Saturday 5 October 2019

रोहित शर्मा नवा सिक्सरकिंग २५ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

◾️टीम इंडियाचा 'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

◾️ रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

◾️रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.

◾️तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत

◾️याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.

◾️ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने आतापर्यंत ४ षटकार ठोकले आहेत.

◾️याबरोबरच तो एका कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.

◾️याआधी हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंह सिद्धूच्या नावावर होता.

◾️ सिद्धूने १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना एका डावात ८ षटकार ठोकले होते.

◾️याप्रमाणे रोहित शर्माने नवजोत सिंह सिद्धूचा २५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...