Tuesday, 25 April 2023

Combine पूर्व 2023 बद्दल थोडक्यात...

एक गोष्ट लक्षात घ्या  Combine पूर्व 30 एप्रिल रोजी होणारी ही exam शांततेची  आहे असं मला वाटत ... कारण अभ्यास असतो‌‌ त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांवरती सुद्धा खूप काम केलेलं असतं पण नेमकं पेपर च्या दिवशी एका तासाचं management कूठे तरी कमी पडतं आणि होतं काय तर घाईघाईने सोपे प्रश्न चूकणे,math+ reasoning ला वेळ न पुरने..अशा समस्या निर्माण होतात...

त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्हाला स्वत:ला जे कोणते Subject सोपे जातात त्या Subject पासून पेपर Solve करण्यास चालू करा ...म्हणजे काय तर सोपे विषय अगोदर घेतल्यास तुमचा Confidence level high होईल आणि जवळपास out off marks मिळतील. बाकी तुम्हाला स्वत:ला ज्या Subject ची थोडीशी Back of the mind कुठेतरी भीती आहे ती भीती देखील दूर होईल आणि अशा विषयांमध्ये देखील तूफान marks मिळतील...

शेवटच्या काळात Factual गोष्टी वारंवार बघा ..‌.या काळात झोप व्यवस्थित घ्या कारण इथून पुढे रात्र दिवस अभ्यास करणे योग्य नाही...अशाने तुमचा मेंदू परीक्षेच्या दिवशी 💯 Confidance ने काम करणे अपेक्षित नाही...त्याच्यामुळे परिपूर्ण झोप या शेवटच्या दिवसात खूप महत्वाची आहे.

एकंदरीत विचार केल्यास ही परीक्षा तुमच्या Confidence ची आहे हे लक्षात ठेवा... शेवटच्या प्रश्नांपर्यत जो Confidance ने लढेल त्याचा विजय 💯 होणार.

खूप खूप शुभेच्छा 💐💐

Tuesday, 18 April 2023

Combine पूर्व 30 एप्रिलच्या दृष्टीकोनातून पुढील 11 ते 12 दिवस....


1. सर्वात महत्वाचे नवीन काहीच वाचू नका.

2. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा.

3. इथून पुढे 30 एप्रिल पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(fous point )

4. पाठीमागील पेपर मध्ये केलेल्या चूकांवर काम.

5. Combine group B आणि group C चे 2020,2021 आणि 2022 सतत Solve करा.

6. दररोज दिवसातून 10 वेळस तरी वरील सर्व पेपरचे बारकाईने स्वतः Analysis करा.

7.  Elemination method आणि Logic या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत.

8. Elemination ने तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते पण logic ने तुमचा प्रश्न चूकण्याची शक्यता जास्त असते..

9. कोणतीही एखादी method use करताना विचारपूर्वक use करा ... शक्यतो logic वाचण्यात न आलेल्या प्रश्नांनाच  apply करा..(प्रत्येक प्रश्नाला Logic इथे Combine ला जास्त उपयोगी ठरत नाही).

10.आपली exam Combine पूर्व ची आहे... त्याच्यामुळे One liner प्रश्नात marks गेले नाही पाहिजेत.

11. Current घ्या बाबतीत इथून पुढे आयोगाच्या Selective Points वरती Focus करा.

12. इथून पुढे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन Quick revision अपेक्षित आहेत.(Focus area)

13. जूने लोकं इथून पुढे तुम्हाला खूप काहीही सूचत असतं ( हा शेवटचा Chance आहे..या वेळी तरी होईल का माझं..) एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc मध्ये फक्त मनगटात धमक लागते ... बाकी माझा तरी इतर कारणांवरती विश्वास नाही..

14. शेवटी आयोगाचा पूर्व चा कोणताही पेपर हा  syllabus आणि exam चा विचार करूनच सेट होत असतो हे इथे लक्षात घ्या.

15. जास्त Form आले म्हणून राज्यसेवा पूर्व सारखा पेपर येणे अपेक्षित आहे का तर कधीच नाही... त्याच्यामुळे आपल्याला एक तास वेळ आणि त्या एका तासाच्या दृष्टिकोनातूनच पेपर सेट होत असतो.

16. म्हणून कितीही अर्ज आले तरी चमकणारे हिरे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

__ इथून पुढे एकदम शांततेत स्वतःच काम करा Best Luck 💐💐❤️

Monday, 17 April 2023

Combine पूर्व ची घोडदौड...


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,


 ✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.


✳️ परत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.

 त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.

 कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.

 बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.

