Sunday, 21 May 2023

राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??


                                                   
 येणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट असलेली जाहिरात, नवीन विद्यार्थ्यांनादेखील सम पातळीत मिळत असलेली संधी या सर्व प्रश्वभूमीवर ही परीक्षा होत आहे.
आपण परीक्षेसाठी अभ्यास तर करणारच आहोत. त्याबद्दल काहीच शंका नाही. पण कितीही अभ्यास झाला तरी परीक्षा Hall मधील दडपण सहन करण्याची ताकद आपल्यात जोपर्यत येत नाही तोपर्यत Exam Clear होणं थोडं अवघड आहे. त्यामुळेच म्हणतात MPSC ही अभ्यासाइतकीच तुमच्या Temperament ची देखील परीक्षा आहे. Exam Hall मध्ये नक्की कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी Manage करता येतील याविषयीं आपण सविस्तर बोलू.
                       
❇️ 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं दडपण परीक्षा Hall मध्ये Manage व्हायला हवं. नाहीतर माझा अभ्यास झाला नाही, माझ्या एवढ्या Facts लक्षात राहतील का ,माझा अमुक विषयाचा अभ्यास पुर्ण झाला नाही, मला इतिहास जमतच नाही यासारखे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतात. पण एक लक्षात घ्या अभ्यासाची वेळ आता निघून गेली आहे. आता जे आहे ते आपल आणि जे नाही तेदेखील आपलंच असं म्हणण्याची वेळ असते.मग आपण इतक्या दिवस काय करत होतो हा प्रश्नादेखील शिल्लक राहतोच असो.जेवढी शिदोरी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे So no Excuse.

❇️ 2. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जेवढं वाचलंय ते सगळं माझ्या लक्षात राहायला हवं. हा, एक Limit पर्यत Facts लक्षात ठेवाव्याच लागतात त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात घ्या आपली परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे. Answers आपल्या समोर आहेत. त्यामुळे सर्व काही लक्षातच असलं पाहिजे असं काही नाही. प्रश्न आणि त्याचे पर्याय दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. So dont worry आता Study आठवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. Option समोर आल्यावर सर्व गोष्टी बरोबर आठवतात. पण त्यासाठी तुमची अभ्यासाची Revision मात्र खूप Strong हवी.

❇️ 3. आपल्या डोक्यातील Prejudices ( पूर्वग्रदूषिते )-

उदा.2020 चा Csat चा Paper Logical आणि थोडा Tough होता आता पण तसाच Paper येणार. आणि मी त्याच पद्धतीने सोडवणार. मित्रांनो हे जर इतकं सोपं असत तर आपण सगळेच परीक्षा पास झालो असतो. आयोगाने Paper कसा Set करावा हे आपण सांगू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की ज्याप्रमाणे आयोगाने Paper Set केलाय त्यानुसार आपल्याला Exam Hall मध्ये बदलावं लागेल.

❇️ 4. 390 Magic Figure - यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जास्त जागा असल्यावर येणारे Unnecessary दडपण. एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये पण Class 1 च्या सर्वात जास्त जागा इ. प्रकारचे प्रश्न मनात घोळायला लागतात. ज्यांचे 2-3 attempt झाले आहेत किंवा ज्यांचा पहिला Serious attempt आहे या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकत. त्यामुळे जागांच burden न घेता आपल्या Natural form वरती Concentrate करा. Outout नक्की भेटेल. 

❇️ 5. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच तुमच्या मानसिकतेची आहे, तुमच्या Confidence ची आहे. आपण शांत राहून प्रत्येक प्रश्नाला कस समोर जातो याची आहे. अभ्यासाला तर पर्याय नाहीच. पण त्यासोबतच वरती सांगितलेल्या गोष्टी अभ्यासातक्याचं किंबहुना अभ्यासापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण या बाबींचा विचार करू आणि सर्वजण छान तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.                    


राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे


प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड


प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६


प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य


प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड


प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे


प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही


प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i


प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व


प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.


प्र.11. खालील विधाने विचारात घ्या( राज्यसेवा मुख्य २०१७)

अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.

ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (१९६०) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.

क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.

ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (१९९५) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, क ३) ब, क, ड ४) अ, ब, ड


प्र.12. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.(Asst मुख्य २०१३)

१) आयर्लंड २) यु.के

३) यु.एस.ए ४) ऑस्ट्रेलिया


प्र.13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश १९७६ च्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. (Asst मुख्य २०११)

१) ४४ वी २) ४१ वी

३) ४२ वी ४) ४६ वी


प्र.14. भारताच्या राज्यघ

टनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (Asst मुख्य २०१२)

अ) कॅनडाची राज्यघटना

ब) जपानची राज्यघटना

क) इंग्लंडची राज्यघटना

ड) अमेरिकेची राज्यघटना

१) अ व क २) क व ड

३) फक्त ड ४) फक्त ब


प्र.15. १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ? (Asst मुख्य २०१३)

अ) सार्वभौम आणि समाजवादी

ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा

ड) एकता आणि एकात्मता

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

१) फक्त ब २) ब आणि क

३) क आणि ड ४) ब आणि ड


प्र.16………….या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.(Asst मुख्य २०१५)

१) १३-१-१९७६ २ )३-१-१९७७

३) ३१-१-१९७८ ४) १-३-१९७७


प्र.17) ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये …….आणि …..शब्द जोडण्यात आले. (Asst मुख्य २०१४)

अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष

क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता

१) अ,ब,क

२)अ,ब,ड

३) ब,क,ड

४) अ,क,ड


प्र.18). आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने “विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………… यांचे स्वातंत्र्य दिले आहे. (Asst मुख्य २०१६)

१) व्यवसाय २) संघटना

३) पूजा ४) संचार


प्र.19) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)

अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.

ब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.

क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

१) फक्त अ २) फक्त क

३) फक्त ब, क ४) अ, ब, क


प्र.20). भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारतात हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? (ASOमुख्य २०१८).

अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.

ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.

क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) अ २) अ, ब, क

३) वरील सर्व ४) अ, ड


प्र.21). भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? (Asst पूर्व २०१२)

अ) समाजवादी आ)धर्मनिरपेक्ष इ) सार्वभौम

ई)लोकशाही उ) गणराज्य ऊ)न्याय

ए) स्वातंत्र्य ऐ)समानता ओ)बंधुता

औ) एकात्मता

पर्यायी उत्तरे :

१) अ, ब, औ २) क, ड, ऊ

३) उ, ए, ऐ ४) अ, ड, ओ

PSI pre and Mains


प्र.22). भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (PSI मुख्य २०१३)

अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

१) अ २) अ,ब

३) अ, ब, क ४) सर्व


प्र.23) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे : (PSI मुख्य २०१२)

१) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य

२) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

३)सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य

४) प्रजासत्ताक गणराज्य


प्र.24) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे. (PSI मुख्य २०१३)

१) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

२) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

३) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

४) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा


प्र.25) गटा बाहेरचा ओळखा : (PSI मुख्य २०१४)

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

पर्यायी उत्तरे :

१) विचार २) श्रध्दा

३) उपासना ४) सामाजिक


प्र.26) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा: (PSI मुख्य २०१४)

अ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) कल्याणकारी राज्याची

अचंबीत करणारी तत्वे ii)एम.व्ही.पायली

क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii)के.एम.मुन्शी

ड) अशा प्रकारचा केलेला

एक सर्वोत्तम मसुदा iv)आचार्य.जे.बी.कृपलानी

अ   ब क   ड

१) iii iv i ii

२) i ii iii iv

३) ii i iv iii

४) iv iii ii i


प्र.27) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (PSI मुख्य २०१६)

१) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही…

२) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आह

ेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.

३) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्त्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते.

४) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती (१९१७) कडून घेतली आहेत.


प्र.28) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI पूर्व २०१६)

१) स्वातंत्र्य २) समता

३) बंधुता ४) न्याय

STI Pre and Mains


प्र.29) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१६)

अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्ताविक उद्दिष्ट्ये आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.

ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले कर सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.

क) केशनावंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा

प्रतिपादन केले.

ड) १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात-समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, ब, क

३) ड ४) अ, ब, क, ड


प्र.30) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? (STI पूर्व २०११)

१) स्वातंत्र्य २) समता

३) न्याय ४) बंधुभाव

प्र.31) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(STI पूर्व २०१५)

१) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

२) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

३) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

४) वरील एकही नाही.


