Wednesday 6 January 2021

ब्रिटनमध्ये करोनाचे गंभीर संकट, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला भारत दौरा



ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. करोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते.


“बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली” असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.


“करोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे” असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.


काही दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना पुढच्यावर्षी युकेमध्ये होणाऱ्या G-7 परिषदेचे आमंत्रण दिले होते. यापूर्वी १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान होते. पुढच्या दशकात भारत-ब्रिटन संबंध कसे असावेत? याविषयी मित्र आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर उत्तम चर्चा झाली असे मोदींनी २७ नोव्हेंबरच्या टि्वटमध्ये म्हटले होते.

बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा



सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.


बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून  अकाउंट बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस माहिती, चेकबुकसाठी विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने व सेवांविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.


बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील. तर यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.


तसेच, जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.

२०२० मध्ये इंटरनेट उपयोगावर सर्वाधिक बंदी घालणारे देश व त्यामुळे झालेले नुकसान


🇮🇳 भारत : २७७९.३ मिलियन डॉलर्स 

🇧🇾 बलारुस : ३३६.४ मिलियन डॉलर्स 

🇾🇪 यमेन : २३६.८ मिलियन डॉलर्स 

🇲🇲 मयानमार : १८९.९ मिलियन डॉलर्स 

🇦🇿 अझरबैजन : १२२ मिलियन डॉलर्स

🇪🇹 इथिओपिया : १११.३ मिलियन डॉलर्स 

🇸🇩 सदान : ६८.७ मिलियन डॉलर्स 

🇹🇷 तर्की : ५१.१ मिलियन डॉलर्स 

🇸🇾 सिरीया : ३५.९ मिलियन डॉलर्स 

🇹🇿 तझानिया : २७.५ मिलियन डॉलर्स

🇹🇩 चाड : २३.१ मिलियन डॉलर्स

🇩🇿 अल्जेरिया : ९.६ मिलियन डॉलर्स

🇬🇳 गिनिया : ६.१ मिलियन डॉलर्स

🇯🇴 जॉर्डन : ४.९ मिलियन डॉलर्स

🇻🇪 वनेझुएला : २.४ मिलियन डॉलर्स .

टॉयकॅथॉन–2021


🔰केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते 5 जानेवारी 2021 रोजी संयुक्तपणे “टॉयकॅथॉन-2021” या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. भारतीय मुलभूत प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळणी विषयीची संकल्पना हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.


🔰कार्यक्रमामधून शाळा आणि महाविद्यालयामधले विद्यार्थी आणि शिक्षक, रचना तज्ञ, खेळणी तज्ञ आणि स्टार्टअप उद्योग भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यांना विषय धरून खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करणार आहेत.


🔰यासंबंधीचे प्रस्ताव 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन सादर करता येणार आहेत.


🔰हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), महिला व बालविकास मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाच्या अभिनवता कक्षाने आयोजित केलेला एक आंतर-मंत्रालय उपक्रम आहे.


💢पार्श्वभूमी


🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केले जात आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


🔰या कार्यक्रमामुळे शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशातल्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधले विद्यार्थी, प्राध्यापकांना आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ससदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून


🧪मत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे.

त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल.


🧪तर पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.

तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.


🧪तसेच 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद  संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.

देशातील आनंदी शहरांत महाराष्ट्रातील तीन शहरे


● ‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’नुसार आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

● प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार के ली आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनामध्ये राजेश कार्यरत आहेत. 

● वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोई-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे. 

● राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये १२ व्या स्थानी आहे. 

● देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. 

● देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२ व्या स्थानी असून नागपूर १७ व्या आणि मुंबई २१ व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

● आनंदी शहरांमध्ये लुधियाना प्रथम स्थानी तर  अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.


आनंदी शहरांची क्रमानुसार यादी

लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम, रायपूर


‘इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण



भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे.


 कोविड-१९च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे. उपग्रह उत्तम स्थितीत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे.

