Tuesday 3 March 2020

चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न


--------------------------------------------------------
🌺💐 केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर, जम्मू व काश्मीरमध्ये गुंतवणूक करणारे .......हे पहिले राज्य असणार आहे
- महाराष्ट्र (पहलगम, काश्मीर आणि लेह, लद्दाख येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत रिसॉर्ट उघडले जातील).

🌺💐 युक्रेन या देशाचे नवे आणि सर्वात तरुण पंतप्रधान -
ओलेक्सी होनच्युरक (35 वर्षांचे).

🌺💐 .........या आशियाई देशात प्रथमच जागतिक शीख अधिवेशन आयोजित करण्यात आले
- पाकिस्तान.

🌺💐 भारतातले सर्वाधिक उंचीवर उभारलेले स्काय सायकलिंग ट्रॅक
- मनाली, हिमाचल प्रदेश (गुलाबा येथे 9,000 फूट उंचीवर; मार्गाची लांबी 350 मीटर).

🌺💐 भारतीय हवाई दलाची प्रथम महिला फ्लाइट कमांडर...... या आहेत
:-विंग कमांडर शालिजा धामी

🌺💐 भारत सरकारच्या ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ यामध्ये अग्रस्थानी असलेला राज्य कोणते
:- केरळ

🌺💐 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ......या देशाच्या राजाने "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" देऊन गौरवले
- बह

🌺💐कलवी तोलाईकाच्ची TV या नावाने विशेष शैक्षणिक वाहिनी सुरू करणारे ..... हे राज्य आहे
– तामिळनाडू.

🌺💐राॅजर्स करंडक २०१९ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारचा विजेता कोण आहे/
:- राफेल नदाल

🌺💐 कोणत्या दिवशी जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार आहे
:- ३१ आक्टोंबर

🌺💐  सहासष्टव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला ? :
- अंदाधुंद

🌺💐 भारताच्या NCAER या आर्थिक वैचारिक संस्थेंच्या मते, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर------ राहणार आहे
:- ६.२%

🌺💐  मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात एक्सलन्स इन सिनेमा सन्मान कोणाला देण्यात आला
:- शाहरुख खान

🌺वार्सा येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले :
- विनेश फोगट

🌺💐आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने मोडला:
- रोहित शर्मा

🌺💐 पाकिस्तानने फाळणीच्या ७२ वर्षानंतर शीख भाविकांसाठी खुला केलेला गुरुद्वारा चौवा साहिब कोणत्या जिल्ह्यात आहे:
-झेलम, पाकिस्तान

🌺💐 भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या परदेशी बँकेला भारतात नियमितपणे बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली ?:-:
- बँक ऑफ चायना

🌺💐  क्यूएस बेस्ट स्टूडंट सिटीज रंकिंग २०१९ च्या अहवालानुसार विद्यार्थसाठी जगातले सर्वोत्तम शहर कोणते:
- लंडन

🌺💐 ........... या ठिकाणी सिंगापूर, थायलंड आणि भारत या देशांच्या नौदलांचा पहिलाच त्रिपक्षीय सराव 16 सप्टेंबर रोजी सुरू झाला
- पोर्ट ब्लेअर.

🌺💐  बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी........ ही पेमेंट बँक ‘भरोसा बचत खाते’ सुरू करणार आहे
- एयरटेल पेमेंट्स बँक.

🌺💐 प्रथमच मोठ्या आंतरराष्ट्रीय ‘# मी टू चळवळ’ परिषदेचा यजमान देश
- आईसलँड (17 सप्टेंबर रोजी रिक्झाविकमध्ये).

🌺💐 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) ......... संताच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे
- गुरु नानक देव.

🌺💐 भारतीय सर्वेक्षण विभाग ....... या रिझोल्यूशनसह (पृथक्करण) ड्रोनचा वापर करून प्रथमच देशाचा नकाशा तयार केला जाणार आहे
- 1:500 (1 सेमी = 500 सेमी).

