Friday 4 October 2019

चीन मिसाईलचे आज अनावरण

✍चीनमध्ये आज राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार  आहे. या निमित्त चीन ताकदीचे प्रदर्शन करणार आहे.

✍तर रस्त्यांवर 15 हजार जवान आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रात्रांचे प्रदर्शन होणार आहे.

✍तसेच यामध्ये असेही एक मिसाईल आहे जे अमेरिकेच्या उरात धडकी भरवू शकते. चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याशिवाय अन्य काही शस्त्रास्त्रे आहेत जी याआधी दाखविण्यात आली नव्हती.

✍Dongfeng-17 एक लघू मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे जे हाइपरसोनिक ग्‍लाइड व्हेईकल लाँच करू शकते. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने अंतर कापते. एवढेच नाही तर हे मिसाईल अमेरिकेच्या सुरक्षा प्रणाली
शिल्ड मिसाईलला भेदण्याची क्षमता ठेवते.

✍उड्डान करताना हे मिसाईल त्याच्या लक्ष्यानुसार उंची कमी किंवा जास्त करू शकते. याशिवाय हे मिसाईल आण्विक हत्यारांशिवाय कव्हेंशन वायरहेड नेण्यासही सक्षम आहे.

✍2017 मध्ये या मिसाईलची चाचणी झाली होती. या मिसाईलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन पुन्हा कक्षेत येण्याचा विक्रम केला होता.

✍तर मिसाईलचे पूर्ण नाव Dongfeng-41 आहे. ही आयसीबीएम मिसाईल पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेणार आहे. ही मिसाईल 10 मॅकच्या वेगाने उड्डाण करते. या मिसाईलची रेंज 7500 मैल असून जगातील कोणत्याही भागात काही मिनिटांत हल्ला चढवू शकते.

✍या मिसाईलमुळे चीन अमेरिकेवर केवळ 20 मिनिटांत हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे एका वेळी ही मिसाईल 10 लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम आहे.

✍तसेच अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अमेरिका आणि रशियाकडेही अशा प्रकारची मिसाईल आहे. तसेच रडारलाही ही मिसाईल सापडत नाही. या मिसाईलमुळे चीनला वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल तैनात करण्यापासून मुक्ती मिळाली आहे.

✍विमान दिसायला साध्या प्रवासी विमानासारखे आहे. मात्र, या विमानातून लांबच्या ठिकाणी बॉम्बवर्षाव करता येतो. नॅशनल डे परेडच्या रिहर्सलवेळी हे विमान दिसले आहे. सहा विमानांनी आकाशात कसरती केल्या होत्या. या वेळी या विमानांना KD-20/CJ-10K आणि KD-63 क्रूझ मिसाईल लावलेली होती. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरू शकते.

प्रश्नसंच 5/10/2019

[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब ✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी ✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान ✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब ✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही ✅

------------------------------------------------------------

जागतिक अंतराळ सप्ताह २०१९

जगभरात दि. ४ ते १०  ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

२०१९  संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, उपग्रहांचे नमुने, चित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

▪️पार्श्वभूमी

दि. 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून ‘स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होता, तर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला. अंतराळाचा मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावा, हा उद्देश यामागे होता.

त्यामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले. सन 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.
—————————————————————--

नेहरु ते मोदी.. जाणून घ्या भारताच्या पंतप्रधानांच शिक्षण

📚भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत या देशाला १४ पंतप्रधान लाभले आहेत. भारतीय पंतप्रधानपदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. केवळ भारतीय नागरिकत्व आणि लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असणे, या दोन अटींची पूर्तता भारतीय पंतप्रधानांना करावी लागते. आजवर हे पद अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. भारतीय पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा घेतलेला हा आढावा.

