Friday 17 July 2020

current_affairs_Notes

• 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची (24 मार्च) थीम ............ ही होती.
- “इट्स टाइम”.

• ............. या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या लेखिका ज्यांना ‘ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन/हेमिंग्वे पुरस्कार जाहिर झाला
- रुचिका तोमर.

• टोकियोमध्ये होणाऱ्या 2020 सालाच्या ऑलंपिक व पॅरालंपिक स्पर्धेतून माघार घेणारा ............... हा पहिला देश ठरला.
– कॅनडा.

• देहरादूनच्या वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत .............या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत
- सिक्किम.

• ................या देशाने 26 मार्च 2020 रोजी COVID-19 उद्रेकावर प्रतिसादासाठी आभासी जी-20 शिखर परिषद आयोजित केली होती.
- सौदी अरब.

• COVID-19 याला भारताच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेनी ................. हा मंच सुरु केला आहे.
- इन्व्हेस्ट इंडिया बिझिनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म.

• गणितासाठीच्या ‘एबेल पुरस्कार 2020’ ............. याना जाहिर झाला.
- ग्रेगरी मार्गुलिस आणि हिलेल फर्स्टनबर्ग (गणितज्ञ).

• ‘लेगसी ऑफ लर्निंग’ कादंबरीचे लेखक
- सविता छाब्रा.

• भारतातले ................. हे तीन शिक्षक जे वर्क फाऊंडेशन ग्लोबल टीचर प्राइज 2020 साठी निवडलेल्या प्रथम 50 मध्ये आहेत
– शुवाजित पायने (राजस्थान), रणजित सिंग डिसाले (महाराष्ट्र) आणि विनीता गर्ग (दिल्ली).

• गणितासाठी 2020 रॉल्फ शॉक पुरस्काराचे विजेते
- निकोलाई जी. मकरोव्ह.

गोदावरी नदी

१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.

३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.

४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.

५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.

६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.

७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश

८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे

९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका

१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.

१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.

१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

Global Gender Gap Index 2020 [जागतिक लिंग असमानता निर्देशांक 2020]

- काढणारी संस्था: World Economic Forum
- चार घटकांवर आधारित हा निर्देशांक काढला जातो: आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक स्थिती, आरोग्य आणि जीवन, राजकीय सशक्तीकरण.
- आयर्लंड, नाॅर्वे, फिनलंड हे देश सर्वोच्च स्थानी आहेत. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- या अहवालात 1 हा सर्वोत्तम स्कोर मानला जातो तर 0 हा निचांकी स्कोर मानला जातो.
- सर्वात जास्त असमानता ही राजकीय सशक्तीकरणात आहे, जगातील देशांच्या राज्यकारभारात फक्त 21% महिला मंत्री आहेत.

● भारताची स्थिती
- 153 देशांच्या यादीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे.
- राजकीय सशक्तीकरणात भारत 18 व्या स्थानी
- आरोग्य आणि जीवन (Health & Survival) मध्ये भारत 150 व्या क्रमांकावर.
- आर्थिक सहभागत (Economic Participation) भारत 149 व्या स्थानी
- शैक्षणिक स्थितीत (Educational Attainment) मध्ये भारत 112 व्या क्रमांकावर आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
(A) केरळ◆
(B) गोवा
(C) हैदराबाद
(D) कर्नाटक

Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
(A) सचिन अवस्थी★
(B) नारायण मूर्ती
(C) लेडी गागा
(D) बियॉन्स

Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
(A) भारतीय रेल्वे★
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) यापैकी नाही

Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.
(A) 14 जुलै
(B) 15 जुलै★
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.
(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★
(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम
(C) ‘रोको टोको’ मोहीम
(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ

Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत◆
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा◆

Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा◆
(D) सुशील चंद्र

Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज◆
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
========================

नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986चं स्वरूप आहे.

📌 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे.

🔰 नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये 🔰

◾️ नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
◾️ ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
◾️ ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे
◾️ खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्‍या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
◾️ ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील
◾️ पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती
◾️ ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत
◾️ राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.
◾️ राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी
________________________________________

राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट - 2020


पूर्व परीक्षा : 13 सप्टेंबर, 2020

पूर्व परीक्षेचे स्वरुप : पेपर 1 व 2
सामान्य अध्ययन - 1 (GS-।) (100 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (सकाळी 11 ते 1)
सामान्य अध्ययन - 2 (C - SAT) ( 80 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (दुपारी 3 ते 5)

0.33% -ve marking आहे... तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे गुण वजा करण्यात येतात...

💢 सामान्य अध्ययन - 1💢
💠 इतिहास

🔶 प्राचीन भारत
आर. एस. शर्मा / डी. एन. झा
( दोन्ही बुक्स मराठीत उपलब्ध) (वरीलपैकी कोणतेही एक घ्या)

🔷 मध्ययुगीन भारत
सतीश चंद्रा /  रं. ना. गायधनी
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔶 आधुनिक भारत
आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या  विशेष संदर्भात):- समाधान महाजन - युनिक अकैडमी

🔷 आधुनिक महाराष्ट्र
11 वी स्टेट बोर्ड नवे व् जुने व् समाधान महाजन च्या पुस्तकातून हा घटक पूर्ण कव्हर होऊंन जाईल.

