीन अशा गोंडवाना भूमीच्या काळातील निर्माण झालेल्या खडकातील उच्च प्रतीचा कोळसा क्षेत्र म्हणून छोटा नागपूर पठार याचा उल्लेख करता येईल

-या भागात दगडी कोळसा, अभ्रक, लोह खनिज, बॉक्साइट इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात

-छोटा नागपूर पठार हे वेगवेगळ्या स्तरावर असणाऱ्या पठारांची एक स्तररचना आहे

-या पठाराचा पृष्ठभाग सपाट असून मध्यभागावर कमी उंचीच्या गोलाकार टेकड्या आहेत

-विद्यांचलचा बहुतांश भाग मध्य प्रदेशात असून त्याच्या पूर्वेला असणाऱ्या छोटा नागपूर पठार याचा विस्तार झारखंड ,छत्तीसगड ,ओरिसा ,पश्‍चिम बंगाल या राज्यात झालेला आहे

-छोटा नागपूर पठार यात कमी अधिक उंचीच्या अनेक पठाराचा समावेश होतो ,ज्यामध्ये हजारीबाग पठार ,कोडर्मा पठार, रांची पठार यांचाही समावेश होतो

-छोटा नागपूर पठारावरील डोंगररांगा मधील सर्वोच्च शिखर पारसनाथ असून त्याची उंची १३६६ मीटर आहे

-या पठारावर केंद्रत्यागी जलप्रणालीविकसित झाली असून दामोदर नदी या प्रदेशातून खचदरीतून वाहणारी प्रमुख नदी आहे

-याच प्रमाणे सुवर्णरेखा, कोयल ,दामोदर, ब्राह्मणी याही नद्या या पठारावरून वाहतात

उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाबद्दल महत्त्वाची माहिती


1️⃣ टरान्स हिमालय =

 यालाच तिबेट हिमालय देखील म्हणतात.

यात पामिरचे पठार हा सर्वात उंचीवरील पठारी प्रदेश येतो.

भारतातील लडाख पठारी प्रदेश या भागात येतो.

यात खालील रांगा येतात

1) काराकोरम पर्वतरांग =जम्मू काश्मीर च्या उत्तरेला

यात k2 शिखर - 8611 मी उंच(भारतातील सर्वात उंच व जगातील दुसरे सर्वात उंच) 

2) लडाख पर्वतरांग =थंड वाळवंट म्हणून ओळख

येथे भारतातील सर्वात खोल दरी बुंझी दरी(5200 मी)

3) कैलास पर्वतरांग =याच्या उत्तर उतारावरून सिंधू नदी उगम पावते

4) झास्कर पर्वतरांग =लडाख च्या दक्षिणेस


2️⃣ बहद हिमालय =यालाच ग्रेटर हिमालय किंवा हिमद्री म्हणतात.

इतर रंगांच्या तुलनेत सलग व सर्वात उंच आहे.

विस्तार हा नंगा पर्वत पासून ते नमचा बरवा पर्यंत आहे.

यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848.86 मी) आहे.

यात जोझिला, नाथुला, सिप्किला या खिंडी आहेत.


3️⃣ लसर हिमालय = यास मध्य हिमालय देखील म्हणतात.

उत्तरेकडील इतर मंद आहे तर दक्षिणेकडील इतर तीव्र स्वरूपाचा आहे.

उताराच्या भागावर गवताची कुरणे असून त्यांना जम्मू काश्मीर मध्ये मर्ग असे म्हणतात(गुलमर्ग, सोनमर्ग) तर उत्तराखंड मध्ये बुग्याल व पयार म्हणतात.

यात पिरपांजल व धौलाधर पर्वतरांग आहेत.


4️⃣ शिवालिक टेकड्या = यास बाह्य हिमालय देखील म्हणतात.

लेसर हिमालय व शिवालिक टेकड्या यांमध्ये सखल तळ असणारा कमी रुंदीचा दरिसारखा भाग आहे त्यास डुंस असे म्हणतात.


5️⃣ पर्वांचल हिमालय = भारताच्या अती पूर्वेकडील भागात म्यानमार सीमेलगत उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत.