श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटने अवकाशात झेप घेतली. 


हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सीएमएस-०१, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे ५२ वे अभियान आहे.

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-



१) रामसर करार - 

वर्ष - १९७१


* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर


* अमलात येण्याचे वर्ष - १९७५


* भारताने मान्य केला - १९८२


२) CITES - 

वर्ष - १९७३


* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण


*अमलात येण्याचे वर्ष - १९७६


* भारताने मान्य केला - १९८०


३) बोन करार - 

वर्ष -१९७९


* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९८३


* भारताने मान्य केला -१९८३


४) व्हिएन्ना करार -

 वर्ष - १९८५


* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८


* भारताने मान्य केला - १९९१


५) बँसेल करार - 

वर्ष - १९८९


* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट


* अमलात येण्याचे वर्ष - १९९२


* भारताने मान्य केला - १९९


६) UNFCCC - 

वर्ष - १९९२


* हवामान बदल रोखणे


* अमलात येण्याचे वर्ष - १९९४


* भारताने मान्य केला - १९९३


७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७


* हरितवायू उत्सर्जनात घट


* अमलात येण्याचे वर्ष - २००५


* भारताने मान्य केला - २००२


८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२


* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन


* अमलात येण्याचे वर्ष - १९९३


* भारताने मान्य वर्ष - १९९४


९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - 

वर्ष - २०००


* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण


* अमलात येण्याचे वर्ष - २००३


* भारताने मान्य केला - २००३


१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -

वर्ष - १९९४


* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण


* अमलात येण्याचे वर्ष - १९९६


* भारताने मान्य केला - १९९६


११) रोटरडँम करार - 

वर्ष - १९९८


* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००५


१२) स्टॉकहोम करार -

 वर्ष - २००१


*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .


ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार


* अमलात येण्याचे वर्ष - २००४


* भारताने मान्य केला - २००६

मराठी व्याकरण सराव प्रश्न


१) 'भाववाचक नाम' ओळखा 

१)  उंची   ✔️

२)  शरद 

३)  पुस्तक 

४)  झाडे 


२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा 

१) ती हळू चालते 

२) रघु खूप झोपला 

३) रमेश दुध पितो  ✔️

४) तो मूर्ख आहे 


३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .

  माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे 

१)  अंगणाला 

२)  अंगणाशी 

३)  अंगणाचे

४)  अंगणा    ✔️


४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?

१)  उभयान्वयी अव्यय  ✔️

२)  शब्दयोगी अव्यय

३)  क्रियाविशेषण अव्यय 

४)  केवलप्रायोगी अव्यय 


५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात 

१)  वाक्य 

२)  शब्दसमूह 

३)  कर्तरी प्रयोग 

४)  प्रयोग   ✔️


६)  ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?

१)  नपुसंकलिंग    ✔️

२)  पुल्लिंग 

३)  स्त्रीलिंग 

४)   यापैकी नाही 


७)  ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा 

१)   रीती भूतकाळ   ✔️

२)   रीती वर्तमानकाळ

३)   रीती भविष्यकाळ

४)   अपूर्ण भूतकाळ 


८)  ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

१)  विकल्पबोधक 

२)  परिणामबोधक 

३)  संकेतबोधक 

४)  समुच्चयबोधक  ✔️

९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?

१) उभयान्वयी

२)क्रियाविशेषण

३)केवलप्रयोगी  ✔️

४)शब्द योगी


१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?

१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?

२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला. ✔️

३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.

४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.


११)'बाभळी मुद्रा व देवळी  निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस ✔️

२)अत्यंत बावळट माणुस

३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा

४)खूपच आळशी माणुस


१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |

हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

१) यमक

२)पुष्यमक

३)अनुप्रास ✔️

४) श्लेष



1) सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

"जो"

A. पुरुषवाचक सर्वनाम

B . दर्शक सर्वनाम

C . संबंधी सर्वनाम✔️✔️✔️

D . अनिश्चित सर्वनाम


2) विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ---------- असे म्हणतात .

