Saturday 10 December 2022

महत्त्वाचे प्रश्न

हळद संशोधन केंद्र कुठे आहे. . ?

👉🏻 सांगली 


 काजू संशोधन केंद्र कुठे आहे. . ?

👉🏻 सिंधूदुर्ग


 मध्यवर्ती कापूस केंद्र कुठे आहे.   ?

👉🏻  नागपूर 


 सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे. ?

👉🏻 शरीवर्धन (रायगड)


 नारळ संशोधन केंद्र कुठे आहे.  ?

👉🏻  भाट्ये (रत्नागिरी )


 केळी संशोधन केंद्र कुठे आहे.   ?

👉🏻  यावल (जळगाव)


 ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. ?

👉🏻  पाडेगाव (सातारा)


 तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे. . ?

👉🏻 जळगाव


 सावित्री नदी वर कोणत्या खाडीवर आहे.  ?

👉🏻 बाणकोट


 'ओशिवरी नदी' कोणत्या जिल्ह्यात आहे. ?


👉🏻  मबई 


 'काजवी नदी' कोणत्या जिल्ह्यात आहे.  . ?


👉🏻  रत्नागिरी 


 'भारजा नदी' कोणत्या जिल्ह्यात आहे.  ?


👉🏻 रत्नागिरी 


 'डोलावहळ धरण' कोणत्या जिल्ह्यात आहे .   ?

👉🏻 कडलिका



 'मोरबा धरण' कोणत्या नदीवर आहे. ?

👉🏻 पातळगंगा


 'मोडकसागर' धरण कोणत्या नदीवर आहे. ?

👉🏻  वतरणा


 'दुधगंगा' नदीचा उगमस्थळ कोठे होतो.     ?

👉🏻  भोलाकारवाडी


 'वारणा' नदीचा उगमस्थळ कोठे होतो.    ?


👉🏻  परचितगड


 'वाण नदी' कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

👉🏻 बीड


 'गोदावरी नदी' कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

👉🏻 नाशिक


 महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे.?

👉🏻 खोपोली

गोदावरी नदी

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.

◆ गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते.

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.

◆ गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता. 

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या दोनच (तेलंगणा चाही समावेश) राज्यांतुन वाहते.

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

इतिहास प्रश्नसंच

 1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले? 


A. चूरामन (चूड़ामणि) ✅

B. गोकुलसिंह

C. राजाराम

D. बदनसिंह

🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721) मुगलांबरोबर लढाई



2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते? 


A. जवाहरसिंह

B. सूरजमल ✅

C. नंंदराम

D. गोकुल सिंह

🔴जाटों का प्लेटों कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली




3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला? 


A. सूरजमल

B. अली बहादुर

C. बंदा बहादुर ✅

D. बदनसिंह


🔴गरु गोविंदसिंग यांची राजधानी होती लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर खालसा राज्य स्थापना



4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली? 


A. वजीर खां

B. फर्रुखसियर ✅

C. बहादुरशाह पहिला

D. यापैकी कोणी नाही

🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.


5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ? 


A. कर्नल स्लीमेन ✅

B. लॉर्ड एल्गिन

C. सर जॉन लॉरेंस

D. लॉर्ड मियो

🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.


प्रागैतीहासीक काळाचे (Protohistorical period) किती कालखंड पडतात?

A. तीन🎯

B. चार

C. पाच

D. दोन


स्पष्टीकरण

1) पुराणाश्म युग, हिमयुग (Paleolithic Age):- एक दशलक्ष वर्षापुर्वीपासून ते दहा हजार वर्षांपूर्वी पर्यंत. (उपप्रकार - तीन)

2) मध्याश्मयुग (mesolithic Age) :- १०,००० वर्षापुर्वीपासून ते ८००० वर्षापूर्वीपर्यंत.

3) नवाश्मयुग ( Neolithic Age) :- ८००० वर्षांपूर्वीपासून ते ६५०० वर्षापुर्वीपर्यंत.




