Friday 4 October 2019

जागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टोबर

दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- टोपणनाव – जागतिक प्राणीप्रेमी दिवस (World Animal Lover Day)

▪️उद्देश :

- प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ....

- पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे निकष आधुनिक घडामोडींना अनुरूप बनवणे. = (प्राणी संरक्षणाचे कायदे काळ बदलतो तसे जुने बनत जातात. अनेक शिकारी आणि तस्कर या कायद्यांत पळवाटा शोधतात. त्यामुळे असे कायदे काळाला सुसंगत बनवणे.)

- प्राण्यांचे कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या संघटना, संस्था जगभरात आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्यांच्यात समन्वय निर्माण करणे. (एकेकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे = जास्त परिणामकारक रिझल्ट्स!)

▪️४ ऑक्टोबरच का?

- असिसीचे संत फ्रान्सिस हे प्राण्यांवर अतिशय प्रेम करीत.

- ४ ऑक्टोबर हा त्यांचा ‘उत्सव दिन’ (Feast Day)!

- म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...