Sunday, 29 January 2023

घटनादुरुस्ती

 ⚜️घटनादुरुस्ती क्र.96⚜️

23 सप्टेंबर 2011

" ओरिया " शब्दाऐवजी " ओडिशा " शब्दाचा बदल ( ओडिशा राज्याची प्रमुख भाषा )


⚜️घटना दुरुस्ती क्र.97⚜️

12 जानेवारी 2012

सहकार क्षेत्रातील बँकांना बळ देण्यासाठी


⚜️घटना दुरुस्ती क्र.98⚜️

2 जानेवारी 2013

आंध्रप्रदेश - कर्नाटक भागातील विकासासाठी कर्नाटकच्या राज्यपालना काही विशेष अधिकार देण्यात आले. भारतीय घटनेत 371 J कलम टाकले


⚜️घटना दुरुस्ती क्र.99⚜️

31 डिसेंबर 2014

राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग


⚜️घटना दुरुस्ती क्र 100⚜️

1 ऑगस्ट 2015

भारत बागलादेशातील भू - सिमा कराराच्या अंमलबजावणीसाठी


⚜️घटना दुरुस्ती क्र - 101⚜️

8 सप्टेंबर 2016

वस्तू व सेवा कर ( GST ) चीं आमलबजावणी


⚜️घटना दुरुस्ती क्र  - 102⚜️

11 ऑगस्ट 2018

या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय मागास - वर्गीय आयोगाला ( NCBC ) घटनात्मक दर्जा देण्यात आला.


⚜️घटना दुरुस्ती क्र 103⚜️

12 जानेवारी 2019

या घटनादुरुस्तीद्वारे भारतातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास ( दुर्बलाना ) ( EWS ) शिक्षण व नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्यात आले


⚜️घटनादुरुस्ती क्र 104⚜️

डिसेंबर 2019

या घटनादुरुस्तीनुसार sc व st प्रवर्गाना 25 जानेवारी 2030 पर्यत संसद व राज्य विधानसभामधील आरक्षण लागू राहील

स्वतंत्र भारताची राज्यघटना
🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


०२. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


०३. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


०४. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


०५. कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

_______________________________

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची
---------------------------------------------------

🔰 ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
-----वि.रा. शिंदे

🔰मस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
----- ढाका

🔰 रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
➖ बगाली.

🔰WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
➖वर्ल्ड ट्रेड आॅर्गनायझेशन.

🔰तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
➖चद्रपूर.

🔰मळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
➖पणे.

🔰भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
➖ लता मंगेशकर.

🔰विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला ?
Ans -: महर्षी धौडों केशव कर्वे

🔰सभाषचंद बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
 Ans-: फॉरवर्ड ब्लॉक

🔰कषय : संक्रामक रोग :: कॅन्सर:.......
Ans-: असंक्रामक रोग

🔰महाराष्ट्रात......... प्रशासकीय विभाग आहेत.
Ans -: 6

🔰महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?
Ans-: नागपूर

🔰राधानगरी धरण.......नदीवर बांधण्यात आलेले आहे.
Ans -: भोगावती

🔰गरामगीता हा काव्य ग्रंथ.......यांनी नी रचला आहे.
Ans-:श्री तुकडोजी महाराज

🔰फसबुकचे संस्थापक कोण ?
Ans-:मार्क झुकेरबर्ग


🔰काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Ans-:आसाम

🔰वदेमातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिले ?
Ans-:बंकीमचंद्र चॅटर्जी

🔰यनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
 Ans-:हेग

🔰दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Ans -: कार्ल मार्क्स

🔰भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात.
 Ans-:28 फेब्रुवारी

🔰भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
Ans-:प्रस्तावना

🔰महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
 Ans-:इचलकरंजी


 Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

१) सर्व बरोबर
२) 1 व 2 बरोबर
३) 2 व 3 बरोबर 💐💐
४) सर्व चूक Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस 'बारमाही न्यून रोजगार' किंवा 'व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी' असेही म्हटले जाते.