  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

 जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.

 जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.


✳️ तयामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.

 माझ्या माहितीप्रमाणे,

 पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत

 जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.

 इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत

 आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.


 1. राज्यशास्त्र-

 राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे

 पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.

 राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.

 एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.

 मग काही जणांना अडचण वाटते

 त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.

 यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे

 कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात

 उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या

 राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.

 ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे

 जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल

 निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.


 2.भूगोल-

 कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.

 हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे. 

 स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत

 आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.

 ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.


 3.अर्थशास्त्र-

 यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.

 अर्थशास्त्राच्या संदर्भात  मागील एक पोस्ट शेअर केली होती

 ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.


 4.विज्ञान-

 इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते. 

 साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.

 कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.

 जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..

 बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.

 तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.

 त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.

इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..


 5. इतिहास-

 सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.

 पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.

 तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.

 इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.

 त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.


 6. चालू घडामोडी-

 यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.

 वारंवार रिव्हिजन करणे.

 आणि पाठांतर करणे.

 कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे

 दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.


अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

अर्थशास्त्र (Combined व पोलीस भरतीसाठी उपयुक्त)

Q1) पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ?
1) प्राप्ती कर    
2) उत्पादन शुल्क
3) शेती उत्पन्नावरील कर✅
4) वरीलपैकी कोणताही नाही

Q2) भांडवली निधीमध्ये (महसूलामध्ये) ‘कर्ज आणि इतर जोखीम’ काय दर्शविते ?
1) रिझर्व्ह बँकेकडे असलेले सरकारी “ॲड हॉक” कर्जरोखे
2) नाणे बाजारातील 100 दिवसांचे सरकारी कर्ज रोखे.
3) लोकांना देय असलेली सरकारी देयता✅
4) वरीलपैकी नाही

Q3) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का –
1) सतत घसरला✅  
2) अचल राहिला
3) सातत्याने वाढला
4) कुठलाही स्पष्ट आलेख (trend) नाही.

Q4) सन 2009-2010 मध्ये एकूण महसूलातील केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नाचा वाटा  ........................  होता.
1) 75.6 टक्के 
2) 66.3 टक्के
3) 80.6 टक्के ✅
4) वरीलपैकी नाही

Q5) सन 2009-2010 मध्ये भारतातील महसुली तुट किती होती ?
1) जी.डी.पी. च्या 5.1%
2) जी.डी.पी. च्या 2.5%
3) जी.डी.पी. च्या 6.1%   
4) वरीलपैकी नाही✅

Q6) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ......... साली झाली.
1) 1935✅
2) 1920
3) 1947
4) 1950

Q7) उत्पादनाचे घटक .......... हे आहेत.
1) जमीन, कामगार आणी भांडवल✅
2) व्याज आणि पगार
3) शासकीय आर्थिक धोरणे
4) यांपैकी कोणतेही नाही

Q8) क्षेत्रीय ग्रामीण बँक ....... ह्या वर्षी सुरू करण्यात आली.
1) 1980
2) 1975✅
3) 1985
4) 1990

Q9) विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडत ?
1) सहकारी बँक
2) भारतीय रिझर्व्ह बँक✅
3) परकीय चलन विभाग
4) वरीलपैकी काहीही नाही

Q10) भारतीय 2000 रुपयांच्या नोटवर कोणाची सही आढळते ?
1) भारताचे अर्थमंत्री
2) अर्थमंत्रालयाचे सचिव
3) आर.बी.आय. चे गव्हर्नर✅
4) भारताचे राष्ट्रपती
-------------------------

शेवटचे 12 दिवस 📖 काय करावं ? काय वाचावं ?

जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 करमानुसार 


1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा.  राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क,  कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा.


2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा. 

भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे, 

भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण,  जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात.


3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी,  लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ,  वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा.


4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2022 ते एप्रिल 2023 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा.

त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला. 

राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा. 

Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता .


5) विज्ञान  : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो,  त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत,  बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं.


6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म,  मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया,  गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख  इ.  , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव, 

शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या) 


7) पर्यावरण  : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात,  Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर  बऱ्याचदा प्रश्न असतो,  

यावेळेस रामसर करार- स्थळे  व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.


PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल.


आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका. 




सर्वाना ALL THE BEST ✌️

⭕️Combine पुर्व 2021 इथून पुढील 14 दिवसांचे नियोजन आणि बरंच काही..

आता आपण पुढील 14 दिवसाचे नियोजन काय आणि कस करता येईल याविषयीं सविस्तर चर्चा करू.

