Sunday 5 January 2020

२०१९ मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू – रिपोर्ट

📌 सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, रेल्वे आणि रस्ते अपघातात अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे

📌 भारतात २०१९ मध्ये एकूण ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI)या स्वयंसेवी संस्थेने एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

📌 रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये ३८ वाघांची शिकार करण्यात आली. २०१८ मध्ये हा आकडा ३४ होता. दुसरीकडे मृत बिबट्यांचा आकडा २०१८ च्या तुलनेत कमी झाला आहे. २०१८ मध्ये ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. मात्र सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, रेल्वे आणि रस्ते अपघातात अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

📌 दरम्यान २०१८ च्या तुलनेत मृत वाघांच्या संख्येत थोडीशी वाढ झाली आहे. २०१८ मध्ये १०४ वाघांचा मृत्यू झाला होता. यावेळी हा आकडा ११० वर पोहोचला आहे. "या आकड्यांवरुन कोणताही तर्क लढवला जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या असतात. पण रेल्वे आणि रस्ते अपघातात बिबट्यांचा मृत्यू होणं खूपच चिंताजनक आहे.

📌 रस्त्यावरील वाढती वाहनं आणि रस्त्यांची रुंदी वाढवल्याने वाहनांचा वाढणारा वेग याचाच हा परिणाम आहे," अशी माहिती स्वयंसेवी संस्थेचे नितीन देसाई यांनी दिली आहे.

📌 वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून २९ वाघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून राज्यात २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये मध्य प्रदेशात २३ तर महाराष्ट्रात १९ वाघांचा मृत्यू झाला आहे.

📌 दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची (एनटीसीए)आकडेवारी वेगळी आहे. त्यांच्यानुसार २०१९ मध्ये ९२ तर २०१८ मध्ये १०२ वाघांचा मृत्यू झाला. एनटीसीएच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एकूण २९६७ वाघ आहेत.

📌  महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत वाढ झाली असून २०१४ मध्ये १९० चा आकडा २०१८ मध्ये ३१२ पर्यंत पोहोचला. ५२६ वाघांसोबत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. पण शिकारीमुळे होणारे मृत्यू दोन्ही राज्यांसाठी चिंतेचा विषय आहे.

📌 २०१९ मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीत घसरण झाली आहे. एनटीसीएकडे यासंबंधी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. तर सोसायटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये देशभरात ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ९७ बिबट्यांचा मृत्यू झाला असून यामधील ३१ बिबट्यांचा रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

गगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड.

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-3 आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे.

📌गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली.

📌बंगळुरुत के सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान 2020 पर्यंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.

📌गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल.

📌रशियामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.तर यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे.

📌2019 मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,
2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे.

📌गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचं प्रशिक्षण यावर्षींची सर्वात
मोठी घडामोड असणार असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.

आता देशातील 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड'ची योजना सुरू झाली

🔰1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना सुरु करण्यात आली आहे

🔴'एक देश, एक रेशन कार्ड' म्हणजे काय ?

🔰 'एक देश, एक रेशन कार्ड' अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार

🔰 म्हणजे कोणत्याही एका केंद्राकडून रेशन घेण्याची सक्ती आता राहणार नाही

🔰 याचा फायदा अशा लोकांना अधिक होणार जे एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत असतात

🔰ही योजना पुढील 12 राज्यांत लागू झाली

🔰आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा

🔰 या राज्यांमध्ये ही  योजना सुरू करण्यात आली आहे.

🔰  तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही  योजना अंमलात आणली जाणार आहे.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा : ज्योतिबा, रामचंद्र, सागर यांना सुवर्ण

- महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत शनिवारी सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ किलो) आणि सोलापूरच्या रामचंद्र कांबळे (७९ किलो) यांनी गादी विभागात तर माती विभागात पुण्याच्या सागर मारकडने (६१ किलो) सुवर्णपदक पटकावले.