🌺💐गन आयलँड' या कादंबरीचे लेखक
- अमिताव घोष.

🌺💐 रग्बी विश्वचषक 2019 ही स्पर्धा ----- या देशात होणार आहे
- जापान (20 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर).

🌺💐 प्रधान मंत्री किसान मान धन योजना तसेच व्यापारी व स्वयंरोजगारीसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या अंतर्गत 60 वर्षानंतर मिळणारे मासिक किमान निवृत्तीवेतन
– 3000 रुपये.

🌺💐 दक्षिण सुदानमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहीमेमध्ये दिलेल्या सेवेसाठी UN पदक मिळविणार्या पाच भारतीय महिला पोलीस अधिकारी
- रीना यादव, गोपिका जहागीरदार, भारती सामंत्रे, रागिनी कुमारी आणि कमल शेखावत.

🌺💐 13 सप्टेंबर रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ........या शहरात मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस सुरू केली
- मुंबई.

🌺💐  सागरी क्षेत्रासाठी दर्जेदार ब्रॉडबँड सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी
- नेल्को.

🌺💐FIFAची 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2020 या स्पर्धेचे आयोजक
– भारत (2 ते 21 नोव्हेंबर 2020 या कलावधीत).

🌺💐  चंद्रमोहीमेच्या अपयशाचा तपास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)....... या देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे
- इस्राएल.

विषुववृत्तावरील देश

इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझिल, सोम टोमे प्रिंसीपी, गॅबाॅन, रिपब्लिक ऑफ कांगो, डेमाॅक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, केनिया, सोमालिया, मालदिव, इंडोनेशिया, किरीबाती

● प्राईम मेरेडियनवरील देश

यु के, फ्रान्स, अल्जेरिया, माली, स्पेन, बुरकिनो फासी, घाना, टोगो

● कर्कवृत्तावरील देश

मेक्सिको, मारूटानिया, पश्चिम सहारा, भारत, बहमास, नायजर, अल्जेरिया, इजिप्त, लिबिया, माली, म्यानमार, ओमन, बांगलादेश, सौदी अरेबिया, चीन, UAE, तैवान

● मकरवृत्तावरील देश

अर्जेंटिना, ब्राझिल, चीली, पाराग्वे, नामेबिया, बोट्सवाना, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया

समजून घ्या सहज सोपं : अमेरिका-तालिबान करार काय आहे?

◾️कतारची राजधानी दोहा येथे शनिवारी (दि. २९ फेब्रुवारी) अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला.

◾️ या करारान्वये अफगाणिस्तानातून अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) संपूर्ण फौजा टप्प्याटप्प्याने माघारी बोलावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔰 पार्श्वभूमी

◾️जवळपास १८ वर्षे अमेरिकी सैन्य अफगाण भूमीवर तैनात होते.

◾️अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे यांनी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाविरोधात जागतिक लढ्याचा पुकार केला.

◾️ओसामा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दडून बसला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानचाही ओसामाला उघड पाठिंबा होता

◾️. साहजिकच अफगाणिस्तान ही दहशतवादविरोधी लढ्याची रणभूमी बनली. ऑक्टोबर २००१मध्ये अमेरिकी फौजा काबूलमध्ये उतरल्

◾️. डिसेंबर २००१मध्ये तालिबान शासक मुल्ला मोहम्मद उमरने काबूलमधून पळ काढला. तालिबानचा पराभव झाला, पण समूळ निःपात झाला नाही.

◾️बुश यांच्यानंतरचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकपाठोपाठ अफगाणिस्तानातूनही फौजा माघारी बोलावण्याविषयी निर्णय घेतला.

◾️ परकीय भूमीवर अमेरिकी सैनिकांचे रक्त सांडणाऱ्या युद्धखोर धोरणांचा जमाना सरला ही त्यामागील भूमिका होती. शिवाय ओबामांच्या दोन टर्म्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन मनुष्यहानी टाळण्याकडे कल वाढला

◾️ ओबामा यांच्यानंतरचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कृतघ्नांच्या निरुपयोगी लढाया येथून पुढे आम्ही लढणार नाहीʼ अशी भूमिका घेतली. फौजामाघार हे त्यांचे निवडणूक वचन आणि निवडून आल्यावर राष्ट्रीय धोरण बनले.

