Wednesday 21 October 2020

महाराष्ट्रातील मुख्य संस्था


1. सत्यशोधक समाज

- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे

- संस्थापक: महात्मा फुले 

- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी


2. प्रार्थना समाज

- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 

- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 

- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.


3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)

- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 

- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)

- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी


4. आर्य समाज

- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 

- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती 

भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2019 -20👉 दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षण जाहिर करतात


👉 कष्णमूर्ती सुब्रम्हण्यम यांनी दुसऱ्यांदा आर्थिक पाहणी अहवाल जाहिर केला


👉 1950 -51 मध्ये पहिला आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. 1964

पर्यन्त केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबर आर्थिक पाहणी प्रकाशित करण्यात येते. 1964 पासून मात्र अर्थसंकल्पापासून विभक्त करण्यात आले


👉 अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग आर्थिक सर्वेक्षण तयार करते


👉 दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण जाहिर केले जावे असे कोणतेही घटनात्मक बंधन सरकारवर नाही.


👉 थीम-: 【 Enable Markets, Promote 'pro business' Policies and Strengthen 'Trust' in the Economy】


---------------------------------------------------


【GDP वृद्धिदर (स्थिर किंमतीला)】


👉 2016 - 17  -------------------- 8.2%


👉 2017- 18  --------------------- 7.2%


👉 2018 -19*  -------------------- 6.8%


👉 2019 - 20**------------------- 5.0 %


👉 2020 - 21# ------------------- 6%


(* तात्पुरते,  पाहिले अगाऊ अंदाज, *# अंदाजित)


---------------------------------------------------


  【 कृषी आणि संलग्न क्षेत्रातील वृद्धि】


👉 2017 - 18 --------------------- 5.0%


👉 2018-19* ---------------------- 2.9%


👉 2019- 20 ------------------- 2.8%


---------------------------------------------------


   【औद्योगिक क्षेत्रातील वृद्धिदर】-:


👉 2017 - 18 ---------------------- 5.9%


👉 2018-19* ---------------------- 6.9%


👉 2019-20** -------------------- 2.5%


---------------------------------------------------


  【सेवा क्षेत्रातील वृद्धिदर】-:


👉 2017- 18 ---------------------- 8.1%


👉 2018-19* ---------------------- 7.5%


👉 2019-20** --------------------- 6.9%


---------------------------------------------------


【 राजकोषिय तूट】 -:


👉 2017 -18 ----------------------- 3.5%


👉 2018-19 ------------------------ 3.4%


👉 2019-20 ------------------------ 3.3%【प्राथमिक तूट】-:


👉 2017-18 ----------------------- 2.6%


👉 2018-19 ----------------------- 2.4%


👉2019-20 ------------------------ 2.3%


---------------------------------------------------

      

【 भारताचे पहिले 5 व्यापारी भागीदार देश】-:


1 चीन

2 अमेरिका

3 संयुक्त अरब अमिराती

4 सौदी अरेबिया

5 हाँग कॉंग


👉 भारताचा व्यापार आधिक्य -:


1 अमेरिका  2 संयुक्त अरब अमिराती


👉 भारताची व्यापार तूट-:

1 चीन  2 सौदी अरेबिया 3 इराक 

4 जर्मनी【पहिल्या 5 निर्यात वस्तु】-:


1 पेट्रोलियम पदार्थ (13.7%)

2 मोती व मौल्यवान खड़े (7%)

3 औषधी उत्पादन (5%)

4 सोने व इतर धातूंची दागिने (4.5%)

5 लोह व पोलाद (3.0%)


【पहिल्या 5 आयात वस्तु】-:


1 कच्चे तेल ( 21%)

2 सोने (6.4%)

3 पेट्रोलियम पदार्थ(5.6%)

4 कोळसा व कोक (4.8%)

5 मोती व मौल्यवान (4.6%)


MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी सूचना

 MPSC Prelims पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला . यानंतर सर्वांच्या मनात सगळ्यात पहिले प्रश्न आला आता परीक्षा कधी होईल?


बघा या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.पण या स्थितीत आपण काय करावे याचा विचार करू..