१) हंगामी बेरोजगारी
२) खुली बेरोजगारी
३) सुशिक्षित बेरोजगार
४) अदृश्य बेरोजगारी 💐💐 Q3)
 समितीचे नाव                         विषय

A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक  उद्योग बाबतच्या  धोरणात सुधारणा               
                                                 
                                 

B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा   दर्जा               
                               

C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक परवाना धोरण समिती           
                                 

       A      B      C      D
१)    1      2      3       4
२)    2      1      4       3
३)    3      4      1       2
४)    4      1      2       3💐💐


 Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _

१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
४) या पैकी नाही

     
 Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

१) सर्व बरोबर
२) फक्त 2 बरोबर
३) फक्त 1 बरोबर 💐💐
४) फक्त 3 बरोबर


Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

१) जलद विकास
२) औद्योगिक विकास
३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
४) समतोल प्रादेशिक विकास


Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
३) माळेगाव (बारामती- पुणे)
४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे....)


Q8)
1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान 'सर्वोच्च वित्तसंस्था' असेच आहे

१) 1 व 3 बरोबर
२) सर्व बरोबर 💐💐
३) फक्त 3 बरोबर
४) 1 व 2 बरोबरQ9) खालील योग्य विधान ओळख

1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

१) सर्व बरोबर 💐💐
२) 1 व 4 बरोबर
३) फक्त 1 व 2 बरोबर
४) सर्व चूक


Q10)

वित्त आयोग                        अध्यक्ष
A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
       A    B    C     D
१)   1     2     3    4
२)   4     2    3     1
३)   4     3    2     1 ✅
४)   1     3    2     4

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

असहकार चळवळ :-

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.


➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.


1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.


2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.


3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे


4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.


5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.


6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.


7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.


◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.


◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-


◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.


◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.


पोलीस भरती प्रश्नसंच

 १) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.✅


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद✅

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व ✅


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३✅

ड) १, २ व ४६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी ✅

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी✅

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ ✅

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण ✅


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 


✔️ लार्ड कँनिंग


2) 1857 च्या उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ति कोण ? 


✔️ मगल पांडे


3) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण  ? 


✔️ विनोबा भावे


4) " आझाद हिंद सेने " ची स्थापना कोणी केली ? 


✔️ रासबिहार बोस


5) मायकेल ओडवायरीची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली ?  


✔️ उधमसिंग


6) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता ? 


✔️  लार्ड कर्झन


7) भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ति कोण  ? 


✔️ राजा राममोहन रॉय


8) " पुणे करार " कोणाकोणामंध्ये झाला ? 


✔️  महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर


9) जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेत्यांची ( त्रिमूर्ती ) नावे सांगा  ? 


✔️ लाल - बाल  - पाल


10) इ.स. 1930 मंध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ? 


✔️ रम्से मँक्डोनाँल्ड


11) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? 


गो. कृ.  गोखले


12) जुन्या मुबंई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर -----------होता


✔️ एलफिन्स्टन


13) इ.स. 1829 मंध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला ? 


✔️ बटिग विल्यम


14) " शिवजयंती उत्सव " महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण ? 


✔️ बा.ग.टिळक


15) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ? 


✔️ सर ए. ओ.ह्युम


16) भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ----------------


✔️ अनी बेझंट


17) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? 


✔️ वयोमेशचंद्र बँनर्जी


18) डाँ.  पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी "गदर " ही गुप्त क्रांतिकारक संघटना ----------या देशामंध्ये सुरू केली ? 


✔️ अमेरिका


19) काँग्रेसचे पहिले अधिवेशन ------------या शहरात घडून आले ? 


✔️ मबंई


20)  कलेक्टर जँक्सनचा वध करणारा क्रांतिकारक -------------


✔️ अनंत लक्ष्मण कान्हेरे


21) " अभिनव भारत संघटनेचे " संस्थापक कोण ? 


✔️ वि.दा.सावरकर


22) आद्य क्रांतिकारक ? 


✔️ वासुदेवन बळवंत फडके


23) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कदी झाला ? 


✔️ 1858


24) हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पाश्र्वभूमी कोणी तयार केली ? 


✔️ सवामी रामानंद तीर्थ


25) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराँय कोण  ? 


✔️ लार्ड कँनिंग


26) "व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट "रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण ? 


