Tuesday 31 March 2020

31-03-2020 Current Affairs


कोणत्या राज्याने ‘सेल्फ-डिक्लेरेशन अ‍ॅप’ सादर केले?
(A) नागालँड✅✅
(B) सिक्किम
(C) मेघालय
(D) त्रिपुरा

रद्द करण्यात आलेला ‘रेड फ्लॅग’ लष्करी सराव कोणत्या देशाच्यावतीने आयोजित केला जातो?
(A) रशिया
(B) चीन
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(D) भारत

निधन पांवलेले अर्जुन देव कोण होते?
(A) वैज्ञानिक
(B) क्रिकेटपटू
(C) फुटबॉलपटू
(D) इतिहासकार✅✅

कोणती संस्था ‘प्रोजेक्ट अरुणंक’ ही मोहीम राबवित आहे?
(A) भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळ
(B) सीमा रस्ते संस्था✅✅
(C) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
(D) यापैकी नाही

हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद (EPCH) कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे?
(A) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय
(B) कामगार व रोजगार मंत्रालय
(C) वस्त्रोद्योग मंत्रालय✅✅
(D) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय

कोणते मंत्रालय ‘MPLADS निधी’ या योजनेची अंमलबजावणी करीत आहे?
(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय✅✅
(B) ग्रामीण विकास मंत्रालय
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) संसदीय कार्य मंत्रालय

कोणत्या राज्य सरकारने ‘कोविड-19 एकता प्रतिसाद निधी’ स्थापन केला?
(A) हिमाचल प्रदेश✅✅
(B) मध्यप्रदेश
(C) राजस्थान
(D) गोवा

कोणती बँक 4 मोठ्या बँका तयार करण्यासाठी 1 एप्रिल 2020 रोजी होणार असलेल्या विलीनीकरणाचा भाग नाही?
(A) सिंडिकेट बँक
(B) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
(C) कॉर्पोरेशन बँक
(D) देना बँक✅✅


कोणती संस्था ‘कोरोना स्टडी सिरीज’ या नावाने नवे प्रकाशन सादर करणार आहे?
(A) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
(B) राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था✅✅
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
(D) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

‘CZ-5’ प्रक्षेपक कोणत्या देशाचे वाहन आहे?
(A) रशिया
(B) चीन✅✅
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) उत्तर कोरिया

General knowledge

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇

महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०

महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई

महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५

महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६

महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६

महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७

महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४

महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८

महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३

स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००

महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%

महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )

सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )

सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी

सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर

जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे

कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु

महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )

सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश

सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )

सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा

सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट

सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल

सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी

सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड

सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा

सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती

सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा

सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ

लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे

सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )

सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड

सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन

क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया

सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया

सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना

सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग

सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन

सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी

सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन

सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी

सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर

सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला

सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया

सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर

सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल

सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )

सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड

सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अमेरिका-चीनमधील ‘कोरोनावॉर’: नवीन विश्वरचनेच्या निर्मितीचे संकेत 

