Sunday 12 April 2020

General Knowledge

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : मुंबई आणि मांडवा

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🖌 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी

🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद

🖌 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस

🖌 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास

🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल

🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक

🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

📚Ref. : "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी", लेखक - अॅड. वरद देशपांडे, प्रकाशन - बी पब्लीकेशन.

यंदा उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय .


⚜दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १ ते ३० जून या कालावधीतील उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. करोनाच्या फैलावामुळे देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने प्रलंबित कामकाजाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

⚜त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयाने अन्य संबंधित न्यायालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीलाही स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि अन्य न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

⚜देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात १६ मार्चपासून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहे.

रघुराम राजन आंतरराष्ट्रीय l नाणेनिधीच्या सल्लागारपदी

🦚आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी ही घोषणा केली आहे.

🦚कोरोनाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. येत्या काळात हे सावट आणखी गडद होऊ शकतं. अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी रघुराम राजन यांच्यासह जगभरातील ११ अर्थतज्ज्ञांची सल्लागार समिती बनवण्यात आली आहे.

🦚कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक मोठमोठे उद्योग बंद आहेत. त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही होत आहेत. भविष्यात जगात मोठ्या मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ NASSCOM संस्थेचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : प्रवीण राव

▪️ कोणत्या कंपनीने 07 एप्रिल 2020 रोजी खासगी क्षेत्रातल्या इंडसइंड बँकेमधला 0.85 टक्के हिस्सा खरेदी केला?
उत्तर : UBS प्रिन्सिपल कॅपिटल एशिया

▪️ ‘17 वर्ष वयोगटातील महिलांचा FIFA विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात घेण्याचे नियोजित होते?
उत्तर : भारत

▪️ ब्रह्म कांचीबोटला कोण होते?
उत्तर : पत्रकार

▪️ फलंदाज आणि यष्टीरक्षक राहिलेले जॅक एडवर्ड्स कोणत्या देशाचे होते?
उत्तर : न्युझीलँड

▪️ कोणते पोर्ट ट्रस्ट ‘सक्तीची अनिश्चित परिस्थिती’ घोषित करणार पहिला सरकारी बंदर ठरला?
उत्तर : कोलकाता पोर्ट ट्रस्ट

▪️ कोबे ब्रायंट यांना कोणत्या देशातल्या नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये मरणोत्तर सामील करण्यात आले आहे?
उत्तर : अमेरिका

▪️ दरवर्षी 07 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 2020 या वर्षाची संकल्पना काय आहे?
उत्तर : सपोर्ट नर्स आणि मिडवाईव्ह्ज

▪️ क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली?
उत्तर : टोनी लुईस

▪️ नौदलाचे कोणत्या डॉकयार्डमधील कर्मचार्‍यांनी ‘पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सीजन मॅनिफोल्ड’ यंत्रणा विकसित केली?
उत्तर : विशाखापट्टणम

--------------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्नसंच

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

समानार्थी शब्द

परिश्रम = कष्ट, मेहनत   
पती = नवरा, वर 
पत्र = टपाल 
पहाट = उषा  
परीक्षा = कसोटी 
पर्वा = चिंता, काळजी 
पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री 
पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज
पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती
प्रकाश = उजेड 
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक
प्रजा = लोक 
प्रत - नक्कल
पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी
प्रदेश = प्रांत 
प्रवास = यात्रा    
प्राण = जीव 
पान = पत्र, पत्ता, पर्ण 
प्रासाद = वाडा 
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन 
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ  
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पोपट = राघू, शुक
पाऊस = वर्षा, पर्जन्य 
पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी 
पिशवी = थैली 
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन 
पुंजा = पूजन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती  
फलक = फळा   
फांदी शाखा 
फूल = पुष्प, सुमन, कुसुम

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...