(Paleolithic Age) पुराणाश्म युगाचे खालीलपैकी किती उपप्रकार पडतात?

A. दोन

B. तीन🎯

C. चार

D. पाच


स्पष्टीकरण

1) अधोपुराणाश्म युग [Lower Paleolithic Age] :- १०लाख वर्षापूर्वीपासून ते १लाख वर्षापूर्वीपर्यंत.

2) मध्य पुराणाश्म युग [ Middle Paleolithic Age] :- १लाख वर्षापूर्वीपासून ते ४०हजार वर्षापूर्वीपर्यंत.

3) उर्ध्व पुराणाश्म युग [ Upper Paleolithic Age] :- ४०हजार वर्षापूर्वीपासून ते १०हजार वर्षापूर्वीपर्यंत.



 कोणत्या युगात अग्नीच्या वापरास प्रारंभ झाला?

A. अधो पुराणाश्म युग

B. मध्य पुराणाश्म युग🎯

C. उर्ध्व पुराणाश्म युग

D. वरीलपैकी एकही नाही


स्पष्टीकरण

शोध :- एच. डी. सांखलिया

मुख्य ठिकाणे :- बुद्धपुष्कर, संघाव गुहा, जबलपूर, अतिरामपाकम.



 खालील वर्णनावरून कालखंड ओळखा.

१) या कालखंडाला हीमयुग समाप्तीचा काळ मानले जाते.

२) याच कालखंडात कृषी-पशुपालनास प्रारंभ झाला.

३) मृतदेह दफनास प्रारंभ याच प्रारंभ झाला.


A. Middle Paleolithic Age

B. Upper Paleolithic Age

C. Mesolithic Age🎯

D. Neolithic Age


 स्पष्टीकरण

Mesolithic Age (मध्याश्मयुग) :-

 शोध :- ए. सी. कालाईल(मिर्झापूर, UP)

मुख्य संशोधन :- एच. डी. सांखलिया (लाणघंज)



चाकाच्या वापरास प्रारंभ ___ या युगात झाला.

A. Mesolithic Age

B. Neolithic Age🎯

C. Upper Paleolithic Age

D. वरील पैकी एकही नाही


स्पष्टीकरण

Neolithic Age (नवाश्मयुग) :-

  शोध :- 1) Le Mesurie-१८४२(रायचूर)

2) John Lubbock (आसाम), मुख्य स्थळे :- *मेहेरगढ*, राणा घुंडी, किली, धुल महम्मद

*Copper smelling (तांबे वितळनाला प्रारंभ भारतात झाला.)*




खालीलपैकी कोणती संस्कृती महाराष्ट्रात होती?

A. सावलदा

B. माळवा

C. जोर्वे

D. वरील सर्व🎯


स्पष्टीकरण

A. सावलदा :- धुळे (तापी - प्रवरा नदी प्रदेश) 

B. माळवा :- दायमाबाद, इनामाबाद, प्रकाश(गोदावरी - तापी - भीमा नदी प्रदेश) 

C. जोर्वे :- जोर्वे,नेवासा,चांदोली, सोनेगाव, इनामाबाद, दायमाबाद (प्रवरा नदी प्रदेश) 




खाली काही नद्यांची व त्याच्या काठावरील शहरांची नावे दिली आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा ओळखा.

अ) रावी - मोहंजोदडो

ब) सिंधू - हड्डप्पा

क) भोगवा- कालीबंगन

ड)घग्गर- लोथल


A. अ फक्त

B. ब फक्त

C. ड फक्त

D. सर्वच चूक🎯


 स्पष्टीकरण

A. रावी- हड्डप्पा

B. सिंधू - मोहंजोदडो

C. भोगवा - लोथल

D. घग्गर - कालीबंगन




खाली दिलेली (हड्डप्पाकालीन) विधाने विचारात घ्या.

