Saturday 18 March 2023

ससंदीय लोकशाही



केंद्रात संसद (पार्लमेंट) द्विसदनी (लोकसभा व राज्यसभा) असून, ती लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची असते. लोकसभेत जास्तीतजास्त ५५० सदस्य असतात. हे सदस्य प्रौढ मतदानपद्धतीने निवडले जातात. त्यांपैकी ५२५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य घटक ज्यातून व २५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात. प्रत्येक राज्यात अनेक मतदारसंघ असतात आणि शक्यतो ते सारख्या लोकसंख्येचे केलेले असतात. राज्यसभेत बारा सदस्यांस वगळून बाकीचे सदस्य राज्यांच्या विधानसभांमार्फत निवडले जातात. हे बारा सदस्य राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतात; ते कला, साहित्य, शास्त्र किंवा समाजसेवा ह्या क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेले असावे लागतात. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. पाच वर्षांनी तिचे विसर्जन होते व पुन्हा निवडणूक होऊन तिची पुनर्रचना करण्यात येते. मात्र पंतप्रधानांना वाटल्यास ते राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन पाच वर्षांपेक्षा आधी करावयाचा सल्ला देऊ शकतात आणि मध्यावधी निवडणूक जाहीर करू शकतात. अशा प्रकारे दोन वेळा (१९७१ व १९७९) लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. तसेच ४२व्या संविधानदुरुस्तीने संसदीय लोकसभेची मुदत सहा वर्षांची करण्यात आली होती; परंतु ४४ व्या संविधान-दुरुस्तीने ती पूर्ववत पाच वर्षे केली. राज्यसभा विसर्जित होत नाही. मात्र तिचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होऊन त्या जागी नव्याने निवडलेले सदस्य येतात


प्रत्येक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य करावे लागते. ही मान्यता बहुमताने मिळते. जर एखादे विधेयक एका सभागृहाने संमत केले असेल आणि त्याला दुसऱ्या सभागृहाची मान्यता नसेल, तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावून ते विधेयक मान्य करून घेता येते. अर्थविषयक विधेयकाबाबत मात्र राज्यसभेला केवळ आपले नकारार्थी मत व्यक्त करता येते; पण हे मत लोकसभेने मानलेच पाहिजे, असे नाही. लोकसभेच्या अध्यक्षपदी सभापती (स्पीकर) असतो. त्याची निवड  बहुमताने लोकसभा करते. राज्यसभेच्या अध्यक्षपदी उपराष्ट्रपती असतो.


लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळ बनवण्यासाठी राष्ट्रपती पाचारण करतात. तो नेता-पंतप्रधान-व इतर मंत्री संसदेच्या कुठल्या तरी सभागृहाचे सदस्य असावेच लागतात. तसे ते नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यांस निवडून वा निमित्त होऊन यावे लागते. पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तपणे संसदेला जबाबदार असतात. जोपर्यंत लोकसभेत त्यांचे बहुमत आहे, तोपर्यंत त्यांना अधिकारात राहता येते. त्यांच्या विरुद्ध जर अविश्वासाचा ठराव संमत झाला, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. हे बहुमत त्या नेत्याचा राजकीय पक्ष बहुमतात असल्यामुळे असेल किंवा त्यास त्याचा व इतर पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे असेल. संविधानात ‘राजकीय पक्ष’ हे शब्द नाहीत.


केंद्र शासनाचे सर्वोच्चपद राष्ट्रपतींचे असून त्यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य व राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य करतात. प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ठरवताना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या मतांचे मूल्य सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतांइतके होईल व राज्यांचे मतबल समान असेल, ह्या तत्त्वांवर ठरवण्यात येते. थोडक्यात राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रामणीय मताद्वारे घेतली जाते आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्तमतदानपद्धतीने होते. राष्ट्रपतींची मुदत अधिकारग्रहणानंतर पाच वर्षांची असते. मात्र त्यांना पुन्हा निवडणुकीस उभे राहता येते. राष्ट्रपतिपदासाठी उभा असलेला उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे; त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण आणि त्याच्यात लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास लागणारी क्षमता असायला हवी. तसेच तो शासनाच्या नियंत्रणाखालील कुठल्याही पगारी अगर मानधन मिळणाऱ्या जागेवर नसावा. अशा जागेवर तो असल्यास निवडणुकीपूर्वी त्याने त्या पदाचा त्याग करावा; मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र वा राज्य सरकारातील मंत्रिपद ह्या जागेवर असलेल्या व्यक्तीस निवडणुकीस उभे राहण्यास हरकत नाही. याच अटी उपराष्ट्रपतिपदासही लागू आहेत.


उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष व राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत किंवा काही कारणाने राष्ट्रपती गैरहजर असल्यास किंवा निधन पावल्यास निधनानंतर सहा महिन्यांपर्यंत किंवा नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. राष्ट्रपती जर घटनेविरूद्ध वागले, तर त्यांना पदच्युत करता येते. संविधानाच्या या व्यतिक्रमणाबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग करावयाचा असेल, त्या वेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहात हजर असलेल्यांपैकी दोन-तृतीयांश सभासदांचा व सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश सभासदांचा पाठिंबा आवश्यक असतो.


राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे काय ? हा प्रश्न पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी प्रथमच १९५८ मध्ये उपस्थित केला. तेव्हापासून अशी चर्चा कायदेपंडितांत चालू आहे. संसदीय लोकशाही संकेतानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी मानलाच पाहिजे आणि भारतातही हा नियम अव्याहतपणे मानला गेला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, असे मत व्यक्त केले आहे. बेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने मूळ संविधानातील ही संदिग्धता काढून टाकली आणि राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला मानलाच पाहिजे, अशी स्पष्ट तरतूद केली. चव्वेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने ही तरतूद कायम ठेवली आणि राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाकडे एखादा प्रश्न पुनर्विचारासाठी पाठवण्याचा अधिकार दिला आणि पुनर्विचारानंतरचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक राहील असे नमूद केले. सभागृहाची बैठक बोलावणे, त्यात अभिभाषण करणे, सभागृहाचे विसर्जन करणे, कायद्याला संमती देणे, वटहुकूम काढणे इ. राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायधीश, उच्च न्यायालयांचे न्यायधीश व सरन्यायधीश, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, पंतप्रधान, नियंत्रक व महालेखापरीक्षक आणि निर्वाचन आयुक्त यांच्या नेमणुका ते करतात. एखाद्या व्यक्तीस माफी देणे, खटला काढून घेणे किंवा शिक्षा कमी करणे, हेही त्यांचे अधिकार आहेत.


संसदेत प्रत्येक सभासदाला संपूर्ण भाषण स्वातंत्र्य असते. संसदेत केलेल्या भाषणावरून कुठलाही खटला करता येत नाही. संसदेच्या प्रत्येक सभागृहाला अनेक विशेष अधिकार असतात. हे विशेष अधिकार संसदेला कायदा करून ठरविता येतील; परंतु असा कायदा करेपर्यंत इंग्लंडच्या पार्लमेंटला आपले संविधान कार्यान्वित होतेवेळी जे विशेष अधिकार व सवलती होत्या, त्याच भारताच्या संसदेच्या सभागृहाच्याही राहतील. आजवर असा कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ह्या विशेष अधिकाराबद्दल अनिश्चितता आहे.


