आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने.🔰आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती 10 ते 100 पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.

🔰तर आपल्या विश्वात अब्जावधी दीर्घिका असून त्यातील अनेक बटू दीर्घिका आहेत, या दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने कमी आहेत. या लहान दीर्घिकांना बटू दीर्घिका असे म्हटले जाते.

🔰तसेच त्यांच्यात ताऱ्यांची निर्मिती कमी वेगाने होत असते पण काही बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती नेहमीच्या दीर्घिकांच्या तुलनेत 10 ते 100 पट वेगाने होत असते. आपल्या आकाशगंगेपेक्षाही या दीर्घिकात जास्त वेगाने तारे तयार होतात. पण तारे निर्मितीची ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर बंद होते. या दीर्घिकांचे वय मात्र काही अब्ज वर्षे असते.

🔰वज्ञानिकांनी या दीर्घिकांचा अभ्यास दोन भारतीय दुर्बिणींच्या मदतीने केला असून त्यात त्यांचे गुणधर्म वेगळे दिसून आले. त्यांच्यात हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने विखुरलेला होता व दोन दीर्घिकांमधील टकरीही वेगळ्या होत्या.

🔰हायड्रोजन हा ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक असल्याचे सांगून वैज्ञानिक अमितेश ओमर यांनी म्हटले आहे की, जर ताऱ्यांची निर्मिती वेगाने व्हायची असेल तर त्यासाठी दीर्घिकेत हायड्रोजनचे प्रमाण जास्त असावे लागते.

🔰ओमर व त्यांचे माजी विद्यार्थी सुमित जैसवाल यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केले असून त्यासाठी नैनिताल येथील देवस्थळची 1.3 मीटरची जलद प्रकाशीय दुर्बीण व पुण्याची जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप यांचा वापर करण्यात आला.

🔰तसेच ओमर यांनी आयनीभूत हायड्रोजनशी जुळणाऱ्या प्रकाशीय प्रारणांची तरंगलांबी मोजण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या दीर्घिकांमधून येणाऱ्या प्रारणांच्या वर्णपंक्ती रेषेच्या मदतीने 45 मीटर व्यासाच्या तीस अँटेनांच्या मदतीने प्रतिमा तयार करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...