Wednesday 21 December 2022

भारतात पण नव्या कोरोना व्हायरस चे आगमन....काळजी घ्यावी लागेल

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्यात महिला,मुलांचा आक्रोश,जमिनीवर मृतदेहांची रास पडली आहे.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंट तीन रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
     भारतात नवीन कोरोना व्हायरसच्या BF.7 चे दोन रूग्ण समोर आले आहे.त्यात गुजरातमध्ये दोन तर एक रूग्ण ओडिशातून समोर आला आहे. याआगोदर यूएस,यूके आणि बेल्जियम,जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या कोरोना व्हायरसचे व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.
   जागतिक लेवलवर वाढत असलेल्या नव्या कोरोना व्हायरस मुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी,नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
    चीनमधून येणाऱ्यांची चौकशी..
चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळांवर आजपासून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
काळजी घ्या....सुरक्षित रहा...!!
--------------------------------------
जन हितार्थ जारी:

महाराष्ट्र पोलिस भरती वाचा : महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई


महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?  

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅

1 ते 2 प्रश्न Fix असतातच यावर

🌸 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🌸


👉🏻 ससदीय शासन पद्धती : इंग्लंड


👉🏻 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


 👉🏻 मलभूत हक्क : अमेरिका


👉🏻 नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


👉🏻 नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका


👉🏻 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


👉🏻 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


👉🏻 कायदा निर्मिती : इंग्लंड


👉🏻 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


👉🏻 ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


👉🏻 सघराज्य पद्धत : कॅनडा


👉🏻 शष अधिकार : कॅनडा

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

· गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

· गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

· पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

· गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

सराव प्रश्नसंच1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================

महाराष्ट्राविषयी माहिती•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


•  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


•  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...