Saturday, 5 October 2019

विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

· विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

· लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.

· आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.

· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

· स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते.

· अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

· गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

I) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

II) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

(A) केवळ I✅✅✅
(B) केवळ II
(C) केवळ I आणि II
(D) सर्व बरोबर आहेत

📌सन 2020 मध्ये लखनऊमध्ये पहिल्यांदाच भरविण्यात येणार्‍या 11व्या ‘डिफेंस एक्सपो’ची संकल्पना काय आहे?

(A) इंडिया: द एमर्जिंग डिफेंस
मॅन्युफॅक्चरींग हब ✅✅✅

(B) इंडिया: द एमर्जिंग केस फॉर फ डिफेंस

(C) इंडिया: कनेक्टिंग द डिफेंस कम्युनिटी वीथ इनसाइट, इंटेलिजेंस अँड ऑपर्चुनिटीज

(D) इंडिया: द केस फॉर द डिफेंस इनोव्हेशन


📌‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकलेल्या राज्याचे नाव काय आहे?

(A) मिझोरम
(B) जम्मू व काश्मीर✅✅✅
(C) केरळ
(D) महाराष्ट्र

📌“इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) विलियम-अलेक्झांडर
(B) सौरभ कुमार
(C) मार्टेन व्हॅन डेन बर्ग
(D) वेणू राजामोनी✅✅✅

📌महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) पॅलेस्टाईन✅✅✅
(C) मॉरिशस
(D) दक्षिण आफ्रिका

📌पंजाब नॅशनल बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?

(A) सुनील मेहता
(B) सुशीलचंद्र मिश्रा
(C) सुनील मिश्रा
(D) एस. एस. मल्लिकार्जुन राव✅✅✅

📌स्टेशन स्वच्छता सर्वेक्षणाच्या अहवालासंदर्भात खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान अचूक आहे ते ओळखा.

I) जयपूर, जोधपूर आणि विजयवाडा ही तीन सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानके आहेत.

II) अंधेरी, विरार आणि नायगाव रेल्वे स्थानके ही 109 उपनगरी स्थानकांपैकी अव्वल ठरलेली तीन स्थानके आहेत.

(A) केवळ I
(B) केवळ II✅✅✅
(C) केवळ I आणि II
(D) एकही नाही

📌महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते _ मूल्य असलेले एक स्मारक नाणे जाहीर करण्यात आले.

(A) रु. 100
(B) रु. 50
(C) रु. 150✅✅✅
(D) रु. 200

📌पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणार्‍या राज्य सरकारचे नाव ओळखा.

(A) ओडिशा
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान✅✅✅
(D) पश्चिम बंगाल

1st- महाराष्ट्र
2nd-बिहार
3rd- राजस्थान

बंगालची फाळणी (1905)

📌.    लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 

📌.   बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले. 

📌.  बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. 

📌.  आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. 

📌.  टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले. 

📌. सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

जीडीपी वृद्धीदरात पुन्हा घटीचे अनुमान : आरबीआय

चालू आर्थिक वर्षातील आर्थिक वृद्धी दर (जीडीपी)पूर्वी निश्चित केलेल्या 6.9 टक्क्याहून दरात कपात करुन 6.1 टक्क्यांपर्यंत कमी  होण्याचे अनुमान रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)  नोंदवले आहे.

- या आर्थिक वर्षात 7.1 टक्के ठेवलेला होता. परंतु देशातील मंदीच्या फटक्यामुळे आलेल्या आर्थिक मरगळीतून सावरण्यासाठी सरकार वेगवेगळय़ा उपाय योजना करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

- उद्योगासह अन्य क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादन वाढ ,उत्पादन मागणीस येणारी तेजी आणि कृषी क्षेत्रातील  सुधारणा व रोजगारसह उत्पादन क्षेत्राला गती प्राप्त होणार असल्याचे अनुमान आरबीआयने मांडले आहे

रोहित शर्मा नवा सिक्सरकिंग २५ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

◾️टीम इंडियाचा 'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

◾️ रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

◾️रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.

◾️तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत

◾️याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.

◾️ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने आतापर्यंत ४ षटकार ठोकले आहेत.

◾️याबरोबरच तो एका कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.

◾️याआधी हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंह सिद्धूच्या नावावर होता.

◾️ सिद्धूने १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना एका डावात ८ षटकार ठोकले होते.

◾️याप्रमाणे रोहित शर्माने नवजोत सिंह सिद्धूचा २५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

तलाठी विशेष

१) सर्वनामाचा प्रकार ओळखा : पुस्तके कोणी नेली ? अ) पुरुषवाचक सर्वनाम ब) दर्शक सर्वनाम क) सामान्य सर्वनाम  ड) प्रश्नार्थक सर्वनाम ===========...