केंद्र सरकारप्रमाणेच राज्यसरकारेही चालतात. फरक इतकाच की घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात. प्रत्येक राज्यात विधिमंडळ असते. त्याची मुदत पाच वर्षे असते. हे विधिमंडळ आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यांत द्विसदनी आहे व बाकीच्या राज्यांत एक सदनी आहे. ह्या दोन सभागृहांना अनुक्रमे विधानसभा व विधान परिषद ह्या नावाने संबोधले जाते. विधानसभेत ५०० हून कमी व ६० पेक्षा जास्त सभासद निरनिराळ्या मतदारासंघांतून निवडलेले असतात. सबंध राज्याची विभागणी अशा प्रकारे करण्यात येते, की त्यातली लोकसंख्या व त्या मतदारसंघास मिळणाऱ्या जागा ह्यांचे प्रमाण सर्व राज्यभर सारखेच राहते. विधान परिषदेच्या सभासदांची संख्या विधानसभेच्या सभासदसंख्येच्या एक-तृतीयांशापेक्षा जास्त असता कामा नये; मात्र ही सभासदसंख्या ४० पेक्षा कमी नसावी. ह्यात एक-तृतीयांश सभासद विधिमंडळाच्या सभासदांनी निवडलेले असतात. काही राज्यपालांनी नेमलेले असतात. एक-तृतीयांश सभासद त्या राज्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळे व संसद विधिद्वारा उल्लेखित अशा स्थानिक प्राधिकाऱ्यांचे सदस्य यांनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून जवळजवळ एक-दशांश, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही विद्यापीठाचे कमीत कमी तीन वर्षे पदवीधर असतील, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून व जवळजवळ एक-द्वादशांश माध्यमिक व इतर शिक्षणसंस्थातून शिकवण्याच्या कामात कमीत कमी तीन वर्षे असलेल्या व्यक्ती मिळून बनलेल्या मतदारसंघातून निवडले जातात.


केंद्रशासित प्रदेशाची शासनपद्धती परिस्थितीनुसार ठरविण्यात येते. अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा, दमण, दीव, मिझोरम व पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला ले. गव्हर्नर हा प्रमुख असतो. अंदमान आणि निकोबार बेटे व चंडीगढ यांवर चीफ कमिशनर हा प्रमुख असतो. लक्षद्वीप बेटासाठी स्वतंत्र प्रशासक नेमलेला आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, दमण, दीव, मिझोराम, पाँडिचेरी या प्रदेशात स्वतंत्र विधानसभा व मंत्रिमंडळे आहेत. दिल्लीसाठी महानगर परिषद व कार्यकारी परिषद आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे येथे झालेला समझौता (करार)

पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.




करारनाम्याच्या अटी

पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.


१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:


२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील.


३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.


४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.


५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.


६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .


७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.


८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.


९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या.


१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला (http://www.simplifiedcart.com/)

स्वातंत्र्याच्या आधी झालेल्या गोलमेज परिषदा

कायदेभांगाची चळवळ चालू असताना परिस्थिति सांभाळण्यासाठी ब्रिटीशांनी पहिली गोलमेज परिषद बोलावली

      

पहिली गोलमेज परिषद (1930-31)

      

इंग्लंड मध्ये पंतप्रधान मकडोनाल्ड च्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरवण्यात आली आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर 89 प्रतींनिधी जमले होते. 89 सदस्या पैकी 16 सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.                         

      पहिल्या गोलमेज परिषदेत घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय.------

     हिंदुस्थानात भावी काळात ब्रिटिश आणि हिंदुस्तान संस्थानिकांचे संघराज्य स्थापन करावे.                                                                        संघराज्याचे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काही प्रमाणात जबाबदार राहील. घटक राज्यात स्वतःचा राज्यकारभार पाहण्याचा स्वतंत्र आधिकार असावा. इत्यादि राजकीय सुधारणामुळे काही महत्वाचे बदल हिंदुस्तानात होणार होते.


गांधी आयर्विण करार-------


      राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. सरकारच्या विरोधात सविनय कायदेभांगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले.

      5 मार्च 1931 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व इंग्लंड वरुण आलेल्या आयर्विण यांच्यात अनेक करार झाले त्या करारास गांधी आयर्विण करार म्हणून संबोधले जाते. या करारातील काही मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील.



·         इंग्रज शासनाने राजकीय कैद्यांची ताबडतोब सुटका करावी.

·         जीवनावश्यक असलेल्या मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याचा आधिकार हिन्दी नागरिकांना द्यावा.

·         विदेशी दारू विकणार्‍या दुकाना पुढे निदर्शने करण्याचा आधिकार असावा.