प्र.32) खालील विधाने लक्षात घ्या : (STI पूर्व २०१४)

अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला’’ धक्क न लावता दुरुस्ती

करता येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ,ब

३) क ४) अ, क


प्र.33) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? (STI पूर्व २०१५)

अ) राष्ट्राची एकता

ब) राष्ट्राची अखंडता

पर्यायी उत्तरे

१) केवळ अ

२) केवळ ब

३)दोन्ही

४) दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होतेAns : १) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४, ११) १, १२) ३, १३) ३, १४) ३, १५) १, १६) २, १७) २, १८) ३, १९) १, २०) ४, २१) १, २२) ४, २३) २, २४) २, २५) ४, २६) १, २७) ४, २८) ४, २९) १, ३०) ३, ३१) ४, ३२) ४, ३३) २

राज्यसेवा प्रश्नसंच

1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील
B) दरोगा  ✍️
C) जिल्हाधिकारी
D) तलाठी  

2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 )

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️
B) व्हॉईसरॉय - मिंटो
C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु
D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड

3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 )

A)लॉर्ड  लिटन
B) लॉर्ड  रिपन ✍️
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  इल्बर्ट

4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 )

A) लॉर्ड  रिपन 
B) लॉर्ड  लिटन ✍️
C)लॉर्ड  कर्झन
D) लॉर्ड  डफरीन

5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 )

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन 
B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु 
C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️
D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

कोणत्या संघटनेच्यावतीने लेह इथल्या DIHAR केंद्रामध्ये कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन  करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना  (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद  सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

1) पोर्तुगीज यांने प्रथम व्यावसायिक कोठी कुठे उघडली ?

A. कोचीन ✅
B. मुंबई
C. सुरत
D. गुजरात

2) इंग्रजांनी अपली पहिली फैक्ट्री कधी सुरू केली ?

A. 1617
B. 1615
C. 1612 ✅
D. 1600

3) कोणत्या शासकाने ईस्ट इंडिया कंपनीला दीवानी प्रदान केली ?

A. जहाँगीर
B. शाहआलम II ✅
C. सिराजुदौला
D. बाहदुर शाह जफर

4) इंटरलोपर्स कोण होते ?

A. मध्यवर्ती व्यापारी
B. अनाधिकृत व्यापार्यांच्या वेशात सागरी लुटरे ✅
C. आधिकृत व्यापारी
D. समुद्री व्यापारी

5) जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना झाली तेव्हा भारताचा राजा कोण होता?

A. अकबर ✅
B. जहाँगीर
C. शहाजांह
D. बहादुर शाह जफर

              

1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?

(A) दिल्ली
(B) मध्यप्रदेश
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) अंदमान निकोबार बेट

कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?

(A) दिलीप उम्मेन✅✅
(B) टी.व्ही. नरेंद्रन
(C) भास्कर चटर्जी
(D) रतन जिंदल

रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?

(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग
(B) मध्य रेल्वे विभाग
(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग
(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅

परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?

(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट
(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅
(C) परीक्षा अभ्यास
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?

(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅
(B) लेमोगांग क्वापे
(C) एडमा ट्रॉओर
(D) हिरोकी नाकातानी

प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती

प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७

प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c🖋️🖋️

प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी🖋️🖋️
४) संथाली

प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची

प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत

प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद

प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग

प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे🖋️🖋️
३) अमरावती
४)कोल्हापूर

प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट🖋️🖋️
४) केशव चंद्र सेन

प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️
४)१ ते १५ फेब्रुवार

प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत

प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?

(A) उत्तरप्रदेश
(B) हरयाणा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?

(A) कविता सेठ
(B) छेको असाकावा
(C) राजीव जोशी✅✅
(D) सत्य चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?

(A) 25 मे✅✅
(B) 26 मे
(C) 27 मे
(D) 28 मे

🚿महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा🚿

1). पुढील पैकी राष्टीय उत्पन्नाची योग्य वैशिष्टये कोणती?

   अ. राष्टीय उत्पन्न ही 'साठा' संकल्पना नसुन ती एक 'प्रवाही' संकल्पना आहे.
ब.  राष्टीय उत्पन्न पैशाच्या स्वरुपात व्यक्त केले जाते.
क.  राष्टीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश असतो.
ड. राष्टीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तु व सेवा याचे मुल्य होय. 
पर्याय :- 1) अ,ब,ड योग्य.
            2) ब,क,ड योग्य.
            3) अ,ड योग्य.
            4) सर्व योग्य.✅✅

2). 8 Nov 1927 रोजी सर जाँन सायमन याच्या अध्यक्षते खाली ..... सदस्याचे एक कमिशन नेमले.