🔰 करारात काय?

◾️अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा माघारी घेण्यासाठी १४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

◾️यात पहिल्या टप्प्यात करार झाल्यानंतरच्या १३५ दिवसांत अमेरिकी सैनिकांची संख्या १३,०००वरून ८६००वर आणली जाईल.

◾️तर नाटोʼ सैनिकांची संख्या १६,०००वरून १२,०००वर आणली जाईल.

🔰मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

◾️तालिबानने दहशतवादी हल्ले थांबवावेत, ही पहिली आणि महत्त्वाची अट.

◾️यासाठी तालिबानने अल कायदाशी संबंध तोडणे अपेक्षित आहे. या अटींची पूर्तता न झाल्यास करारातून एकतर्फी माघार घेण्याची मुभा अमेरिकेला राहील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक वन्यजीव दिन World Wildlife Day

🔰 3 मार्च 1973 रोजी Covention on International Trade in Endangered Species (CITES) या करारावरती सह्या करण्यात आल्या या दिनाचे स्मरण म्हणून UN हा दिवस 2013 पासून साजरा केला जातो.

🔰 जगातील वन्यप्राणी & वनस्पती बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. माहिती संकलन वैभव शिवडे.

🔰 आजपर्यंतच्या इतिहासात हा पहिलाच दिवस आहे, जो पाण्याखालील सृष्टीवर भर देतो.

🔴 2018 Theme: Big Cats Predators Under Threat

🔴 2019 Theme: Life Below Water For People & Planet

🔴 2020 Theme: Sustaining all life on Earth

🔴 Covention on International Trade in Endangered Species of Wild Fauna & Flora (CITES)

🔰 धोका असणार्‍या प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करणारा करार

🔰 यालाच Washington Convention या नावानेही ओळखलं जाते.

🔰 3 मार्च 1973 रोजी या करारावर सह्या झाल्या तर 1 जुलै 1975 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

🔰 सध्या भारतासह 183 देश सदस्य आहेत.

दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली

🔰केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

🔴कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान

🔰कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत. शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

🔰शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

🔰प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.

1974 साली पुडुचेरी येथे प्रथम कृषी विज्ञान केंद्र उघडण्यात आले. आज देशभरात 717 KVK कार्यरत आहेत.

बंगळुरूमध्ये 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ भरणार

🔰6 मे ते 8 मे 2020 या कालावधीत बंगळुरू (कर्नाटक) या शहरात 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) यांच्या नेतृत्वाखाली "इंडस्ट्री 4.0 - इनोव्हेशन अँड प्रोडक्टिव्हिटी" या विषयाखाली आयोजित केला जाणार आहे.

🔰उत्पादन क्षमतेच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही जगातले सर्वात मोठे मंच आहे. तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही परिषद भारतात होणार आहे. यावर्षी चर्चेत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर भर दिला जाणार आहे.

🔰जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) 1969 सालापासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे.

🔰नावीन्यपूर्ण आणि जागतिक पातळीवरील पद्धतींवर विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात उद्योगपती, विद्वान, प्रशासक तसेच उद्योग, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातले कार्यकर्ते एकत्र येतात.

🔴‘इंडस्ट्री 4.0’ म्हणजे काय?

🔰‘इंडस्ट्री 4.0’ हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उपसंच आहे जो उद्योगाशी निगडीत आहे.

🔰चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मानवाने तयार केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निर्मिती, सेवा, कृषी अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे. ‘स्मार्ट शहर’ उपक्रम हा याच संकल्पनेचा एक भाग आहे.

🔰अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे, ज्यामार्फत मानवाच्या जागी यंत्रांची बसवणी केली जाणार. सगळ्या प्रक्रिया या संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित होणार.

