Friday 16 October 2020
रद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र
🔰9 ऑक्टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.
🔰ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सुखोई लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
🔴रद्रम क्षेपणास्त्राविषयी
🔰भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले विकिरण-रोधी क्षेपणास्त्र आहे.
🔰अतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह INS-GPS नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरवरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे. पॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे.
🔰कषेपणास्त्राच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर RF (रेडियो फ्रिक्वेन्सी) उत्सर्जित करणाऱ्या दूरसंचार घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात.
अर्थशास्त्राच्या नोबेलमुळे गुरू-शिष्य जोडीचा सन्मान.
🔰‘‘आज सकाळी एका व्यक्तीने दारावर टकटक केली. दार उघडले तर समोर बॉब विल्सन उभे होते. त्यांनी नोबेलची पुरस्काराची बातमी आपल्याला दिली. हा सगळा विचित्र योगायोग होता.
🔰 आम्ही दोघेही नोबेलचे मानकरी ठरलो व विल्सन यांनी आपल्याला ही माहिती दिली’’, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॉल. आर. मिलग्रोम यांनी सांगितले. एक प्रकारे गुरू-शिष्य परंपरेचा हा सन्मान झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
🔰मिलग्रोम यांनी म्हटले आहे की, विल्सन हे माझे पीएच डीचे सल्लागार आहेत. ते समोरच्या रस्त्यावर राहतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे येऊन दोघांनाही नोबेल मिळाल्याची ही बातमी दिली. अगदी गोड अशीच ही बातमी होती. विद्यार्थी, मित्र व सहकारी यांची आम्हाला नोबेल मिळावे ही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. चाहत्यांचे प्रेम व आदरही आम्हाला मिळाला.
🔰विल्सन यांनी सांगितले की, मिलग्रोम हा माझा माजी विद्यार्थी. लिलावाबाबतच्या संशोधनात तो अगोदरपासून चमक दाखवत होता. आम्ही १९७० मध्ये पहिल्यांदा लिलावाबाबतचे संशोधन केले. अनेक आर्थिक प्रक्रियात सुधारणा करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.
STARS या शालेय शिक्षण सुधारणाविषयक प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “स्ट्रेन्दनिंग टिचिंग-लर्निंग अँड रिजल्ट्स फॉर स्टेट्स” अर्थात “राज्यांसाठी अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आणि परिणाम बळकटीकरण” (स्टार्स / STARS) प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
🔰परकल्प 1) राष्ट्रीय पातळी 2) राज्य पातळी अश्या दोन महत्वाच्या घटकात राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार.
🔴इतर ठळक बाबी
🔰परकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5718 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात जागतिक बँकेकडून 500 दक्षलक्ष डॉलर (सुमारे 3700 कोटी रुपये) एवढा निधी उपलब्ध होणार.
🔰शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अंतर्गत परख (PARAKH) नामक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना केली जाणार. केंद्र स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था म्हणून काम करणार.प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांमध्ये प्रकल्प राबवला जाणार.
🔰सधारित शैक्षणिक परिणाम साध्य करणे, होणाऱ्या परिवर्तनाविषयी धोरण विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी, प्रगतीकरण तसेच त्यासाठी सरकारच्या हस्तक्षेप धोरणात सुधारणा, या सर्व बाबींसाठी राज्यांना मदत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अश्या प्रयत्नामुळे आजच्या आणि भविष्यातल्या कामगार उद्योगांसाठी या शैक्षणिक धोरणातून सुसंगत मनुष्यबळ मिळू शकणार.
🔰परकल्पाच्या अंतर्गत, ‘आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था’(CERC) देखील असणार, ज्याद्वारे कोणत्याही नैसर्गिक, मानवी आणि आरोग्यविषयक संकटांचा अधिक प्रभावीपणे सामना करता येणार. त्यामुळे, एखादी शाळा मध्येच बंद झाली, पायाभूत सुविधांचे नुकसान, अपुऱ्या सुविधा अशा अडचणी दूर करता येणार आणि दुर्गम भागातही शिक्षण पोहचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येणार. CERC यामुळे अशा आकस्मिक खर्चांसाठीचा निधी लवकरात लवकर मिळण्यास मदत होणार.
🔰या प्रकल्पामुळे, निश्चित राज्यात विद्यार्थ्यांना किमान तीन भाषा शिकता येणार, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार, अध्ययन मूल्यांकन व्यवस्था अधिक बळकट होणार, अनुभवांचे आदानप्रदान करण्याचा लाभ इतर राज्यांनाही मिळणार आणि राज्यपातळीवर सेवांच्या अंमलबजावणीत सुधारणा होऊ शकणार.
