History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ जून २०२६

Combined Group B&C History PYQ 2018

Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना

Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद

Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी

Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार

Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी

Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद

Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट

Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल

Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)

Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर

Q12. जोड्या जुळवा –
➤ स्वदेशी – फ़साळकर
➤ वंगभंग – वासुदेव साठे
➤ किचकवध – खाडिलकर
➤ story – भीमराव

Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण

Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण

१० जून २०२६

आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: राष्ट्रीय आणीबाणीचा नामंजुरीचा ठराव फक्त लोकसभा करू शकते .

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नामंजुरीसाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.


२८ मे २०२६

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-औरंगाबाद


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बुलढाणा


12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?

उत्तर- कर्करोग


13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?

उत्तर- ए


14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?

उत्तर- शिरपूर


15) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

उत्तर- तोरणमाळ


16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- महाराष्ट्र


17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 8 मार्च


18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?

उत्तर- मूत्रपिंडाचे विकार


19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?

उत्तर- ड


20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?

 उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक


21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?

उत्तर- 21 कि.मी


22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर- 2:3


23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?

 उत्तर- कॅलरीज


24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे? 

 उत्तर- स्वादुपिंड


25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

उत्तर- फिनलंड


26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?

 उत्तर- महात्मा गांधी


27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?

 उत्तर- मुंबई


28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? 

 उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन


30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?

: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा



31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

सर): उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी


32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?

 उत्तर- सोन्यासारखे


34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?

उत्तर- कीडनाशक


35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?

 उत्तर-  ल्युकेमिया


36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

 उत्तर- वसंतराव नाईक समिती


37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?

 तलाठी


38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?

उत्तर-  महात्मा गांधी


39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?

उत्तर- डॉक्टर विजय भटकर


40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?

उत्तर- वाहन


41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?

उत्तर- कुसुमाग्रज


42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

 उत्तर- न्यूयॉर्क


43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

उत्तर- 13


44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- रायगड


45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- अहमदनगर


46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- राजस्थान


47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- कोल्हापूर


48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- ऑस्ट्रेलिया


49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? 

 उत्तर- इक्वेडोर


50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?

उत्तर- तुर्कस्तान


51) झुलू जमात कोठे आढळते ?

उत्तर- दक्षिण आफ्रिका


52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?

 उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर


53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- महाराष्ट्र


54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?

उत्तर- कावेरी


55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर- सिकंदराबाद


56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?

 उत्तर- हंगेरी


57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?

उत्तर- राष्ट्रकूट


58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी


59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

 उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा


60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?

 उत्तर- सुभाषचंद्र बोस


61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?

: उत्तर- लोकमान्य टिळक


62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला? 

: उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858


63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?

: उत्तर- 1909


64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

: उत्तर- लॉर्ड आयर्विन


65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

: उत्तर- सविनय कायदेभंग


66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?

: उत्तर- दादाभाई नौरोजी


67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?

: उत्तर- 26 जानेवारी 1930


68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- फाजलअली


70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?

: उत्तर- 3


71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार


72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

: उत्तर- स्वर्णसिंह समिती


73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?  

: उत्तर- कलम 123


74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

: उत्तर- 22


75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?

: उत्तर- 11


76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

: उत्तर- 3 डिसेंबर


77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

: उत्तर- श्रीलंका


78) सुजय कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल


79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?

: उत्तर- ॲल्युमिनियम


80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो? 

: उत्तर- यकृत


81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?

: उत्तर- डेसिबल


82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?

: उत्तर- तुर्कस्तान


83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

: उत्तर- 1991


84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

: उत्तर- अप्रत्यक्ष


85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

: उत्तर- गटविकास अधिकारी


86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?

: उत्तर- राजस्थान


87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत? 

: उत्तर- 5


88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

: उत्तर- माळशेज


89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

: उत्तर- वेलवंडी


90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?

: उत्तर- 8 नोव्हेंबर 2016


91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.

: उत्तर- तेलबीया


92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? 

: उत्तर- इंदापुर


93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली? 

: उत्तर- छत्रपती शाहू महाराज


94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?

: उत्तर- जॉन चेसन


95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?

: उत्तर- आर्थरसीट


96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?

: उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌


97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?

: उत्तर- कराड


98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?

: उत्तर- पुणे


99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?

