Friday, 30 September 2022

हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2022

पासपोर्टची जागतिक क्रमवारी जारी करणाऱ्या हेन्ली अँड पार्टनर्स या कंपनीने 2022 ची पासपोर्ट क्रमवारी जानेवारी 2022 मध्ये जारी केली.

सध्याची क्रमवारी 2022 च्या पहिल्या तिमाहीसाठी आहे.

क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा जपान आणि सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले. या देशांतील नागरिक 192 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

भारताच्या क्रमवारीमध्ये 7 स्थानांची सुधारणा झाली.

2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या स्थानी होता, तो आता 2022 मध्ये 83 व्या स्थानी आहे.

आता भारतीय नागरिक 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय विदेश दौरा करू शकतात. यावर्षी ओमान आणि आर्मेनिया या देशांमध्ये पासपोर्ट शिवाय भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.

पहिले तीन स्थान
1) जपान, सिंगापूर
2) जर्मनी, दक्षिण कोरिया
3)फिनलँड इटली, लक्झेंबर्ग, स्पेन

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...