Friday 28 August 2020

निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर



🔰 नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.

🟣 राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू

🟡 भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा

🟠 हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश

🔴 कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड

🔴 इतर ठळक बाबी...

🔰 हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

🔰 निर्यात वृद्धीसाठी प्रादेशिक कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्देशांक राज्य सरकारांना मार्गदर्शक ठरणार आहे.
निर्यात वैविध्य, वाहतूक संपर्क आणि पायाभूत सुविधा या उप स्तंभाबाबत बऱ्याच भारतीय राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

🔰या तीन स्तंभाबाबत भारतीय राज्यांचे सरासरी गुण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.साधारणपणे बहुतांश किनारी राज्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र.



🔰भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

🔰तरिची (तामिळनाडू)
🔰रायगंज (पश्चिम बंगाल)
🔰राजकोट (गुजरात)
🔰जबलपूर (मध्यप्रदेश)
🔰झांसी (उत्तरप्रदेश)
🔰मरठ (उत्तरप्रदेश)
🔰हम्पी शहर (कर्नाटक).

🔴भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विषयी...

🔰भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.

🔰भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्याकडून ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु वा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले जाते. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-1958’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.



🔰करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली.

🔰परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

🔰याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर दिर्घीकापासून येणाऱ्या अतीव अतिनील किरणांचा अॅस्ट्रोसॅट मार्फत शोध.


🔰भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या अंतराळ वेधशाळेपासून मिळविलेल्या माहितीच्या आधारे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 9.3 अब्ज प्रकाशवर्षे दूर अंतरावर असणाऱ्या दिर्घीका (galaxy) यापासून येणाऱ्या अतीव अतिनील (ultraviolet) प्रकाशकिरणांचा शोध लावला आहे. विश्वाचे अंधकारमय युग कसे संपले याविषयावर शोधामुळे प्रकाश टाकला जाऊ शकतो, जो एक महत्वाचा संकेत आहे.

🔰डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वात खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चमूने हा शोध लावला आहे. या चमूत भारत, स्वित्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जापान आणि नेदरलँड या देशांचे शास्त्रज्ञ आहेत.

🔴अस्ट्रोसॅट बाबत...

🔰अस्ट्रोसॅट (ASTROSAT) हा 1513 किलो वजनी भारताचा पहिला समर्पित बहु-तरंगलांबीची सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह आहे. हे एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे.

🔰ही मोहीम दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी अंतराळात पाठवण्यात आली. उपग्रह समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे. अमेरिका, रशिया, युरोपीय अंतराळ संस्था आणि जापान यांच्यानंतर भारत हा अंतराळात प्रयोगशाळा असलेला जगातला पाचवा देश ठरला.

आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना.



🔰आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.

🔴इतर ठळक बाबी

🔰जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.पोलिओ

🔴पोलिओ (शास्त्रीय नाव:

🔰पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणू ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.

🔰पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.
पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.

🔴पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस –

1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.

🔴आफ्रिका खंड....

🔰आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

🔰आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’सिस्टिम.



🔰पर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेशात खांद्यावरुन मिसाइल डागता येणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांच्या तुकडया तैनात केल्या  आहेत.तर शत्रुच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने उंचावरील प्रदेशात रशियन बनावटीच्या इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांना तैनात केले आहे.

🔰तसेच रशियन बनाटीच्या या एअर डिफेन्स सिस्टिमचा भारतीय लष्कर आणि इंडियन एअर फोर्स दोघेही वापर करतात.
युद्धाच्या प्रसंगात किंवा शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर तुमच्या तळाजवळ येतात, तेव्हा या सिस्टिमचा वापर केला जातो. भारताने सुद्धा आपली टेहळणी क्षमता वाढवली आहे.चीनच्या हवाई हालचालींवर रडार्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातेय तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स सुद्धा सज्ज ठेवली आहेत.

🔰भारतीय हद्दीतील भागांमध्ये चिनी हेलिकॉप्टर्स प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सैन्याला दिसले आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी हवाई हद्दीचे उल्लंघन करु नये, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून इंडियन एअर फोर्सने सुखोई फायटर विमाने तैनात केली आहेत.

आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने.



🔰आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती 10 ते 100 पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.