1. 5
2. 6
3. 7✅✅
4. 8

3).  30 Oct 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्म निदर्शने करत असताना ...... या अधिकाऱ्याने लाठी हल्याचा आदेश दिला, त्यामध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय हे नेते गंभीर जखमी झाले.

1. जेम्स स्टँक 💐
2. लाँड् एल्गिन
3. जाँन लाँरेन्स
4. लाँड् लान्सडाऊन

4). पोर्णिमेला आणि अमावस्येचा चंद्र, सुर्य व पुथवी एकाच रेषेत येते या दिवशी चंद्र व सुर्य याचा एकति गुरुत्वीय बलामुले पुथ्वीवर सर्वात मोठी भरती येते याला ........ भरती म्हणतात.

1. उधानाची✅✅
2. आवर्तिची
3. सौम्य
4. उग्रभरती.

5). ..... चंद्र आणि सुर्य पुथ्वीला काटकोण करतात या दिवशी येणारी भरतीला भांगेची भरती म्हणतात.

1. षष्टीला
2. अष्टमिला✅✅
3. सप्तमिला
4. व्दितीयेला

6).  योग्य विधान ओळखा 
अ. संप्लवन या कि्येत वायुरुपातील बाष्प घनरुपात रुपातंरीत होत.
ब. घन रुपातील वुष्टीला हिमवुष्टी म्हणतात.
क. उच्च अक्षवुत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटी पर्यत हिमवुष्टी होते.
ड. उष्ण कटिबंधात सुमारे ५०००m  पैक्षा जास्त उंचीवर हिमवुष्टी होते.

1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. सर्व योग्य✅✅
4. अ,ब,क

7). चुकीचे विधान ओळखा.

अ.  भारत, आफि्का, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळयात गारा पडतात.

ब.  विषुववूत्तीवर वातावरणातील   उष्णतेमुळे गारा पडत नाहीत.

क. शीत कटीबंधात उध्वा्गामी प्रवाह नसल्याने गारा पडतात.

1. अ,ब,क योग्य.
2. सर्व चुक.
3. फक्त ब चुक
4. फक्त क चुक✅✅

8). एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातुन विशिष्ठ रचना तयार होते या रचनेस ...... असे संबोधतात.

1. आर्वत✅✅
2. परावर्त
3. प्रतिरोध
4. आरोह.

9).  बँकांचे राष्ट्रीयीकरण जोड्या जुळवा.

1. १ जने १९४९ - (   ) अ) स्टेट                    
बँक  आँफ इंडीया.

2. १ जुलै १९५५ - (   ) ब) ७ सहयोगी बँकांचे राष्ट्रीयीकरण

3. १९५९ - (   ) क) रिझव्ह्  बँक आँफ इंडीया.

1. क,अ,ब✅✅
2. अ,ब,क
3. ब,क, अ
4. अ,क,ब

10). योग्य विधान ओळखा.

अ. आर्वत पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो व क्षेत्र देखील विस्तीर्ण  असते.

ब.  उष्ण कटिबंधात पडणारा आर्वत पाऊस मर्यादीत क्षेत्रावर पडतो व वादळी स्वरुपाचा असतो.

क. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो.

ड. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.

1. अ,ब,क योग्य.
2.  ब,क,ड, योग्य.
3.  सर्व योग्य.✅✅
4.   सर्व चुक.

11).  स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोर्डस मार्फत न होता तो गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्सामार्फत चालवल्या जावा अशी शिफारस ....... ने केली.

1. रिपन कमिशन.
2.  राँयल कमिशन. ✅✅
3.  मेयो कमिशन.
4.  माँटेग्यू कमिशन.

12).  लोकहिताच्या दुष्टीने किवा अधिक अखिल भारतीय सेवा निर्मान करण्याचा फक्त राज्य सभेला प्राप्त झाला आहे. तर कलम कोणती?

1.  311,
2.  312,✅
3.  309,
4.  302,

13).  अँग्लो इंडियन जमातीस पुरेसे प्रतिनिधीत्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतुन 2 सदस्साची नेमनुक  ..... कलमे नुसार करु शकतात.

1. 330,
2.  331,✅✅
3.  333,
4.  332,

14).  असे दोन देश ......च्या काँमन्स सभाग्रुहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे.