·         कायदेभंग चळवळीत सरकारने ज्या ज्या व्यक्तींना खाजगी मालमत्ता जप्त केली असेल त्या त्या व्यक्तींची मालमत्ता परत करावी

·         कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी

·         राष्ट्रसभेने गोलमेज परिषदात भाग घ्यावा

·         बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

·         सरक्षण, परराष्ट्र, अल्पसंख्यांक व काही खाती येत्या राज्यकारभार पद्धतीत राखीव म्हणून रहावीत.   

      गांधी आयर्विण करारा बरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली.


दुसरी गोलमेज परिषद (1931)---

     
      गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विण यांनी आपले व्हाईसरॉय चे पद सोडून मायदेशी परतले त्यांच्या जागी लॉर्ड विलिंगडन व्हाईसरॉय झाले. ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.
      पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंड ला गेले. या परिषदे मध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली. परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतींनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते. गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश आवस्थेत ये आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभांगाची चळवळ सुरू केली परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.




राम्से मॅकडॉनल्ड यांचा जातीय निवाडा (16 ऑगस्ट 1932)


      काही अनेक कारणास्तव दुसरी गोलमेज परिषद अयशस्वी ठरली. दुसर्‍या गोलमेज परिषदेत विविध जाती धर्माचे प्रतींनिधी उपस्थित होते त्या मध्ये हिंदुस्तानाच्या राज व्यवस्थेच्या बाबतीत एकमत होऊ शकले नाही. जाती धर्माच्या आधारावर कायदेमंडळात व्यक्तींना सभासदत्व प्राप्त करून देणारा ठराव पंतप्रधान राम्से मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर केला पंतप्रधानाच्या या निर्णयास इतिहासात रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा म्हणून ओळखले जाते.
      या निवाड्यानुसार ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्यांक होते तेथे त्यांना प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व मिळाले. तथापि जेथे हिंदू अल्पसंख्यांक होते तेथे हिंदूंना मात्र प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व मिळाले नाही. ख्रिशन, अँग्लो इंडियन आणि यूरोपियन यांना देखील त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणाबाहेर जागा मिळाल्या होत्या. मॅकडोनाल्ड यांनी अस्पृश्य समाजालाही स्वतंत्र मतदार संघ जाहिर केला तसेच ते सर्वसाधारण मतदारसंघात देखील मतदान करू शकत होते पण अस्पृश्यांना हिंदू पासून अलग करण्याचा हा निर्णय महात्मा गांधी यांना पसंद नाही पडला त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केले. अस्पृश्यांचे शुभचिंतक व नेते बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र मतदार संघाची कल्पना आवडली होती परंतु महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांना महात्मा गांधी यांची भेट घ्यावी लागली तेथे तडजोड घडून आली.


पुणे करार----1932

     
      त्या काळी अस्पृश्यांची परिस्थिति फार दयनीय होती. हिंदू समाजातील चार वर्ण पद्धतीतील सर्वात खालचा स्थर म्हणजेच अस्पृश्य होत. या परिस्थितीचा विचार करूनच मॅकडोनाल्ड यांनी जातीच्या आधारावर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ दिला होता. पण अस्पृश्यांना हिंदू पासून वेगळे केले तर ते कधी एक होऊ शकणार नाही असे महात्मा गांधीजींना वाटले त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरोधात उपोषण सुरू केले शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी तडजोड करून त्यांच्याशी बोलणी करण्याचे ठरवले. शेवटी अस्पृश्यांना 148 जागा राखीव देण्यात आल्या या करारास पुणे करार म्हणून संबोधले जाते.

तिसरी गोलमेज परिषद—1932

      महात्मा गांधीजींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव कमी होत होता. परंतु असे असतानाही इंग्रजांनी दडपशाही चे धोरण चालूच ठेवले होते. इंग्लंड मधील हुजूर पक्षाने देखील भारतास नवीन राज्यघटना देण्यास नकार दिला होता.
      असे असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली (डिसेंबर 1932). या गोलमेज परिषदेत भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सलेक्षण कमिटी ची स्थापना केली. या गोलमेज परिषदेच्या आधारावरच 1935 चा कायदा उदयास आला.