👇👇👇👇

1) पंडीत जवाहरलाल नेहरू – जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस या पदाचा कारभार सांभाळला. माजी पंतप्रधान नेहरू यांनी त्यांचे सुरूवातीचे शिक्षण भारतात घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो येथे गेले. या दरम्यानच्या काळात त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय आणि केंब्रिज विद्यापीठातून मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेतले. याशिवाय, त्यांनी इनर टेम्पल या संस्थेतून कायद्याचे शिक्षणही घेतले होते.

2) लाल बहादूर शास्त्री – भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शास्त्री यांचे माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधींनी देशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळा सोडण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशप्रेमाने प्रेरित झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. त्यानंतरच्या काळात वाराणसीच्या काशी विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही पदवी बहाल केली.

3) इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी १९८० पासून सलग तीन टर्म पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाची चौथी टर्म सुरू असताना त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांनी इकोले नोउवेले, बेक्स, इकोले इंटरनॅशनल, जिनिव्हा, प्युपिलस ओन स्कूल, पुना अँड बॉम्बे, बॅडमिंटन स्कूल, ब्रिस्टॉल, विश्व भारती, शांतिनिकेतन, कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते.

  4) मोरारजी देसाई – स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सेंट बुसार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

5) चरण सिंग – चरण सिंग फक्त १७० दिवस भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठातून घेतले. त्यानंतर काही काळ चरण सिंग यांनी गाझियाबादमध्ये वकिलीही केली होती

6) राजीव गांधी – इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्याकडे देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आली. ते भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान ठरले. राजीव गांधी यांनी वेलहॅम बॉईज स्कूल आणि डून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ट्रिनिटी महाविद्यालय, केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतले. याशिवाय, लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

7) व्ही.पी. सिंह – विश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्यांनी अलाहाबाद व पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.

8) चंद्र शेखर – भारताचे आठवे पंतप्रधान असलेले चंद्रशेखर यांचा कार्यकाळही वर्षापेक्षा कमी राहिला. तरूण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या सतिशचंद्र महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले.

9) पीव्ही नरसिंह राव– भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवणाऱ्या पी व्ही नरसिंह राव १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी आंध्र प्रदेशमधील एका लहानशा खेड्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. यानंतर नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून त्यांनी कायद्यातील मास्टर्सची पदवी संपादन केली

10) अटलबिहारी वाजपेयी– अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांमध्ये सत्ता सोडली होती. त्यानंतर १९९८ मध्ये ते पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्वाल्हेर व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयातून वाजपेयी यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली.

11) एच. डी. देवेगौडा– भारताचे ११ वे पंतप्रधान असलेले एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमधील एल. व्ही. पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

12) इंद्रकुमार गुजराल– भारताचे १२ वे पंतप्रधान असलेले इंद्रकुमार गुजराल उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी बी.कॉम., एम.ए., पीएचडी आणि डिलिट या शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या.

13) डॉ. मनमोहन सिंग– भारताला लाभलेल्या विद्वान राजकारण्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची वर्णी लागते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड महाविद्यालयातून मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रातील पदवी आणि डी. फिलपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीसह पूर्ण केले.

14) नरेंद्र मोदी– भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.



संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा.

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
   1) भाषण    2) समोर      3) अधिक    4) करवत नाही

उत्तर :- 1

2) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे.

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) संकरित    4) भावे

उत्तर :- 4

3) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी

   1) मध्यमपदलोपी समास      2) तत्पुरुष समास 
   3) अव्ययीभाव समास      4) व्दंव्द समास

उत्तर :- 1

4) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

5) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’
     या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?

   1) उपमा    2) रूपक      3) उत्प्रेक्षा    4) अनन्वय

उत्तर :- 3

6) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?

   1) दररोज    2) रात्रंदिवस    3) अभ्यास    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 4

7) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.

