Saturday 1 October 2022

महाराष्ट्र संबंधित महत्वाचे वन लाइनर


1) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
9.7 टक्के .
2) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
मध्ये प्रदेश .
3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
रत्नागिरी.
4) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
गोंदिया.
5) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
रत्नागिरी.
6) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग.
7) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
नाशिक.
8) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
अंबोली (सिंधुदुर्ग).
9) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
  ठाणे जिल्ह्यात.
10) विदर्भातील नंदनवन कोणते?
चिखलदरा.
11) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
शेगाव जिल्हा बुलढाणा .
12) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
नाशिक

13) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
नाशिक.
14) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
सातपुडा.
15) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
  यवतमाळ.
16) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
NH 6 .
17)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
भगुर (नाशिक ).
18) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
  नांदेड.
19) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
सोलापूर.
20) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
कोल्हापूर येथे 1895 ला.
21) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
अमरावती.
22) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
जुन्नर.
23) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
भीमा.
24) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
  प्रवरानगर(जी अहमदनगर ). 
25) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
गोदावरी.
26) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
गोदावरी.
27) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
अहमदनगर.
28) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
अमरावती.
29) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
  प्रीतिसंगम
30) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?
कर्नाळा जिल्हा रायगड.
31) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
मोझरी (अमरावती)
32) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
कोयना प्रकल्प.
33) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
  गंगापूर (नाशिक)
34) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
औरंगाबाद.
35) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा

घटना आणि देशातील पहिले राज्य


1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- राजस्थान

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- उत्तराखंड

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- हरियाणा

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- आंध्रप्रदेश

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- केरळ

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- पंजाब

11).मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

12).विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :-  कर्नाटक

13).भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

14).मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

15). महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र मुंबई

16). रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र*

17).राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- आंध्रप्रदेश 2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून

18). अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- छत्तीसगड

19). मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :-  मध्यप्रदेश

विषाणू

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गीकरण करतात.

विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणुशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणुशास्त्रज्ञ म्हणतात. विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाहीत. परंतु ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू (bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना बॅक्टेरियोफेग (bacteriophage) असे म्हणतात.

विषाणू (Virus) हे सजीव आहेत की नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणुशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण की ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तिकाही नसते तसेच ते स्वतः चयापचय प्रक्रियाही करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते थियोडोर श्वानने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत, कारण विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

२९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या

समिती/उपसमिती  अध्यक्ष
१.  मसुदा समिती               
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२.  संचालन समिती                    
डॉ. राजेंद्र प्रसाद

३.  कार्यपद्धती नियम समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद.

४.  वित्त व स्टाफ समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद

५.  राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद

६.  संघराज्य संविधान समिती 
पं जवाहरलाल नेहरू

७.  संघराज्य अधिकार समिती 
पं जवाहरलाल नेहरू.

८.  प्रांतिक संविधान समिती 
स. वल्लभभाई पटेल

१०.  झेंडा समिती                     
जे.बी. कृपलानी

११.  सुकाणू समिती  
के.एम. मुंशी

१२.  मूलभूत अधिकार उपसमिती 
जे.बी. कृपलानी

१३.  अल्पसंख्यांक हक्क उपसमिती 
एच.सी. मुखर्जी.

१४.  वित्त व स्टाफ उपसमिती 
ए.एल. सिन्हा

दुसरी पंचवार्षिक योजना

कालावधीः १ एप्रिल १९५६ ते ३१, मार्च १९६१

मुख्य भरः जड व मूलभूत उद्योग

प्रतिमानः पी. सी. महालनोबिस प्रतिमान.
योजनेचे उपनाव: नेहरू-महालनोबिस योजना (भौतिकवादी

योजना) •योजना खर्च: प्रस्तावित खर्चः ४८०० कोटी रू.,

वास्तविक खर्चः ४६००कोटी रू.

उद्दिष्ट :
1.विकासाचा दर ७.५ टक्के प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

2.जड व मूलभूत उद्योजकांची स्थापना करून औद्योगिकीकरण.

3.१० ते १२ लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार

4.समाजवादी समाजरचनेचे तत्व(Socialistic Pattern of Society) हे आर्थिक नितीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले. (या तत्वाचा प्रथम स्वीकार जानेवारी १९५५ मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात घेण्यात आला. अधिवनेशाचे

अध्यक्ष यु. एन. ढेबर हे होते.)