- श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत गादी विभागातील ७९ किलो गटाच्या अंतिम फेरीत रामचंद्रने उस्मानाबादच्या रवींद्र खैरेवर १४-३ अशी मात केली. अहमदनगरचे केवल भिंगारे व साताऱ्याच्या श्रीधर मुळीक यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

-  ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबाने कोल्हापूरच्या रमेश इंगवलेला चीतपट केले. उपांत्यपूर्व फेरीत बीडच्या आतिष तोडकर याने पुण्याच्या केतन घारेचा १०-० असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.

-  दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या संकेत ठाकूरने कोल्हापूर शहराच्या साइराम चौगुलेचा १०-० असा पराभव करून कांस्यपदक मिळवले.

- माती विभागाच्या ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हय़ाच्या सागरने पुणे शहरच्या निखिल कदमला चीतपटीने मात करीत सुवर्णपदकावर कब्जा केला. सागर मारकड प्रथमच ६१ किलो वजनी गटात खेळत होता व पदार्पणातच त्याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. याआधी सागर ५७ किलो वजनी गटात खेळत असे. त्याही गटात गेली चार वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

- ‘महाराष्ट्र केसरी’ खुल्या गटाची प्रथम फेरी पार पडली. गादी विभागात लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेवर १९ सेकंदात १० गुणांच्या तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळविला. पुण्याच्या अभिजीत कटकेने अमरावतीच्या मिरजा नदीम बेगवर ६ सेकंदांत चीतपट विजय मिळवून पुढील फेरी गाठली.

- मुंबईच्या समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादुमिया मिलानीवर ७-२ असा विजय मिळवला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्य़ाच्या साहिल पाटीलवर ११-६ अशी मात केली. विष्णू खोसेचा प्रतिस्पर्धी काही कारणास्तव अनुपस्थित असल्याने त्याला पुढे चाल मिळाली.

- माती विभागात गतविजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर १०-० असा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवला.

▪️अंतिम निकाल

- गादी विभाग – ७९ किलो : १. रामचंद्र कांबळे (सोलापूर), २. रवींद्र खैरे (उस्मानाबाद), ३. केवल भिंगारे (अहमदनगर) आणि ३. श्रीधर मुळीक (सातारा); ५७ किलो : १. ज्योतिबा अटकळे (सोलापूर), २. रमेश इंगवले (कोल्हापूर), ३. आतिष तोडकर (बीड) आणि संकेत ठाकूर (पुणे शहर). माती विभाग – ६१ किलो : १. सागर मारकड (पुणे जिल्हा), २. निखिल कदम (पुणे शहर), ३. हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

- नवीन वजनी गटात खेळण्यासाठी गेले वर्षभर तयारी करीत होतो. त्यामुळे आपण यामध्ये पदक जिंकू असा विश्वास होता, पण अंतिम फेरीत इतक्या सहजासहजी विजय मिळेल असे वाटले नव्हते. यशाचे श्रेय मी माझे वडील मारुती मारकड यांना देतो, जे स्वत: एनआयएस कुस्ती प्रशिक्षक आहेत. यापुढे राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धावर लक्ष केंद्रित करून देशाचेही नाव उज्ज्वल करेन.
---------------------------------------------------

निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल स रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

- अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.

- 1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.

▪️नव्या नियमांनुसार,

- नोंदणी करणार्‍या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.

- https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.

- राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

▪️ECI विषयी

- भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

- घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.

- आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
---------------------------------------------------

इस्रोच्या 'रिसॅट - 2BR1'चं यशस्वी लॉन्चिंग

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज (दि. 11) रिसॅट - 2BR1 या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

'रिसॅट - 2BR1' या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात आले.

'हे' फायदे होणार* :

RISAT-2BR1 मध्ये खास सेन्सरमुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.

  दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळणार आहे.

कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.

  कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आजच्या लॉन्चिंगसह इस्रोने गेल्या 20 वर्षात 33 देशांचे 319 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ब्रिटिशकालीन शिक्षण

♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854

♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात.
= चार्ल्स वुड

♦️मुंबई, कोलकाता, आणि मद्रास येथे केव्हा विद्यापीठे स्थापन झाली.
=इ स 1857

♦️कोणी कलकत्ता येथे स्वखर्चाने 'बेथ्यून कॉलेज' काढले.
= लॉर्ड डलहौसी

♦️हंटर आयोग स्थापन.
= 1882

♦️भारतात मुद्रणकलेची सुरुवात कोठे झाली.
= गोवा

♦️मुद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते?
= डॉ, कॅरे

♦️महाराष्टात ख्रिश्चन मिशऱ्यानी ग्रंथ छपाई केव्हा सुरू केली?
= इ स 1810

असहकार आंदोलनाचा प्रसार व व्याप्ती

* गांधीजींनी खिलाफत चळवळीचे नेते अली बंधूसोबत
देशव्यापी दौरा केला.

सरकारी शाळांवर बहिष्कार -

अंदाजे ९०,०००
विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा-कॉलेजेस सोडून
नवनिर्मित ८०० राष्ट्रीय शाळा व महाविद्यालयात
प्रवेश घेतला. बंगालमध्ये चित्तरंजन दास यांनी
प्रमुख भूमिका बजावली. सुभाषचंद्र बोस कलकत्ता
येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.
राष्ट्रीय शाळांच्या स्थापनेत सहभागी नेतृत्व होते
आचार्य नरेंद्र देव, लाला लजपतराय, झार्ीर हुसेन
इ. याशिवाय अलिगढची जामिया मिलिया, काशी
विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ व बिहार विद्यापीठ
यांचाही लक्षणीय सहभाग होता.
वकिली व्यवसायाचा त्याग करणारे नेते - चित्तरंजन
दास, मोतीलाल नेहरू, मुकूंदराव जयकर, सैफुद्दीन
किचलू, वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी, टी.
प्रकाशम, असफ अली व राजेंद्र प्रसाद इ.

🌺परदेशी कापडांवर बहिष्कार 🌺

- हा असहकारातील
सर्वाधिक यशस्वी कार्यक्रम ठरला. परदेशी कपड्यांची
सार्वजनिक होळी करण्यात येई. ते विकणाऱ्या
दुकानांसमोर निदर्शने करत. १०२ कोटी रुपयांची
कपड्यांची आयात १९२१-२२ मध्ये ५७ कोटी
रुपयांपर्यंत खाली आली.

☘☘☘☘☘🌸🌸☘☘☘☘☘☘

चालू घडामोडी वन लाइनर्स, 05 जानेवारी 2020.

✳ जुलाहा साड्या रोप अम्बेसिडंट म्हणून परिणीती चोप्रा

✳ तामिळनाडू विधानसभेचे माजी सभापती पी.एच.पांडियन यांचे निधन

✳ ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांची भारत भेट स्थगित केली आहे

✳ 28 वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा -2020 ची प्रगती मैदानात सुरुवात

✳ जनरल बिपिन रावत यांनी एअर डिफेन्स कमांड तयार करण्याचा प्रस्ताव दिला

✳ महाराष्ट्र सरकारने "सायबर सेफ वुमेन्स" पुढाकार घेतला

✳ केव्हीआयसीने गुजरातमध्ये पहिला रेशीम प्रक्रिया प्रकल्प सुरू केला

✳ बेंगळुरू येथे आयोजित भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे 107 वे सत्र

✳ थीम 2019: "विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास"

✳ 5 वा आयएचएआय राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा 2020 लेहमध्ये प्रारंभ झाला

✳ ग्रीन पार्कमध्ये दिल्ली 1 ला पूर्णतः स्वयंचलित कार पार्क टॉवरचे अनावरण

✳ डब्ल्यूएचओ ने 2020 नर्स आणि मिडवाइफचे वर्ष म्हणून नियुक्त केले

✳ भारताचे परकीय चलन All 457..468. अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या उच्च पातळीला स्पर्श करते