अ) वजने व मापे बनविण्यासाठी स्टिटाईट या दगडाचा वापर होत असत.

ब) मापन करण्यासाठी लोखंडाच्या पट्ट्यांचा वापर होत असत. 

क) मुद्रा बनविण्यासाठी प्रामुख्याने चर्ट या दगडाचा वापर होत असत.


A. अ योग्य

B. अ व ब योग्य

C. सर्व योग्य

D. सर्व अयोग्य🎯


 स्पष्टीकरण

अ) वजने व मापे बनविण्यासाठी *चर्ट* या दगडाचा वापर होत असत.

ब) मापन करण्यासाठी *तांब्याच्या* पट्ट्यांचा वापर होत असत.

क) मुद्रा बनविण्यासाठी प्रामुख्याने *स्टिटाईट* या दगडाचा वापर होत असे.



खाली काही हड्डप्पा पूर्व संस्कृत्या व त्याचे प्रदेश दिले आहे, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.

अ) सोथी-सिसवाल- राजस्थान, हरियाणा 

ब) आमरी - सिंध

क) हेलमंड- अफगाणिस्तान

ड) झोब- बलुचिस्तान


A. सर्व अयोग्य

B. सर्व योग्य🎯

C. अ चूक

D. अ फक्त बरोबर



हड्डप्पा संस्कृतीचा अंत सिद्धांत व संशोधकांची नावे दिली आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.

अ) महापूर - एच. डी. सांखलिया

ब) नदी प्रवाहातील बदल- एच. डी. लॅम्बरीक

क) परकीय आक्रमण - स्टुअर्ट पीगॉट, व्हील्लर


A. फक्त अ अयोग्य🎯

B. फक्त ब योग्य

C. सर्व योग्य

D. सर्व अयोग्य


थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

दारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती

दारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती

अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.

दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.
दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.
भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.
सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :

देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

दारिद्रय रेषा :

गरिबीची प्रमाण मोजण्यासाठी दारिद्रय रेषा (Pov-erty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो.
1973-74 पासून नियोजन आयोग दारिद्रय रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर करीत आहे.
1दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग (Per Capita per day calorie intake) –

या निकषानुसार ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग 2400 कॅलरी, तर शहरी भागात तो किमान 2100 कॅलरी एवढा ठरविण्यात आला आहे.
अर्थात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्याचे रूपांतर पैशात (equivalent मनी value) केले जाते.
दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च (Per Capita Per Month Consumption Expenditure) –

या निकषानुसार दारिद्रय रेषा 2004-2005 मध्ये (आधारभूत वर्ष: 1973-74) ग्रामीण भागात दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च रु. 356.30 तर शहरी भागात तो रु. 538.60 एवढी ठरविण्यात आली आहे.
यावरून जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा कमी खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंबे’ (Below Poverty Line: BPL) तर जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेवरील कुटुंबे’ (Above Poverty Line:APL) असे संबोधले जाते.
भारतातील दारिद्रयाचे प्रमाण :

1999-2000 पर्यंतची भारतातील दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या व तिचे एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण संबंधित तक्त्यामध्ये दिले आहे.
नवीन पद्धतीचा वापर (New Methodology) :

1997 पासून नियोजन आयोगामार्फत दारिद्रय रेषा व दारिद्रयाचे प्रमाण मोजण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर केला जात आहे.
या पद्धतीची शिफारस ‘गरीब व्यक्तींची संख्या व संरक्षणाच्या मोजमापासाठी तज्ज्ञ गटा’ ने (लकडावाला समिती अहवाल) केली होती.
या पद्धतीमध्ये पुढील दोन पद्धतींचा स्विकार करण्यात आला आहे.
युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) –

यामध्ये सर्व उपभोग्य वस्तूंच्या 30 दिवसांच्या रिकॉल/रीफरन्स कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतो.
मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) –

