Wednesday 28 December 2022

29 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड


Q.1) महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे?

✅ नागपूर


Q.2) मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली?

✅ दक्षिण कोरिया


Q.3) नुकतेच पियुष गोयल यांनी ग्राहकांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?

✅ राईट टू रिपेअर


Q.4) रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ अनिल कुमार लाहोटी


Q.5) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ संतोष कुमार यादव


Q.6) निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?

✅ सुवर्णपदक


Q.7) जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे?

✅ पाचव्या


Q.8) भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितवा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे?

✅ 30 वा


Q.9) जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

✅ 68 वा


Q.10) IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ सॅम कुरन

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता


१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

सराव प्रश्न उत्तरे

Question : 1

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅

(B) जैवतंत्रज्ञान विभाग

(C) गृह मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 2

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅

(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 3

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅

(B) राजस्थान

(C) उत्तरप्रदेश

(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 4

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 5

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस

(B) डी ओप्रेसो लिबर

(C) सेम्पर सुप्रा ✅✅

(D) यापैकी नाही


1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील 

B) दरोगा  ✍️

C) जिल्हाधिकारी 

D) तलाठी   


2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 ) 

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️

B) व्हॉईसरॉय - मिंटो 

C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु 

D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड 


3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 ) 

A)लॉर्ड  लिटन 

B) लॉर्ड  रिपन ✍️

C) लॉर्ड  हेस्टिंग्स 

D) लॉर्ड  इल्बर्ट


4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 ) 

A) लॉर्ड  रिपन  

B) लॉर्ड  लिटन ✍️

C)लॉर्ड  कर्झन 

D) लॉर्ड  डफरीन 


5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 ) 

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन  

B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु  

C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️

D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

_________________________

1) खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.

(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर (b) चुकीचे आहे.

 B. विधान (b) बरोबर (a) चुकीचे आहे.

 C. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 D. दोन्ही विधाने चुकीची आहेत.✍️

____________________________


2) खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

 A. भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी 

 B.  राज्याचा महाधिवक्ता

 C. राज्य लोकसेवा आयोग

 D. राज्य मानवी हक्क आयोग.✍️

____________________________

3) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत✍️

 D. गुरदयालसिंग धिल्लन.

____________________________

4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता✍️

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________________

5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_____ समावेश होतो.

 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा✍️

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.

____________________________

6) भारतीय राज्यघटनेतील ___ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21✍️

 C. कलम 22

 D. कलम 31.


____________________________

7) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा✍️

 C. सात

 D. आठ. 


____________________________


8) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.✍️

____________________________


9) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा✍️

 D. चार.

____________________________


10) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.✍️

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

विज्ञान प्रश्नसंच.


🏆 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 


⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 

_________________________


🏆 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?


⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन

_________________________


🏆 नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?


⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


🏆 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?


⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण

_________________________


🏆 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?


⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम

_________________________


 🏆 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?


⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 

_________________________


🏆 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?


⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन

_________________________


🏆 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.


⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट

_________________________


🏆 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................


⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️

_________________________


🏆 धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू 

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश ☑️

_____________________________

पलेटलेट्स म्हणजे काय?


हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                     
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई -

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

हिवताप/ मलेरिया (Malaria)


💉 रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.


🎯परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.


🎯प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.


🎯लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.



🔬 हिवतापाच्या अवस्था

 (Stages Of Malaria):


1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही  अवस्था 2-4 तास आढळते.


2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.


3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही  अवस्था 15-20 मिनिट आढळते.


💉 लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन


🔬 जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही  औषधे सुचविली आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...