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष सातत्याने पुढे येत गेला. गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष शिगेला पोहोचला. दोन्ही राष्ट्रांमध्ये जवळपास दोन वर्षे व्यापारयुद्धही सुरु होते. या व्यापारयुद्धातही दोनही देशांचे संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले होते. हा तणाव काही आठवड्यांपूर्वी निवळल्यामुळे संपूर्ण जगानेच सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. परंतु कोरोना कोविड १९ या विषाणूच्या महामारीचा उद्रेक झाला आणि त्याची जबरदस्त झळ अमेरिकेलाही बसल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा विकोपाला जाण्याइतपत ताणले जाऊ लागले आहेत. 
चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या कोरोनाने अमेरिकेत अक्षरशः कहर केला आहे. आजघडीला इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंड ही या विषाणूची केंद्रे बनली आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. या विषाणूजन्य आजारामुळे मरणार्‍यांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका, तेथील समाजजीवन आणि अर्थकारण संकटात सापडले आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनवर उघड आरोप करायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत हा विषाणू चीनपुरता मर्यादित होता, तोपर्यंत ट्रम्प यांनीही त्याला ङ्गार महत्त्व दिलेले नव्हते, किंबहुना हा फ्लूचा प्रकार आहे, त्याचा फारसा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, अशा स्वरूपाची वक्तव्ये ट्रम्प यांच्याकडून केली गेली. पण जसजसा कोरोना विषाणूचा प्रसार हा वाढू लागला आणि जेव्हा त्याचा प्रसार अमेरिकेत वाढायला लागला, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागले त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली. अमेरिकेचा शेअऱ बाजार गडगडला. नंतर ट्रम्प यांच्या असेही लक्षात आले की केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर कोरोनाच्या विळख्यामध्ये अमेरिकेतील बहुतांश राज्ये आली आहेत. मग मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदांमध्ये उघडपणे चीनला लक्ष्य करायला सुरुवात केली. चीनने जगाला संकटात टाकले आहे, असा आरोप त्यांनी जाहीरपणाने केला. त्यांनी कोरोना विषाणूला चायना व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे म्हटले. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद चीनमध्ये उमटले. चीनने लागलीच त्यावर प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. हा विषाणू चीनकडून आलेला नसून उलट अमेरिकेच्या लष्कराने याचा प्रसार केला आहे, असा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला. एवढेच नव्हे तर चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी जागतिक पातळीवर एक अजेंडा ठरवला, ज्यामध्ये काही मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे ,या विषाणूचा जन्म चीनमध्ये झालेला नसून तो अमेरिका पुरस्कृत विषाणू आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच्या लढ्यात चीनमधल्या साम्यवादी शासनाला आणि राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांनी केलेल्या सर्व कारवाईला कमालीचे यश मिळाले आहे. परंतु पाश्‍चिमात्य देश विशेषतः अमेरिका या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकत नाहीये. त्याचप्रमाणे अमेरिकेने चीनवरून जाणारे विमान बंद केले आहे, त्यावरही चीनने विरोध दर्शवला आहे. 
या दोन्ही राष्ट्रांकडून परस्परांवर होणार्‍या आरोपांची तीव्रता वाढली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर युरोपातून येणारी सर्व विमाने थांबवली आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे आज सर्वच देश दुसर्‍या देशाला मदत करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत चीनने युरोपला मदतीचा हात देऊ केला. चीनकडून युरोपला मोठ्या प्रमाणावर औषधे, मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा केला जात आहे. चीनने आपल्या प्रपोगंडा

मशीनचा वापर करत जगाला हे दाखवायला सुरूवात केली की आमच्यावर एवढे मोठे संकट असूनही आम्ही सर्व जगाला सगळ्या गोष्टी पुरवतो आहोत. या प्रपोगोंडा गेममध्ये चीनला यश मिळाले आहे. आज जगाच्या मदतीसाठी चीन सरसावतो आहे असे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, जागतिक महासत्ता असणारा अमेरिका मात्र स्वतःच्या गोष्टींमध्येच गुंतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचे महत्त्व वाढते आहे. 
चीनने सांगितले कोरोना विषाणू संसर्गावर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे. आमच्याकडील उद्योगधंदे हळूहळू सुरू होत आहेत, असेही चीन सांगत आहे. परंतू कोरोनाचा प्रसार अजून किती काळ होत राहील, याबाबत कोणालाच काही सांगता येत नाहीये. त्यामुळे कोरोना विषाणूचा झटका अमेरिका आणि युरोपला जबरदस्त बसणार आहे. साहजिकच अशा स्थितीमध्ये येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारण हे चीनकेंद्रीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
आज संपूर्ण अमेरिकेत भीतीचे वातावरण आहे. ह्या वातावरणामागे आर्थिक असुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. कदाचित अमेरिकेला या परिस्थितीची क