✔️ लार्ड रिपन


27) लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटा बरोबर केली जाते ? 


✔️ औरंगजेब


29) 1929 मंध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या आध्यक्षेखाली पास झाला ? 


✔️  पडित नेहरू


30) "गदर पार्टीचे " पुणे जिल्ह्यातील कार्यकरते कोण ? 


✔️ विष्णू गणेश पिगंळे


32) विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक ------------


✔️ धोंडो केशव कर्वे


31) भारकाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?  


✔️ सी.  राजगोपालाचारी


33) होमरुल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली  ? 


✔️ मबंई


34) "असहकार चळवळ " कोणी केली ? 


✔️ महात्मा गांधी


35) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द----------- यांनी आवाज उठविला ? 


✔️ वि.रा.शिदें


36) वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ------------


✔️ पडित नेहरू


37) मुंबई येथे थिआँसाँफिकल सोसायटी शाखा इ.स.-----------या वर्षी झाली  ? 


✔️ इ.स.1897


38) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना "राणीचा जाहिरणामा " प्रस्तुत करणार्‍या साम्राद्नीचे नाव -----------?

राणी व्हिक्टोरिया 

✔️


39) भारतातील" स्वतंत्र " हा शब्द ब्रिटिश राजकर्त्यानी ---------------मंध्ये वापरला ? 


✔️ अटलीच्या घोषणेत


40) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात।? 


✔️ लार्ड रिपन

Mpsc pre exam samples Questions

 1) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे.

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.🔰

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

________________________

2) खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

 A. प्रतिषेध🔰

 B. उत्प्रेक्षण

 C. बंदी प्रत्यक्षीकरण

 D. अधिकारपृच्छा.

________________________

3) योग्य कथन ओळखा :

(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 🔰

 C. (a) आणि (b) दोन्ही

 D. (a) आणि (b) दोन्ही नाही.

________________________

________________________

4) खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

 A. सी. राजगोपालाचारी

 B. मिनू मसानी 

 C. पी.सी. जोशी🔰

 D. के.एम. मुन्शी.

______________________

5) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) अचूक आहे 

 B. फक्त (c) अचूक आहे

 C. फक्त (d) अचूक आहे🔰

 D. (a) आणि (d) अचूक आहे.

________________________

6) मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

 A. एकसष्टावी घटना दुरुस्ती🔰

 B. बेचाळीसावी घटना दुरुस्ती

 C. त्रेसष्टावी घटना दुरुस्ती

 D. शहाऐंशीवी घटना दुरुस्ती.

________________________

7) लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

 A. एस.सी. - 78, एस.टी. - 39

 B. एस.सी. - 84, एस.टी. - 47🔰

 C. एस.सी. - 81, एस.टी. - 39

 D. एस.सी. - 79, एस.टी. - 41.

________________________


8) योग्य पर्यायांची निवड करा :

(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.

(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.

(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.

(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.

पर्यायी उत्तरे :

 A. (b) आणि (d) फक्त

 B. (c) आणि (d) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d)

 D. (a), (b) आणि (c) फक्त.🔰


________________________


9) 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

 A. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव असतील.

 B. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील.

 C. पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असेल.

 D. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक (मतदान).🔰


________________________


10) राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

 A. (b) फक्त

 B. (b), (c), (d)

 C. (a), (d)🔰

 D. (a), (b), (d).


1) राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

 A. मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते.

 B. राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी

 C. दहाव्या अनुसूची खाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्यमंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो.

 D. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.🔰

________________________

2)जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

 A. जिल्हाधिकारी

 B. विभागीय आयुक्त 🔰

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरीलपैकी कोणालाही नाही.

________________________

3)खालील विधाने विचारात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर🔰

 B. विधान (b) बरोबर

 C. दोन्हीही विधाने बरोबर

 D. दोन्हीही विधाने चुकीची.

________________________

________________________


4)पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :

(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (b)🔰

 D. (a), (d).

________________________

5)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

 A. जे.व्ही.पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.

 B. फझल अली आयोगाने 'एक भाषा-एक राज्य' हे तत्त्व नाकारले होते.

 C. फझल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.🔰

 D. राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

________________________

6)74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग IX-A हा नव्याने समाविष्ट झाला.