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोग.



🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.

🧩राज्यसभा..

🅾️ ससदेचे उच्च सभागृह.

🅾️ भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

🅾️ एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त.

🅾️ सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

🅾️ महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

🅾️ मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

🧩लोकसभा..
🅾️ एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

🅾️ पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

🅾️16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

🅾️लोकसभा निवडणूक 2014..

🅾️16 वी लोकसभा निवडणूक.

🅾️ 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान.

🅾️16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

🅾️एकूण मतदारसंघ: 543

🅾️ एकूण मतदान केंद्र: 927553

🅾️ सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

🅾️ एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

🧩 पक्षीय बलाबल
🅾️भारतीय जनता पक्ष: 282
🅾️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
🅾️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
🅾️ कम्युनिस्ट पक्ष: 01
🅾️ कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
🅾️राज्यस्तीय पक्ष: 182
🅾️नोंदणीकृत पक्ष: 16
🅾️अपक्ष: 03

🧩 वशिष्ट्ये...

🅾️ EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.

🅾️नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला.

🅾️ 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.

🅾️ 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

🅾️ एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

🅾️ महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

🅾️ 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.

🅾️6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.

🅾️ 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

🅾️एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला.

भूगोल :- मातीचे प्रकार व स्थान



◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.


ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव



संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


✏️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर


✏️गजरात -भिल्ल


✏️झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख


✏️तरिपुरा - चकमा, लुसाई


✏️उत्तरांचल - भुतिया 


✏️करळ - मोपला, उरली


✏️छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब 


✏️नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी


✏️आध्रप्रदेश - कोळम, चेंचू


✏️पश्चिम - बंगाल संथाल, ओरान 


✏️महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली


✏️मघालय - गारो, खासी, जैतिया


✏️सिक्कीम - लेपचा 


✏️तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

बंगालच्या उपसागरातील बेटे



 -बंगालच्या उपसागरात असणाऱ्या आराकान योमा या पर्वतरांगेच्या उंच शिखराचा भाग म्हणजे अंदमान निकोबार बेट समूह

-अंदमान आणि निकोबार बेट समूहात एकूण 572 बेटे असून अंदमान निकोबार चे एकूण क्षेत्रफळ आठ हजार 549 चौरस किलोमीटर आहे

-अंदमान व निकोबार हे दोन द्विपसमूह असून 10 डिग्री चॅनल ने वेगवेगळे झालेले आहेत


१) मोठे अंदमान

-मोठे अंदमान बेट समूहाची उत्तर अंदमान ,मध्य अंदमान व दक्षिण अंदमान अशी विभागणी आहे

-मोठे अंदमानच्या दक्षिणेस डंकन जलमार्गाने विभाजित केलेले छोटे अंदमान आहे

-मध्य अंदमानच्या पुर्वेस barren आयलँड हा भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे

-उत्तर अंदमानच्या पुर्वेस नारकोंडम आयलंड हा ज्वालामुखी आहे

-अंदमानातील सर्वोच्च शिखर उत्तर अंदमान बेटावरील सॅडल पिक जे 737 मीटर उंच आहे

-अंदमान आणि निकोबार च्या राजधानीचे शहर पोर्टब्लेअर हे मोठे अंदमान या बेटामधील दक्षिण अंदमान या बेटावरती वसलेले आहे

-पोर्ट ब्लेअर हे भारतातील तेरावे आंतरराष्ट्रीय बंदर आहे

-अंदमानातील एकूण 25 बेटांवर वसाहती असून येथील ओंग ही प्रमुख आदिवासी जमात आहे


२) निकोबार बेट समूह

-अंदमानच्या दक्षिणेस 10 डिग्री चैनल ने विभाजित केलेला निकोबार बेट समूह हा सात मोठ्या व 12 लहान बेटांचा बनलेला आहे