1. पुढच्या 14 दिवसात प्रत्येक विषयांचे 1 चांगले Revision आणि शेवटी 1 fast Revision व्हायला हव. बघुयात सविस्तर..

2. साधारणता 14 दिवसांचे नियोजन 2 टप्प्यात केलं तर better राहील. पुढील 10 दिवसात इतिहास, भूगोल, Polity, Economy आणि Science या प्रत्येक विषयाला साधारण 2 दिवस असे 5 विषयांना एकूण 10 दिवस. याप्रमाणे आपली पुढील 10 दिवसात सर्व विषयांची 1 मस्त Revision झाली पाहिजेत.

3.आता तुम्हाला वाटेल आपली पाचच विषयांची Revision झाली. पण एक लक्षात घ्या Current आणि Math Reasoning ला इथून पुढील दिवसांमध्ये वेळ न देता तासांमध्ये वेळ द्या. म्हणजे तुम्ही Dailly 12 तास अभ्यास केला तर किमान 3 तास या विषयांना तुम्ही द्यायला हवेत.
Current आणि Math Reasoning हे Cutoff मध्ये deciding factors असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको.

4. आता तुमचे पहिल्या 10 दिवसात पहिले Revision होईल. अजून तुमच्याकडे 4 दिवस आहेत. यामध्ये प्रत्येक विषयच Revision करणं शक्य होणार नाही. त्याऐवजी, तुम्ही तुम्हाला weak वाटणारे विषय किंवा त्यामधील तुम्हाला weak वाटणारे उपघटक निवडून त्याची Revision  करू शकता. उदा. इतिहासात तुम्ही समाजसुधारक, Polity मध्ये Imp articles, सुची, परिशिष्ट्ये इ. वाचू शकता. तसेच Economy मध्ये लोकसंख्येची आकडेवारी तुम्ही पाठ करू शकता.

अशा प्रकारे शेवटच्या 4-5 दिवसात तुम्हाला येत असलेल्या गोष्टी Skip करून ( कारण तुम्हाला येणाऱ्या गोष्टी कधीही येणारच आहेत.)ज्या गोष्टी चुकु शकतात किंवा ज्याची revision करण्याची गरज आहे त्यावरतीच focus करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त Output मिळेल.

वरील नियोजन जसेच्या तसे follow करावे असे काही नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बदल करू शकता. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की पुढील 14 दिवसात आपला Comprehensive अभ्यास होणं अपेक्षित आहे.

♦️यासोबतच खालील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.

1. Reading तर आपण करणारच आहोत    पण पुढच्या 14 दिवसांनमध्ये तुम्ही आयोगाचे खूप सारे PYQ नक्की बघा. फक्त PYQ Analysis करताना ते स्पष्टीकरण वाचण्यापेक्षा तो प्रश्न कोणत्या उपघटकावर आला आहे, या वर्षी कोणत्या उपघटकावर ते प्रश्न विचारू शकतात, तसेच तो प्रश्न अजून दुसऱ्या कोणत्या मार्गाने solve करता येऊ शकतो का??
अश्या सर्व पद्धतीने PYQ Analysis झालं पाहिजेत.

2. जे घटक तुम्हाला अवघड वाटतात त्या घटकांचे pyq चांगले करा. म्हणजे Reading कमी झालं तरी Marks येतील.

3. आता Revision करताना जास्त Detail मध्ये करण्याची वेळ राहिली नाही so आपला फोकस हा Fact वरती हवा. म्हणजे आपली परीक्षा पण Factual आहे so तो approach कायम डोक्यात असू द्या.

4. तुमचे कमीत कमी 5 Test Papers तरी सोडवून झालं असतील. आता इथून पुढे जास्त Test Papers Solve करण्यात Point नाही पण तरी तुम्हांला Time management साठी शक्य असल्यास अजूनही 3-4 Test Papers सोडवण संयुक्तीक असेल. पण जास्त test Papers च्या पाठीमागे लागण्यात काहीही Point नाही कारण आपल्याला आयोगाला marks पाडायचे आहे test papers ला नाहीत. So फक्त Time management म्हूणन त्या गोष्टींकडे बघा.

5. Combine पुर्व ही अभ्यासाएव्हडीच वेळेच्या आणि झालेल्या अभ्यासाच्या नियोजनाची परीक्षा आहे. So Actual exam मध्ये वेळेच्या नियोजनाचे नियोजन आतापासूनच डोक्यात असू द्या. Actual Paper मध्ये होणाऱ्या Silly mistakes कश्या कमी करता येतील यादृष्टीने पुढील दिवसांमध्ये काम होणं अपेक्षित आहे..