२०१९ मधील प्रादेशिक पुरस्कार एकाच ठिकाणी
🔥 लता मंगेशकर पुरस्कार:-
🔰२०१९:- उषा खन्ना
🔰२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )
🔰२०१७:- पुष्पा पागधरे
🔥जनस्थान पुरस्कार:-
🔰२०१९;-वसंत डहाके.
🔰२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष
🔰२०१५:- अरुण साधू
🔥राजश्री शाहू पुरस्कार:-
🔰२०१९:- अण्णा ह्जारे
🔰२०१८:- पुष्पा भावे
🔰२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर
🔥 पण्यभूषण पुरस्कार :-
🔰२०१९:-डॉ. गो. ब देगलूरकर
🔰२०१८:- प्रभा अत्रे
🔰२०१७ :-डॉ.के.एस.संचेती
🔥 जञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
🔰२०१९:- म.रा.जोशी
🔰२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे
🔰२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते
🔰२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख
🔥 चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
🔰२०१८ :-सुहास बाहुळकर
🔰२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर
🔰२०१६ :- सदाशीव गोरसकर
🔥 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
🔰२०१८:- डॉ. रघुरामन राजन
🔰२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा
🔰२०१६:- नंदन निलकेणी
🔥 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राज्यस्तरीय पुरस्कार)
🔰२०१९:- एन.डी. पाटील
🔥 कसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
🔰२०१८:- वेद राही
🔰२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश
🔰२०१६ :- विष्णू खरे
🔥 वही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१९:- श्रीमती सुषमा शिरोमणी
🔰२०१८:- विजय चव्हाण
🔰२०१७ :- विक्रम गोखले
🔥वही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
🔰२०१९:- भरत जाधव
🔰२०१८:- मृणाल कुलकर्णी
🔰२०१७ :- अरुण नलावडे
🔥 राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१९:- वामन भोसले
🔰२०१८:- श्याम बेनेगल
🔰२०१७ :-सायरा बानो
🔥राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
🔰२०१९:- परेश रावल
🔰२०१८:- राजकुमार हिरानी
🔰२०१७ :- जॅकी श्राॅप
🔥 नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
🔰२०१८:- जयंत सावरकर
🔰२०१७ :-बाबा पार्सेकर
🔰२०१६:-लीलाधर कांबळी
🔥 सगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८ :-विनायक थोरात
🔰२०१७ :-निर्मला गोगटे
🔰२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर
🔥 विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८:- बशीर कमरुद्दिन मोमीन
🔰२०१७:- मधुकर नेराळे
🔰२०१६ :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)
🔥 टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
🔰२०१९:-संजय गुप्ता
🔰२०१८:- सिद्धार्थ वरदराजन
🔰२०१७ :- के. सिवन
🔥लोकमान्य टिळक सन्मान:-
🔰२०१९:- बाबा कल्याणी
🔰२०१८:- डॉ. के. सिवन
🔰२०१७ :-आचार्य बाळकृष्ण
🔥लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
🔰२०१८:-पंढरीनाथ सावंत
🔰२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)
🔰२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )
🔰२०१५:- उत्तम कांबळे
🔥वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८:- महेश एल कुंजवार
🔰२०१७ :-मारुती चितमपल्ली
🔥 विष्णुदास भावे पुरस्कार:-
🔰२०१८ :- डॉ .मोहन आगाशे
🔰२०१७ :- मोहन जोशी
🔰२०१६ :- जयंत सावरकर
🔥भीमसेन जोशी पुरस्कार :-
🔰२०१९;-अरविंद पारीख
🔰२०१८:- पंडीत केशव गिंडे
🔰२०१७ :- माणिक भिडे
🔰२०१६ :- बेगम परविन रुसताना
🔥 धन्वतरी पुरस्कार:-
🔰२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान
🔰२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी
🔰२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य
🔥नागभूषण पुरस्कार:-
🔰२०१८:- विजय बारसे
🔰२०१७:- शिरीष देव
🔥 चतुरंग जीवन गौरव पुरस्कार :-
🔰२०१९:-सय्यद भाई
🔥 तन्वीर सन्मान पुरस्कार
🔰२०१९:- नसरूद्दीन शहा
महत्वपूर्ण घटनादुरुस्त्या संपूर्ण यादी (Important Constitutional Amendments)
🛑 16 वी घटनादुरुस्ती 1963 :
राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि संघटना, संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.
कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार कायदेमंडळाच्या सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखापरीक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश.
🛑 17 वी घटनादुरुस्ती 1964 :
बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्या शिवाय व्यक्तिगत लागवडीखालील असलेली जमीन प्राप्त करण्यास प्रतिबंध. ९व्या परिशिष्टामध्ये आणखी ४४ कायद्यांचा समावेश.