🔰तर आपल्या विश्वात अब्जावधी दीर्घिका असून त्यातील अनेक बटू दीर्घिका आहेत, या दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने कमी आहेत. या लहान दीर्घिकांना बटू दीर्घिका असे म्हटले जाते.

🔰तसेच त्यांच्यात ताऱ्यांची निर्मिती कमी वेगाने होत असते पण काही बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती नेहमीच्या दीर्घिकांच्या तुलनेत 10 ते 100 पट वेगाने होत असते. आपल्या आकाशगंगेपेक्षाही या दीर्घिकात जास्त वेगाने तारे तयार होतात. पण तारे निर्मितीची ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर बंद होते. या दीर्घिकांचे वय मात्र काही अब्ज वर्षे असते.

🔰वज्ञानिकांनी या दीर्घिकांचा अभ्यास दोन भारतीय दुर्बिणींच्या मदतीने केला असून त्यात त्यांचे गुणधर्म वेगळे दिसून आले. त्यांच्यात हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने विखुरलेला होता व दोन दीर्घिकांमधील टकरीही वेगळ्या होत्या.

🔰हायड्रोजन हा ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक असल्याचे सांगून वैज्ञानिक अमितेश ओमर यांनी म्हटले आहे की, जर ताऱ्यांची निर्मिती वेगाने व्हायची असेल तर त्यासाठी दीर्घिकेत हायड्रोजनचे प्रमाण जास्त असावे लागते.

🔰ओमर व त्यांचे माजी विद्यार्थी सुमित जैसवाल यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केले असून त्यासाठी नैनिताल येथील देवस्थळची 1.3 मीटरची जलद प्रकाशीय दुर्बीण व पुण्याची जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप यांचा वापर करण्यात आला.

🔰तसेच ओमर यांनी आयनीभूत हायड्रोजनशी जुळणाऱ्या प्रकाशीय प्रारणांची तरंगलांबी मोजण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या दीर्घिकांमधून येणाऱ्या प्रारणांच्या वर्णपंक्ती रेषेच्या मदतीने 45 मीटर व्यासाच्या तीस अँटेनांच्या मदतीने प्रतिमा तयार करण्यात आल्या.

उडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी


📚नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेच्या (आरसीएस) - उडे देश का आम नागरीक (उडान) ने  तीन यशस्वी निविदा प्रक्रियांनंतर चौथ्या फेरी अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी दिली आहे.

📚 यामुळे देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागातील संपर्क वाढू शकेल. नवीन मार्गांची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये ईशान्येकडील प्रदेश, डोंगरप्रदेशातील we राज्ये आणि बेटे यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

📚गवाहाटी ते तेजू, रुप्सी, तेजपूर, पासीघाट, मीसा आणि शिलाँग या मार्गांसह ईशान्येकडील जोडणीला विशेष चालना देण्यात येत आहे. उडानच्या या चार मार्गांतर्गत नागरिकांना हिसार ते चंदीगड, डेहरादून आणि धर्मशाला या मार्गांवर प्रवास करता येईल. वाराणसी ते चित्रकूट आणि श्रावस्ती मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे.

📚 उडान 4.0 योजनेअंतर्गत नव्या मार्गांमध्ये लक्षद्वीपमधील अगत्ती, कवरत्ती आणि मिनिकोय बेटे देखील जोडली गेली आहेत.

📚आजवर, उडान योजनेअंतर्गत 766 मार्ग मंजूर झाले आहेत. पैकी 29 वापरातील, 08 वापरात नसलेले आणि 02 कमी वापरात असलेले विमानतळ यांचाही मंजूर मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

📚ईशान्येकडील क्षेत्र, डोंगर प्रदेशातील राज्ये आणि बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून डिसेंबर 2019 मध्ये उडानची चौथी फेरी सुरू करण्यात आली. एएआय च्या वतीने यापूर्वीच विकसित केलेल्या विमानतळांना या योजनेअंतर्गत व्हीजीएफसाठी (अनुदान सहाय्यतून सक्षमीकरण) प्राधान्य दिले आहे. उडान 4, अंतर्गत हेलिकॉप्टर आणि सी-प्लेन्सचे कामकाज देखील समाविष्ट केले गेले आहे.

📚सथापनेपासून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 274 उडान मार्ग चालू केले आहेत, जे 45 विमानतळ आणि 3 हेलिपोर्टला जोडले गेले आहेत.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...