6. तुम्ही सर्वजण नक्कीच परीक्षा पास होणार आहात. जशी जशी परीक्षा जवळ येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढला पाहिजेत. स्वतः च्या प्रामाणिक कष्टावरती विश्वास ठेवा यश आपलेच आहे.

सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

Sunday, 16 April 2023

चालू घडामोडी प्रश्नसराव

(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम .

(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- 20 फेब्रुवारी .

(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- *तिरंदाजी.

(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर .

(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- 23 मार्च .

(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस .

(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Wednesday, 5 April 2023

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?

कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट

आंबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

क्लूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

MCQ effectively कसे Solve कराल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवाल?



आपण या Series च्या भाग 1 मध्ये पुस्तकं कसे वाचावे आणि Pyq चे analysis कस करावे? याविषयी माहिती पाहिली होती. आजच्या भाग 2 मध्ये आपण केलेल्या वाचनाचे परीक्षेत Reflection कसे मिळवावे?अभ्यासाचे Consolidation कसे करावे? Out of Box प्रश्नांना कशा पद्धतीने सामोरे जावे याविषयी माहिती बघुयात.


 यावर्षी कधी नव्हे ते सर्व पदांसाठी ऍड आल्या आहेत.2022 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी एक सुवर्ण वर्ष ठरणार आहे.त्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागणार आहे आणि ते ही पुर्ण तयारीनिशी.


करूया सुरवात..


♦️आपण करत असलेला अभ्यास आणि त्याचे परीक्षेतील प्रतिबिंब -


बऱ्याच मुलांची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे मी अभ्यास खूप करतो/करते पण परीक्षेमध्ये मार्क मिळत नाहीत. त्यासाठी नक्की काय कराव. मला असं वाटतं की आपण फक्त Books वाचत राहतो. ते परीक्षेसाठी किती महत्त्वाच आहे? एखादा टॉपिक आणि त्या टॉपिक मधील कोणता सबटॉपिक  महत्त्वाचा आहे हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळे फर्स्ट टू लास्ट पेज आपण पुस्तक वाचत राहतो. आणि इथेच आपली खूप मोठी चूक होते. परीक्षेला नक्की काय विचारतात हेच आपल्याला समजलेल नसतं. ते समजण्यासाठी  सगळ्यात महत्त्वाचा Mirror  म्हणजे Previous Year Question Papers. ते पाहूनच आपण पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे. त्यानीच आपल्या वाचनामध्ये Specificity येण्यास मदत होईल. अन्यथा आपले गाढवकाम हे वर्षानुवर्ष सुरूच राहील.

परीक्षेमध्ये अभ्यासाचा reflection न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण अभ्यासाचा घेतलेला अतिरिक्त ताण आणि काही झालं तरी पास व्हायचंच आहे अशी आपली तयार झालेली मानसिकता. मला देखील याचा अनुभव आहे. पण हे खूप धोकादायक आहे त्याऐवजी सकारात्मक विचार, अभ्यासातील सातत्य, Pass होण्याची कोणतीही भीती मनात नसणे इ. गोष्टींकडे आपण आपला Focus वळवला तर ते आपल्याला 100% फायद्याचं ठरेलं.


♦️दसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासाचे Consolidation (दृढीकरण ).


आपण वाचत असलेला Content हा खूप Fragmented स्वरूपात असतो.त्याला एका ठिकाणी गोळा करावे लागते. त्यासाठी लिमिटेड Sources आणि त्याच्या Maximum Revisions हाच रामबाण उपाय आहे.त्यामुळेच सर्व Toppers सांगत असतात की References Limited ठेवा त्याच्याच वारंवार revisions करा.ते अगदी बरोबर आहे.कारण आपण References ला जेवढे limited राहू तितका आपला अभ्यास Perfect होतो आणि डोक्यामध्ये Content च mixture होत नाही.उदा. आपण Combine/ Rajyaseva Mains साठी इंग्लिश विषयाला Vocabulary करत असतात pal & suri, Bakshi सर, बाळासाहेब शिंदे सर, कोणत्याही class चा Vocab ची notes इ. Data वाचत असतो. पण मला तुम्ही सांगा आपण जर एवढे सगळे sources वाचले तर आपल कोणतेही Vocab नीट होणार नाही आणि revision ला पण वेळ भेटणार नाही. थोडक्यात आपण वर mention केलेल्या sources पैकी कोणताही एकच source Vocab साठी वापरावा आणि त्याच्याच जास्तीत जास्त revisions कराव्यात. हीच गोष्ट आपल्याला प्रत्येक विषयाला आणि त्या विषयातील Subtopics ला लागू करायची आहे.


