Saturday 29 February 2020

सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र..


🎯पृथ्वीला चंद्र किती आहेत असा प्रश्न विचारल्यास अगदी लहान पोरगाही एक असं उत्तर देईल. मात्र लवकरच या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.

🎯तर संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला 2020 सीडी थ्री असं नाव दिलं आहे.
तसेच मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे  येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे.

🎯19 फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे.तर हा चंद्र 1.9 मीटर लांब आणि 3.5 मीटर रुंद  आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.

🎯या नव्या चंद्राची परिक्रमण कशा ठरलेली नसून तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असंही संशोधकांनी सांगितलं आहे. याआधी 2006 साली  ‘आरएच वन 20’ ही छोटी खगोलीय वस्तू पृथ्वी भोवती फिरत होती.

🎯सप्टेंबर 2006 ते जून 2007 पार्यंत पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर केली.
‘आरएच वन 20’ प्रमाणे ‘2020 सीडी थ्री’ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निघून जाईल असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...