Sunday 24 March 2024

चालू घडामोडी :- 23 मार्च 2024

◆ 1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार.(RBI ची स्थापना :- 1 एप्रिल 1935)


◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान देशाच्या 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पाहिले विदेशी व्यक्ती ठरले आहेत.


◆ बिहार राज्यात सुपौल जिल्ह्यात कोशी नदीवर देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे.


◆ बिहार राज्यात 10.2km लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे.


◆ इस्रो कडून भारताच्या पहिल्या पुष्पक या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे.


◆ इस्रो ने पुष्पक या अवकाश यानाची यशस्वी चाचणी कर्नाटक राज्यातील चीत्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे.


◆ हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन इंद्रावती' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


◆ भारत सरकारने हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सूरू केले आहे.


◆ खगोशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला 'शिव आणि शक्ती' नाव दिले आहे.


◆ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


◆ Google Deepmind या कंपनीने SIMA AI मॉडेल लाँच केले आहे.


◆ शांघाय ऑपरेशन ऑर्गायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन भारत या देशात करण्यात आले होते.


◆ इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी डॉ. नीरज मित्तल यांनी निवड झाली आहे.


◆ भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेश या राज्यात सूरू करण्यात आले आहे.


◆ उत्तर प्रदेश राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषीत केला आहे.


Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...