यामध्ये 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणार्‍या गैर-खाध वस्तूंसाठी (उदा. कपडे, चपला, टिकाऊ वस्तु, शिक्षण, आरोग्य खर्च) 365 दिवसांच्या रिकॉल कालावधीच्या, तर इतर सर्व वस्तुंसाठी 30 दिवसांच्या रिकॉल पिरीयडचा समावेश होतो.
दारिद्रयाच्या मोजमापाच्या पद्धतीमध्ये सुधारणा – सरकारच्या दारिद्रय रेषेच्या गणन पद्धतीवर बरीच टिका केली जाते. या गणन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने अलिकडे दोन समित्य केल्या होत्या.
एन.सी.सक्सेना समिती :

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही एन.सी.सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती (Committee for Estimation of BPL Families in Rural Areas) स्थापन केली होती.
या समितीने सप्टेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केली होती.
या समितीने सदध्याची दारिद्रय रेषा अपूर्ण असून त्यात वाढ सुचविली, जेणे करून आवश्यक कॅलरीज उपलब्ध होऊ शकतील. तसेच समितीच्या मते दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या 50 टक्के इतकी उच्च आहे.
मात्र या शिफारशी नियोजन मंडळाने फेटाळून लावल्या.

सुरेश तेंडुलकर समिती :

केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला.
या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे-
समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे.
समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे.
नियोजन मंडळाने सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्रय रेषेच्या (356.3 रु. ग्रामीण भागात, व 538.60 रु. शहरी भागात) जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे.
या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे.
नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.
सी. रंगराजन पॅनेल :

मात्र या दारिद्रय रेषेवर झालेल्या प्रचंड टिकेमुळे तेंडुलकर समितीच्या पद्धतीचे परीक्षण करण्यासाठी आणि पर्यायी पद्धत सुचविण्यासाठी मे 2012 मध्ये सी. रंजराजन यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ गटाची स्थापना केली.
या पॅनेलमध्ये महेंद्र देव, के. सुदरम, महेश व्यास आणि के.दत्ता हे अर्थतज्ज्ञ सदस्य आहेत.
दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) :

भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे.
दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे.
अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन,

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.


अ) वृद्धीधारित दृष्टिकोन (Growth-oriented Approach) –

हा दृष्टिकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की, आर्थिक वृद्धीचे परिणाम (जिडीपी व दर डोई जीडीपीतील वेगवान वृद्धी) समाजाच्या सर्व गटांपर्यंत पसरतील, तसेच गरीब जनतेपर्यंत झिरपत जातील.
1950 च्या दशकात व 1960 कया दहकाच्या सुरुवातीपर्यंत नियोजनाचा मुख्य भर याच दृष्टीकोनावर आधारित होता. त्यामागे असा विचार होता की, निवडक प्रदेशांमध्ये वेगवान औधौगिक विकास आणि हरित क्रांतीच्या माधमातून कृषि विकास घडवून आणल्यास न्यून-विकसित प्रदेशांना तसेच समाजातील मागास आणल्यास गटांना त्याचा फायदा प्राप्त होईल.
मात्र, एकंदरीत वृद्धी आणि कृषि व उधोग क्षेत्रातील वृद्धी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही. दुसर्‍या बाजूला, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे दर डोई उत्पन्नातील वाढ अत्यल्प ठरली. हरित क्रांतीमुळे प्रादेशिक तसेच वैयक्तिक विषमतेत भरच पडली. भू-सुधारणा यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचे फायदे गरीब जनतेपर्यंत झिरपून पोहचले नाहीत.