A . विशेष्य✔️✔️✔️

B . अव्य सदृश्य सर्वनाम

C . धातुसाधित विशेषणे

D . अव्ययसाधित विशेषणे


4) अव्ययालाच ------- म्हणतात .

A . विकारी शब्द 

B . पद✔️✔️✔️

C. अविकारी शब्द 

D . विकृति


3) "चांगला मुलगा परिक्षेत पास होतो " यावाक्यातील विशेषण प्रकार ओळखा .

A  . अधिविशेषण✔️✔️✔️

B . विधिविशेषण

C . सार्वनामिक विशेषण

D . उत्तर विशेषण


 4) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा ?

"थड"


A . गार

B . किनारा✔️✔️✔️

C . आधात

D . गर्दी 


5) पुढील शब्दसिध्दिचा प्रकार ओळखा ?

"धडपड "


A . पूर्णाभ्यस्त

B .अंशाभ्यस्त

C . अनुकरण वाचक✔️✔️✔️

D .  यापैकी नाही 


6) मराठी भाषेत मुळ सर्वनामे किती आहेत?

A  . १२

B . ०९✔️✔️✔️

C . १५

D . ०७


7) " चला पानावर बसा " या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा?

A . व्यंगार्थ

B . लक्षार्थ✔️✔️✔️

 C . वाच्यार्थ

D . संकेतार्थ


Q: 8) " राम वनात जातो " या वाक्यात एकूण किती मुलध्वनी आहेत ?

A . सात

B. अकरा 

C . तीन 

D . चौदा✔️✔️✔️


10) "मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला"

 या वाक्यातील कर्ता ओळखा

A  .मी

B  . संकष्टी चतुर्थी

C  . चंद्र ✔️✔️

D  . दिसणे


 11) "ळ" वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

A . उष्मे

B . स्पर्श 

C . महाप्राण

D . स्वतंत्र✔️✔️✔️


 12) "आजी दृष्ट काढते" 

वाक्यातील प्रयोग ओळखा

A . कर्मणी प्रयोग 

 B. कर्तरी प्रयोग✔️✔️

C . भावे प्रयोग

D . शक्य कर्मणी प्रयोग


13) प्राधान्य नुसार समासाचे प्रकार  सांगा

A) अव्ययीभाव समास

B) तत्पुरुष समास

C) द्व्ंद्व समास

D) बहुव्रीही समास

आर्सेनिकचे प्रदूषण


✍️आर्सेनिक हा जवळजवळ सर्व प्रकाराच्या जीवनासाठी विषारी ठरतो, परंतु अलीकडेच वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांना एका अभ्यासातून असा शोध लागला आहे की प्रशांत महासागरातले काही सूक्ष्मजीव पाण्यातल्या या विषारी घटकाला सहन करण्यासोबतच सक्रियपणे श्वसनासाठी आत्मसात केले आहे.


✍️बदलत्या वातावरणाशी कश्याप्रकारे जुळवून घेतले जाते त्याबाबत हा शोध घेतला गेला.


◾️आर्सेनिक पदार्थ:-


✍️आर्सेनिक (As) एक गंधहीन आणि चव नसलेला उपधातू आहे, जो भूमीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. हा पदार्थ सामान्यपणे शीळा, माती, पाणी आणि हवेत आढळतो. हा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात आढळून येणार्‍या पदार्थांमधील 26वा पदार्थ आहे. प्रमाणानुसार, आर्सेनाइट As-3 याला आर्सेनिकचे सर्वात विषारी स्वरूप मानले जाते. शिवाय आर्सेनिकचे मिथाइलेटेड स्वरूप {MMA(V), DMA(V), MMA(III), DMA(III)} देखील विषारी असतात. जैव-इंधन जाळणे, रासायनिक खते, उद्योग हे या पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत.


