Sunday 1 March 2020

पाकिस्तानसाठी चीन पाठवणार बदकांची फौज

🦗 पाकिस्तानमध्ये सध्या टोळधाडीने धुमाकूळ घातला असून अनेक पिकांचे नुकसान केले आहे. टोळ कीटकांना नष्ट करण्यासाठी चीनने पाकिस्तानला 1 लाख बदकांची फौज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

🧐 *प्रकरण काय? :*

▪ अलीकडेच टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

▪ पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जाते. येथे हिवाळ्यामध्ये टोळ किड्यांची पैदास होते. टोळ नियंत्रणात पाकिस्तानकडे प्रभावी व्यवस्थापन नाही.

🧐 *बदके खातात 200 टोळ :* चीन पूर्वेकडील झेजियांग प्रांतातून टोळ खाणाऱ्या बदकांना पाकिस्तानात पाठवले जाणार आहे. एक बदक दिवसाला 200 टोळ कीटक खाऊ शकतो. त्यामुळे 1 लाख बदकांची फौज दिवसाला 2 कोटी टोळ कीटकांना खाऊ शकते.

📍 दरम्यान, टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा

“मर्केरियन 231’ आकाशगंगेमध्ये ऑक्सिजन वायू आढळला

🔰 पृथ्वीपासून दीड अब्ज प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेल्या “मर्केरियन 231’ नावाच्या आकाशगंगेमध्ये खगोलशास्त्रज्ञांना आण्विक ऑक्सिजनचा शोध लागला आहे. पृथ्वीपासून 561 दशलक्ष प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेली “मर्केरियन 231’ आकाशगंगा ‘ओरियन नेबुला’ (मृगशीर्ष नक्षत्रसमूह) याचा एक भाग आहे.

🔴ठळक बाबी

🔰 आण्विक ऑक्सिजन शोधला गेला असलेल्या प्रदेशांपैकी एक म्हणजे ‘ओरियन नेबुला’ होय. असा विश्वास आहे की अंतराळात ऑक्सिजन पाण्याच्या बर्फाच्या रूपात हायड्रोजनसोबत बांधलेल्या अवस्थेत आहे, जो धूळीचे कण आणि लहान दगडांवर तयार होतो.

🔰 “मर्केरियन 231’ आकाशगंगेचा “क्वासर” नावाचा अत्यंत तेजस्वी सूर्य आहे, ज्याच्या मध्यभागी एक प्रचंड असे कृष्णविवर आहे. क्वासर हे विश्वातल्या अत्यंत तेजस्वी वस्तूंपैकी एक आहे. असे मानले जाते की ‘ओरियन नेबुला’वर हायड्रोजनच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण 100 पटीने जास्त आहे.

🔰 ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हीलियम नंतर विश्वातला तिसरा सर्वात सामान्य घटक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी मिलीमीटर रेडिओमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून ऑक्सिजनचा शोध घेतला.

राजापुरची कजोल गुरव आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी भारतीय संघात

- इंडोनेशिया येथे 6 ते 8मे, 2020 दरम्यान होणार्‍या आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये राजापूरची सुकन्या काजोल अशोक गुरव हिची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड झाली आहे. यावर्षी सिनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक आणी फेडरेशन कप स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर काजोलची भारतीय संघात निवड झाली आहे.

- तिच्या या निवडीने राजापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे. गेल्या 8 वर्षांपासून काजोल पॉवरलिफ्टींग हा खेळ खेळत आहे. यामध्ये तिने आजवर विद्यापीठस्तरीय तसेच ज्युनिअर, सिनिअर स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. गेल्या 3 वर्षातील तिच्या कामगिरीतील सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर भारतीय संघासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे काजोलने सांगितले. एवढेच नव्हे तर या स्पर्धेत देशासाठी पदक मिळवण्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे. यासाठी गेली काही वर्षे ती सातत्याने कसून सराव करत आहे.

- काजोल ही सध्या पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत असून गेली 3 वर्षे ती पश्चिम रेल्वेकडून पॉवरलिफ्टींग स्पर्धा खेळत आहे. राजापूर येथे शिवशक्ती कीडा मंडळाच्या व्यायामशाळेत ती दररोज4 तास कसून सराव करते. आजवर राष्ट्रीय स्पर्धेत तीने स्कॉट 190 किलो, बेंचपेस 105 किलो, डेडलिफ्ट 180 किलो असे एकूण 475 किलो वजन अवघ्या 52 किलो वजनगटात उचलले आहे. आशियाई स्पर्धेमध्ये काजोल पुन्हा 52 किलो वजनीगटात भारतीय संघातून सहभागी होईल, या स्पर्धेत तिने आजवरची सर्वोच्च कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.

- 2013 मध्ये काजोलचा भाऊ प्रतिक गुरव याने भारताचे प्रतिनिधीत्व करताना पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून राजापूरचे नाव उंचावले होते. याचीच पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न तीच्या मनात आहे, असे काजोलने सांगितले. येत्या 7 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान काजोल हिमाचल प्रदेश येथे भारतीय रेल्वेच्या सराव शिबिराला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी जाऊन नंतर लगेचच इंडोनेशिया येथे आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आहे

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...