Friday 15 October 2021

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय


👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर
👤 ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप
👤 मॅगसेसे : विनोबा भावे
👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन
👩‍🦰 दादासाहेब फाळके : देविका राणी
👤 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा
👤 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान
👩‍🦰 मॅन बुकर : अरुंधती रॉय
👤 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन
👩‍🦰 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया
👤 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे
👤 खेलरत्न पुरस्कार : विश्वनाथन आनंद
👦 बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर
👤 गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार
👤 ग्लोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले
👤 कलिंगा प्राईज् : जगजित सिंह
👤 जपान प्राईज् : गुरदेव एस खुश
👤 जी डी बिर्ला पुरस्कार : ए दत्ता
══════════════════

दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’

🔰महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरण्याचा मान पटकावला. १६ वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकषही (नॉर्म) प्राप्त केला आहे.

🔰हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल १९ महिन्यांनंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने (एलो २३०५ गुण) ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले.

🔰१० दिवस चाललेल्या स्पर्धेत दिव्याने तिच्यापेक्षा वरचे किताब मिळवलेल्या चार खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच तिने तीन लढती जिंकल्या आणि दोन लढतींत तिला पराभव पत्करावा लागला. शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टर’साठी आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.

🔰‘महिला ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटेला बरोबरीत रोखत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला. हा किताब मिळवण्यासाठी तिला एलो २४०० गुण आणि तीन निकषांचा टप्पा पूर्ण करावा लागेल. दिव्याला या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.

‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा : छेत्रीच्या गोल धडाक्यामुळे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

🔰कर्णधार सुनील छेत्रीच्या दुहेरी गोल धडाक्यामुळे भारताने यजमान मालदीववर ३-१ असा विजय मिळवत ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील दोन गोलसह छेत्रीने (७९ गोल) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (७७) यांना मागे टाकले.

🔰भारताला या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मालदीवविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य होते. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली.

🔰मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला. आता शनिवारी (१६ ऑक्टोबर) होणाऱ्या ‘सॅफ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतापुढे नेपाळचे आव्हान असेल.

‘पीएम गतीशक्ती’ कार्यक्रम

🧣13 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या “पीएम गती शक्ती” या नावाने बहू-पद्धती संपर्कासाठीच्या राष्ट्रीय मास्टर योजनेचा शुभारंभ केला. नवी दिल्लीत या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

🛑योजनेविषयी

🧣ही योजना एकापासून ते दुसऱ्या पद्धतीच्या वाहतूक पद्धतीने लोक, वस्तूमाल आणि सेवांच्या दळणवळणासाठी एकात्मिक आणि अखंड संपर्क व्यवस्था प्रदान करेल.

🧣सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रमाची निश्चिती, सुयोग्य उपयोजन, तादात्म्य, विश्लेषणात्मक, गतीशील या सहा स्तंभावर “पीएम गतीशक्ती” आधारित आहे.

🧣ही योजना महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे समग्र नियोजन हितसंबंधींकरता संस्थात्मक करणार आहे. स्वतंत्र पद्धतीने आपापल्या विभागांमध्ये नियोजन आणि रचना करण्याऐवजी, प्रकल्पांची रचना आणि उभारणी सामाईक दृष्टीकोनातून होणार आहे.

🧣योजना केंद्रीय सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकार यांच्या भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत जलमार्ग, ड्राय/लँड पोर्ट, उडान इत्यादींसारख्या पायाभूत सुविधा योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करणार आहे.

🧣बहू-पद्धती संपर्क व्यवस्थेमुळे लोकांना प्रवास करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची वाहतुकीच्या एका साधनातून दुसऱ्या साधनाद्वारे वाहतूक करण्यासाठी एकात्मिक आणि सुविहित संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा लाभ शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे शक्य होणार आहे.

विशेष प्रकरणांमध्ये 24 आठवड्यांमध्ये गर्भपात करण्यास भारतात परवानगी


❄️केंद्रीय सरकारने विशेष प्रकरणांमध्ये गर्भपाताची कालमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, काही विशेष प्रकरणांमधून झालेल्या गर्भधारणेच्या 24 आठवड्यांमध्ये गर्भपाताची परवानगी दिली जाईल.

❄️लैंगिक अत्याचार, बलात्कार, अल्पवयीन गर्भधारी मुली, गर्भधारी विधवा किंवा घटस्फोटित महिला तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या महिला यांच्यासाठी ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. शिवाय मानसिकदृष्ट्या आजारी महिला, आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या गर्भधारी महिला देखील यासाठी पात्र असतील.