🔶 महाराष्ट्रातील समाजसुधारक
डॉ. अनिरुद्ध

💠भूगोल

🔶 महाराष्ट्राचा भूगोल
के. ए. खतीब / ए. बी. सवदी / दीपस्तंभ प्रकाशन
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔷 भारताचा भूगोल
डॉ. अनिरुद्ध / के. ए. खतीब
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔶 जगाचा भूगोल
जिआग्राफी थ्रू मैप्स वर्ल्ड : के. सिद्धार्थ (मराठीत उपलब्ध)

🔷 प्राकृतिक भू-विज्ञान
सौ. संजीवनी दाते(के'सागर) किंवा
शारदा अकैडमी नोट्स (11 वी Ncert मराठीत उपलब्ध)

💠 सामान्य विज्ञान

🔷सचिन भस्के / अनिल कोलते
(👆यापेक्षा 5 ते 10 वी स्टेट बोर्ड जरी वाचले व् 11 वी NCERT Biology केले तरी हा विषय कव्हर होतो... जवळजवळ 20 प्रश्न येतात विज्ञान घटकाचे राज्यसेवेत तेहि स्टेट बोर्ड मधून)

🔶 जैवतंत्रज्ञान : सचिन भस्के/ दीपस्तंभ प्रकाशन
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 अर्थशास्त्र

🔶 नागेश गायकवाड़ / किरण देसले (भाग 1) / रंजन कोलंबे
(वरीलपैकी कोणतेही एक)
🔷 महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2019-20
🔶 केंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल

💠 राज्यशास्त्र व पंचायत राज

🔷 इंडियन पॉलिटी - एम्. लक्ष्मीकांत (मराठी)
🔷 संपूर्ण राज्यव्यवस्था - तुकाराम जाधव (युनिक अकैडमी)
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔰 पंचायत राज
के'सागर / किशोर लव्हटे
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 पर्यावरण
योगेश नेतनकर / युनिक अकैडमी(कलर बुक)
(वरीलपैकी कोणतेही एक)

💠 चालू घडामोडी
🔸युनिक बुलेटिन मंथली मैगजीन
🔹 पृथ्वी परिक्रमा मंथली मैगजीन
🔸 सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स
🔹स्पॉटलाइट - सुशिल बारी
🔸टॉपर 777 - इद्रीस पठान
🔹सकाळ इयर बुक
(वरीलपैकी कोणतेही एक प्रकाशनाचे बुक्स घ्या व जे एकदा घेतले तेच कायम continue वाचत रहा...)

💢 C - SAT 💢
🔷 संपूर्ण C - SAT - प्रणिल गिल्डा
किंवा
C - SAT Decoded - सारथी प्रकाशन
(यात फक्त उतारे आहेत Day wise plan)

🔶 बुद्धिमत्ता चाचणी -  सुजित पवार / फिरोज पठान / सचिन ढवले / संदीप आरगड़े
(वरीलपैकी कोणतेही एक)

🔷 समग्र अंकगणित - फिरोज पठाण / सचिन ढवले
(वरीलपैकी कोणतेही एक)

💢 गतवर्षीच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका 💢

🔷 सामान्य अध्ययन पेपर 1 ला 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित-  के'सागर / प्रवीण चोरमले / सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स

🔶 C-SAT 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित- सचिन ढवळे/ज्ञानदीप प्रकाशन

🔰 इतर संदर्भ
लोकसत्ता, मटा, इंडियन एक्सप्रेस, दी हिंदू, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईयर बुक - 2020, PIB News

टीप :

1. जिथे Oblique ( / ) देऊन एकपेक्षा अधिक पुस्तके दर्शवली आहेत तिथे योग्य ते कोणतही एकच बुक्स घ्या.... (वरील पुस्तके मी फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करूनच दिली आहेत... )
2. अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचून काढा. (2013 ते 2019 पर्यंतच्या)
3. पुस्तके घेतांना नेहमी नवीन आवृत्ती घ्या.
4. वर उल्लेखित केलेल्या बुक्स व्यतिरिक्त अजून काही वेगळी पुस्तके तुमच्या कडे असतील किंवा confuse होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा...
6. याव्यतिरिक्त आपणाकडे
आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर व् बेल्हेलर, गाठाळ, शांता कोठारे, के'सागर, डॉ. बिपन चंद्रा, जयसिंगराव पवार
महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे
भूगोल व् कृषी : ए. बी. सवदी
भूगोल व् पर्यावरण : ए. बी. सवदी
अर्थशास्त्र : रंजन कोलंबे
सा. विज्ञान : सोनाली भुसारे/ नवनाथ जाधव
पर्यावरण - तुषार घोरपडे
ही पुस्तके असतील तरी आपण हेच continue करू शकता...

‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच.


🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

🔥मुख्य बाबी

🔶‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.

🔶या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे.IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.

🔥IGXचे भविष्यकालिन फायदे🔥

🔶नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे.

🔶बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (IGX) नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.

🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. या मंचमुळे मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. IGX बाजारपेठेतले चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे.

🔶IGXच्या माध्यमातून LNG टर्मिनल, गॅस पाइपलाईन, CGD पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून किंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार, अशी अपेक्षा आहे.

🔶भारताची अर्थव्यवस्था LNG आधारित बनवण्यासाठी हाती घेतलेली कार्ये देशाकडे लवकरच 50 MMT एवढी LNG टर्मिनल क्षमता असणार आहे.

🔶देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन LNG करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.

🔶देशामध्ये LNG विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्प आणि CBM कार्यशैली यासारख्या योजना सध्या कार्यरत आहेत.

🔶येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन तयार असणार आहे.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी..

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...