Friday 9 December 2022

जालियनवाला बाग हत्याकांड :

लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले.भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली.इ.स. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.



🔶सुरवातीचे सत्याग्रह :-


भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला.

दक्षिण आफ़्रिकेतून परत आल्यानंतर 1917 साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले.त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग 1918 साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.


🔶जालियनवाला बाग हत्याकांड :-


पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.


या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...