🛑18 वी घटनादुरुस्ती 1966 :
एखाद्या घटक राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एखादा भाग दुसऱ्या एखाद्या घटकराज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन घटकराज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा संसदेचा हा अधिकार तिच्या नवीन घटकराज्य निर्माण करण्याच्या अधिकारा मध्ये अंतर्भूत आहे.
🛑19वी घटनादुरुस्ती 1966 :
निवडणूक न्यायासनाची व्यवस्था रद्द केली आणि निवडणूक याचिका सुंवैचा अधिकार उच्च न्यायालयांना दिला.
🛑 20वी घटनादुरुस्ती 1966 :
सर्वोच्च न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशातील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरविल्या
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🔴इतर ठळक बाबी...
🔰पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🔰जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.
जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🔴आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..
कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.
कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..😊
महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती
🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)
🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),
🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)
🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)
🚦 1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)
🚦 1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)
🚦 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.
🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.
🔥राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू
🔥भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा
🔥हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश
🔥कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड
❗️❗️इतर ठळक बाबी...❗️❗️
हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.
महाराष्ट्र - जलाशय व धरणे
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
ग्रंथी (Glands)
🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते
🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात
1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)
2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)
🎇अतः स्रावी ग्रंथी
या संप्रेरके(Harmon's)स्रावतत
🎇बाह्यस्रावी ग्रंथी
या विकारे(Enzymes)स्रावतत
🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)
🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात
नद्या व त्यांचे उगमस्थान:
गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)
यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)
सिंधू → मानसरोवर (तिबेट)
नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)
तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)
ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)
सतलज → कैलास पर्वत(तिबेट)
बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)
गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक
कृष्णा → महाबळेश्वर.
कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)
साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)
पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).
सहावी पंचवार्षिक योजना
☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र
🔥कार्यक्रम
⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना
✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)
🔥दोन पोलाद प्रकल्प
🔘विशाखापट्टणम
🔘सालेम पोलाद
✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण
🔘1982➖एक्सझीम बँक
🔘जलै 1982➖नाबार्ड
👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले
👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते
🔥वद्धी दर
👁🗨सकल्पित➖5.2 टक्के
👁🗨साध्य➖5.54 टक्के
____________________________
विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020 .
🦋साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
🦋नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)
🦋साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)
🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...
🦋जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.
🦋ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.
🦋यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.
🚦नोबेल पुरस्काराविषयी...
🦋नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
🦋नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
🦋तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते.
🦋सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.
🦋खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:
🦋भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
🦋शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर.
🌼दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी "मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट - ग्रेटर अॅक्सेस" या विषयाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला गेला.
🌼या दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी “मानसिक आरोग्य: कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी एका आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केला होता. ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.
🌿पार्श्वभूमी....
🌼अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) या संस्थेच्यावतीने 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता. जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करणारी एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.
🌼मानसिक विकार हा जगभरात आढळणारा एक सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. त्यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.
🌼आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे. त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.
भारतमाला प्रकल्प‼️‼️
💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.
🔴ठळक बाबी
💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.
💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.
💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी
💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.
💼मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🎇इतर ठळक बाबी...
🗺पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🗺जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.
जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🎇आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात.
🌠पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे.
🌠चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.
चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे.
🌠फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण 13 बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर सुरु केला आहे.विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो
वित्तीय समित्या.
१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती
जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांfना प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.
♨️अध्यक्षांची नेमणुक
लोकसभा अध्यक्षांकडून अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच
♨️कार्य
अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची मितव्यायिता सुचविणे.
२) लोकलेखा समिती-
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)एका वर्षासाठी सदस्यांची निवड मंत्री सदस्य नसतात लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातीलCAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.
♨️समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.
राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत.
🎯 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत
🎯 बाजारभावला मोजले जाते
🎯 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर
🎯 परत्यक्ष पद्धत आहे
❄️ उत्पन्न पद्धत
🎯 घटक किंमती ला मोजले जाते
🎯 सवा क्षेत्र साठी वापर
🎯 अप्रत्यक्ष पद्धत आहे
❄️खर्च पद्धत
🎯 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी
🎯 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते
जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
🟣1. सत्व – अ
शास्त्रीय नांव – रेटीनॉल
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🟣2. सत्व – ब1
शास्त्रीय नांव – थायमिन
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
🟣3. सत्व – ब2
शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🟣4. सत्व – ब3
शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🟣5. सत्व – ब6
शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
🟣6. सत्व – ब10
शास्त्रीय नांव – फॉलीक
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत
🟣7. सत्व – क
शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
🟣8. सत्व – ड
शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🟣9. सत्व – इ
शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🟣10. सत्व – के
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
वाचा :- प्रमुख पिके व त्यांच्यावरील रोग
🔰 डाळींब 🔜 तल्या, सुरसा, मर, करपा
🔰 सत्रा 🔜 डिंक्या, देवी (कँकर)
🔰 दराक्षे 🔜 भरी, केवडा (अँधैकनोज)
🔰 कळी 🔜 जळका चिरूट, पर्णगुच्छ (बंचिटॉप), सीगाटोका (करपा)
🔰 चिकू 🔜 फायटो पथोरा (फळांची सड)
🔰 मोसंबी 🔜 डायबॅक (आरोह)
🔰 लिंबू 🔜 खऱ्या
🔰 आबा 🔜 भिरूड
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .
🔰भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.
🔰GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.
🔰यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.
🔰मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.
🔰सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.
🔴भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी
🔰२०१९: ३६ व्या क्रमांकावर
🔰२०१८: ४४ व्या क्रमांकावर
🔰२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई
🔴जग क्रमवारी....
1.अमेरिका
2.यूके
3.स्वीडन
4.फ्रान्स
5.जर्मनी
6.आयर्लंड
🔰भारतीय पेटंट कायदा, २००५
कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा
हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.
🔰कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.
🔰ततीय पक्षाला परवाना बंधनकारक
विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य.
संक्षिप्त नावे व त्यांची संपूर्ण नावे/मूळ नावे
🏀 *संत ज्ञानेश्वर=ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी*.
🏀 *संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर*..
🏀 *संत तुकाराम=तुकाराम बोल्होबा अंबिले*..
*🏀समर्थ रामदास=नारायण सूर्याजीपंत ठोसर*.
*🏀गाडगेबाबा=डेबूजी झिंगराजी जाणोरकर*..
🏀 *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज=माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)*.
🏀 *भगिनी निवेदिता=मार्गारेट एलिझाबेथ नोबल*..
*🏀महात्मा गांधी=मोहनदास करमचंद गांधी*..
*🏀सनापती बापट=पांडुरंग महादेव बापट*
*बाबा आमटे=मुरलीधर देविदास आमटे*.
*🏀अण्णा हजारे=किसन बाबूराव हजारे*
*🏀 सयाजीराव गायकवाड=गोपाळ काशिनाथ गायकवाड*
*🏀राजर्षी शाहू महाराज=यशवंतराव जयसिंगराव घाटगे*
*🏀सवामी दयानंद सरस्वती=मूळशंकर अंबाशंकर तिवारी*..
*🏀सवामी विवेकानंद=नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्*
🏀 *मदर टेरेसा=अँग्नीस गॉकशा वाजक शियू*.
🏀 *के. आर. नारायण=केचेरेल रामण नारायणन*..
🏀 *डी. देवेगौडा=हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा*..
🏀 *व्ही. शांताराम=शांताराम राजाराम वनकुद*
🏀 *पी. व्ही. नरसिंहराव=पाम्लामूर्ती व्यंकटरामय्या नरसिंहराव*.
🏀 *दादासाहेब फाळके=धुंडीराज गोविंद फाळके*.
🏀 *टी. एन. शेषन=तिरूनिल्लाई नारायणन अय्यर शेषन*.
🏀 *पी. ए. संगमा=पुर्णो आयटोक संगमा*..
*🏀दलाई लामा=तेन्झीन गायात्सो*..
*🏀कर्मापा लामा=कर्मापा युगिन त्रिनले दोरजी*.
🏀 *स्वामी रामानंद तीर्थ=व्यंकटेश भगवानराव खेडगीकर*..
🏀 *बिल क्लिंटन=विल्यम जोफरसन क्लिंटन*..
🏀 *पी. टी. उषा=पिलूवालकंडी टेकापरविल, उषा*..
🏀 *कपिल देव=कपिलदेव रामलाल निखंज*..
🏀 *माईक टायसन=मलिक अब्दुल अजीज*..
🏀 *पेले=एडसन अरांतेस डो नासिमेंटो*..
🏀 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम=डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम*....
डॉ एे पी जे अब्दुल कलाम
◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.
◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम
◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.
◾️कार्यकाळ
25 जुलै 2002 – 25 जुलै 2007
◾️तयांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले
◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला
◾️इदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला
◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.
◾️सरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला
◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते
🚀 1985 : त्रिशूल,
🚀1988 : पृथ्वी,
🚀1989 : अग्नी,
🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात
◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले.
◾️तथेच त्यांचे निधन झाले
◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
1) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे ? 👉अपोलो बंदर 2) गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे?👉 26 मी. (85 ...
-
1) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते? A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष...
-
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...