05 October 2019

जागतिक अंतराळ सप्ताह २०१९

जगभरात दि. ४ ते १०  ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

२०१९  संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, उपग्रहांचे नमुने, चित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

▪️पार्श्वभूमी

दि. 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून ‘स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होता, तर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला. अंतराळाचा मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावा, हा उद्देश यामागे होता.

त्यामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले. सन 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.
—————————————————————--

No comments:

Post a Comment

Latest post

महत्त्वाचे ऑपरेशन 2025

1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी - 2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देश...