 B. या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश झाला.

 C. बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे.🔰

 D. वरीलपैकी एकही नाही.

________________________

7) खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?;

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 

 C. (a) आणि (b)

 D. दोन्हीही चुकीची.🔰

________________________

8) खालील विधाने विचारात घ्या :

(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.

(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

 A. (a) आणि (b)

 B. (a), (b) आणि (c)

 C. (a), (b) आणि (d)🔰

 D. वरील सर्व.

________________________

9) 'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

 A. बलवंतराय मेहता समिती

 B. अशोक मेहता समिती 🔰

 C. जी.व्ही.के. राव समिती

 D. एल.एम. सिंघवी समिती.

________________________


10) कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

 A. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.🔰

 B. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.

 C. (A)बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.

__________

1)समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

A. जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.

 B. जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.🔰

 C. जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.

 D. जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.

____________________________

2)महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. (a)

 B. (b) 

 C. (c)🔰

 D. यापैकी एकही नाही.

____________________________

3)खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. सर्व अर्थ (धन) विधेयके [अनुच्छेद-110] ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके [अनुच्छेद-117] ही अर्थ (धन) विधेयके नसतात.

 B. वित्त विधेयक [अनुच्छेद-117(3)] हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.🔰

 C. वित्त विधेयका [अनुच्छेद-117(3)] बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.

 D. वरीलपैकी एकही नाही.

____________________________

____________________________

4)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

 A. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

 B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 🔰

 C. भारताचे महान्यायवादी 

 D. लोकसभेचे सभापती.

__________


5)भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

 A. खर्च विभाग

 B. महसूल विभाग 

 C. आर्थिक व्यवहार विभाग🔰

 D. संरक्षण विभाग.

____________________________

6)खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 A. कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.

 B. कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.

 C. कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.🔰

 D. कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.

____________________________

7)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून ___ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

 A. जिल्हा दंडाधिकार

 B. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 🔰

 C. जिल्हा न्यायाधीश

 D. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.

____________________________

8)भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ____ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

 A. 20

 B. 21 

 C. 22🔰

 D. वरीलपैकी कोणतेही नाही.

____________________________

9)माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ___ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त ___ असेल.

 A. 15, नागरिकांना

 B. 21, सरकारी दफ्तरांना

 C. 19(1)(a), नागरिकांना🔰

 D. 19(1), सरकारी अधिका-यांना.

____________________________

10)सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

 A. भारताचे राष्ट्रपती

 B. राज्याचे राज्यपाल

 C. भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार

 D. भारताचे सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार.🔰

____________________________


चलेजाव आंदोलन (१९४२)▪️घटनाक्रम


― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.


― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 


― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 


― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.


― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.


― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.


― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.


― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.


― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.


― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.


― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.


― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.


― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.


― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.


― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.


― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.


― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.


― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


▪️छोडो भारत चळवळ


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


▪️नेताजी सुभाष चंद्र बोस


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


▪️आझाद हिंद सेना


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


▪️भारतीय नौदलाचा उठाव


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

सराव प्रश्न[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}
-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}
-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}
-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]
-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}
-------------------
 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}
-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ?
१) विचारसरणीत  भिन्नता
२) आंदोलन मार्गातील भिन्नता
३) मागण्यात  भिन्नता
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४


६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
 
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी
ब) आचार्य कृपलानी
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅

Question bank


1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

1. व्यापार

2. शेती

3. औद्योगिकरण

4. गुंतवणूक

🅾️उत्तर : शेती


2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.

1. शेती व्यवसाय

2. मत्स्य व्यवसाय

3. दुग्ध व्यवसाय

4. कुकुटपालन व्यवसाय

🅾️उत्तर : दुग्ध व्यवसाय


3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

1. महाबळेश्वर

2. पंचगणी

3. लोणावळा

4. आंबोली

🅾️उत्तर : आंबोली


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

1. तहसीलदार

2. उपजिल्हाधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. महसूल आयुक्त

🅾️उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

1. पीटर सविड्लर

2. अलेक्झांडर ग्रीशुक

3. व्हॅसिली इव्हानचूक

4. विश्वनाथ आनंद

🅾️उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

1. सौदी अरेबिया

2. अफगाणिस्तान

3. लिबिया

4. इराक

🅾️उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.