: उत्तर- 21 ऑक्टोंबर


100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

: उत्तर- मनोधैर्य


Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी  


Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड 


Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी


प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
 उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल 

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
 उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
 उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
): उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
): उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
: उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? 
): उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
): उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?  
): उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
): उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? 
): उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
): उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
): उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
): उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
): उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
): उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
): उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
): उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
): उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
): उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
): उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
): उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
): उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
): उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 
): उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
): उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? 
): उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
): उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
): उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
): उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
): उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
): उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
): उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? 
): उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? 
): उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
): उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
): उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
): उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
): उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
): उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
): उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
): उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
): उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
): उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? 
): उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
): उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते? 
): उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
): उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
): उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
): उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
): उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
): उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
): उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
): उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे? 
): उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? 
): उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
): उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? 
): उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
): उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
): उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
): उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
): उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 
): उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
): उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
): उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
): उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 
): उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
): उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? 
): उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? 
): उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
): उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
): उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
): उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
): उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
): उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
): उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? 
): उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
): उत्तर- व्यंकटेश माडगूळकर


गांधी युगाचा उदय

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 

हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 

असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 

काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 

या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 

या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 

या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 

राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 

नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :

1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 

या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.


7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 

12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 

385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 

यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 

महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.

सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 

6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 

आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.


8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 

महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 

विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.


9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 

14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 

8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -

इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 

प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 

महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -

सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.

या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -

चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 

नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 

सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.


10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 

मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -

या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 

या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -

त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -

24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 

भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 

3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 

मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

महाराष्ट्राचा इतिहास.

🧩 मौर्य ते यादव...


🅾️(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)


🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...


🅾️महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...


🅾️सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. 


🅾️महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


🧩 वाकाटकांचा काळ...


🅾️वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



🧩कलाचुरींचा काळ...


🅾️वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...


🅾️वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. 


🅾️त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..


🅾️वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


🧩 यादवांचा काळ..


🅾️महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. 


🅾️यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

जिल्हाधिकारी

– जिल्हा हा प्राचीन कालखंडापासून महत्वाचा घटक मानला जातो.  जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो.

– रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या मते ” जिल्हाधिकारी असे कासव आहे ज्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती उभा आहे”. जिल्हाधिकारी या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास होत गेला आहे.

कालखंड                           जिल्हाधिकाऱ्यांचे नाव

मौर्य कालखंड                      राजुका

गुप्त कालखंड                      वीसयापती

मोगल कालखंड                    अमीर / अमल गुजर

ब्रिटीश कालखंड                   जिल्हाधिकारी


भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद १४ मे १७७२ रोजी वॊरन हेस्टींगंज यांनी निर्माण केले. ( महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे )

– १७८७ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायदानाची वदंडाधिकाऱ्याची कामे सोपविली.

– सुरवातीला जिल्हा धिकारी होण्यासाठी ( ICS- Indian Civil Services ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.

– भारतामध्ये १९४६ ला ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.

– सुरेंद्रनाथ बेनर्जी हे भारतातील पहिले ICS  परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती होय. 

– सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी होय. 

– ICS परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वदावा यासाठी ‘ली कमिशनच्या‘ शिफारशीच्या आधारावर भारतामध्ये १९२६ ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ( UPSC ).

– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांघिक लोकसेवा आयोगाचे रूपांतर केंद्रीय लोकसेवा आयोग असे करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचा कलम ३१५ मध्ये तरतूद करण्यात आली.

– जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो.

– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ (१) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो.

पात्रता                    पदवीधर असावा

निवड                     केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे

नेमणूक                   राज्य शासन

दर्जा                       IAS चा

कार्यक्षेत्रे                  जिल्हास्तर

वेतन व भत्ते              राज्य शासन

कार्यकाळ                 ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

नियंत्रण                   विभागीय आयुक्त

रजा                       राज्य शासन

राजीनामा                 राज्य शासन

बडतर्फी                  केंद्र शासनाच्यावतीने


२३ मे २०२६

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी शेवटच्या आठवड्यात नियोजन काय असावे?


 राज्यसेवा पूर्वसाठी इतिहासामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण 15 प्रश्नांपैकी आठ ते नऊ प्रश्न हे प्राचीन व मध्ययुगीन भारतावर विचारले जातात.त्यामध्ये देखील 5 ते 6 प्रश्न प्राचीन व दोन-तीन प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात.


 ♦️आता आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतासाठी नक्की काय Strategy असायला पाहिजे याविषयी बघूयात.


1.राहिलेल्या 7 दिवसातील कमीत कमी आठ ते दहा तासांचा वेळ तुम्ही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला द्यायला हवा.


त्यामध्ये देखील शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा टॉपिक वाचला तर जास्त फायदा होईल.कारण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या facts खूप लवकर विसरून जातात.कोणी जर हा घटक Skip केला असेल तर अजूनही वेळ आहे हा टॉपिक करून घ्या.कारण Basic reading वरती देखील 4-5 प्रश्न बरोबर येऊ शकतात.


2. प्राचीन  भारतातील काही महत्त्वाच्या घटकांवर आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. उदा.सिंधू खोरे संस्कृती,महाजनपदे, मौर्य कालखंड,गुप्त कालखंड,गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वैदिक कालखंड etc.


