Sunday 5 January 2020

इस्रोच्या 'रिसॅट - 2BR1'चं यशस्वी लॉन्चिंग

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज (दि. 11) रिसॅट - 2BR1 या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

'रिसॅट - 2BR1' या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात आले.

'हे' फायदे होणार* :

RISAT-2BR1 मध्ये खास सेन्सरमुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.

  दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळणार आहे.

कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.

  कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आजच्या लॉन्चिंगसह इस्रोने गेल्या 20 वर्षात 33 देशांचे 319 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...