ल्पना असावी. १९९३ पासून म्हणजे गेल्या तीस वर्षात कोक आणि ड्रॅगन हे एकत्र जाऊ शकतात अशा पद्धतीची मान्यता संपूर्ण अमेरिकेत होती. कोक म्हणजे अमेरिका आणि ड्रॅगन म्हणजे चीन. आपण चीनबरोबर शत्रुत्व करण्यापेक्षा किंवा त्याला शत्रु मानण्याऐवजी जर दोघांनी एकत्रित काम केले तर कदाचित दोन्ही देशांचा ङ्गायदा होईल, अशी मांडणी करण्यात आली आणि त्यानुसार पुढील गोष्टी घडत गेल्या. खूप अमेरिकन कंपन्या या चीनी कंपन्यांकडून मिळणार्‍या कच्चा मालावर विसंबून होत्या. आजघडीला अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योग पूर्णपणे चीनकडून जो कच्चा माल दिला जातो, (ङ्गार्मास्युटिकल्स इनग्रेडियंटस) त्यावर अवलंबून आहे. हा माल चीनकडून मिळत नाही तोपर्यंत अमेरिकेत औषधनिर्मिती होऊ शकत नाही इतकी गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे अमेरिकेत निर्माण होणारी प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स आजघडीला १०० टक्के चीनच बनवतोय. त्यामुळे चीनच्या एका सरकारी अधिकार्‍यांने असे वक्तव्य केले होते की आम्ही अमेरिकेचा औषधपुरवठा बंद केला तर अख्खा अमेरिका कोरोना विषाणूमुळे उद्धवस्त होईल. हे वक्तव्य अत्यंत स्ङ्गोटक होते. 
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असल्याने या सगळ्याला पक्षीय राजकारणाचे रूप दिले जात आहे. यावरुन संपूर्ण अमेरिकेत ङ्गूट पडताना दिसतेय. काही जण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे संशयाने पाहू लागले आहेत. विशेष म्हणजे चीनला डोनाल्ड ट्रम्प हे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून नको आहेत. त्यामुळे चीनने त्यांच्यावरील आरोप अधिक तीव्र करायला सुरूवात केली आहे. आता दोन्ही देशामधील आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध आता प्रपोगंडा युद्धाचे रूप घेते आहे. शीतयुद्धाच्या काळात जसे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील प्रपोगंडा मशिनरी होती ती परस्परांच्या विरोधात असे आरोप प्रत्यारोप करणे, पुरावे सादर करणे, दावे प्रतिदावे करणे अशाच प्रकार आता चीन आणि अमेरिकेच्या बाबतीत सुरू झाला आहे. यास कोरोना विषाणू हे नवीन कारण मिळाले आहे. सत्तेची नवी समीकरणे पुढे येत आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोप हे सातत्याने एक होते, त्यातही पश्‍चिम युरोप. तर अमेरिकेने नाटोसारखी लष्करी संघटना काढली होती. ही संघटना अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होती. दुसर्‍या महायुद्धात युरोपचे जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, ते भरून काढण्यासाठी अमेरिकेने मार्शल प्लान, ट्रूमन यांसारख्या काही महत्त्वाच्या आर्थिक मदतीच्या योजना राबवल्या होत्या. याच्या अंतर्गत युरोपला मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली. पण आजच्या परिप्रेक्ष्यात हाच युरोप अमेरिकेपासून दूर जाताना दिसतो आहे.
अर्थात याला कारण डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतरच युरोप आणि अमेरिकेत खटके उडायला सुरूवात झाली. आता तर या मतभेदाने कळस गाठला आहे. अमेरिका ङ्गर्स्ट या ट्रम्प यांच्या धोरणामुळे या मतभेदांना सुरूवात झाली होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे अमेरिकेच्या हाती कोलित