या सर्व कालखंडातील आयोग व्यक्तीवर जास्त प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे व्यक्तींचा अंदाज घेऊन चांगला अभ्यास करा.या कालखंडातील संस्कृती,भाषा,लोकांची जीवन जगण्याची पद्धती,कला-संस्कृती याचा अंदाज घ्या.


3. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न विचारले जातात.यामध्ये मुघलांचे आगमन आणि भारतातील मुघल घराण्याची स्थापना, मुघलकालीन कला,साहित्य,संस्कृती इ अनुषंगाने अभ्यास करा.त्यानंतर दिल्ली सलतनत,भक्ती चळवळ, सुफी चळवळ, सीख धर्मीयातील विविध चळवळ या वरती आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारतो.


♦️Booklist-


तुम्ही आतापर्यत ज्या booklist मधून read केलं आहे त्यामधून revise करा.


आणखी कोणी जास्त केलं नसेल तर फक्त 6,7 आणि 11 th चे Stateboard मधून Cover करून घ्या. एक optimum Level चे marks नक्कीच भेटतील.


♦️आता आता तुम्ही दोन जानेवारी साठी  प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सोडवताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात.


1. इतिहासाचे बरेच प्रश्न हे व्यक्तीविशेष म्हणजेच Personality based विचारले जातात. त्यामुळे शेवटचं revision घेताना व्यक्तींवर जास्त focus राहू द्या.अजून आयोग महत्वाच्या व्यक्तींवरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे Options मध्ये तुम्हाला जर एखादी महत्त्वाची व्यक्ती दिसत असेल तर तेच उत्तर निवडले पाहिजेत.

उदा.2018 च्या Prelims ला अल्लाउद्दीन खिलजी वरती multistatement प्रश्न आला होता. त्यामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी त्याच्या दरबारी होता हे वाक्य होते. आणि तेवढं वाक्य माहित असली की प्रश्न सुटेल.


2. इतिहासामध्ये उत्तरे ही most Inclusive पर्यायचीच असतात.2020 च्या परीक्षेमध्ये शहाजहाच्या दरबारातील चित्रकार विचारले होते. आणि ऑप्शन खूपच Narrow होते.म्हणजे फक्त ab, फक्त bc, फक्त cd आणि चौथा abd. अशा वेळी चौथा म्हणजे most inclusive Option उत्तर असते.

 

3. इतिहासामध्ये एक Timeline असते ती timeline perfect लक्षात आली पाहिजे. उदा.महाजनपदे, मौर्य आणि गुप्त या timeline मधील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या छोट्या गोष्टी जरी माहिती असलं तरी प्रश्न Tackle होतो.


4. प्राचीन व मध्ययुगीन भारतातील 8-9 प्रश्नांपैकी साधारणता दोन ते तीन प्रश्न हे जोड्या लावा यावरती असतात. पुढील पाच-सहा दिवस तुम्ही आयोगाचे 2017 पासून 2020 पर्यंत चे पेपर घेऊन  जोड्यांचे पॅटर्न व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये काही कॉमन ऑप्शन्स दिसतील तीच उत्तरे बऱ्यापैकी असतात. किंवा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये 1234 किंवा 4321 या जोड्यांचा पॅटर्न देखील चालतो.


5. प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न हे out of box असतात. पण त्यालादेखील logic लागू शकत. उदा.2019 मध्ये Achaemenid विजयानंत्तर कंभोज मध्ये कोणता उद्योग सुरु झाला असा प्रश्न होता. आपलं Confusion हे जहाजबांधणी व ब्लॅंकेट बनवणे यामध्ये होत. पण कंभोज हे शहर समुद्रकाठावर वसलेलं नव्हतं याचाच अर्थ तिथं जहाजबंधनी उद्योग सुरु होणे थोडे अवघड आहे.त्यामुळे ब्लॅंकेट बनवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो.


6. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील Options संबंधीचा. तो कोणता? समजा एखाद्या प्रश्नातील Options मध्ये दोन पर्याय जर Close दिसत असतील तर तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते.प्रश्न सोडवताना ही Technique तुम्ही निश्चितच वापरू शकता.


7. 2020 ला प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडे tough होते हे मान्य आहे पण त्यामध्येदेखील आपण वरती सांगितल्याप्रणे वेगवेगळे method वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो.


सर्वांना शुभेच्छा!

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

१८ मे २०२६

बंगाल राज्य व बंगाल युद्धे

 प्लासीची लढाई 

      बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.

सिराजउद्दौला (कार. १० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा ⇨अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची [⟶ अंधारकोठडी, कलकत्त्याची]. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. ⇨रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. 

कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या : (१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी. (२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि (३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत. सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.

विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली [⟶ इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील]. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.



बक्सारची लढाई

(२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

लढाईची पार्श्वभूमी व कारणे

प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.

बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.

पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.

मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे

खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला; मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला; कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.





०६ मे २०२६

राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

प्रश्न मंजुषा



♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर


०४ एप्रिल २०२६

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.