1. अनेकांनी अभ्यास बंद केलाय तो लगेच सुरू करायला पाहिजे.

2.परीक्षा कधीही झाली तरी आपण पास झालो पाहिजे, हा आपला दृष्टिकोन पाहिजे.

3.ज्या विद्यार्थी मित्रांचा Prelims चा अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांनी आता Mains चा वेगळा असलेला अभ्यास करावा. उदा. HR. HRD इ.

4.दुसरा पर्याय असा आहे की Prelims आणि Mains ला समान असलेले विषय करावेत.

 उदा. आधुनिक भारत, भूगोल, राज्यघटना इत्यादी.

5. दररोज 2 तास CSAT चालू ठेवावे.

6.Revision, MCQs सोडविण्यावर भर द्यावा.

7.ज्या मित्रांचा अभ्यास झाला नाही त्यांनी आपले कोणते विषय कमकुवत आहेत त्यावर लक्ष द्यावे.


मित्रहो, कोणीही अभ्यास बंद करू नका. हवं तर एक,दोन दिवस विश्रांती घ्या आणि परत जोरात अभ्यासाला लागा. हा काळ मेहनतीचा आहे,आपल्या अभ्यासात improvement करण्याचा आहे.


ग्रहांविषयी महत्त्वाची माहितीसर्वात मोठा ग्रह - गुरु


सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह-  बुध


पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस


 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन-  बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून


सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र


लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह-  मंगळ


सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.


 पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस 


सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु 


सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र 


सूर्यापासून अंतरानुसार ग्रह-  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून


आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.


** पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम -  शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

भारतीय वायु सेना दिवस


◾️ सथापना 8 ऑक्टोबर 1932


◾️ 88 वा स्थापनादिन 


◾️26वे वायुसेना प्रमुख:- आर के एस भदौरिया


◾️बरीद वाक्य:-  "नभ: स्पृशं दीप्तम्"


◾️सवतंत्रपूर्व रॉयल इंडियन एयरफोर्स होते


◾️अभियान:- ऑपरेशन मेघदूत

ऑपरेशन पुमलाई

ऑपरेशन पवन

ऑपरेशन कैक्टस

कारगिल युद्ध


◾️लड़ाऊ विमाने:- सुखोई-30 एमकेआइ, मिराज २०००, मिग-२९, मिग-२१, एचएएल तेजस, राफेल


◾️हलीकॉप्टर:- 

ध्रुव, चेतक, चीता, एमआई-८, एमआई-१७, एमआई-२६, एमआइ-२५/३५, एचएएल लाइट कॉम्बैट हैलीकॉप्टर, एचएएल रुद्र


◾️ परशिक्षक:- हॉक एमके १३२, ऍचजेटी-१६ किरण, पिलैटस सी-७ एमके द्वितीय


◾️परिवहन:- सी-१३०जे, सी-१७ ग्लोबमास्टर तृतीय, आईएल-७६, एन-३२, ऍचएस ७४८, डू २२८, बोइंग ७३७, ईआरजे १३५


◾️जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेवा आहे.


भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी🔸सचेता कृपलानी


- गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी 

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री 

- 1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना


🔸 मातीगिनी हाजरा


- Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध 

- चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग 


🔸 लक्ष्मी सेहगल


- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या Indian National Army मध्ये कॅप्टन

- झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व 

- दुसर्या महायुद्धात सहभाग


🔸कित्तूरची राणी चनम्मा


- कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी

- वयाच्या 33 व्या वर्षी 1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव


🔸कनकलता बारूआ


- आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध. 

- चले जाव (1942) चळवळीत सक्रीय सहभाग 

- वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद


🔸कमलादेवी चटोपाध्याय


- 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग

- परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला 

- कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार 

- अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग


🔸मादाम भिकाजी कामा


- लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या

- 1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला


🔸 अरूणा असफ अली


- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The Grand Old Lady म्हणून ओळख. 

- भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला .


💐💐💐💐💐💐

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"◾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


◾️कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

लॉर्ड डलहौसी

🔘कालावधी:-1848 ते 1856


✍️खल्या व्यापार चे तत्व आणले


✍️सिमला उन्हाळी राजधानी केली


✍️खलसाधोरण साठी प्रसिद्ध होता


☀️दत्तकविधान नामंजूर खालसा


🔘सातारा:-1848 🔘सबलपूर:-1849


🔘जतपुर:-1849 🔘बघाट:-1850


🔘उदयपूर:-1852 🔘झाशी:-1853


🔘नागपूर:-1854


🌻अतर्गत राज्यकारभार गोंधळ


👁‍🗨सिक्कीम:-1850


👁‍🗨अवध:-1856


👉1853:-बिनतारी संदेशवहन सुरू


👉1854:-पोस्ट खाते सुरू


✍️पहिले पोस्ट तिकीट कराची ला


🎯16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली


✍️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास


✍️1856:-धार्मिक आयोग्यत कायदा


🔘1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा


👉1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू


👉1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे


👉1853:-पहिली कापड गिरणी सुरू


☀️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध 


☀️1852:-इंग्रज ब्रम्ही युद्ध


गौतम बुद्ध : परिचय.

🧩 महामाया...

  🅾️या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व  गौतम बुद्धांच्या आई होत्या.


🧩राहुल...

🅾️हा यशोधरा व गौतम बुद्धांचा एकमेव पुत्र होता. राहुल बुद्ध संघात सामील होऊन भिक्खू बनला.


🧩 महाप्रजापती गौतमी ...

🅾️महाप्रजापती गौतमी या महामाया बहिण व कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या दुसऱ्या पत्नी व गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. नंतर या भिक्खूणी बनल्या.

गौतम बुद्ध : जन्म .

🅾️सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. 

🅾️लोक कथेनुसार शुद्धोदन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते.

🅾️ राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात.

 🅾️सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.💠💠

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.

गौतम बुद्ध : विवाह.

🅾️सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. 

🅾️धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.

 गौतम बुद्ध : ज्ञानप्राप्ती.

🅾️गहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली.

 🅾️आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. 

🅾️जञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

गौतम बुद्ध : परिनिर्वाण.

🅾️इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ हा भगवान गौतम बुद्धांचा कालावधी.

🅾️बद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

 🅾️जञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्रप्रवर्तन किंवा धम्मचक्कपवत्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला.

भारतातील सर्वात लांब.


1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  

 - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) 

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे.


  🧩भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव


1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 

3) काळे खंड - आफ्रिका 

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल करोनाचं संकट, शास्रज्ञांच्या समितीचा दावा.


🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल.


🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.


🔰सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे.


🔰सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.

ड्रॅगनला झटका, मलाबार युद्ध कवायतीसाठी भारताने जोडला एक नवा मित्र.🔰दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मित्र जोडला आहे. पूर्व लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा एक झटका आहे. कारण मलाबार नौदल कवायतीच्या निमित्ताने चीन विरोधात एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.


🔰आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे. नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.


🔰या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया काय असेल? याबद्दल थोडी चिंता होती. भारताप्रमाणेच चीनचे अमेरिका, जपान या देशांबरोबरही फारसे जमत नाही. ऑस्ट्रेलिया बरोबरही त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातील टोक्योमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटाची बैठक पार पडली.


🔰कवाड गटातील चारही देश चीनच्या विस्तारवादी आणि वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि व्यापारावरुन चीनचा अमेरिकेबरोबर वाद सुरु आहे. भारताबरोबर सीमावाद चालू आहे. “मलाबार कवायती २०२० ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे” असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी २००७ साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.

मक्तेदारीप्रकरणी गूगलविरुद्ध खटला.


🔰मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने गूगलविरुद्ध खटला दाखल केला आहे. ऑनलाइन शोध आणि जाहिरात यावरील वर्चस्वाचा स्पर्धेला मारक ठरेल असा गैरवापर केल्याचा आणि पर्यायाने ग्राहकांना हानी पोहोचविल्याचा गूगलवर आरोप आहे.


🔰निकोप स्पर्धा असावी यासाठी सरकारने दावा दाखल करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे. जवळपास २० वर्षांहूनही अधिक काळापूर्वी सरकारने मायक्रोसॉफ्टविरुद्धही दावा दाखल केला होता.


