Friday 9 December 2022

कुका आंदोलन

√ पंजाब प्रांतातील एक प्रसिद्ध चळवळ.
या आंदोलनास कुका चळवळ, नामधारी चळवळ, नामधारी शीख आंदोलन या नावांनीही संबोधले जाते.

√  १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाब प्रांतामध्ये देशभक्ती व क्रांतिकारी भावना जागविण्याचे कार्य या आंदोलनाच्या माध्यमातून झाले.

√ शीख धर्मनेते भाई बालकसिंह (१७८४–१८६२) यांचे शिष्य भाई रामसिंह कुका (१८१६–१८८५) हे या आंदोलनाचे मुख्य प्रणेते.

√  ब्रिटिशांनी पंजाबची २१ प्रांतांत विभागणी केली व त्यांचे अन्यायकारक रीत्या ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरण करून प्रत्येक प्रांतावर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

√  ब्रिटिश सरकारच्या पंजाब विलीनीकरण धोरणामुळे पंजाब प्रांतातील शेतकरी, कष्टकरी व कारागीर यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

√  तसेच ब्रिटिशांनी भाई रामसिंह यांच्या पत्नी राणी जिंदा (१८१७–१८६३), दिवाण मूलराज (१८१४–१८५१), भाई महाराजसिंह (मृत्यू १८५६), महाराजा दिलीपसिंह (१८३८–१८९३) यांना दिलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे व गोवधबंदी उठविल्यामुळे भाई रामसिंह यांच्या मनात ब्रिटिशविरोधी असंतोष वाढत गेला.

√   त्यांनी आपल्या अनुयायांना पांढरी पगडी, पांढरी वेशभूषा, पांढऱ्या लोकरीपासून तयार केलेले कपडे व स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची शिकवण दिली.

√  लग्नसोहळ्यातील हुंडाप्रथा व अनावश्यक खर्च टाळण्यास, तसेच भ्रूणहत्या (कन्यावध) बंदी करण्यासाठी समाजप्रबोधन केले.

√  सरकारी शाळा, न्यायव्यवस्था, रेल्वे, डाकव्यवस्था यांवर बहिष्कार घालून भाई रामसिंह यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार पुकारला; परंतु ब्रिटिश सरकार, रूढी-परंपरावादी लोक, ख्रिश्चन धर्मप्रचारक व काही मुस्लिमांना त्यांचे शांततापूर्ण असहकार धोरण धोकादायक वाटू लागले.

√  त्यामुळे ब्रिटिश सरकारने भाई रामसिंह यांना इ. स. १८६३ मध्ये भैणी या गावात नजरकैद केले.

√  पंजाब प्रांतात ब्रिटिश शासनाच्या स्थापनेपासून गोहत्यांच्या घटनांत वाढ झाली. त्यामुळे कुकांनी एप्रिल १८७१ पासून गोवध करणाऱ्या कत्तलखान्यांवर आक्रमकपणे आंदोलनास सुरुवात केली. रामपूर मलौध दुर्ग येथे गोहत्या प्रश्नावर कुका आंदोलकांनी संघर्ष केला.

√  १५ जानेवारी १८७२ रोजी मलेरकोटला रियासतमधील गोवध करणाऱ्या कत्तलखान्यावर कुका आंदोलकांनी हल्ला केला. यावेळी लुधियानाचे ब्रिटिश आयुक्त कांबन यांनी ६८ निःशस्त्र कुका आंदोलकांना अटक करून ५० आंदोलकाना तोफेच्या तोंडी दिले.

√  यांमध्ये १३ वर्षांचा एक बालक बिशनसिंहही होता. दुसऱ्या दिवशी इतर कुका आंदोलकांना फाशी देण्यात आली. एकाच वेळी ६८ कुका आंदोलकांचे बलिदान ही भारतीय स्वातंत्र्यसंग्राम इतिहासातील अद्भुत घटना होती.

√  ब्रिटिश सरकारने कुका आंदोलकांचे प्रणेते भाई रामसिंह यांना भारतातून हद्दपार करून बर्मा (ब्रह्मदेश) येथे पाठविले. तेथेच त्यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही कुका आंदोलन चालूच राहिले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...