✍️मानवी जीवनास विषारी ठरणार्‍या आर्सेनिकमुळे ‘आर्सेनिकोसिस’ ही वैद्यकीय समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातल्या उपलब्ध आवश्यक एनजाइमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बरेच अवयव काम करणे बंद करतात तसेच त्वचेचे रोग, कर्करोग सारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.


✍️पयजलात आर्सेनिकसाठी WHO कडून ठरविण्यात आलेल्या मानकानुसार, पेयजलातली या पदार्थाची कमाल पातळी (MLC) 10 PPB एवढी आहे. भारतामध्ये हे प्रमाण 50 PPB एवढे स्वीकृत करण्यात आले आहे.


✍️भारतात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आसाम, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आर्सेनिकचा प्रभाव आढळून येतो.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारतीय क्षेपणास्त्रे


1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

मोजकेच पण महत्वाचे‌


            सा. विज्ञान विशेष

        शास्त्रीय शोध व संशोधक 


1) प्रोटॉन - गोल्ड स्मिथ 

2) इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन

3) न्यूट्रॉन - C.C. चाडविक

4) किरणोत्सार - हेन्री बेक्वेरेल

5) लेझर किरण - शॉल व चार्लस टोन्स 

6) क्ष- किरणे - रॉन्टजेन

7) पोलोनियम, रेडियम  - मादाम क्युरी,            पेरी क्युरी

8) अमोनियम, ऑक्सिजन - जोसेफ  प्रिस्टले

9) हायड्रोजन - हेन्री कॅव्हेंडिश

10) अणूबॉम्ब - जे. रॉबर्ट ओपन हायमर

11) महारोगावरील लस - थोर्मन हन्सन

12) डायनामाईट - अल्फ्रेड नोबेल

13) देविची लस - एडवर्ड जेन्नर

14) जडत्वाचे नियम - आयझॅक न्यूटन

15) सापेक्षतावाद - अल्बर्ट आईन्स्टाईन

16) मधुमेहावरील उपचार - M. बेंटिग

17) शिवनयंत्र - एलियस हावे

18) अॅटमबॉम्ब - आटो हॉन

19) रिवॉल्वर - कोल्ट

20) सुरक्षित वस्तरा - जिलेट

21) दुरध्वनी - ग्रॅहम बेल

22) टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड

23) केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस

24) मायक्रोस्कोप - जेन्सन

25) टायर - डेनलफ

26) बॅरोमीटर - टॉरीचीली

27) विमान - राईट बंधू

28) बंदुकीची दारू - रॉजर बेकन

29) बॉलपेन - जॉन लुई

30) बॉल पॉईंट पेन - ब्युरो बंधू

31) विद्यूत घट - व्होल्टा

32) होमियोपॅथी - सॅम्युअल हायेनमन

33) टाईपरायटर - ख्रिस्तोफर शोल्स

34) स्ट्रेप्टोमायसिस - बॅकसन

35) पोलिओ लस दंडावाटे - साल्क

36) पोलिओ लस तोंडावाटे - अल्बर्ट साबीज

37) बिनतारी संदेश - मार्कोनी

38) कॉलरा - रॉबर्ट कॉक

39) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

40) पेट्रोल इंजिन - निकोलस ऑटो 

41) डिझेल इंजिन - रुडॉल्फ डिझेल

42) इलेक्ट्रीक डायनामा - लायकेल फॅरडे

43) अनुवंशशास्त्राचा जनक- मेंडेल

44) उत्क्रांतीवाद - चार्ल्स डार्विन

45) मोटर गाडी - हेन्री फोर्ड

46) घड्याळ - पीटर

47) सायकल - मॅकमिलन

48) हातमाग - आर्ट राईट

49) यंत्रमाग - कार्ट राईट

50) मोटर सायकल - एडवर्ड  बटलर

भारतीय निवडणूक आयोग



भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.