यामध्ये डाफला, मिरी, अभोर, मिश्मी,पत्कोई, नागा, मणिपूर, मिझो, त्रिपुरा, गरो, खासी, जयांतिया या टेकड्यांच्या समावेश होतो.📌 हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण


1️⃣ जम्मू काश्मीर हिमालय अथवा पंजाब हिमालय =

याचा विस्तार सिंधू ते सतलज नदीपर्यंत

लांबी 700 किमी 

यात झास्कार, लडाख, काराकोरम, पिरपंजाल, धौलाधर या पर्वतरांगांच्या समावेश होतो.

यात k2 शिखर = 8611 मी आणि नंगा पर्वत = 8126 मी आहेत.


2️⃣ कमाऊँ हिमालय अथवा गढवाल हिमालय =

विस्तार सतलज ते काली नदीपर्यंत 

लांबी 320 किमी

यात केदारनाथ=6940 मी, बद्रीनाथ= 8138 मी, गंगोत्री=6614 मी, यमुनोत्री पर्वत आहेत.

या प्रदेशात देवभूमी म्हणूनही ओळखले जाते.

इथून गंगा(अलकनंदा + भागीरथी) नदी उगम पावते.


3️⃣ नपाल हिमालय =

विस्तार कली ते तिस्ता नदिदरम्यान

लांबी 800 किमी

हिमालयातील सर्वोच्च शिखरे यात आहेत

माऊंट एव्हरेस्ट -8848.86 मी, कंचनजुंगा- 8598 मी

मकालू-8481 मी, धावळगिरी- 8172


4️⃣ आसाम हिमालय =

विस्तार तिस्ता ते ब्रम्हपुत्रा नदिदरम्याना

लांबी 720 किमी

दक्षिण उतार तीव्र आणि उत्तर उतार मंद आहे.

प्रमुख शिखर नामचा बरवा -7758 मी📌 हिमालयातील प्रमुख पर्वत शिखरे क्रमाने

माऊंट एव्हरेस्ट - 8848.86 मी

K 2 -8611मी

कंचनजुंगा - 8598 मी

मकालू - 8481 मी

धावलगिरी - 8167 मी

नंगा पर्वत - 8126

अन्नपूर्णा - 8091 मी

नंदादेवी - 7817 मी

नामचाबरवा - 7758 मी📌 हिमालयातील प्रमुख खिंडी


बनिहाल - जम्मू ते श्रीनगर

चांग ला - लडाख ते तिबेट 

पिरपंजाल - जम्मू ते श्रीनगर 

काराकोरम - लडाख ते चीन

झोझी ला - श्रीनगर ते कारगिल   

बार ला चा - मनाली ते लेह

सिपकीला - हिमाचल ते तिबेट

रोहतांग - कुलू ते लेह

लीपुलेख - मानसरोवर ला जाण्याचा मार्ग

नथुला - भारत ते चीन

दिहांग - अरुणाचल ते म्यानमार

लिखापानी - अरुणाचल ते म्यानमार

असहकार आणि खिलाफत आंदोलन

·         गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर 1920 मध्ये सुरु केले.

·         पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते.

·         गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली. सरकारमान्य शाळा महाविद्यालये, कोर्टकचेर्‍या, विधिमंडळे व परदेशी कापडहयांवर बहिष्कार घालण्याचा व सरकारने दिलेल्या पदव्या किताबांचा त्याग करण्याचा जनतेला आदेश देण्यात आला.

·         नंतर सरकारी नोकर्‍याचे राजिनामे आणि करबंदी सुरु करुन या आंदोलनाला जनतेच्या सत्याग्रहाचे स्वरुप देण्याचा कार्या होता. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. स्वहस्ते सूत कातून खादी तयार करण्याचे, अस्पृश्यता न पाळण्याचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे संवर्धन करुन ते टिकविण्याचे जनतेला आदेश देण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या.

·         काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.

·         या पहिल्या जनआंदोलनास 1920 ते 1922 दरम्यान अभूतपर्व स्वरुप प्राप्त झाले. लाखो विद्याथ्र्यांनी शाळा महाविद्यालये सोडली. शेकडो वकिलांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली.

·         परदेशी कापडावरील बहिष्कार हे एक जनआंदोलन बनले व परदेशी कापडाच्या हजारो होळयांनी भारतीय नभोमंडळ उजळून गेले.

·         परदेशी कापड विकणार्‍या व दारुच्या दुकानांवरील निरोधनाचा कार्याही विशेष यशस्वी ठरला.

·         या आंदोलनात अनेक विभागांत कामगार आणि शेतकरी आघाडीवर होते. तरीही गांधीजी संतुष्ट नव्हते.