♦️तिसरा महत्वाचा मुद्दा येतो Out of Box प्रश्न कसे सोडवायचे?


मित्रांनो बघा, त्यासाठी आपल्याला खूप जास्त वाचन करण्याची गरज नाही. Exam Hall मध्ये आपली सदसदविवेकबुद्धी जागृत असली तरी बरेच प्रश्न सुटू शकतात.आणखी काही बाबी म्हणजे आयोगाची प्रश्न विचारण्याची भाषा(आयोगाने प्रश्नामध्ये उद्दिष्ट विचारल्यावर एकच उद्दिष्ट असत. आणि उद्दिष्टे विचारल्यावर एकापेक्षा जास्त उद्दिष्टे असतात. त्यावरून पर्यायकडे गेलो की आपण खूप लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.आयोगाच्या प्रश्नामधील काही tricks (उदा. एखादा पर्याय लांब असेल तर शक्यतो ते Answer राहते.),आयोगाचा प्रश्न समोर आल्यानंतर त्याच उत्तर काय असू शकत याचा आपला develope झालेला एक Common sense(उदा.आयोगाने a, b, c अशी तीन वाक्ये दिली आणि पर्यायामध्ये ab, bc, ac आणि all of the above असं दिल तर आयोग यामधील नेमक कोणत उत्तर ठेवत आहे, चुकवलं तर कुठे चुकवत आहे हे तुम्ही बारकाईने Pyq मधून बघून घ्या)इ. गोष्टी खूप मॅटर करतात.  

उदा.2017 च्या MPSC Mains मध्ये असा प्रश्न आला होता की भारतीय पायाभूत सुविधा महामंडळ मर्यादित कंपनी हे अल्प मुदतीचे कर्ज देते. तर हे विधान बरोबर असूच शकत नाही. कारण पायाभूत विकासाची कामे दीर्घ कालावधीसाठी असतात. तर त्यासाठी स्थापन झालेली कंपनी अल्प मुदतीचे कर्ज कसे देऊ शकते? अशा पद्धतीने तो पर्याय eliminate झाला की आपण थेट उत्तरापर्यंत पोहोचतो.                                  आजच्यापुरत एवढंच.


यातील पुढील भागात आपण एक नवीन विषय घेऊन त्या अनुषंगाने चर्चा करूयात.

धन्यवाद.


भूकंप लहरी :



» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे म्हणतात.


■ नाभी (Focus) : 

» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.


■ अधीकेंद्र (Epicentre) : 

» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.


■ भूकंप अधिलेख (Seismogram) :-  

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


भूकंप लहरींचे प्रकार :- 

■ प्राथमिक लहरी (P waves) : 

» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. 

» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 

» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. 

» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 

» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 

» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. 

» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 

» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 

» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. 

» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. 

» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 

» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

_____________________

■ रिश्टर स्केल (Richter Scale) : 

» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.


■ भूकंपाचे जागतिक वितरण 

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 

» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. 

» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. 

» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. 

» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 

» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 

» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. 

» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 

» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.


एल निनो म्हणजे काय?

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आलेल्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट या काळात 'एल निनो'ची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे. भारतात जून ते ऑगस्ट या काळात जवळपास 60 टक्के एल निनो परतण्याचा संस्थेचा अंदाज आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) कडून प्राप्त माहितीनुसार हवामानाची जी सध्याची स्थिती आहे, त्यावरून असे दिसून येते की कमकुवत एल निनोच्या संदर्भात इशारा करीत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात आणि मेच्या शेवटपर्यंत याबाबत स्पष्टता मिळणार. तेव्हाच पावसावरील त्याच्या प्रभावाबाबत स्पष्टता दिली जाऊ शकणार.


▪️एल निनो म्हणजे काय?


डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात.


एल निनो प्रशांत महासागरात तयार होणारा एक जलवायू चक्र आहे, ज्याचा प्रभाव जगभरातल्या हवामानावर पडतो. हा चक्र तेव्हाच सुरू होतो जेव्हा पश्चिम उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या तटाकडे भूमध्य सीमेबरोबर पूर्वेकडे प्रवाहीत होतो.


‘एल-निनो’ परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनापट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस किलोमिटर क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. 


परंतु तापमान एक ते दीड अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. एल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सियसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रुपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो.


हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे एल-निनो आल्यास मोसमी पाऊस भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत कमी पडतो वा पडतही नाही. हा एल-निनो दरवर्षी येतोच असे नाही.


2017 साली निधन पावलेले हवामानशास्त्रज्ञ देव राज सिक्का यांनी 1982 साली पहिल्यांदा एल निनो घटना आणि भारतीय मान्सून यादरम्यान असलेला संबंध प्रस्तावित केला होता.


▪️एल निनोचा प्रभाव :-


विकसनशील देश हे शेती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत. ज्या देशांच्या सीमा प्रशांत महासागराला जोडलेल्या आहेत, तेथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याचे अनुभव आतापर्यंत आले आहेत.


गेल्या काही वर्षांत एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगात आणि मार्गात बदल होत आहे आणि त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडू लागल्यामुळे बऱ्याच देशात दुष्काळसदृश्य तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना दिसून आली आहे. 


▪️एल निनोची लक्षणे :-


अभ्यासानुसार, प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सतत तीन महिने 0.5 अंश सेल्सियस ते 0.9 सेल्सियसपर्यंत वाढल्यासच एल निनोचा प्रभाव दिसून येतो.


हिंदी महासागराच्या पाण्याचा पृष्ठभाग, तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील हवेच्या दाबात वाढ होणे. ताहिती, मध्य पूर्व प्रशांत महासागराच्या भागावरील हवेचा दाब कमी होणे.  दक्षिण प्रशांत महासागराच्या भागातील ‘ट्रेड विन्डस्‘ म्हणजेच विषुववृत्तीय भागातून वाहणारे वारे कमकुवत असणे आणि त्यांची दिशा पूर्वेकडे असणे.  


पश्चिम प्रशांत महासागरातले आणि हिंदी महासागरातले उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे पसरणे. त्याचा परिणाम पश्चिम प्रशांत महासागराजवळच्या भागात दुष्काळ आणि कोरड्या पूर्व प्रशांत महासागराच्या भागात पाऊस असा होतो. अश्या अनेक लक्षणांवरून याबाबत निश्चिती करण्यात येते.


उष्ण कटिबंधातील पूर्व मध्य प्रशांत महासागरात सातत्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने सातत्याने ‘एल निनो’साठी प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यातूनच प्रशांत महासागराकडून वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा वेग कमी होतो. त्याचाच परिणाम पूर्वेकडील उत्तर भागातल्या ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस होतो. प्रामुख्याने भारत, स्वीडन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान या देशांवर परिणाम होतो.

विज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न



1: - स्नायूंमध्ये कोणते ऍसिड साचल्याने थकवा जाणवतो?

उत्तर: - लॅक्टिक ऍसिड


२: - द्राक्षात कोणते आम्ल आढळते?

उत्तर: - टार्टरिक ऍसिड


3: - कर्करोगाशी संबंधित आजारांचा अभ्यास म्हणतात

उत्तर: -ऑरगेनोलॉजी


4: - मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे?

उत्तर: - मज्जातंतूचा पेशी


5 .: - दात प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात?

उत्तर: - डेन्टाईनचे


6.: - कोणत्या जंतूंचा आकार पायातील चप्पल प्रमाणे असतो?

उत्तर: - पॅरामेटीयम


7: - गांडुळात किती डोळे आहेत?

उत्तर: - एकटा नाही


8: - गाजर कोणत्या व्हिटॅमिनचे समृद्ध स्रोत आहे?

उत्तर: - व्हिटॅमिन ए


9: - प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये आढळत नाही?

उत्तर: - तांदूळ


10.: - मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम आहेत?

उत्तर 1350 ग्रॅम

साधारण विधेयक आणि धनविधेयक यांचा तुलनात्मक अभ्यास

🔴 साधारण विधेयक

▪️साधारण विधेयकाची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येते.

▪️कोणताही सदस्य असे विधेयक मांडू शकतो.

▪️राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीशिवाय मांडता येते.

▪️राज्यसभा यात बदल करू शकते किंवा फेटाळू शकते.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने असे विधेयक रोखून धरू शकते. -

▪️लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेत पाठवण्यासाठी अध्यक्ष्यांच्या सहीची गरज नसते.

▪️दोन्ही सभागृहांत असहमती झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात

▪️मंत्र्याने लोकसभेत मांडलेले साधारण विधेयक अस्वीकृत झाल्यास/ सरकारचा मतदानात पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी सदस्याच्या विधेयकाच्या बाबतीत असे झाल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागत नाही.

▪️राष्ट्रपती असे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.

🔵धन विधेयक

▪️सुरुवात फक्त लोकसभेत करता येते.