✳ फेज II फेम इंडिया अंतर्गत मंजूर 2636 ईव्ही चार्जिंग स्टेशन

✳ 171 आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णालये डी-एम्पेनल्ड

✳ तिसरा खेलो इंडिया युवा खेळ गुवाहाटी येथे होणार आहे

✳ कोरल रीफ्सचे संरक्षण करण्यासाठी पलाऊ पहिला देश सनस्क्रीनवर बंदी घालणार आहे

✳ धार्मिक विधी महोत्सव "लाई हरौबा" त्रिपुरामध्ये प्रारंभ झाला

✳ भुवनेश्वर नागरी संस्थेने "गो ग्रीन" मोहीम सुरू केली

✳ मार्च 2020 मध्ये भारत  36 व्या आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल कॉंग्रेसचे आयोजन करणार आहे

✳ प्रख्यात आसामी थिएटर व्यक्तिमत्व रत्न ओझा निधन झाले

✳ इंग्लंड बोर्ड क्रिकेट फुटबॉल क्रियाकलाप म्हणून फुटबॉल बंदी करते

✳ गुवाहाटीमध्ये 1 टी 20 आय दरम्यान पोस्टरवर बॅनर, बॅनर्स

✳ इस्रोने कर्नाटकमधील अंतरासाठी शैक्षणिक केंद्र सेट केले

✳ चौथी अखिल भारतीय पोलिस ज्युडो क्लस्टर चॅम्पियनशिप नवी दिल्ली येथे आयोजित

✳ एमईए नवीन उदयोन्मुख आणि सामरिक तंत्रज्ञान (नेस्ट) सेट करते

✳ इरफान पठाणने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा केली

✳ बीएसएफ महानिरीक्षक (आयजी) म्हणून अभिनव कुमार यांची मुदतवाढ

✳ श्रीलंका एफएम दिनेश गुनावर्डेना 9-10 जानेवारी रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच


1) ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
उत्तर : हवामानातले बदल

2) धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

3) NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
उत्तर : केरळ

4) दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?
उत्तर : अहमदाबाद आणि मुंबई

5) ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?
उत्तर : 54 चौरस किलोमीटर

6) ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
उत्तर : कर्नाटक

7) नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?
उत्तर : हरवलेला मोबाईल फोन

8) ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?
उत्तर : नागरी उड्डयन मंत्रालय

9) कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
उत्तर : अमिताभ बच्चन

10) तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

1) इराणच्या ‘रिव्होल्युशन गार्ड्स फॉरेन ऑपरेशन’ दलाच्या कमांडरपदी कोण आहे?
उत्तर : इस्माईल कानी

2) दृष्टिहीन व्यक्तींसाठी चलनी बँकनोट ओळखण्यासाठी RBI कडून कोणते अ‍ॅप सादर करण्यात आले आहे?
उत्तर : ‘MANI / मनी’

3) समुद्रातल्या प्रवाळी प्रदेशाला विषारी ठरणारी ‘सनस्क्रीन’ यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे?
उत्तर : पलाऊ

4) ‘हरगिला’ या पक्षीप्रजातीचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या राज्याने पुढाकार घेतला आहे?
उत्तर : आसाम

5) कोणते राज्य वाळू दारापर्यंत पोहचविण्याची योजना आखत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

6) 107 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन कुठे करण्यात आले?
उत्तर : बेंगळुरू

7) पाचवे ‘IHAI राष्ट्रीय आइस हॉकी अजिंक्यपद 2020’ या स्पर्धेला कुठे सुरूवात झाली?
उत्तर : लेह

8) कोणत्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी “दामिनी” नावाने व्हॉट्सअ‍ॅप सेवा कार्यरत करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

9) टी-20 सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज कोण ठरला?
उत्तर : मुजीब उर रहमान

10) ‘एयर ऑफिसर-इन-चार्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ म्हणून पदभार कुणी स्वीकारला?
उत्तर : मार्शल एम.एस.जी. मेनन

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...