   1) दिवस मावळला  2) सूर्य बुडाला    3) आयुष्य संपत आले  4) दिवस संपला

उत्तर :- 3

8) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

   1) वाट      2) पंथ      3) रस्ता      4) पथ

उत्तर :- 2

9) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) प्राकृतिक    2) स्वाभाविक    3) कृत्रिम      4) सृष्टी

उत्तर :- 3

10) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

   1) घनिष्ठ मैत्री असणे      2) दुरान्वयाने संबंध असणे
   3) ओढून ताणून संबंध  लावणे    4) शत्रूत्व असणे

उत्तर :- 3

मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

- स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकमुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे.

-एका वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारे आणि २ कोटींहून जास्त प्रवासी प्रवास करणारे दादर स्थानक स्वच्छतेच्या यादीत मुंबईत प्रथम क्रमांकावर आले.

-  एका वर्षाला १०० ते ५०० कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या आणि १ ते २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया महाराष्टÑातील सोलापूर या स्थानकाला स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. हे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ स्थानक असल्याची सर्वेक्षणात नोंद करण्यात आली आहे.

- ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ यांच्या सर्र्वेक्षणानुसार स्वच्छतेच्या वर्गवारीच्या यादीत
1) दादरनंतर
2) पुणे
3) सीएसएमटी
4) कल्याण
5) ठाणे
7) एलटीटी
8 ) पनवेल
या स्थानकांचा क्रमांक लागला.

महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक
1 -  सोलापूर स्थानकानंतर
2-   नाशिक रोड
3-   नागपूर या स्थानकांचा क्रमांक लागला.

या सर्वेक्षणात प्रत्येक स्थानकाला १ हजारपैकी गुण देण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सोलापूरला ८८७.१८, दादरला ८६४.७९, पुण्याला ८४८.३९, नाशिक रोडला ८०८.४९, नागपूरला ७९५.९२, सीएसएमटी ७३५.२९, कल्याणला ७०४, ठाण्याला ७०१.७३, एलटीटीला ६६६.९९, पनवेलला ६५३.०७ गुण मिळाले आहेत.

अशी झाली स्वच्छतेची वर्गवारी

सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्थानकाची प्रवासी संख्या आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अशाप्रकारे स्थानकांची वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार उपनगरी नसलेले (एनएसजी)अशी विभागणी करण्यात आली. या एनएसजीची दोन वर्गात उप वर्गवारी करण्यात आली होती.

एनएसजी १ मध्ये एका वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारे आणि २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया स्थानकांचा समावेश होता.
तर, एनएसजी २ मध्ये एका वर्षाला १०० ते ५०० कोटींचा महसूल मिळवून देणारे आणि १ ते २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया स्थानकांचा समावेश होता. या दोन्ही वर्गवारीचा अभ्यास करून स्वच्छतेच्या स्थानकाची यादी करण्यात करण्यात आली. त्यानुसार एनएसजी १ मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाने तर एनएसजी २ मध्ये सोलापूर स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला.
———————————————————--

बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट

◾️मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या,

◾️अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

◾️अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे.

◾️अंतिम फेरीत अविनाश तेराव्या स्थानावर राहिला.

◾️२०१८ साली जून महिन्यात गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ८:४९:२५ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.

◾️ यानंतर फेडरेशन कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत अविनाशने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

जागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टोबर

दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- टोपणनाव – जागतिक प्राणीप्रेमी दिवस (World Animal Lover Day)

▪️उद्देश :

- प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ....

- पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे निकष आधुनिक घडामोडींना अनुरूप बनवणे. = (प्राणी संरक्षणाचे कायदे काळ बदलतो तसे जुने बनत जातात. अनेक शिकारी आणि तस्कर या कायद्यांत पळवाटा शोधतात. त्यामुळे असे कायदे काळाला सुसंगत बनवणे.)

- प्राण्यांचे कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या संघटना, संस्था जगभरात आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्यांच्यात समन्वय निर्माण करणे. (एकेकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे = जास्त परिणामकारक रिझल्ट्स!)

▪️४ ऑक्टोबरच का?