▪️फक्त मंत्रीच मांडू शकतो.

▪️फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच मांडता येते.

▪️राज्यसभेला फक्त बदल सुचवण्याचा हक्क आहे.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस धन विधेयक रोखून धरू शकते.

▪️लोकसभेने पास केलेल्या धनविधेयकावर अध्यक्षांची सही असणे गरजेचे असते.

▪️असहमती झाल्यास लोकसभेने स्वीकारलेल्या स्वरुपातच विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्याचे मानले जाते. यावर संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

▪️लोकसभेने नामंजूर झाल्यास सरकार राजीनामा देते.

▪️राष्ट्रपती अस्वीकृत करू शकतात पण पुन्हा विचार करण्यासाठी परत पाठवू शकत नाही.
════════════════

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


स्पर्धा परीक्षा - इतिहास विषय तयारी

*| Competitive Exams*

● मुळात इतिहास हा विषय आवडीने अभ्यास करण्याचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना यातील वंशावळी, सणावळी याची अकारण भीती वाटते. इतिहास विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पद्धतशीरपणे केली तर काहीच कठीण नाही. 


● प्रामुख्याने इतिहास विषयाचे तीन भाग पडतात. प्रथम म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास व तिसरा म्हणजे अर्वाचीन इतिहास. यातही आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग एमपीएससी वा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावाच लागेल.

इतिहास अभ्यासाची पूर्वतयारी करताना त्याला प्रामुख्याने तीन भागात विभागून अभ्यास करणे सोईचे होईल. 


● प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हटला तर अगदी सिंध संस्कृतीच्या इतिहास पासून सुरुवात करून वैदिक युग, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, मगध राज्य, मौर्य साम्राज्य त्यानंतरची राजवंश जसे कण्व, कुपाल, गुप्त साम्राज्य, हुण, राजपूत, गुर्जर, प्रतिहार, कनौज, पाल, येथपर्यंतचा कालावधी सर्व तपशीलवार अभ्यासणे आलेच. या सर्वांच्या काळातील वैशिष्ट्ये, सणावळी लक्षात ठेवणे जिकरीचे काम तर आहेच; सोबतच कठीण आहे. 


● पण त्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंतची इतिहासाची पुस्तके फारच उपयोगी पडतात. एनसीईआरटी व राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वाचावी लागतील. त्यातून स्वत:ची टिपणे काढावीत व स्वतंत्र वहीत लिहून ठेवावीत. हीच बाब मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. 


● मध्ययुगीन इतिहास म्हटला तर सुुलतान घराण्यापासून तर खिलजी, तुघलक, लोधी, मुगल साम्राज्यातील बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेबपर्यंतचा तपशीलवार इतिहास अभ्यासावा लागेल, तर अर्वाचीन इतिहासासाठी 1850 च्या उठावापासून तर स्वातंत्र्यापर्यंत व स्वातंत्र्योत्तर काळातील अगदी आतापर्यंतच्या घटनांचा अभ्यासही करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे इतिहासाची विभागणी करून पूर्वतयारी होण्यात मदत होते.

पंचायत राज संदर्भातील समित्या



1) व्ही आर राव (1960)

🔴विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती


2) एस डी मिश्रा (1961)

🔵विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था


3) व्ही ईश्वरण (1961)

🟣विषय - पंचायत राज प्रशासन


4) जी आर राजगोपाल (1962)

🟠विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट


5) आर आर दिवाकर (1963)

🟢विषय - ग्रामसभेसंदर्भात 


6) एम राजा रामकृष्णय्या (1963)

🟡विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट


7) के संथानम (1963)

🟤विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट


8) के संथानम (1965) 

🟣विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात


9) आर के खन्ना (1965)

⚫️विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट


10) जी रामचंद्रन (1966) 

⚪️विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात


11) श्रीमती दया चोबे (1976)

🔴विषय - समुदाय विकास आणि पंचायत

बलवंतराय मेहता अभ्यास गट

📌स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिली पंचवार्षिक योजना अमलांत आली. शेतकऱ्यांचा आणि खेड्यांतील इतर लोकांचा विकास करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. लोकांचा सहभाग व्यामध्ये अपेक्षित होता पण या योगानेला म्हणावा तसा लोकसहभाग मिळाला नाही. या कामाची पाहणी करण्यासाठी नियोजन मंडळाने बलवंतराय मेहतांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमला.