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:
1.भिलाई पोलाद प्रकल्पः रशियाच्या मदतीने (१९५९ मध्ये)

2.रूरकेला पोलाद प्रकल्पः प. जर्मनीच्या मदतीने (१९५९ मध्ये)

3.दुर्गापूर पोलाद प्रकल्पः ब्रिटनच्या मदतीने (१९६२ मध्ये)

4.BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.): 479100

5.दोन खत कारखानेः नानगल आणि रुरकेला

मूल्यमापन:
1.वाढीचा दर ४.२१ टक्के एवढा संपादित केला गेला.

2.पोलाद उद्योगाची विशेष वाढ.

3.सामाजिक क्षेत्रात, विशेषत: शिक्षण व आरोग्य सेवांत, विशेष वाढ.

4.समाजवादी समाजरचनेचे उद्दिष्ट्य गाठण्यात अपशय.

5.खालील प्रश्नांना सामोरे जावे लागलेः
i.सुवेझ कालव्याचा प्रश्न
ii.मोसमी पावसाची कमतरता
iii.परकीय चलनाच्या साठ्यातील घट

6.किंमतींचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.
__

उल्हास नदी

उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती १२२ किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. खोपोली, उल्हासनगर, ठाणे अशा महानगरांतून प्रदूषित होत पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या या नदीच्या मुखात साल्सेट बेटावर मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर वसलेले आहे.

उल्हास नदीचा उगम लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणात होतो. धरणापासून ३ कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील १४व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे. पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, कर्जत, नेरळ,कोदिवले, दहीवली,बिरदोले,शेळु ही प्रमुख गावे व शहरांतून वहात जाऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. ठाणे जिल्हयात वांगणी, बदलापूर, वसत, शहाड, मोहोने, कल्याण ही प्रमुख शहरे व गावे घेत पुढे शहाड येथे वालधुनी नदीला घेऊन दोन तीन किलोमीटर अंतरावर अटाळी येथे काळू नदीला मिळते व पूढे अरबी समुद्रास मिळते. उल्हास नदीला दिवा गावापासून पुढे वसईची खाडी असे म्हणतात.

कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशीर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरांत पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य Drainage System आहे.

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी: १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६

मुख्य भरः या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान: या योजनेसाठी हेरॉड-डोमर प्रतिमानाचा वापर करण्यात आला.

योजना खर्च:
प्रस्तावित खर्चः २३७८ कोटी रू. वास्तविक खर्च: १९६० कोटी रू.
योजनेचे उपनाव: पुनरुत्थान योजना

उद्दिष्टे :

1.दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे.

2.देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढविणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे.

3.अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावर नियंत्रण.

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:

1.दामोदर खोरे विकास योजना (दामोदर नदीच्या खोऱ्यात, झारखंड-प.बंगालमध्ये)

2.भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेशपंजाब मध्ये).

3.कोसी प्रकल्प (कोसी नदीवर, बिहारमध्ये).

4.हिराकूड योजना (महानदीवर, ओरिसामध्ये) (वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आली होती. ते बहुउद्देशिय प्रकल्प आहेत.)

5.सिंद्री (झारखंड) येथे खत कारखाना

6.चित्तरंजन (प.बंगाल) येथे रेल्वे इंजीनाचा कारखाना M.पेरांबूर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना

8.HMT कारखाना बँगलोर येथे स्थापन

9.हिंदुस्तान अँटीबायोटिक्स: पिंपरी, पुणे

10.१९५२ पासून ‘समुदाय विकास कार्यक्रम'ची सुरूवात

मुल्यमापन:

1.योजना जवळजवळ सर्व बाबतीत यशस्वी झाली. कारणेi) योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता. ii) योजनेची लक्ष्ये कमी होती.

2.अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१५२) ६५.८ दशलक्ष टनांपर्यंत (१९५५-५६) वाढले.

3.मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जाच्या पायाभूत सोयींना सुरुवात.

4.आर्थिक वाढीचा दर: संकल्पितः २.१%, साध्यः ३.६%

5.योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतींचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. (पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे, ज्यादरम्यान किंमतींचा निर्देशांक कमी झाली.)

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

शास्त्रीय उपकरणे व वापर

.           