1.  इग्लंड व लंडन
2.  कँनडा व लंडन
3.  रशिया व यूके
4.  कँनडा व इग्लंड✅✅

15).  समाजसुधारक ओळखा

अ. मुंबईतील एल्फिन्स्टन काँलेजमध्ये इंग्रजी व इतिहास चे प्राध्यापक.

ब.  पुण्यात न्यायाधीश म्हणुन कार्य.

क.  विधवा विवाहाचे समर्थन करताना त्यानी मुंबईत एक विधवा विवाह घडवुण आणला.

ड.  १८९६ साली पुण्यात 'डेक्कन सभा' ही मवाळ वादी संघटना स्थापन केली.

1.  गोपाळ गणेश आगरकर
2.   न्या. महादेव गोविंद रानडे✅
3.   गणेश वासुदेव जोशी
4.  महात्मा फुले.

१६. C-DAC ( center for Development of Advanced Computing ) :- ची स्थापना कोठे व कधी झाली?

उत्तर :  पुणे., १९८८ ला

१७. संगनकाच्या मेमरीचे एकक सांगा.

उत्तर : बाइट

१८. लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष याच्या पदच्युत करण्यास कलम कोणती?

उत्तर : कलम ९४

महत्वाच्या योजना आणि त्यांची सुरुवात


✍️📚 MPSC चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या.


💯 दर वर्षी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व मध्ये योजना वर 2/3 प्रश्न Fix असतातच..


1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014


2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014


3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014


4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014


5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014

 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014


7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014


8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015


9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015

 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015


11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 


12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 


13) राष्ट्रीय कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 


14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015


15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015


16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015


17) उस्ताद योजना — 14 मे 2015


18) कायाकल्प योजना — 15 मे 2015


19) D D किसान वाहिनी — 26 मे 2015


20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015


21) किसान सन्मान निधी योजना — 24 फेब्रुवारी 2019


22) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना — 1 मे 2016


राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


तयारी राज्यसेवा पूर्व परीक्षेची

1. जय एक वस्तू 70 रु. ला खरेदी करतो आणि 84 रुपयास विकतो तर या व्यवहारात जयला किती % नफा होतो?

 1) 25

 2) 20

 3) 30

 4) 10


उत्तर : 20


2. जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 400

2)  450

 3) 475

 4) 500


उत्तर : 500


3. आचल एक खुर्ची 360 रुपयास विकते त्यावर तिला 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  380

 2) 340

 3) 300

 4) 500


उत्तर : 300


4. एका विक्रेता काही वस्तू 200 रूपयास खरेदी करतो. त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/5 नफा होतो. तर त्याला किती टक्के नफा होतो?

1)  20

 2) 25

 3) 30

 4) 40


उत्तर : 20


5. एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?

 1) 370

 2) 280

 3) 300

 4) 420


उत्तर : 420


6. 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

 1) 20% तोटा

 2) 25% नफा

 3) 20% नफा

 4) 25% तोटा


उत्तर : 20% नफा


7. एक वस्तू दिलीप 89 रूपयास विकतो. त्यामुळे त्याला तोटा होतो. तेवढाच नफा ती वस्तु 121 रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

 1) 100

 2) 210

 3) 70

 4) 105


उत्तर : 105


8. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 1020

 2) 1050

 3) 1000

 4) 1215


उत्तर : 1020


9. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  740

 2) 700

 3) 750

 4) 600


उत्तर : 600


10. एक वस्तू 37 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 57 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  67

 2) 37

 3) 57

 4) 47


उत्तर : 47

भारताचा घटनात्मक विकास ( राज्यसेवा - पूर्व + मुख्य साठी )

प्रस्तावना


ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात होती़ राजेशाहीची अंतिम विधिसत्ता, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता ही राजाच्या हातात एकवटलेली होती़.

या काळात मात्र खेडी ही स्वयंपूर्ण होती व स्वतंत्रही होती़ यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते.

याच काळामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यामधील एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होय़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना इ़ स़ १६०० मध्ये करण्यात आली, या कंपनीने इंग्लंडच्या राणीकडून ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद मिळवली.

प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एकच ध्येय होते, ते भारतीय लोकांशी व्यापार करणे व त्यापासून नफा कमवणे़ म्हणून इ़ स़ १६०० ते १७५७ पर्यंतच्या कालखंडास ब्रिटिश ईस्ट इंडियाकंपनीचा व्यापार विस्ताराचा काळ असे म्हटले जाते़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया हा प्लासी (१७५७) (बंगाल प्रान्त) च्या लढाईने घातला, तर १७६४ च्या बक्सारच्या लढाईने आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला़.