❄️नवीन नियमांनुसार, राज्य वैद्यकीय मंडळ गर्भपाताच्या संदर्भात निर्णय घेतील. गर्भपातासाठी महिलेने केलेल्या विनंतीचा आढावा राज्य वैद्यकीय मंडळ घेणार आहे आणि विनंती प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार. विनंती मंजूर झाल्यास, पाच दिवसांच्या आत गर्भपात करावा लागेल.

🅾‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’

❄️‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’ याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971” यामध्ये दुरुस्ती केली गेली आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक, मानवी आणि सामाजिक आधारावर हा कायदा तयार करण्यात आला आहे.

🅾नवीन नियमानुसार,

❄️गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका वैद्यकाचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन वैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.
गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.

नेशन्स लीग फुटबॉल - एम्बापेमुळे फ्रान्सला विजेतेपद.

🔰अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना किलियान एम्बापेने केलेल्या निर्णायक गोलमुळे जगज्जेत्या फ्रान्सने अंतिम सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव करत नेशन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवले. सॅन सिरो स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना आक्रमणात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

🔰उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ६४व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. अनुभवी करीम बेन्झेमाने उत्कृष्ट गोल केल्यामुळे फ्रान्सने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ८०व्या मिनिटाला थिओ हर्नाडेझच्या पासवर एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

🔰अखेरच्या काही मिनिटांत स्पेनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीसने दोनदा अप्रतिमरीत्या चेंडूला गोलजाळ्यात जाण्यापासून अडवत स्पेनला बरोबरी साधू दिली नाही.

अल्फ्रेड नोबेल कोण होते?

21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.

अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.

अल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या.

ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता.

सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. आणि त्यांची मत त्या काळासाठी प्रागतिक होती.

डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता.

नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली.

त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता.

त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी 1901मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना पहिलं नोबेल मिळालं.

कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता.

आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, "prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind" म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.

या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

चालू घडामोडी प्रश्नसंच


● कोणत्या दिवशी ‘जागतिक अधिवास दिवस २०२१’ साजरा करण्यात आला?
उत्तर : ४ ऑक्टोबर

●  कोणत्या राज्यात ICMR संस्थेच्या ‘ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच इन नॉर्थ ईस्ट’ (आय-ड्रोन) कार्यक्रमाला सुरूवात झाली?
उत्तर :  मणिपूर

●  कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम ‘मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
उत्तर : मॅग्नस कार्लसन

● कोणता देश २०२२ साली ‘मिलान’ नामक त्याची सर्वात मोठी नौकवायत आयोजित करणार?
उत्तर : भारत

●  __ या संस्थेच्यावतीने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021; ऑन माय माइंड: प्रोमोटिंग, प्रोटेक्टिंग अँड केयरिंग फॉर चिल्ड्रेन्स मेंटल हेल्थ” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
उत्तर : UNICEF

● कोणत्या देशामधील 'JIMEX' नामक सागरी द्विपक्षीय कवायतीची पाचवी आवृत्ती ०६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली?
उत्तर : भारत आणि जपान

● कोणत्या राज्यातून GI टॅग मिळविलेल्या ‘मिहिदाना’ नामक गोड पदार्थाची पहिली खेप बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आली?
उत्तर :  पश्चिम बंगाल

●  ____ राज्यातील इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाले.
उत्तर :  केरळ

● कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : व्हाइस ॲडमिरल अधीर अरोरा

●  कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०४ ऑक्टोबर

●  कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे १००  टक्के भागभांडवल विकत घेतले?
उत्तर :  पेटीएम

● कोणत्या व्यक्तीला २०२१ या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?
उत्तर : व्ही. एस. नटराजन

●  कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : राजीव बन्सल

● कोणत्या संस्थेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरात ४०० हून अधिक ठिकाणी "नॅशनल अप्रेंटिसशीप मेला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)

● ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, ‘सोमुद्र अविजन’ नामक जहाज विशाखापट्टणमच्या बंदरावर पोहचले. ते कोणत्या देशाच्या नौदलाचे जहाज आहे?
उत्तर : बांगलादेश

●  खालीलपैकी कोणाला आसाम सरकारचा “लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले?
उत्तर : शिलाँग चेंबर चॉइर, आसामी साहित्यिक डॉ. निरोद कुमार बारूआ, कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक न्यास

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...