मराठी - वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे

मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे


7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


12)रामराम ठोकणे - निरोप घेणे


13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे



15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


16) वर्ज्य करणे - टाकणे


17) काडीमोड करणे - संबंध तोडणे


18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


19) अगतिक होणे - उपाय न चालणे


20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे


21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे


22) इडापिडा टळणे - संकट जाणे


23) उतराई होणे - उपकार फेडणे


24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे


25) लकडा लावणे - सारखी घाई करणे


26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


28)कागाळी करणे - तक्रार करणे


29) खांदा देणे - मदत करणे


30) खोबरे करणे - नाश करणे


31) गय करणे - क्षमा करणे


32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


34) जीव ओतणे - मन लावून काम करणे


35) सुपारी देणे - आमंत्रण देणे


36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


38) नामोहरम होणे - पराभूत होणे


39) पदर पसरणे - याचना करणे


40) पाणउतारा करणे - अपमान करणे


41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे


42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे


43) हिरमुसले होणे - नाराज होणे


44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे


45) विटून जाणे - त्रासणे


46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे


47) फडशा पाडणे - संपवणे


48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे


49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


50)धिंडवडे निघणे - फजिती होणे


61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


64)हातपाय गाळणे - धीर सोडणे


65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील


 काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे


67)झाकड पडणे - अंधार पडणे


68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे


69)टोपी उडवणे - टवाळी करणे


70)पाणी पाजणे - पराभव करणे


71)वहिवाट असणे - रीत असणे


72)छी थू होणे - नाचक्की होणे


73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे


74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे


75)दिवा विझणे - मरण येणे


76)मूठमाती देणे - शेवट करणे


77) सुगावा लागणे - अंदाज लागणे


78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे


79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे


80)कानाशी लागणे - चहाडी करणे


81)किटाळ करणे - आरोप होणे


82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे


83)हातावर तुरी देणे - फसविणे


84)बेगमी करणे - साठा करणे


85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक



आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली


✅ कोळसा ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.


✅ खनिज तेल ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.


✅ नसर्गिक वायू ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.


✅ रिफायनरी उत्पादने ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.


✅ खते ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.


✅ पोलाद ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.


✅ सिमेंट ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.


✅ वीज ✅


ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.


नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

91वी घटनादुरुस्ती 2003



मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.


1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)


2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)


3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)


4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)


5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही.  मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे


केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.


एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा  मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)


6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?



- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखलाGदिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.


महाराष्ट्र पोलीस भरती ⭕️मराठी म्हणी⭕️

1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग



1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53


2.मेकॉले समिती-1853


3.वुडचा खलिता-1854


4.हंटर समिती-1882-83


5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने  भारतीय विद्यापीठ कायदा 1904


6.सॅडलर समिती-1917-18


7.हारटोग समिती-1929


8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937


9.सार्जंट योजना-1944


10.राधाकृष्ण आयोग-1948


Trick :


 शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.

सामान्य ज्ञान


जागतिक आर्थिक मंच (WEF) - 

➖सथापना: सन 1971 (01 जानेवारी); 

➖मख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड.


ग्रुप ऑफ 20 (जी-20) याची 

➖ सथापना – सन 1999 (26 सप्टेंबर).


पश्चिम बंगाल राज्य - 

➖ सथापना: सन 1950 (26 जानेवारी); 

➖राजधानी: कोलकाता.


छत्तीसगड राज्य - 

➖ सथापना: सन 2000 (01 नोव्हेंबर); 

➖ राजधानी: रायपूर.


सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross domestic product -GDP) याची मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी.


भारतातले राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) याची 

➖ सथापना – सन 1993 (12 ऑक्टोबर).


भारतातले केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची 

➖ सथापना – सन 2005 (12 ऑक्टोबर) (माहितीचा अधिकार कायद्यान्वये).


भारतात माहितीचा अधिकार (RTI) कायदा या साली लागू करण्यात आला – सन 2005 (15 जून).


ब्रिटीश भारतातली प्रथम पदवीधर महिला - कामिनी रॉय (बंगाली कवीयत्री, समाजसेवक आणि स्त्रीवादी).

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते


गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास


यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ


गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस


घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस


गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ


दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस


ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास


झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस


रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस


सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस


नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास


तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास


साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास


चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस


महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास


गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ


कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस


कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस


Online Test series

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...