Sunday 12 July 2020

वाचा :- महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी



● *मुंबई* : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

● *रत्नागिरी* : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

● *सोलापूर* : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

● *कोल्हापुर* : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

● *रायगड* : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

● *सातारा* : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

● *परभणी* : ज्वारीचे कोठार.

● *नागपुर* : संत्र्यांचा जिल्हा.

● *भंडारा* : तलावांचा जिल्हा.

● *जळगाव* : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

महाराष्ट्र पोलिस भरती Imp प्रश्न


१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

● *आकाश* : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

● *त्रिशुल* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

खुदीराम बोस.

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

🅾स्मृतिदिन - ११-०८-१९०५

🧩खुदीराम बोस  :

🅾भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

🅾बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

🅾यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा हकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

🅾घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...