- असिसीचे संत फ्रान्सिस हे प्राण्यांवर अतिशय प्रेम करीत.

- ४ ऑक्टोबर हा त्यांचा ‘उत्सव दिन’ (Feast Day)!

- म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.

देश विदेश

» ग्लोबल गोलकीपर सन्मान श्री नरेंद्र मोदी यांना
» बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन तर्फे
» स्वछ भारत अभियानासाठी
---------------------------------
» इंडियन कोस्ट गार्ड शिप "वराह" चे या
जलावतरण
» 25/09/2019
» चेन्नई Telegram: VJSeStudy
----------------------------
» जाक शिराक यांचे निधन
» फ्रान्स चे दोन वेळा अध्यक्ष राहिले
» ला बुलडोझर नावाने ओळख
» दोन दशके पॅरिसचे महापौर
-------------------------------
» जागतिक अथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा   आजपासून
» ठिकाण - दोहा
» 27 जणांचा भारतीय संघ सामील
-----------------------------
» INS खांदेरी पाणबुडी दाखल
» कलवरी श्रेणीतील दुसरी पाणबुडी
» 28 सप्टेंबर 2019 नौदलात दाखल
--------------------------------
» लता मंगेशकर यांच्या 90 वा वाढदिवस
» 'लता' या पुस्तकाचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले
-------------------------------------
» INS निलगिरीचे माझगाव डॉक येथे जलावतरण
» संरक्षणमंत्री राजनाथसिंह व यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते
» P-17 A प्रकल्पांतर्गत उभारणी
» या मालिकेतील ही पहिलीच युद्धनौका
» नौदलप्रमुख अडमिरल कारमवीर सिंह उपस्थित होते. Telegram: VJSeStudy
» वजन- 2650 टन
» जलावतरन झाल्यास विविध चाचण्या झाल्यानंतर नौदलात सामील होते.
---------------------------------
» शांतिस्वरूप भटनागर डॉ कायरत साईकृष्णन यांना जाहीर
» CSIR तर्फे 2019 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत
» 12 संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे
» साईकृष्णन यांचे मूलभूत संशोधन- माणसाच्या प्रतिकार शक्ती प्रमाणे जीवाणूंनासुद्धा असते
--------------------------------
» भारताला सॅफ चषकाचे जेतेपद(फुटबॉल)(U-18) Telegram: VJSeStudy
» ठिकाण-काठमांडू
» उपविजेता-बांगलादेश
» भारताचे मुख्य प्रशिक्षक-फ्लाईड पिंटो
---------------------------------
» चित्रपट संगीताचे अभ्यासक अनंतराव सप्रे यांचे निधन
-----------------------------------
» संपूर्ण स्वदेश “अस्त्र” हवाई दलासाठी सज्ज
» DRDO ने विकसित केले आहे
» हवेतून हवेत मारा, आवाजहूनही वेगवान(4 पट)
» 110 km पर्यंतचा वेध घेऊ शकते
» DRDO प्रमुख डॉ जी सतीश रेड्डी
---------------------------------
» समाजमाध्यमावर 'भारत की लक्ष्मी' मोहीम
» श्री नरेंद्र मोदी यांनी मॅन की बात मध्ये प्रतिपादन
» या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर होत्या
-------------------------------
» शांता रंगास्वामी यांचा क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा. Telegram: VJSeStudy
» भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार
------------------------------
» पावसाची विक्रमी खेळी
» देशात 10% , राज्यात 32% अधिक पाऊस
» महाबळेश्वर रेकॉर्ड 8492MM
--------------------------------
» ग्रामीण भारत हागणदारीमुक्त
» महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‛ स्वच्छ भारत कार्यक्रमात’ PM मोदी यांची घोषणा
» 60 महिन्यात 11 कोटी सौचालय बांधल्याची माहिती. Telegram: VJSeStudy
---------------------------------
» कपिल देव यांचा हंगामी क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा
» BCCI नीती अधिकारी D. K. जैन
---------------------------------
» व्यक्तिविशेष
» ख्रिस्टलिना जॉर्जिव्हा_ IMF च्या नवीन प्रमुख
» 66 वर्षीय जॉर्जिव्हा पुडील 5 वर्ष पदावर असतील.