🔰यासंबंधीची संकल्पना 2011 साली जर्मनीने एका प्रकल्पाच्या माध्यमातून जगापुढे मांडली. पुढे 2012 साली त्याच्या अंमलबजावणीबाबत काही शिफारसी देण्यात आल्या.

अर्मेनियात ‘मेड इन इंडिया’ला मागणी.

🔰भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’  अभियानाला मोठे यश मिळाले आहे. कारण रशिया आणि पोलंडला मागे टाकत भारताने  अर्मेनियासोबत 280 कोटी (40 मिलियन डॉलर) रुपयांचा संरक्षण करार केला आहे.

🔰तर या करारानुसार, डीआरडीओद्वारे विकसित आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे (बीईएल) निर्मित चार ‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ युरोपीय देश असलेल्या अर्मेनियाला भारत निर्यात करणार आहे.

🔰तसेच या व्यवहाराची निर्यात प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अर्मेनियाने भारताकडून ही शस्त्रे घेण्यापूर्वी रशिया आणि पोलंडच्या रडारचीही चाचणी केली होती पण शेवटी त्यांनी भारतीय रडार्सलाच पसंती दिली.
‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ या चार रडारचा हा संरक्षण व्यवहार अयसून हे 50 किमीच्या सीमेमध्ये  शत्रूची हत्यारं, मोर्टार आणि रॉकेट सारख्या स्वयंचलित शस्त्रांचा नेमका शोध घेऊ शकते.

🔰त्याचबरोबर एकाच वेळी विविध ठिकाणांहून भिन्न शस्त्रांद्वारे डागलेल्या अनेक क्षेपणास्त्राचा शोधही हे रडार घेऊ शकते. भारतीय सैन्य जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ याच रडारचा उपयोग करते. यामुळे पाकिस्तानी चौक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा पत्ता त्यांना लागतो. 2018 मध्ये चाचणीसाठी भारतीय सैन्याला ही प्रणाली देण्यात आली होती.

भारताचे माजी हाॅकीपटू बलबीर सिंह यांचे निधन

🔰भारताचे माजी हाॅकीपटू बलबीर सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते.

🔰हाॅकी इंडियाने ट्विट करताना माजी हाॅकीपटू आणि दोनवेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या बलबीर सिंह खुल्लर यांच्या निधनाबदल दु:ख व्यक्त केले असून त्यांनी श्रध्दाजंली वाहिली आहे.

🔰पंजाबमधील जालंधर जिल्हातील संसारपूर गावात जन्म झालेल्या बलबीर यांनी १९६३ साली फ्रान्सच्या लियोनमध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

🔰आपल्या कारकिर्दीत त्यांनी बेल्जियम, इंग्लंड, नेदरलॅण्ड आणि पश्चिम जर्मनी अशा देशाचा दौरा करताना भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.

🔰बलवीर १९६६ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि १९६८ मध्ये मैक्सिकोमध्ये झालेल्या आॅलिम्प्कमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.

1 मे पर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

🔰 1 मे 2020 पर्यंत महाराष्ट्राला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकच्या वापरापासून परावृत्त करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य सरकारने निश्चित केले आहे. याविषयीची घोषणा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

🔰 येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. शहरांसह ग्रामीण भागांमध्ये देखील यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टीक ऐवजी विघटन होणारी आवरणे, कापडी थैली, लाकडी वस्तू अश्या पर्यायी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.

🔰 1 मार्च 2020 पासून मुंबईत प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष पथके नेमली असून कोणीही बंदी योग्य प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

🔰 महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसूचनेनुसार यापूर्वीच संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिक (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. त्यामधून प्‍लास्टिकची पिशवी, ताट, वाटी, चमचे, वेष्टण, पाणी पाऊच, इत्यादी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

🔰उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰तर या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिली आहे.

🔰गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.

🔰तसेच उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.