·         ता. 5 फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.

·         तीन हजार शेतकर्‍यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत 22 पोलिस ठार झाले.

·         गांधीजींनी हया प्रकाराची विशेष गांभीर्याने दखल घेतली व अहिंसात्मक चळवळीची जनतेला अद्याप योग्य शिकवण मिळाली नाही, असे वाटून त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेतले. मात्र या चळवळीचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहणारे होते.

(1) त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्‍या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्‍यांत काम करणार्‍या नोकरवर्गाचाही समावेश होता. स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्‍यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले.

(2) भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्‍या देशाच्या बाबतीत असेच घडले.

(3) या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृज्ञ्ल्त्;ाीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. १९२० मध्येच त्यांनी म्हटले होते की, ज्ञ्थ्ुेत्;भिरुता की हिंसा एवढाच पर्याय असेल तर खुशाल हिंसाचाराचा अवलंब करा असाच मी सल्ला देईन, भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.

·         असहकार चळवळीचा अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे हिंदी जनतेचा आत्मविश्र्वास आणि स्वाभिमान फार मोठया प्रमाणात वाढला.

·         आता भारतीय जनतेचे साम्राज्यशाहीशी युध्दच सुरु झाले होते.

·         एखाद्या लढाईत तात्पुरता पराभव पत्करावा लागला तरी आपल्या ध्येयाकडील वाटचालीपासून आता कोणीही तिला विचलित करु शकणार नव्हते.

·         ता. 23 फेब्रुवारी 1922 ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे.

·         1920 मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे.

·         मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो अथवा स्वातंत्र्ययुध्दाच्या दिवसांत ब्रिटिशांच्या प्रतिनिधींनी जो वर्णनातील धुमाकूळ घातला तसा ते नव्या जोमाने घालोत वा न घालोत, संग्राम चालूच राहील.

गांधी युगाचा उदयसत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

दर वर्षी 1 प्रश्न Fix असतोच नक्की वाचा, एवढ्या माहितीमुळे तुमचा 1 मार्क वाढेल

     

               🔊🌸🔰 धवनी 🔰🌸🔊


‘🔊 धवनी म्हणजे ऐकण्याची संवेदना 👂


🔰 धवनीचे स्वरूप : ‘ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.


🔰 धवनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


🔰 परत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


🌷🌷कपन 🌷🌷


🔰 वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


🔰 उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने


🔰 धवनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


🔰 वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


🔰 धवनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


🔰 धवनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


🔰 परत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.


🌷🌷धवनी तरंगाची वैशिष्ट्ये :🌷🌷


🔰 जव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


🌷🌷सपीडने 🌷🌷


🔰 कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


👉🏻 सपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


🌷🌷विरलने 🌷🌷


🔰 कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


👉🏻 विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


🔰 दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


👉🏻 तयाचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


🌷🌷वारंवारता :🌷🌷


🔰 घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


🔰 एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


👉🏻 धवनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


👉🏻 तयाचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


🌷🌷तरंगकाल :🌷🌷


🔰 लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘तरंगकाल’ होय.


🔰 माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


👉🏻 तो ‘T‘ ने दर्शविला जातो.


👉🏻 SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


👉🏻 u=1/t


🌷🌷धवनीचा वेग :🌷🌷


🔰 तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


👉🏻 वग = अंतर/काल


👉🏻 एका तरंगकालात कापलेले अंतर,


👉🏻 वग = तरंगलांबी/तरंगकाल


👉🏻 वग = वारंवारता*तरंगलांबी


🌷🌷मानवी श्रवण मर्यादा :🌷🌷


🔰 मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


🔰 पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.


🌷🌷शरव्यातील ध्वनी :🌷🌷


🔰 20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


🔰 निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


👉🏻 उपयोग :


🔰 जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.


🌷🌷धवनीचे परिवर्तन :🌷🌷


🔰 धवनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


🔰 धवनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


🌷🌷परतिध्वनी :🌷🌷


🔰 मल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


👉🏻 अतर = वेग*काल


🌷🌷निनाद :🌷🌷


🔰 एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.


🌷🌷सोनार (SONAR):🌷🌷


🔰 Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


🔰 पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.


जालियनवाला बाग हत्याकांड :

लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले.भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली.इ.स. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.🔶सुरवातीचे सत्याग्रह :-


भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला.