भारताच्या घटनात्मक विकासासंदर्भात खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते

१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये झालेला घटनात्मक विकास : १७७३ ते १८५८ पर्यंत़

२) ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये झालेला घटनात्मक विकास : १८५८ -१९४७


भारताचा घटनात्मक विकास १७७३ -१८५८ :


१७७३ चा रेंग्युलेटिंग अॅक्ट :

बंगालमधील जनतेत कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या़.

त्याच काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला़ बंगाल प्रान्तामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजली़.

भारतीय व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे़ व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आरडाओरड सुरू झाली़.

या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली़ तेव्हा कंपनीच्या एकूण कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग अॅक्ट संमत करावा लागला़.

रेंग्युलेटिंग अॅक्ट

कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जो अॅक्ट देण्यात आला, त्यास रेंग्युलेटिंग अॅक्ट असे म्हणतात़.

त्यावेळी इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थ यांचे सरकार होते़ त्यांना इंग्लंडमधील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत होते़ त्यामुळे कंपनी विषयी त्या सरकारने सभागृहामध्ये दोन कायदे केले़

१) पहिल्या कायद्यानुसार कंपनीच्या मागणीनुसार कंपनीला ४ टक्के व्याजदराने व काही अटींवर १४ लाख पौंड एवढे कर्ज दिले़

२) दुसरा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा रेग्युलेटिंग अॅंक्ट होय़

रेग्युलेटिंग अॅाक्टमधील तरतूदी

१) या अॅक्टनुसार कंपनीच्या इंग्लंडच्या व भारताच्या घटनेत बदल करण्यात आला़

२) या अॅेक्टनुसार कंपनीच्या कारभाराचे भारतामध्ये एकसूत्रीकरण करण्यात आले़

३) बंगाल प्रान्तातील गव्हर्नरला बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला व त्याच्या नियंत्रणाखाली मुंबई व मद्रास प्रान्ताचे गव्हर्नर आले़ (विशेष बाब म्हणजे १७७३ च्या अॅचक्टपूर्वी अशा प्रकारे नियंत्रण नव्हते़ प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नरवर प्रत्यक्ष संचालक मंडळाचे नियंत्रण होते़)

४) या अॅरक्टनुसार गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले़ प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व साहाय्य करण्याचे त्याचे काम होते़

५) या कायद्यानुसार बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि ४ जणांचे सल्लागार मंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले होते़ या कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावेत असे ठरवण्यात आले़

६) या कायद्यामधील तरतुदीनुसार १७७४ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली़ (पहिले न्यायाधीश -एलिजा इम्पे)

कंपनीचे कर्मचारी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणले़

७) गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसह कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, भेटवस्तू इ़ स्वीकारता येणार नाहीत असे सांगण्यात आले़

८) प्रत्येक २० वर्षानंतर कंपनीच्या कारभाराचे मूल्यमापन केले जाईल किंवा भारताच्या कारभारासाठी फेर कायदा देण्याचे ठरवण्यात आले़ हे फेर कायदे/मूल्यमापन (१) १७९३, (२) १८१३, (३) १८३३, (४) १८५३ मध्ये देण्यात आले

-------------------------------------------------------------------------१७८१

१७८१ चा संशोधनात्मक कायदा :

१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅाक्टनंतर काही उपायात्मक व पूरक कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यांपैकी एक म्हणजे १७८१ चा भारत सरकारचा कायदा होय़ यास १७८१ चा संशोधनात्मक कायदा असे म्हणतात़

१) त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर करण्यात आले़

२) यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले़.

--------------------------------------------------------------------------पिट्सचा

१७८४ चा पिट्स अॅक्ट :

१७८१ चा भारत सरकारच्या कायद्यानंतर - गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ब्रिटिश सरकारला (पार्लमेंटला) झाली़ तसेच १७७३ च्या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी १७८४ चा पिट्स अॅ क्ट देण्यात आला़ (पिट्स हे इंग्लंडचे पंतप्रधान होते़)

तरतुदी :

१) या कायद्यानुसार कंपनीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले़.