🔰दरम्यान दिल्ली पोलिसांना आतापर्यंत हिंसा घडविणाऱ्यांची एक हजार जणांची ओळख पटली आहे. यापैकी 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसेत झालेल्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र रविवार ते बुधवार या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार

🔰सेन यांना लोकसंख्येबाबतचे धोरण, प्रजनन आणि आरोग्य, दारिद्र्य, महिलांचे हक्क, कामगार पेठ आणि जागतिक प्रशासन अक्षय क्षेत्रांमधल्या त्यांनी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

🔰सेन हार्वर्ड विद्यापीठात जागतिक आरोग्य आणि लोकसंख्येच्या एक संलग्न प्राध्यापक आहेत आणि ती भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरू येथे सार्वजनिक धोरणाच्या प्राध्यापकही राहिलेल्या आहेत. त्या ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ येथे ‘रामालिंगास्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटेर्मिनेंट्स ऑफ हेल्थ’ याच्या संचालिका आहेत.
मे 2020 या महिन्यात तेल अवीव...

🔴इतर गटाचे विजेते

🔰सांस्कृतिक जतन आणि पुनरुज्जीवन (भूतकाळ श्रेणी) - लोनी जी. बंच तिसरा (वॉशिंग्टन, अमेरिका) आणि बारबरा किर्शेनब्लाट-गिम्ब्लेट (न्यूयॉर्क विद्यापीठ)
कृत्रिम बुद्धिमत्ता (भविष्य श्रेणी) - डेमिस हसाबिस आणि अ‍ॅमनोन शाशुआ (जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ).

पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय


🔰पाकिस्तानच्या संसद परिसरात आता  महिलाखासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

🔰संसदेतीलमहिला समितीने संसदीय परिसरात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सांगितले आहे. आयएनएसने पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार हवाला देताना म्हटलं आहे की, हा मुद्दा महिला खासदारांनी उपस्थित केला होता.

🔰तर त्यांनतर संसद भवन गृहनिर्माण समितीची बैठक झाली. आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू केले जाईल.

🔰इतकेच नव्हे तर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी ब्युटी पार्लर का उघडले नाही, यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (सीडीए) फटकारले आहे.

🔰तर समितीच्या संयोजकांना संसद परिसरात ब्युटी पार्लरसाठी जागा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे देशात आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा खासदार जनतेचे पैसे ब्युटी पार्लरवर उडवणार असल्याच्या निर्णयावरून तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना प्रदान

🔰 राज्य सरकारच्या वतीनं मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ काल ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला.

🔰 मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पुरस्कार प्रदान केले.

🔰 ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ - पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेला (मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणारी संस्था) प्रदान करण्यात आला. 

🔰 डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार - आर. विवेकांनद गोपाळ यांना तर

🔰 कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार - अनिल गोरे यांना देण्यात आला. 

ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती

🔰5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने निवृत्ती स्विकारलेली आहे.

🔰तर आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची 2, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं प्रत्येकी एक विजेतेपद मिळवलं आहे. मध्यंतरी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती.

🔰तसेच यानंतर शारापोव्हाने दमदार पुनरागमन केलं, मात्र यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं नाही.

🔰आपल्या उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

देशातल्या कुठल्याही ATM मध्ये नाही मिळणार 2 हजाराची नोट.

🔰ATM मशीन्समध्ये लवकरच एक महत्वाचा बदल होणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत.

🔰देशभरातील दोन लाख 40 हजार एटीएम मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा रॅक हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

🔰त्यामुळे यापुढे ATM मधून 100, 200 आणि 500 रुपयाच्याच  नोटा निघतील.
तर ATM मशीन मध्ये चार ट्रे असतात.

🔰त्यातल्या तिघांमध्ये 500 आणि एकात 100 किंवा 200 रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

🔰तसेच काही दिवसांपूर्वीच इंडियन या सरकारी बँकेने देशभरातील आपल्या 3 हजार एटीएम मशीन्समध्ये  दोन हजाराची नोट भरण्याची प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश दिले होते.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...