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम (Poverty Alleviation Programmers PAPs) –

वृद्धीधारीत दृष्टीकोनाला पर्याय म्हणून धोरण निर्मात्यांनी दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांच्या राबवणुकीचार भर देण्यास सुरुवात केली. सामाजिक मालमत्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कामाची निर्मिती करून गरीब जनतेसाठी उत्पन्नसृजक रोजगार निर्माण करता येईल, हा मागील विचार होता.
या दृष्टीकोनाचा अवलंब अल्प प्रमाणात तिसर्याच योजनेदरम्यान करण्यात आला, व त्यानंतर टप्प्याटप्याने त्याचा विस्तार करण्यात आला. अशा दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांचे तीन प्रकार पडतात-
स्वयंरोजगाराचे कार्यक्रम: उदा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
मजुरी रोजगार कार्यक्रम: उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रीकरण असलेल्या योजना: उदा. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना.

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद (Provision of minimum basic amenities) –

या दृष्टिकोनात जनतेला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दरिद्रयाचा प्रश्न हाताळण्याचा समावेश होतो.
सामाजिक उपभोगाच्या गरजांवर (उदा. अनुदानित दराने अन्नधान्य पुरवठा, शिक्षण व आरोग्य सोयी, पाणी पुरवठा व स्वच्छता इ.) सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचे राहणीमान उंचवता येऊ शकते, या कल्पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश असल्याचे मानले जाते.
या दृष्टीकोना अंतर्गत कार्यक्रमांच्या आधारे रोजगार निर्मिती करणे, गरिबांच्या उपभोगात भर घालणे व शिक्षण-आरोग्यात सुधारणा होणे, या बाबी अपेक्षित आहेत.
गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन प्रमुख कार्यक्रम राबविले जात आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था
एकात्मिक बाल विकास योजना
राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना
वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणार्यान योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश होतो-
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
भारत निर्माण योजना
इंदिरा आवास योजना
ग्रामीण गरीबांना शहरी सेवांचा पुरवठा (PURA)
तसेच, सरकारने काही विशिष्ट गटांना मदत करण्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आहेत.
उदा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP), ज्यांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ चालविली जाते.

अर्थशास्त्र प्रश्न व उत्तरे

 

1. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र 'गाभा क्षेत्र' मानण्यात आले?

अ) औद्योगिक क्षेत्र

ब) शिक्षण क्षेत्र

क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

ड) कृषी क्षेत्र

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा

1.(अ) फक्त

2. (अ)आणि(क) फक्त

3.ब) फक्त

4.ड) फक्त✅


2. तुटीच्या अर्थभरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो?

1.भावसंकोच

2. भाववाढ✅

3.निर्यातवाढ

4. यापैकी कोणतेही नाही


3.एक बंध अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये .. .....

1. चलन पुरवठा पूर्णपणे नियंत्रित असतो

2.तुटीच्या अर्थ भरणाचा वापर केला जातो

3.केवळ निर्यातीला परवानगी असते

4.ना निर्यात ना आयात✅


4. एक रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहे?

1.नियोजन आयोग

2.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

3.स्टेट बँक ऑफ इंडिया

4.केंद्रीय अर्थ खाते✅


5.भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणास म्हणले जाते?

1.जगदीशचंद्र बोस

2.राजा रामन्ना

3.डॉ. स्वामिनाथन✅

4.जयंत नारळीकर


6.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दरात कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?

1.बँक दर✅

2. व्याज दर

3 रेपो दर

4.अधिकर्ष सवलत


7...... यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक  धोरण संसदेपुढे मांडले

1.डॉ. आंबेडकर

2.श्यामप्रसाद  मुखर्जी✅

3.पंडित नेहरू

4.गुलझारीलाल नंदा


8. खालीलपैकी कोणती समिती लघुउद्योग क्षेत्रातील पतपुरवठयात येणाऱ्या अडचणी या विषयाशी संबधित होती?

1. आर.व्ही.गुप्ता समिती

2.डा. एल.सी. गुप्ता समिती

3.एस.एल.कपूर समिती✅

4.आर.एल.मल्होत्रा समिती


9.सदोष शिक्षण पद्धतीमुळे ......बेकारी निर्माण होते?

1.सुशिक्षित✅

2.तंत्रिकी

3.ग्रामीण

4.संघर्षजन्य


10.रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता?