मिळाल्यासारखे झाले आहे. ट्रम्प यांनी युरोपशी व्यवहारच पूर्णपणे बंद केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेला येणारी विमाने बंद केली तेव्हा युरोपने त्याचा निषेध करत ‘याची आवश्यकता नव्हती’ असे वक्तव्य केले. या नाराजीमुळेच युरोप अमेरिकेपासून दूर जात असताना चीनने हुशारीने ही संधी साधली आहे. आज चीन युरोपच्या जवळ येत चालला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायातील १९३ देशांापैकी अमेरिकेचा अपवाद वगळता कोणीही चीनवर टीका करत नाहीये. एवढेच नव्हे तर चीन जे आरोप अमेरिकेवर करतो आहे त्याला रशिया आणि इराण यांचे समर्थन मिळते आहे. त्यामुळे एकीकडे युरोप, चीन, रशिया, इराण यांसारखे पूर्वी वैचारिक विरोधक असलेले देश एकत्र येताना दिसताहेत आणि अमेरिका मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडताना दिसतो आहे.
मागील काळात अमेरिकेने मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना, बहुराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करायची आणि अशी मदत केल्यानंतर त्यांना आपल्या हितसंबंधांना वापरून घ्यायचे अशी एक प्रकारची रणनीती आखली होती. तोच प्रकार आता चीन करतो आहे. चीनची अर्थव्यवस्था मोठी असल्याने, जगभरात त्यांचे अब्जावधी रूपयांचे प्रकल्प सुरू आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठी आर्थिक मदत करायला सुरूवात केली आहे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनाही चीनची बाजू उचलून धरते आहे. या संपूर्ण संघर्षामुळे एक नवी विश्‍वरचना आकाराला येण्याची दाट शक्यता आहे. याला कोरोनापश्‍चातची विश्‍वरचना म्हणता येईल. या रचनेमध्ये अमेरिका हा बर्‍यापैकी बाजूला पडलेला असेल आणि अमेरिकेच्या बाजूला जाण्याने एक पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी चीन भरून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक वेगळेच चीनकेंद्रीत जग कदाचित पहायला मिळू शकते. 

General Knowledge

▪ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळतात.
उत्तर : औरंगाबाद

▪ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर : 12 लोक चौ.कि.मी.

▪ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला?
उत्तर : मणिपूर

▪ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

▪ कोणत्या राज्यात रबराची सार्वधिक लागवड होते?
उत्तर : केरळ

▪ मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अमरावती

▪ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे?
उत्तर : नर्मदा

▪ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असेलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
उत्तर : दख्खनचे पठार 

▪ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे?
उत्तर : तिरुवनंतपूरम

▪ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे?
उत्तर : मध्ये प्रदेश

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

 हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

🟤 उठावाची कारणे  🟤

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

🟤१८५७चे स्वातंत्र्यसमर  : पुस्तक  🟤

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

🟤१८५७ च्या उठावाचे स्वरूप 🟤

इ.स. १८५७ च्या या उठावाच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यात यश मिळविले असले तरी प्रारंभीच्या काळापासूनच कंपनीला भारतीयाचा विरोध सहन करावा लागत होता. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणामुळे व भारतीयाचे आर्थिक शोषण करण्याच्या त्यांच्या नीतीमुळे ब्रिटिशाविरुद्ध भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषातूनच ठीकठिकाणी बंड व उठाव घडून आले होते . तथापि , या उठावाना स्थानिक स्वरूप असल्याने हे उठाव इंग्र्जी सत्तेपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकले नाहीत. इ.स. १८५७ च्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्टपूर्ण होते . या उठावाची व्याप्ती मोठी असल्याने ब्रिटिशापुढे हा उठाव एक आव्हान ठरले. भारतातील इंग्र्जी सत्ता नष्ट करण्याचा भारतीय जनतेने केलाला हा मोठ्या प्रमाणावरील एक प्रयत्न होता. या उठावाच्या रूपाने भारतीय समाजाच्या मनात इंग्र्जी सत्तेविषयी असलेला असंतोष उफाळून आला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेल्या असंतोषाचे प्रगट झालेले ते एक रौद् स्वरूप होते. या उठावाच्या स्वरूपाविषयी इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे वेगवेगळी मते मांडली आहेत.

१) ब्रिटिश इतिहासकारांच्या मते इ.स. १८५७ चा उठाव म्हणजे ' शिपायांचे बंड ' होते .

सर जाॅन लॉरेन्स, जॉन सिली , पी. इ. रॉबट॔स् या इंग्र्ज इतिहासकारांनी या उठावाला ' शिपायांचे बंड ' म्हटलेले आहे. त्यांच्या मते, या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तीक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती.

प्रा. न. र. फाटक या प्रसिद्ध भारतीय विचारवंतानेही या उठावाल, ' १८५७ ची शिपाईगर्दी ' असे म्हटले आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...