स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

विद्यापीठ स्थापना

विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ
शहर   -  मुंबई
स्थापना - 18 जुलै 1857

विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
शहर - नागपूर
स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
शहर - गडचिरोली
स्थापना - 27 सप्टेंबर 2011

विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
शहर - मुंबई
स्थापना  - 1916

विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
शहर - पुणे
स्थापना - 1949

विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
शहर - औरंगाबाद
स्थापना - 23 ऑगस्ट 1958

विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर
शहर - कोल्हापूर
स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
शहर - अमरावती
स्थापना - 1 मे 1983

विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
शहर  - नाशिक
स्थापना - जुलै 1989

विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
शहर - जळगाव
स्थापना - 15 ऑगस्ट 1989

विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
शहर - नांदेड
स्थापना - 17 सप्टेंबर 1994

विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
शहर - सोलापूर
स्थापना - 1 ऑगस्ट 2004

महाराष्ट्रातील अभयारण्ये

नरनाळा - अकोला
टिपेश्वर -यवतमाळ 
येडशी रामलिंग - उस्मानाबाद
अनेर - धुळे, नंदुरबार
अंधेरी - चंद्रपूर

औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - नांदेड,यवतमाळ

कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चपराला - गडचिरोली

जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर

पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे

मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती

यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी

महात्मा गांधी - राजघाट

जवाहरलाल नेहरू - शांतीवन

लालबहादूर शास्त्री - विजय घाट

इंदिरा गांधी - शक्ती स्थळ

बाबू जगजीवन राम - समता स्थळ

चौधरी चरण सिंग - किसान घाट

राजीव गांधी - वीरभूमी

ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ

चंद्रशेखर - जननायक

आय. के. गुजराल - स्मृती स्थळ

अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल

के. आर. नारायण - उदय भूमी

मोरारजी देसाई - अभय घाट

शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी

गुलझारीलाल नंदा - नारायण घाट

डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

राज्यघटनेतील भाग

भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग दूसरा – नागरिकत्व
भाग तिसरा – मूलभूत हक्क
भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
भाग पाचवा – संघ
भाग सहावा – राज्य
भाग सातवा – रद्द
भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
भाग नववा – पंचायत
भाग नऊ ‘अ’ – महापालिका
भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
भाग पंधरावा – निवडणुका
भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
भाग सतरावा – भाषा
भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
भाग एकोणीसवा – संकीर्ण
भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
२) अकलेचा कांदा : मूर्ख
३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला
६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस
१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस
१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस
१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
२१) खडास्टक : भांडण
२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर
२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
२५) गंगा यमुना : अश्रू
२६) गंडांतर : भीतीदायक संकट
२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 
२८) गाढव : बेअकली माणूस
२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
३४) घोरपड : चिकाटी धरणारा
३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
३६) चालता काळ : वैभवाचा काळ
३७) चौदावे रत्न : मार
३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
४१) ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
४२) थंडा फराळ : उपवास
४३) दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
४४) दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
४५) देवमाणूस : साधाभोळा माणूस
४६) धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
४७) धोपट मार्ग : सरळ मार्ग
४८) नवकोट नारायण : खूप श्रीमंत
४९) नंदीबैल : मंदबुद्धीचा
५०) पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
५१) पाताळयंत्री : कारस्तान करणारा
५२) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
५३) पिकले पान : म्हातारा मनुष्य
५४) बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
५५) बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
५६) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
५७) भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
५८) भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
५९) भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
६०) मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
७०) मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
७१) मृगजळ : केवळ अभास
७२) मेषपात्र : बावळट मनुष्य
७३) रुपेरी बेडी : चाकरी
७४) लंबकर्ण : बेअकली / बेअकल
७५) वाटण्याच्या अक्षता : नकार
७६) वाहती गंगा : आलेली संधी
७७) शकुनी मामा : कपटी मनुष्य
७८) सिकंदर : भाग्यवान
७९) सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
८०) शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
८१) श्रीगणेशा : आरंभ करणे
८२) सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
८३) स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
८४) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
८५) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
८६) सूर्यवंशी उशिरा उठणारा
८७) सोन्याचे दिवस : चांगले दिवस
८८) रामबाण औषध : अचूक गुणकारी       

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...