1. दहावी

2. आठवी

3. बारावी

4. स्नातकीय

🅾️उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

1. गगन नारंग

2. रामपाल

3. राजेंद्र सिंह

4. जहीरखान

🅾️उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका

🅾️उत्तर : ब्रिटन


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा

🅾️उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम

🅾️उत्तर : जिनिव्हा


12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई

🅾️उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच

🅾️उत्तर : साडे पाच


14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे

🅾️उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस

4. डिझेल

🅾️उत्तर : उस


16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू

🅾️उत्तर : भात व गहू


17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

1. जगन्नाथ शंकर सेठ

2. बाळशास्त्री जांभेकर

3. भाऊ दाजी लाड

4. छत्रपती शाहू महाराज

🅾️उत्तर : बाळशास्त्री जांभेकर


18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🅾️उत्तर : अमेरिका आणि कॅनडा


19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही

🅾️उत्तर : वरील कोणतीही नाही


20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49

4. 39

🅾️उत्तर : 49


१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.🅾️


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद🅾️

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾️

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व 🅾️


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३🅾️

ड) १, २ व ४६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾️


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी 🅾️

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी🅾️

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ 🅾️

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾️


नीती आयोग

 नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. डॉ. राजीव कुमार हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. ०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.


नीती आयोगाचे मुख्य आधार स्तभ

भारताचा दृष्टी दस्तऐवज ( Vision Document of India .

बाराव्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन दस्तऐवज

'परिवर्तनशील भारत' ( ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ) या विषयावर निती आयोगामार्फत व्याख्याने आयोजित करणे .

शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न

फलश्रुती अंदाजपत्रक आणि उत्पादन फलश्रुती आराखडा

जागतिक उदयोजकांची शिखर परिषद २०१७

मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविणे .


सदस्य

अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्य कार्यकारी अधिकारी CEO: श्री अमिताभ कांत

उपाध्यक्ष: डॉ. राजीव कुमार

पदसिद्ध: राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंग तोमर

विशेष आमंत्रित: नितीन गडकरी,थावरचंद गेहलोत, स राव इंद्रजित सिंह पियूष गोयल

पूर्णवेळ सदस्यः बिबेक देबरॉय(अर्थतज्ञ), विजय कुमार सारस्वत, रमेश चंद(शेतीतज्ञ)

नियामक परिषद: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे गवर्नर

पंचवार्षिक योजना

1, एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.
ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.
7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.

पंचवार्षिक योजना :-

१) पहिली पंचवार्षिक योजना
कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.
अग्रक्रम: कृषी
पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.
प्रकल्प :
१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
२. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
८. HMT- बँगलोर
९. हिंदुस्थान एंटीबायोटिक
महत्वपूर्ण घटना :-
१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू.
२. community development programme 1952
३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना.
४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.
५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)
मूल्यमापन : -
योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला .

२) २ री पंचवार्षिक योजना:-
कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१
प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल
Mahalanobis Model खर्च : प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.
प्रकल्प :-
१. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने
२. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने
३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने
४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ
५. नानगल व रुरकेला खत कारखाने.
६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला
महत्वपूर्ण घटना :-
१. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.
२. Intensive Agriculture district programme – (1960)
मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.
३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले.
४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल
५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार
६. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण
७. बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना.

३) ३ री पंचवार्षिक योजना:-
कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६
प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)
खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.
प्रकल्प : -
१. Intensive Agriculture Area programme-1964-65
२. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना
३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)
३.Food Corporation of India (१९६५)
४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.
महत्वपूर्ण घटना : -१. १९६२ चे चीन युद्ध. २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.
मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले. १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

४) तीन वार्षिक योजना
कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९
तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली.
या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.
१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.
२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८) हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.
३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९) अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

