भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

● *आकाश* : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

● *त्रिशुल* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...