1.चलन पुरवठा कमी होणे✅

2.महागाईत वाढ होणे

3.उत्पादनात वाढ होणे

4.अ व ब  दोन्हीही


1. भारताच्या सन २००० च्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे?

१.सन २०२० पर्यंत किमान जन्मदर साध्य करणे

२.सन २०३० पर्यंत सुदृढ लोकसंख्या साध्य करणे

३.सन २०४० पर्यंत स्त्री पुरुष प्रमाणात वाढ करणे 

४.सन २०४५ पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे✅✅✅


2. १२ व्या पंचवार्षिक योजनेत पायाभूत क्षेत्रातील अंदाजे गुंतवणूक किती आहे?

१.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट✅✅✅

२.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १२०%

३.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १५०%

४.वरीलपैकी एक ही नाही


3. भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख तीन करणे कोणती?

अ)सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन

ब)व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल

क)दारिद्रय निर्मूलनातील अपयश

ड) महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर

१.अ, ब आणि ड✅✅✅

२.ब, क, आणि ड

३.अ, ब आणि क

४.क, ड आणि अ


4. भारताच्या विकासासंदर्भात डॉ कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता?

१.भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक✅✅✅

२.खाजगी क्षेत्रावर नियंत्रण

३.दारिद्रय चे निवारण

४.शेती क्षेत्राचा विकास


5. ग्रामीण पायाभूत विकासासाठी..... या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली?

१.नाबार्ड✅✅✅

२.ए. आय.बी.पी

३.एन.सी.डी.सी

४.आय.ए.डी.पी


6. खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्दोग नाहीत?

१.कोळसा, कचे तेल आणि विधुत

२.तेल परिशोधन, कचे तेल आणि कोळसा

३.कोळसा, सिमेंट आणि लोह इस्पित

४.कचे तेल, प्राकृतिक गॅस आणि तेल परिशोधन✅✅✅


7. १९९१ च्या लघुउद्योगा साठीच्या योजनेनुसार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी वर लक्ष द्यायचे होते?

१.वित्त उभारणी

२.निर्यात प्रोत्साहन

३.विपणनास साहाय्य✅✅✅

४.कुशल कामगारांची तरतूद


8. खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले?

१.चंद्रशेखर

२.पी व्ही नरसिंह राव✅✅✅

३.डॉ मनमोहन सिंग

४.एच डी देवेगौडा


9. २००३-२००७ च्या आयात निर्यात धोरणातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता?

१.संशोधन आणि विकासात पुढाकार

२.विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीस प्रोत्साहन

३.तंत्रज्ञान पार्क

४.शेतमालाच्या निर्यातीवरील संख्यात्मक निर्बंधा चे उच्चटन✅✅✅


10. देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला?

१.जवाहर रोजगार योजना

२.नेहरू रोजगार योजना

३.जे पी नारायण गॅरेटी योजना

४.प्रधानमंत्री रोजगार योजना✅✅✅

काही द्रव्यांच्या pH किमती ✴️

🧬 pH म्हणजे हायड्रोजनचे प्रमाण.

🧬 pH means Potential of Hydrogen.

     


🔯 pH चा शोध लावला = 

                            पेडर लॉरिट्झ सारेन्सन


🧪 आम्ल < ७ < आम्लारी

🧪 Acids < 7 < Alkalies



📌 लिंबाच्या रसाचा pH = 2.4 


📌 वहिनेगराचा pH = 3


📌 दारुचा pH = 3.5


📌 दधाचा pH = 6.4


📌 पाण्याचा pH = 7


📌 मीठाचा pH = 7


📌 मानवी रक्ताचा pH = 7.4


📌 मानवी अश्रुंचा pH = 7.4 


📌 मानवी लाळेचा pH = 6.5 - 7.5


📌 समुद्राच्या पाण्याचा pH = 8.1


📌 मानवी लघवीचा pH= 4.8 - 8.4


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...