Monday 15 June 2020

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका


*उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला आणि घटना समितीने तो 22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*शब्दांचा क्रम:- न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता
*42 व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट शब्द:- समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक, आर्थिक,राजकीय न्याय
*विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य
*दर्जा आणि संधीची समानता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सरनामा घटनेचा भाग आहे का ?
*1960-बेरुबारी खटला- घटनेचा भाग नाही
*1973-केशवानंद भारती खटला-घटनेचा भाग आहे.
*1995-LIC खटला- घटनेचा भाग आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सरनामा न्यायप्रविष्ट नाही.
*राज्य शब्दाची व्याख्या कलम 12 आणि कलम 36 मध्ये नमूद.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक न्याय- कलम 38
*आर्थिक न्याय - कलम 39
*राजकीय न्याय - कलम 325, 326
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

काळ व प्रकार

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

वर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ

 1) वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

उदा.

मी आंबा खातो.मी क्रिकेट खेळतो.ती गाणे गाते.आम्ही अभ्यास करतो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.

i) साधा वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

मी आंबा खातो.कृष्णा क्रिकेट खेळतो.प्रिया चहा पिते.

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान असतो.

उदा. 

सुरेश पत्र लिहीत आहे.दिपा अभ्यास करीत आहे.आम्ही जेवण करीत आहोत.

iii) पूर्ण वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी आंबा खाल्ला आहे.आम्ही पेपर सोडविला आहे.विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.    

मी रोज फिरायला जातो.प्रदीप रोज व्यायाम करतो.कृष्णा दररोज अभ्यास करतो.

2)  भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

राम शाळेत गेला.मी अभ्यास केला.तिने जेवण केले.

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

i) साधा भूतकाळ

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

रामने अभ्यास केलामी पुस्तक वाचले.सिताने नाटक पहिले.

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात होतो.दीपक गाणे गात होता.ती सायकल चालवत होती.

iii) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सिद्धीने गाणे गाईले होते.मी अभ्यास केला होता.त्यांनी पेपर लिहिला होता.राम वनात गेला होता.

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करीत होतो/असे.ती दररोज मंदिरात जात होती/असे.प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.

3)  भविष्यकाळ :

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी सिनेमाला जाईल.मी शिक्षक बनेल.मी तुझ्याकडे येईन.

i) साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.

उदा.

उद्या पाऊस पडेल.उद्या परीक्षा संपेल.मी सिनेमाला जाईल.

ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात असेल.मी गावाला जात असेल.पूर्वी अभ्यास करत असेल.दिप्ती गाणे गात असेल.

iii) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खाल्ला असेल.मी गावाला गेलो असेल.पूर्वाने अभ्यास केला असेल.दिप्तीने गाणे गायले असेल.

iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करत जाईल.पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.सुनील नियमित शाळेत जाईल.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला.

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

- कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं २ वर्षे ११ महिने १८ दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. संविधानाची भाषा

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.
- यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली.
-भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-अध्यक्ष-Dr.राजेंद्र प्रसाद

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली.

अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली.
- सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते.
-पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

-फाळणीनंतर संविधान सभेतील संदस्यांची संख्या २९९ झाली.
समितीच्या ११ बैठका झाल्या.
त्या १६४ दिवस कामकाज चालले.
समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या.
त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
-मसुदा समितीच्या ४४ बैठका झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

-मूळ घटनेत ८ परिशिष्टे होती. नंतर ४ जोडण्यात आली आहेत.

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

-मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती.

-सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा लागू करण्यात आला.
भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधान कोणी हस्तलिखित केले आहे?

-बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.
-प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

अंकगणित

० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.

१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

विभाज्यतेच्या कसोटय़ा

A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.

B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.

C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.

D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.

E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.

I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.

K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.

L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश

अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना

राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक

भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ

राज्यपाल देतात.

राजीनामा

राज्यपालाकडे 

कार्यकाल

अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.

अयोगाचे कार्य :

राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.

राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.

मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.

अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.

राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...