-या बेटांची निर्मिती प्रवाळ कीटकांपासून झालेली आहे 

-उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत कार निकोबार ,मध्यवर्ती बेटे ,दक्षिण बेट समूह ,छोटे निकोबार आणि मोठे निकोबार असा बेटां चा क्रम आहे 

-निकोबार च्या 13  बेटावरती वस्ती आहे 

-या बेटा मधील सर्वोच्च शिखर माउंट धुलियर हे 642 मीटर उंच आहे


#भारताचे सर्वात दक्षिणेकडील पिगमिलियन पॉईंट ज्याला आपण इंदिरा पॉईंट असे म्हणतो हे मोठे निकोबार चे दक्षिण टोक आहे (६ अंश ४२ कला)

भारताचा भूगोल प्रश्नसंच


१).महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो ?

*१) कोल्हापूर ✅*

२) रत्नागिरी

३) ठाणे

४) सातारा


२).महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे

*१) कळसुबाई ✅*

२) तारमती

३) साल्हेर

४) कलावंतीण दुर्ग


३). भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी दहशतवादी परिसरामध्ये सर्जिकल स्ट्राईक कधी घडवून आणला ?

*१) सप्टेंबर २०१६ ✅*

२) सप्टेंबर २०१५

३) जुलै २०१७

४) ऑगस्ट २०१६


४ ).जगातील सर्वात प्रथम हॉस्पिटल ट्रेन जी अतिमहत्त्वाच्या दुर्गम भागात विशेषतः भारतातील रुग्णांना वैद्यकीय मदत आणि आराम देते खालीलपैकी कोणती होती ?

१) फ्रेंच रेड क्रॉस ट्रेन

*२) लाइफलाइन एक्स्प्रेस ✅*

३) रेल्वे एम्ब्युलन्स

४) टेरापीट मटे मड्गोव्ह


५ ).जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?

१) १४ सप्टेंबर

*२) १४ नोव्हेंबर ✅*

३) १ नोव्हेंबर

४) २८ नोव्हेंबर


६ ).हँगिंगगार्डन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

१) पुणे

२) सोलापूर

*३) मुंबई ✅*

४) नागपूर


७). कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?

१) महाराष्ट्र

२) कर्नाटक

*३) तेलंगणा ✅*

४) गोवा


८ ).प्रवाशी भारतीय दिवस दरवर्षी ....... ह्या दिवशी साजरा केला जातो?

१) ५ जून

२) १ डिसेंबर

*३) ९ जानेवारी ✅*

४) १० मार्च


९ ).महाराष्ट्रात अगाखान पॅलेस कुठे स्थित आहे ?

१) मुंबई

२) नागपूर

*३) पुणे ✅*

४) कोल्हापूर


१०).ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?

१) जळगाव

२) बीड

३) रत्नागिरी

*४) सोलापूर✅*



महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई

जगातील सगळ्यात उंच ठिकाणे



          1) माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. 1955 मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.


          2) के 2: पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातले दुसर्‍या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे.


          3) कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसर्‍या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची 8,586 मीटर आहे.


          4) ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.


          5) मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. 8,485 मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.


          6) चोयुः 8,201 मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.


          7) धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. 8,167 मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.


          8) मनास्लुः 8,163 मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस 1956 मध्ये चढला होता.


          9) नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8, 126 मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणे खुप कठीण मानले जाते. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला किलिंग माउंटन असेही म्हटले जाते.


          10) अन्नपूर्णाः 8,091 मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.


           11) नंदा देवीः 7,810 मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत 1988 पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


💠💠भवैज्ञानिक इतिहास.💠💠


🅾️सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. 


🅾️स. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


🅾️ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. 


🅾️या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे.


🅾️ पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे.


🅾️ भकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


🧩विशेष....


🅾️सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. 


🅾️पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


🅾️पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे.


🅾️ पर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत.


 🅾️महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. 


🅾️थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


🦋🦋🦋🦋🦋

दख्खन पठार



‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


प्राचीन भारताचा इतिहास :



 राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...