Monday, 17 April 2023

Combine पूर्व ची घोडदौड...


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,


 ✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.


✳️ परत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.

 त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.

 कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.

 बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.

  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

 जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.

 जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.


✳️ तयामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.

 माझ्या माहितीप्रमाणे,

 पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत

 जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.

 इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत

 आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.


 1. राज्यशास्त्र-

 राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे

 पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.

 राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.

 एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.

 मग काही जणांना अडचण वाटते

 त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.

 यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे

 कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात

 उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या

 राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.

 ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे

 जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल

 निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.


 2.भूगोल-

 कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.

 हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे. 

 स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत

 आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.

 ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.


 3.अर्थशास्त्र-

 यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.

 अर्थशास्त्राच्या संदर्भात  मागील एक पोस्ट शेअर केली होती

 ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.


 4.विज्ञान-

 इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते. 

 साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.

 कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.

 जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..

 बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.

 तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.

 त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.

इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..


 5. इतिहास-

 सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.

 पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.

 तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.

 इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.

 त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.


 6. चालू घडामोडी-

 यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.

 वारंवार रिव्हिजन करणे.

 आणि पाठांतर करणे.

 कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे

 दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.


अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

अर्थशास्त्र (Combined व पोलीस भरतीसाठी उपयुक्त)

Q1) पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ?
1) प्राप्ती कर    
2) उत्पादन शुल्क
3) शेती उत्पन्नावरील कर✅
4) वरीलपैकी कोणताही नाही

Q2) भांडवली निधीमध्ये (महसूलामध्ये) ‘कर्ज आणि इतर जोखीम’ काय दर्शविते ?
1) रिझर्व्ह बँकेकडे असलेले सरकारी “ॲड हॉक” कर्जरोखे
2) नाणे बाजारातील 100 दिवसांचे सरकारी कर्ज रोखे.
3) लोकांना देय असलेली सरकारी देयता✅
4) वरीलपैकी नाही

Q3) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का –
1) सतत घसरला✅  
2) अचल राहिला
3) सातत्याने वाढला
4) कुठलाही स्पष्ट आलेख (trend) नाही.

Q4) सन 2009-2010 मध्ये एकूण महसूलातील केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नाचा वाटा  ........................  होता.
1) 75.6 टक्के 
2) 66.3 टक्के
3) 80.6 टक्के ✅
4) वरीलपैकी नाही

Q5) सन 2009-2010 मध्ये भारतातील महसुली तुट किती होती ?
1) जी.डी.पी. च्या 5.1%
2) जी.डी.पी. च्या 2.5%
3) जी.डी.पी. च्या 6.1%   
4) वरीलपैकी नाही✅

Q6) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ......... साली झाली.
1) 1935✅
2) 1920
3) 1947
4) 1950

Q7) उत्पादनाचे घटक .......... हे आहेत.
1) जमीन, कामगार आणी भांडवल✅
2) व्याज आणि पगार
3) शासकीय आर्थिक धोरणे
4) यांपैकी कोणतेही नाही

Q8) क्षेत्रीय ग्रामीण बँक ....... ह्या वर्षी सुरू करण्यात आली.
1) 1980
2) 1975✅
3) 1985
4) 1990

Q9) विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडत ?
1) सहकारी बँक
2) भारतीय रिझर्व्ह बँक✅
3) परकीय चलन विभाग
4) वरीलपैकी काहीही नाही

Q10) भारतीय 2000 रुपयांच्या नोटवर कोणाची सही आढळते ?
1) भारताचे अर्थमंत्री
2) अर्थमंत्रालयाचे सचिव
3) आर.बी.आय. चे गव्हर्नर✅
4) भारताचे राष्ट्रपती
-------------------------

शेवटचे 12 दिवस 📖 काय करावं ? काय वाचावं ?

जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 करमानुसार 


1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा.  राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क,  कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा.


2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा. 

भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे, 

भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण,  जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात.


3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी,  लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ,  वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा.


4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2022 ते एप्रिल 2023 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा.

त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला. 

राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा. 

Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता .


5) विज्ञान  : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो,  त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत,  बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं.


6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म,  मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया,  गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख  इ.  , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव, 

शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या) 


7) पर्यावरण  : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात,  Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर  बऱ्याचदा प्रश्न असतो,  

यावेळेस रामसर करार- स्थळे  व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.


PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल.


आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका. 
सर्वाना ALL THE BEST ✌️

⭕️Combine पुर्व 2021 इथून पुढील 14 दिवसांचे नियोजन आणि बरंच काही..

आता आपण पुढील 14 दिवसाचे नियोजन काय आणि कस करता येईल याविषयीं सविस्तर चर्चा करू.