♦️ आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त


🔹 सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८

🔹 कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७

🔹 एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२

🔹 महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३

🔹 टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७

🔹 एस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२

🔹 राम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५

🔹 आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०

🔹 श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०

🔹 टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६

🔹 एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१

🔹 जेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४

🔹 टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५

🔹 ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६

🔹 एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९

🔹 नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०

🔹 शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२

🔹 वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५

🔹 हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५

🔹 नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७

🔹 अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018

🔹 ओमप्रकाश रावत : 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018

🔹 सुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे

मराठी व्याकरण शब्दाच्या जाती


1] नाम -


जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.


उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश... 

__________________________


2] सर्वनाम-


 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.


उदाहरण - मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण...... 

__________________________


3] विशेषण-


 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.


उदाहरण - गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर.... 

__________________________


4] क्रियापद- 


जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.


उदाहरण - बसणे, पळणे, जातो..... 

__________________________


5] क्रियाविशेषण- 


जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.


उदाहरण - इथे, तिथे, आज, उद्या.... 

__________________________


6] शब्दयोगी अव्यय- 


जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी, 

__________________________


7] उभयान्वयी अव्यय-


 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - व, आणि, किंवा, परंतु..... 

__________________________


8] केवलप्रयोगी अव्यय-


 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.


उदाहरण - अरेरे, अबब..... 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४  विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


मिशन नोकरी

• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे


• कलकत्ता :- 

भारतातील पहिल्यांदा तरंगता बाजार म्हणजेच 'फ्लोटिंग मार्केट' पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे सुरु करण्यात आला आहे 

Online Test Series

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास

🟢


◾️जन्म नागपूरमधील कामठी येथे 6 जानेवारी 1904 रोजी झाला.


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना "जय भीम" या अभिवादनाचे जनक मानले जाते


◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते


◾️वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच 12 जानेवारी  1949 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे

१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅


२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅


३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही


४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज


५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश


६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी

(B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन

(C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅

(D) यापैकी नाही


८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड

(B) भारतीय पोलाद प्राधिकरण

(C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅

(D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन


९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? 

(A) एन. राजा✅

(B) सेनगोट्टीयन के. ए.

(C) पी. थांगमणी

(D) एस. पी. वेलुमानी


१०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत

(B) जपान✅

(C) चीन

(D) रशिया


११) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ

(B) उला चक्रीवादळ

(C) दमण चक्रीवादळ

(D) यासा चक्रीवादळ✅


१२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅

(B) नागालँड आणि मिझोरम

(C) मणीपूर आणि त्रिपुरा

(D) यापैकी नाही


१३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी

(B) 3 जानेवारी

(C) 5 जानेवारी

(D) 4 जानेवारी✅


१४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली? 

(A) बेलारूस

(B) कझाकस्तान✅

(C) ताजिकिस्तान

(D) चीन


१५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष

(B) 25 वर्ष

(C) 24 वर्ष

(D) 21 वर्ष✅


१६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत

(B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी

(C) मेजर जनरल गौतम चौहान✅

(D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग


१७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया✅

(D) चीन


१८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग

(B) जॅक मा

(C) अनिल अंबानी

(D) झोंग शांशां✅


१९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे

(B) तियानवेन-1✅

(C) शेनझोऊ

(D) चांग’ए प्रोजेक्ट


2०) कोणत्या मंत्रालयाने 'उद्योग मंथन' कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच - मोदी.


🗑औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🗑या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


🗑राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.

भारतीय हवामान विभागाचा “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ अहवाल.


🔰भारतीय हवामान विभागाने (IMD) “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.


🔴ठळक नोंदी ...


🔰वर्ष 2020 हे वर्ष 1901 पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले.सर्वात उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षातली म्हणजे 2006-2020 मधली वर्षे आहेत.


🔰मागील दशक (2001 - 2010/2011 - 2020) हे देखिल नोंदवले गेलेल्या सर्वाधिक उष्ण दशकांपैकी एक आहे.

देशभरात झालेला नैऋत्य मौसमी हंगामातला (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा जास्त (LPAच्या 109 टक्के) होता.