📌या अभ्यास गटाने आपला अहवाल १९५७ साली सदर केला. त्यामध्ये पंच्यात राज्याची संकल्पना दिशा आणि रचनेच्या दूरगामी व अमुलाग्र बदलासाठी शिफारशी करण्यात आल्या. आणि प्रथमच लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पंचायत राज्याची संकल्पना मांडण्यात आली. राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची योजना आखली.

📌२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

🌸पंचायत राज व्यवस्थेचा आढावा🌸

📌पंचायत राज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या समित्या वेळोवेळी स्थापन करण्यात आल्या. त्यात श्री. व्ही.टी.कृष्णम्माचारी यांच्या अध्यक्षतेखाली १९६० साली समिती नेमण्यात आली. या अभ्यासगटाने काही महत्वाच्या शिफारशी केल्या. कायदयाने ग्रामसभा प्रस्थापित कराव्या व त्यांच्या किमान दोन सभा व्हाव्यात ही महत्वाची शिफारस या अभ्यास गटाने केली.

📌१९७७ साली अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली. प्रतेक राज्यातील पंचायत राज व्यवस्था त्या त्या राज्याच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असू शकेल. आवश्यक वाटल्यास घटनेत दुरुस्ती करून पंचायत राज व्दारे लोकशाही विकेंद्रीकरण झाले पाहिजे असे मत या समितीने मांडले. १९८५ साली नियोजन मंडळाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मुलन कार्यक्रम परिणामकारक रितीने राबविला जावा म्हणून  श्री.जी.व्ही.के. राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीनेही लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून पंचायत राज व्यवस्थेला महात्वाचे स्थान असावे अशी शिफारस केली.

🌸महाराष्ट्रात पंचायतीराजचा अभ्यास🌸

📌महाराष्ट्र शासनानेही पंचायत राज व्यवस्थेच्या यशस्वी परिणामकारकतेसाठी वेळोवेळी अभ्यासगट व समित्यांची स्थापना केली. एस.जी.बर्वे समिती १९६८, बोगिरवार समिती, १९७०, मंत्रिमंडळाची उपसमिती, १९८०, आणि पंचायत राज व्यवस्थेचे मुल्यमापन करण्यासाठी १९८४ साली प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

📌या समितीने आपला अहवाल १९८६ साली सादर केला. ही सर्वात अलिकडील समिती असून त्यांच्या शिफारशीच्या आधारे राज्यशासन वेळोवेळी विचार करून दुरुस्त्या करीत आहे.

🌸एल.एम.सिंघवी समिती🌸

📌सन १९८४ च्या अखेरीस राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. त्यांच्या सरकारने पंचायत राज्य संस्थेला मजबूती प्रदान करण्याच्या उद्देशाने सन १९८६ च्या जून महिन्यात एल.एम.सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली “लोकशाही आणि विकास कामासाठी पंचायतीचे पुर्नजीवन करण्यासाठी समिती” ची नियुक्त केली.

📌पंचायत राज संस्थांची सध्याची स्थिती त्यांची आत्तापर्यंतची वाटचाल आणि विकास कार्यातील त्यांची भूमिका इत्यादीचे मुल्यमापन करण्याची तसेच ग्रामीण विकास व राष्ट्रबांधणीच्या कार्यात पंचायत राज्य संस्थांना भरीव योगदान कसे करता येईल या बाबत उपाय सुचविण्याची जबाबदारी सिंघवी समितीवर सोपविण्यात आली होती.

🌸घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस🌸

📌एल.एम.सिंघवी समितीच्या बऱ्याचशा शिफारशी यापुर्वीच्या काही समित्यांनी केलेल्या शिफारशी प्रमाणेच आहेत. तथापि सिंघवी समितीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारस केली ती म्हणजे “पंचायत राज संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक मान्यता व संरक्षण देण्यात यावे. त्याकरीता भारतीय राज्य घटनेत एक नवे प्रकरण समाविष्ट करण्यात यावे.”

📌सिंघवी समितीची ही शिफारस अत्यंत वैशिष्टयपूर्ण मानावी लागेल. भारतात पंचायत राज्याची स्थापना झाल्यानंतर राजकिय नेत्यांनी व राज्यकर्त्यांनी ग्रामीण पुर्नरचनेच्या तसेच ग्रामीण विकासाच्या कार्यात पंचायत राज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतील म्हणून त्यांना सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत अशा अर्थाचे मत प्रदर्शन केले. ७३ वी घटना दुरुस्ती करण्यामागे सिंघवी समितीच्या अहवालाचे फार मोते योगदान आहे असे म्हटल्यास त्यात वावगे काहीच नाही.

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...