दक्षिण आफ़्रिकेतून परत आल्यानंतर 1917 साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले.त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग 1918 साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.


🔶जालियनवाला बाग हत्याकांड :-


पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.


या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.


कुका आंदोलन

√ पंजाब प्रांतातील एक प्रसिद्ध चळवळ.
या आंदोलनास कुका चळवळ, नामधारी चळवळ, नामधारी शीख आंदोलन या नावांनीही संबोधले जाते.

√  १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाब प्रांतामध्ये देशभक्ती व क्रांतिकारी भावना जागविण्याचे कार्य या आंदोलनाच्या माध्यमातून झाले.

√ शीख धर्मनेते भाई बालकसिंह (१७८४–१८६२) यांचे शिष्य भाई रामसिंह कुका (१८१६–१८८५) हे या आंदोलनाचे मुख्य प्रणेते.

√  ब्रिटिशांनी पंजाबची २१ प्रांतांत विभागणी केली व त्यांचे अन्यायकारक रीत्या ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरण करून प्रत्येक प्रांतावर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

√  ब्रिटिश सरकारच्या पंजाब विलीनीकरण धोरणामुळे पंजाब प्रांतातील शेतकरी, कष्टकरी व कारागीर यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

√  तसेच ब्रिटिशांनी भाई रामसिंह यांच्या पत्नी राणी जिंदा (१८१७–१८६३), दिवाण मूलराज (१८१४–१८५१), भाई महाराजसिंह (मृत्यू १८५६), महाराजा दिलीपसिंह (१८३८–१८९३) यांना दिलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे व गोवधबंदी उठविल्यामुळे भाई रामसिंह यांच्या मनात ब्रिटिशविरोधी असंतोष वाढत गेला.

√   त्यांनी आपल्या अनुयायांना पांढरी पगडी, पांढरी वेशभूषा, पांढऱ्या लोकरीपासून तयार केलेले कपडे व स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची शिकवण दिली.

√  लग्नसोहळ्यातील हुंडाप्रथा व अनावश्यक खर्च टाळण्यास, तसेच भ्रूणहत्या (कन्यावध) बंदी करण्यासाठी समाजप्रबोधन केले.

√  सरकारी शाळा, न्यायव्यवस्था, रेल्वे, डाकव्यवस्था यांवर बहिष्कार घालून भाई रामसिंह यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार पुकारला; परंतु ब्रिटिश सरकार, रूढी-परंपरावादी लोक, ख्रिश्चन धर्मप्रचारक व काही मुस्लिमांना त्यांचे शांततापूर्ण असहकार धोरण धोकादायक वाटू लागले.

√  त्यामुळे ब्रिटिश सरकारने भाई रामसिंह यांना इ. स. १८६३ मध्ये भैणी या गावात नजरकैद केले.

√  पंजाब प्रांतात ब्रिटिश शासनाच्या स्थापनेपासून गोहत्यांच्या घटनांत वाढ झाली. त्यामुळे कुकांनी एप्रिल १८७१ पासून गोवध करणाऱ्या कत्तलखान्यांवर आक्रमकपणे आंदोलनास सुरुवात केली. रामपूर मलौध दुर्ग येथे गोहत्या प्रश्नावर कुका आंदोलकांनी संघर्ष केला.

√  १५ जानेवारी १८७२ रोजी मलेरकोटला रियासतमधील गोवध करणाऱ्या कत्तलखान्यावर कुका आंदोलकांनी हल्ला केला. यावेळी लुधियानाचे ब्रिटिश आयुक्त कांबन यांनी ६८ निःशस्त्र कुका आंदोलकांना अटक करून ५० आंदोलकाना तोफेच्या तोंडी दिले.

√  यांमध्ये १३ वर्षांचा एक बालक बिशनसिंहही होता. दुसऱ्या दिवशी इतर कुका आंदोलकांना फाशी देण्यात आली. एकाच वेळी ६८ कुका आंदोलकांचे बलिदान ही भारतीय स्वातंत्र्यसंग्राम इतिहासातील अद्भुत घटना होती.

√  ब्रिटिश सरकारने कुका आंदोलकांचे प्रणेते भाई रामसिंह यांना भारतातून हद्दपार करून बर्मा (ब्रह्मदेश) येथे पाठविले. तेथेच त्यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही कुका आंदोलन चालूच राहिले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...