🔰दशभरातले 2020 या वर्षातले ईशान्य मोसमी हंगामामधले पावसाचे प्रमाण सर्वसाधारण होते.


🔰2020 या वर्षामध्ये उत्तर हिंद महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळ म्हणजे अतीशक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’,  तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’.


🔰हवामानासंबधीत प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. उदाहरणार्थ - अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर इत्यादी.


🔰वार्षिक पृष्ठभाग तसेच हवेचे तापमान वर्ष 2020 मध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. यावर्षी देशभरात जमीन आणि हवेचे तापमान हे सरासरी +0.29 अंश सेल्सियस राहिले.


🔰दशभरातल्या हवामानाच्या नोंदी वर्ष 1901 पासून केल्या जातात. या नोंदींनुसार 2020 हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.


🔰‘WMO स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट’ याच्यानुसार, जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातला फरक वर्ष 2020 मध्ये (जानेवारी तो ऑक्टोबर) हा +1.2 अंश सेल्सियस राहिला.

Shift 1 Mts 5 January 2021 exam questions



१) वैदिक संस्कृतीचा कालखंड


२) महाराष्ट्राचे वनमंत्री


३) महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री


४) भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे


५) भारतातील सर्वात साक्षर जिल्हा


६) अकोल्याचे खासदार


७) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री


८) गोदावरी नदीची लांबी किती


९) कावेरी नदी कोठे आहे


१०) महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कधी सुरू केली


११) बुलंद दरवाजा कोठे आहे


१२) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबविली गेली


१३) संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या


१४) संत कबीर कोणत्या समाजाचे होते


१५) भारतात पोस्ट बँक ची सुरुवात केव्हा झाली


१६) गीत गोविंद ग्रंथ कोणी लिहिला आहे


28) जयदेव लिखित गीतागोविंदम कोणत्या भाषेत आहे


29) कलिंगा पुरस्कार कोणती सायन्स अकॅडेमी देते


30) मुदुमलाई अभयारण्य कोठे आहे


31) मानस कोणत्या नदीची उपनदी आहे


32) गंदक कोणत्या नदीची उपनदी आहे


33) बालमजुरी हे कोणत्या मूलभूत हक्कामध्ये येते


34) वेद किती आहेत


35) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली


36) बॉम्बे प्रेसिडन्सी स्थापना


37) NATO ट्रीटी मध्ये शेवटचा सदस्य देश कोणता


38) जीविताच स्वातंत्र्य कोणत्या कलमात येते


39) गुरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे


40) ग्रँड टॅंक रोड कधी बांधण्यात आला


41) राष्ट्रीय सभेत फूट केव्हा पडली


42) वेदांचे किती प्रकार आहेत


43) कन्याकुमारी ते तामिळनाडू मध्ये कोणती नदी आहे


44) मुंबई येथे कोणती चळवळ झाली होती


45) कावेरी नदी काठी कोणते गाव/शहर आहे


46) जगातील कोणता देश पोलिओ मुक्त झाला आहे


47) (20×20×20) ÷(4×4×4)


48) मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे


49) आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोनते


50) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली


51) (152 × 17 ) (33 ÷ 11 ) = ?


52) (120÷16) × ? - 4=356


53) बिहू सण कोणत्या राज्याचा आहे


54) दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे


55) CII चा फुल फॉर्म


56) कृष्णा आणि कावेरी कोणत्या किनाऱ्यावरून वाहतात


57) DGP फुल फॉर्म


58) पेंच व्याघ्रप्रकल्प


59) ऑपरेशन समुद्र सेतू


60) अष्टप्रधान मंडळातील प्रधान


61) भारताचे 12 वे राष्ट्रपती


62) सर्वात जास्त ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात असतो


63) महाबलिपुरम मंदिर


64) प्रस्तावनेत नसलेला शब्द


65) बोडो भाषा कोठे बोलली जाते


66) दक्षिणवासी कालीमाता मंदिर

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...