५) ४ थी पंचवार्षिक योजना:
कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४
प्राधान्य : -स्वावलंबन
घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ
मॉडेल : Open Consistency Model
खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु.,
वास्तविक खर्च- १५,७९९  कोटी रु.
प्रकल्प : -
१. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973)
२. Small Farmer Development Agency (SFDA)
३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२)
४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)
महत्वपूर्ण घटना -
१. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला.
२. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली.
४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३)
५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता.
६. Foreign Exchange Regulation Act-1973
मूल्यमापन : - काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

६) ५ वी पंचवार्षिक योजना-
कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.
प्राधान्य : दारिद्र्य निर्मुलन
खर्च : प्रस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु.,
वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.
प्रकल्प :
१. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM)
२. Integrated Child Development Services
३. Desert Development Programme
महत्वपूर्ण घटना :
१. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला.
२. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर. (१९७६)
मूल्यमापन :दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश
राजकीय घटना : २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. जानेवारी १९८० मध्ये काँग्रेस (आय) ने सरकती योजना फेटाळली. १ एप्रिल १९८० नवीन सहावी योजना सुरु करण्यात आली.

७) दूसरा सुटीचा कालावधी
कालावधी: इ.स. १९९० - इ.स. १९९२

८) ६ वी पंचवार्षिक योजना:
कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५
प्राधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती
मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model
खर्च : प्रस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु.,
वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.
प्रकल्प :
१. Integrated Rural Development Programme (IRDP)
२. National Rural Employment Programme (NREP)
३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP)
४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA)
५. नवीन २० कलमी कार्यक्रम
६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश)
७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)
महत्वपूर्ण घटना : १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
मूल्यमापन : हि योजना यशस्वी ठरली. वाढीचा दर ५ टक्क्यापेक्षा अधिक सध्या होण्यास सुरवात झाली.

९) ७ वी पंचवार्षिक योजना:
कालावधी: इ.स. १९८५ - इ.स. १९९०
प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती
घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता'
मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान
खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु.,
वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु
प्रकल्प :
१. इंदिरा आवास योजना-RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली.
२. Million Wells Scheme
३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART)
४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.
मूल्यमापन : - या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.
सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

१०) ८ वी पंचवार्षिक योजना:-
कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७
प्राधान्य : मनुष्यबळ विकास
घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता'
मॉडेल : Export-led Growth Model
खर्च : प्रस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु.,
वास्तविक खर्च- ४,७४,११२ कोटी रु.
प्रकल्प : -
१. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३
२. Employment Assurance Scheme (EAS)
३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY)
४. Mahila Samridhi Yojana
५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS)
६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP)
७. Mid-Day Meal Scheme
८. Indira Mahila Yojana
महत्वपूर्ण घटना :- सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली. १९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.(Full convertibility of Rupee on Current account) १९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला. १९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला.
मूल्यमापन : - योजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी. वाढीचा दर सरासरी ६.६८ इतका साध्य झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ८.०% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.९%

११) ९ वी पंचवार्षिक योजना
कालावधी: इ.स. १९९७ - इ.स. २००२
प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती
घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ.
खर्च : प्रस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु.,
वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु.
प्रकल्प : -
१. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे.
२. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार
३. भाग्यश्री बाल कल्याण योजना
४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण
५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा.
६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.
७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती.
८. अंत्योदय योजना(२५ डिसेम्बर २०००)- स्वस्त भावाने अन्नधान्य.
९. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना(२५ डिसेम्बर २०००)
१०. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना(२०००-०१)- प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण, ग्रामीण विद्युतीकरण.
११. सर्व शिक्षा अभियान(२००१)- शिक्षण न घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करणे.
महत्वपूर्ण घटना : National Highways Development Programme हाती घेण्यात आला. सार्वजनिक शेत्रातील उद्योगांना स्वायत्तता देण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरु करण्यात आली. कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.
मूल्यमापन : कृषी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर २.४४% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ४.२९% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर 7.87%

१२) 10 वि पंचवार्षिक योजना:-
कालावधी-2002-2007

१३) ११ वी पंचवार्षिक योजना
कालावधी: इ.स. २००७ - इ.स. २०१२

१४) 12 वि पंचवार्षिक योजना:-
कालावधी-2012-2017

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...