२) कंपनीच्या संचालकांचे धोरण नियंत्रित करण्यासाठी ६ सदस्यीय नियंत्रक मंडळाची स्थापना करण्यात आली़

३) या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारविषयक अधिकार वेगळे करण्यात आले़.

४) गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करताना सल्लागार मंडळाची सदस्य संख्या ४ वरून ३ करण्यात आली़.

५) गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात लागू केलेले कायदे व नियम याची एक प्रत देणे सक्तीचे केले़

---------------------------------------------------------------------------१७९३

१७९३ चा चार्टर अॅक्ट :

१) या अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये पुन्हा २० वर्षाची वाढ करण्यात आली़

२) कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कमी करण्यात आली.

३) यानुसार नियामक मंडळाच्या सदस्यांना व त्यांच्या नौकर वर्गाला, भारताच्या महसुलातून तनखे देण्याची तरतूद करण्यात आली़.

४) कंपनीने केलेल्या कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सर्वाच्च न्यालायला देण्यात आला.

५) कायम धारा या नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

६) गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वाच्च प्रमुख बनला

--------------------------------------------------------------------------१८१३

१८१३ चा चार्टर अॅक्ट :

१) १८१३ च्या चार्टर अॅक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली़

मात्र : कंपनीचा चहाच्या व्यापाराचा तसेच चीनशी व्यापाराची मक्तेदारी कंपनीचीच असेल असे ठरवण्यात आले़.

२) या कायद्यानुसार भारताच्या राज्यकारभाराबाबत सनदेची आणखी २० वर्षे मुद्दत वाढवण्यात आली़.

३) या कायद्यानुसार नियंत्रक मंडळाची सत्ता अधिक स्पष्ट करण्यात आली व त्यात वृद्धी करण्यात आली़.

४) या कायद्याने सरकारने जनतेत शिक्षण प्रसार करण्याचे ठरवले़.

५) भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी कंपनीने १ लाख रुपये खर्च करावेत असे कायद्यात सांगितले़

६) या अॅनक्टनुसार खिस्ती धर्मप्रचारकास भारतामध्ये येण्याचे परवाने मिळाले़.

--------------------------------------------------------------------------१८३३

१८३३ चा चार्टर अॅक्ट :

१) या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २० वर्ष मुदत वाढ देण्यात आली़

२) १८३३ च्या चार्टर अॅशक्टनुसार भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले़ यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल यास भारताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला़.

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग़

३) १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय घटनेत बदल करण्यात आला व या अॅक्टनुसार कंपनीचा चहाचा व्यापार व चीनसोबतच्या व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली़

४) या कायद्यानुसार प्रांताच्या गव्हर्नरच्या मंडळातील सदस्यांची तीन ही संख्या निश्चित करण्यात आली; परंतु आर्थिक बाबतीत पूर्वीचे विकेंद्रीकरण नष्ट करण्यात आल्याने अधिकारावर मर्यादा आली़ अर्थकायदा, याबाबतीतही प्रांतावर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले़

5) विधी आयोगाची स्थापना करण्यात आली (अध्यक्ष-लॉर्ड मेकोले)

-----------------------------------------------------------------------------१८५३

१८५३ चा चार्टर अॅक्ट :

:रेग्युलेटिंग अॅटक्टमधील तरतुदीनुसार १७९३, १८१३, १८३३ व १८५३ या मधील १८५३ चा चार्टर अॅक्ट महत्त्वाचा आहे़.

एकीकडे डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली होती़.याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपवावी अशी मागणी भारतातील अनेक नेत्यांनी, संस्थानांनी केलेली होती़.

या सर्व मागण्यांचा काही फायदा झाला नाही कारण या अॅक्टनुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली नाही; पण सत्तेचा कालावधीही ठरविण्यात आला नाही़.

तरतुदी

१) कंपनीला व्यापाराचा व कारभाराची सत्ता मागील चार्टर अॅक्टप्रमाणे २० वर्षे वाटून देण्यात आली नाही़

२) या अॅक्टनुसार इंग्लंड पार्लमेंट जोपर्यंत देईल तेवढीच मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले़

३) गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावी असे स्पष्ट केले़

४) बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला़

५) भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत स्वीकारण्यात आली़ (१८५४ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या)

६) या कायद्यानुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नरचे स्वतंत्र पद देण्यात आले़ यापूर्वी बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा कारभार पाहत असे़.

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...