1. पुढच्या 14 दिवसात प्रत्येक विषयांचे 1 चांगले Revision आणि शेवटी 1 fast Revision व्हायला हव. बघुयात सविस्तर..

2. साधारणता 14 दिवसांचे नियोजन 2 टप्प्यात केलं तर better राहील. पुढील 10 दिवसात इतिहास, भूगोल, Polity, Economy आणि Science या प्रत्येक विषयाला साधारण 2 दिवस असे 5 विषयांना एकूण 10 दिवस. याप्रमाणे आपली पुढील 10 दिवसात सर्व विषयांची 1 मस्त Revision झाली पाहिजेत.

3.आता तुम्हाला वाटेल आपली पाचच विषयांची Revision झाली. पण एक लक्षात घ्या Current आणि Math Reasoning ला इथून पुढील दिवसांमध्ये वेळ न देता तासांमध्ये वेळ द्या. म्हणजे तुम्ही Dailly 12 तास अभ्यास केला तर किमान 3 तास या विषयांना तुम्ही द्यायला हवेत.
Current आणि Math Reasoning हे Cutoff मध्ये deciding factors असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको.

4. आता तुमचे पहिल्या 10 दिवसात पहिले Revision होईल. अजून तुमच्याकडे 4 दिवस आहेत. यामध्ये प्रत्येक विषयच Revision करणं शक्य होणार नाही. त्याऐवजी, तुम्ही तुम्हाला weak वाटणारे विषय किंवा त्यामधील तुम्हाला weak वाटणारे उपघटक निवडून त्याची Revision  करू शकता. उदा. इतिहासात तुम्ही समाजसुधारक, Polity मध्ये Imp articles, सुची, परिशिष्ट्ये इ. वाचू शकता. तसेच Economy मध्ये लोकसंख्येची आकडेवारी तुम्ही पाठ करू शकता.

अशा प्रकारे शेवटच्या 4-5 दिवसात तुम्हाला येत असलेल्या गोष्टी Skip करून ( कारण तुम्हाला येणाऱ्या गोष्टी कधीही येणारच आहेत.)ज्या गोष्टी चुकु शकतात किंवा ज्याची revision करण्याची गरज आहे त्यावरतीच focus करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त Output मिळेल.

वरील नियोजन जसेच्या तसे follow करावे असे काही नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बदल करू शकता. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की पुढील 14 दिवसात आपला Comprehensive अभ्यास होणं अपेक्षित आहे.

♦️यासोबतच खालील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.

1. Reading तर आपण करणारच आहोत    पण पुढच्या 14 दिवसांनमध्ये तुम्ही आयोगाचे खूप सारे PYQ नक्की बघा. फक्त PYQ Analysis करताना ते स्पष्टीकरण वाचण्यापेक्षा तो प्रश्न कोणत्या उपघटकावर आला आहे, या वर्षी कोणत्या उपघटकावर ते प्रश्न विचारू शकतात, तसेच तो प्रश्न अजून दुसऱ्या कोणत्या मार्गाने solve करता येऊ शकतो का??
अश्या सर्व पद्धतीने PYQ Analysis झालं पाहिजेत.

2. जे घटक तुम्हाला अवघड वाटतात त्या घटकांचे pyq चांगले करा. म्हणजे Reading कमी झालं तरी Marks येतील.

3. आता Revision करताना जास्त Detail मध्ये करण्याची वेळ राहिली नाही so आपला फोकस हा Fact वरती हवा. म्हणजे आपली परीक्षा पण Factual आहे so तो approach कायम डोक्यात असू द्या.

4. तुमचे कमीत कमी 5 Test Papers तरी सोडवून झालं असतील. आता इथून पुढे जास्त Test Papers Solve करण्यात Point नाही पण तरी तुम्हांला Time management साठी शक्य असल्यास अजूनही 3-4 Test Papers सोडवण संयुक्तीक असेल. पण जास्त test Papers च्या पाठीमागे लागण्यात काहीही Point नाही कारण आपल्याला आयोगाला marks पाडायचे आहे test papers ला नाहीत. So फक्त Time management म्हूणन त्या गोष्टींकडे बघा.

5. Combine पुर्व ही अभ्यासाएव्हडीच वेळेच्या आणि झालेल्या अभ्यासाच्या नियोजनाची परीक्षा आहे. So Actual exam मध्ये वेळेच्या नियोजनाचे नियोजन आतापासूनच डोक्यात असू द्या. Actual Paper मध्ये होणाऱ्या Silly mistakes कश्या कमी करता येतील यादृष्टीने पुढील दिवसांमध्ये काम होणं अपेक्षित आहे..

6. तुम्ही सर्वजण नक्कीच परीक्षा पास होणार आहात. जशी जशी परीक्षा जवळ येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढला पाहिजेत. स्वतः च्या प्रामाणिक कष्टावरती विश्वास ठेवा यश आपलेच आहे.

सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...