चालु घडामोडी वन लाइनर्स, 04 ऑक्टोबर 2019.

🔶 बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसांच्या दौ On्यावर भारतात आल्या

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत ट्रेंट बाउल्ट दुसर्‍या क्रमांकावर आहे

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत कागिसो रबाडा तिस 3rd्या क्रमांकावर आहे

Cum आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत पी कमिन्सचा चौथा क्रमांक लागतो

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत मुजीब उर रहमानचा पाचवा क्रमांक लागतो

ICC ख्रिस वॉक्सने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत 6 वे स्थान मिळविले

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत मोहम्मद अमीरने 7th वा क्रमांक मिळवला

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत मिशेल स्टार्कने 8 वे स्थान मिळविले

🔶 आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत रशीद खान 9 व्या स्थानावर आहे

ICC आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजीत मॅट हेन्रीने 10 वे स्थान मिळविले

S एस मल्लिकार्जुन राव यांना पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले

Hi अभिलाष खांडेकर यांची मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

Power वीज प्रकल्पांना कोळशाच्या पुरवठ्यात पारदर्शकता व चांगल्या समन्वयासाठी शासनाने "प्रकाश" पोर्टल सुरू केले.

🔶 आरबीआय चालू आर्थिक वर्षासाठी आज चौथे द्वि-मासिक धोरण जाहीर करेल

🔶 रविशंकर झा यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

🔶 अजय लांबा यांना गौती हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक

H इंद्रजित महांती यांची राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Man मणि कुमार यांची केरळ मुख्य न्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक

🔶 एल.एन. स्वामी यांना हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

🔶 जेके महेश्वरी यांची आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

🔶 एके गोस्वामी यांना सिक्किम हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

Ger रॉजर बिन्नी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले

America अ‍ॅलिस वॉल्टनने अमेरिकेच्या यादीत फोर्ब्स सर्वात श्रीमंत वुमन अव्वल स्थान मिळविले

5th 5 व्या टी -20 आयमध्ये भारत महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 5 विकेट्सने पराभव केला

M क्रिकेटर एम अझरुद्दीन बीसीसीआयचा एचसीए प्रतिनिधी निवडला

🔶 भाजपाने उत्तर प्रदेशमधील राज्यसभेसाठी सुधांशु त्रिवेदी यांना उमेदवारी दिली

🔶 युनायटेड किंगडममध्ये कॉमनवेल्थ ज्युडो स्पर्धा आयोजित

🔶 यूबीआय नाम्स चोकसी, गीतांजली जेम्स Willफ विलफुल डिफॉल्टर्स

Ult कुल्तर मलिक हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले गेले

🔶 एच.एम. अमित शहा दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस येथून निघाला

🔶 भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धामुळे दहा कोटींहून अधिक लोक मारले जाऊ शकतात: अभ्यास करा

🔶 पीएमसी बँक पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये झाली

🔶 जय राम ठाकूर यांनी एचडीएफसी बँकेच्या प्रगती रथचा शुभारंभ केला

ID भारताच्या कोनेरू हम्पीने ताज्या FIDE क्रमवारीत जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली

🔶 पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसमधील मेट्रो सेवा, ईएनटी रुग्णालयाचे उद्घाटन केले

🔶 मार्क कोल यांचा पाकिस्तान महिला प्रमुख प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Raf राजनाथ सिंह फ्रान्सला राफेल फायटर जेट्स मिळवण्यासाठी भेट देणार आहेत

🔶 डीएम राजनाथसिंग 8 ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये राफळे सॉर्टी उडणार आहेत

Met मुंबई मेट्रोने एकाच वापरातील प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली.

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...