🔰सरकारकडून आणखीही काही कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून  गूगलविरुद्धची कारवाई ही सुरूवात असू शकते. सरकारने अ‍ॅपल, अमेझॉन आणि फेसबुक या कंपन्यांच्या तपासालाही न्याय विभाग आणि मध्यवर्ती व्यापार आयोगाला हिरवा कंदील दाखविला आहे.


🔰अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना दूर सारून गूगलने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली ती बाजारातील स्पर्धेसाठी हानिकारक आहे, असे अमेरिकेचे डय़ेपुटी अ‍ॅटर्नी जनरल जेफ रॉसन यांनी वार्ताहरांना सांगितले.

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती.


🔰करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.


🔰आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.


🔰करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं.

सर्वात प्रभावशाली देशांच्या ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यादीत भारत चौथ्या क्रमांकावर.


🔰सिडनी (ऑस्ट्रेलिया) शहरातल्या लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेनी ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ नामक एक अहवाल प्रकाशित केला आहे. 


🔰कलेल्या अभ्यासामध्ये आशिया-प्रशांत प्रदेशामधल्या सर्वात प्रभावशाली / सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


🔰जगातल्या प्रमुख देशांची आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, देशांतर्गत परिस्थिती, भविष्याचे नियोजन, जगातील इतर देशांसोबत असलेले संबंध, राजकीय व कूटनीतिक प्रभाव इत्यादी घटकांचा विचार करून दरवर्षी शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली जाते.


🔴ठळक बाबी...


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये भारत हा चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. भारताला 2020 साली 39.7 गुण मिळाले आहेत.


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये प्रथम तीन सर्वात प्रभावशाली देश (अनुक्रमे) - अमेरिका, चीन आणि जपान

आशिया प्रशांत प्रदेशामध्ये महामारीमुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या 18 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 


🔰महामारीमुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे, असे अहवालात म्हटले आहे.


🔰आशियातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारा भारत देश चांगली कामगिरी करणारा हिंद-प्रशांत प्रदेशातला मध्यम स्तरावरील देश आहे. भारताने राजनयिक प्रभावात दक्षिण कोरिया आणि रशियालाही मागे टाकले आहे.या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ 40 टक्केच पोहचू शकतो, तर 2019 आधी ही शक्यता 50 टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीची याचिका फेटाळली


🔰महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.


🔰दिल्लीस्थित सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्यासह तिघांची याचिका दाखल करून घेण्यास सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या पीठाने नकार दिला. भारताचे नागरिक या नात्याने आपल्याला संबंधित मागणीसाठी राष्ट्रपतींकडे जाण्याची मुभा आहे. राष्ट्रपतींकडे दाद मागावी, त्यासाठी न्यायालयात येऊ  नये, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले. अशा स्वरूपाची जनहित याचिका न्यायालय दाखल करून घेऊ  शकत नाही वा हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


🔰याचिककर्त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी तसेच, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील स्थावर मालमत्तेवरील कारवाईचा संदर्भ दिला होता. या दोन उदाहरणांच्या आधारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर, याचिकेत दिलेल्या संदर्भातील घटना फक्त मुंबईतील आहेत.


🔰तम्हाला महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे हे माहिती आहे का, असा प्रश्न सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना विचारला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात घटना आणि कायद्याचे पालन करणारी एकही गोष्ट राज्य सरकारने केली नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत


🔰उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.


🔰आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

1971 मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.


🔰रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी 38 ठिकाणे आहेत.


🔰दक्षिण आशियात भारताची एकूण 38 पाणथळ  ठिकाणे या यादीत आहेत.

जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र 20 कोटी हेक्टरचे आहे.


🔰भारताच्या 10 पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता.


🔰इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी.


🔰इटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.


🔴ठळक बाबी...


🔰शजारच्या नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्याही खाली भारताचे स्थान आहे.


🔰सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो.

देशातल्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहे.भारतातली 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. देशात लहान मुलांमध्ये खुंटलेल्या वाढीचे प्रमाण 37.4 टक्के आहे.

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...