Thursday 9 May 2024

चालू घडामोडी :- 09 मे 2024

◆ भारतात दरवर्षी 9 मे रोजी ‘महाराणा प्रताप जयंती’ साजरी केली जाते.

◆ ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने जगभरात आपली कोविड-19 लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ चीनने जू फेहाँग यांची भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ Visa ने सुजाई रैनाची भारतात कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ स्कॉट फ्लेमिंग यांची भारतीय वरिष्ठ पुरुष बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अनिवासी नागरिकांकडून मायदेशात रक्कम पाठवण्यामध्ये भारत देशाचा प्रथम क्रमांक लागतो.

◆ राजस्थान मधील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक 46 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

◆ 12 ते 15 मे या कालावधीमध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा होणार आहेत.

◆ अमेरीका देशातील प्रसिद्ध दैनिक द न्युयॉर्क टाइम्स आणि वाशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला 2024 चा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ पुलित्झर पुरस्कार 2024 मध्ये "रॉयटर्स" वृतसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ पुलित्झर पुरस्कार दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो.

◆ गुगल कंपनीने भारत देशातील अँड्रॉइड वापरकर्त्या साठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे.

◆ सध्या जगभरातील 80 देशांमध्ये गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे.

◆ भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेट मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक-2 या सरावाचे आयोजन पंजाब राज्यात करण्यात आले आहे.

◆ आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कजाकिस्तान देशाने सर्वाधिक 48 पदके जिंकली आहेत.

◆ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन  BRO द्वारे हिमाचल प्रदेश आणि लडाख या ठिकाणा दरम्यान शिंकुन ला बोगदा तयार करण्यात येणार आहे.

◆ "हिदाला" चक्रीवादळ हे हिंदी महासागरात निर्माण झाले आहे.

◆ आयुष मंत्रालयाच्या निर्देशक म्हणून नियुक्त झालेले सुबोध कुमार हे 2010 बॅचचे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...