Tuesday 24 September 2019

178 वर्ष जुनी ‘थॉमस कुक’ ही ब्रिटिश प्रवासी  कंपनी बंद पडली

👉ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक आपला व्यवसाय बंद करत आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे.

👉आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने सध्या व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 कंपनीने सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत.

👉व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे.

👉थॉमस कुक कंपनी अचानक बंद होणार असल्याने जगभरात फिरायला गेलेले जवळपास 1.50 लक्ष लोक जिथे-तिथे अडकले आहेत.

👉याशिवाय जगभरातली 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामध्ये 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.

👉थॉमस कुकची सन 1841 मध्ये स्थापना झाली.

👉 1855 साली कंपनीने पहिली ऐसी ऑपरेटर सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली, जी ब्रिटिश प्रवाशांना एस्कॉर्ट ट्रिपवर युरोपीयन देशात घेऊन जात होती.

👉त्यानंतर 1866 साली कंपनीने अमेरिका ट्रिप आणि 1872 साली संपूर्ण जगात कंपनीने आपली सेवा सुरु केली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द
उत्तर :- 1

2) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

3) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

4) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

5) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

6) ‘तो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

   1) साधित क्रियाविशेषण अव्यय      2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय
   3) सिध्द क्रियाविशेषण अव्यय      4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 2

7) योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.

     डोळयांनी .................. पाहून देव दिसत नाही, अंत: चक्षूंनी पहावा लागतो.

   1) सुध्दा    2) फक्त      3) केवळ      4) पण

उत्तर :- 3

8) पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.
   ब) केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात.
   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 3

10) खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ?

   1) तो रोज व्यायाम करत असतो.      2) तो रोज व्यायाम करतो.
   3) तो रोज व्यायाम करत होता.      4) तो रोज व्यायाम करत असे.

उत्तर :- 4

1 ऑक्टोबरपासून ओडिशामध्ये ऑनलाईन प्रदूषण प्रमाणपत्र अनिवार्य


🏭 ओडिशामध्ये 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन प्रदूषण प्रमाणपत्र अनिवार्य असेल, 30 सप्टेंबरपूर्वी जारी केलेले मॅन्युअल प्रदूषण अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी) वैध राहील.

🏭 प्रदूषण अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी) साठी दोन आणि तीनचाकी वाहनांसाठी फी रु. 60, हलक्या मोटार वाहनासाठी (एलएमव्ही) रु. 100 आणि मध्यम व अवजड मोटार वाहनांसाठी रु. 150 (जीएसटी अतिरिक्त)

🏭 प्रदूषण चाचणी केंद्रे 1 ऑक्टोबरपासून मॅन्युअल प्रमाणपत्र देणे बंद करतील.

🏭 ओडिशा सरकारने ऑनलाईन प्रदूषण प्रमाणपत्र 1 ऑक्टोबरपासून बंधनकारक केले आहे.

🏭 सप्टेंबरनंतर प्रदूषण चाचणी केंद्रांनी स्वहस्ते दिलेली प्रमाणपत्रे अवैध मानली जातील.

🏭 सुधारित मोटार वाहन (एमव्ही) कायद्याने वायूद्वारे ध्वनी / ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वाढवून 10,000 केला .

🏭 प्रदूषण अंतर्गत नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्रांसाठी वाहनधारक ओरडले.

🏭 ऑनलाईन जारी केलेले पीयूसी प्रमाणपत्र इलेक्ट्रॉनिक स्वरुपात एम परिवाहन अर्जाद्वारे दर्शविले जाऊ शकते आणि वाहन मालकांना माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या तरतुदीनुसार प्रमाणपत्र घेणे बंधनकारक नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरती स्पेशल प्रश्नसंच


1.  कामठी येथे कशाच्या खाणी आहेत?
✅. - दगडी कोळसा. 

2.  महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
✅.  - नागपूर. 

3.  तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते?
✅. - चंद्रपुर. 

4.  भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कोठे आहे? - तुमसर.

5.  महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
✅. - नागपूर..

6.  कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते?
✅. - नागपूर. 

7.  रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
✅. - मॅगनीज. 

8.  लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - गडचिरोली. 

9.  सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - मॅगनीज. 

10.  कायनाईटच्या खाणी कोठे आहेत?
✅. - देहुगाव-भंडारा. 

11.  क्रोमईट कोठे सापडते?
✅. - भंडारा. 

12.  अभ्रक कोठे मिळते?
✅.  - नागपूर. 

13.  सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते?
✅. - नागपूर. 

14.  चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते?
✅. - तांबडी माती. 

15.  तापी व पूर्णा खोर्‍यात कोणती माती आढळते?
✅.  - गाळमिश्रीत. 

16.  भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते?
✅.  - उथळ व चिकन. 

17.  महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे?
✅. - तेलगु-गंगा. 

18.  इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारी राज्ये कोणती?
✅.  - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.

19.  लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे?
✅. - आंध्रप्रदेश. 

20.  पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्‍यांने उभारला गेला आहे?
✅. - मध्यप्रदेश. 

21.  इडियाडोह योजना कोठे आहे?
✅. - भंडारा-चंद्रपूर. 

22.  बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - भंडारा. 

23.  पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो?
✅.  - नागपूर-भंडारा. 

24.  महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता?
✅. - भंडारा व गोंदिया. 

25.  बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे?
✅. - वर्धा. 

26.  रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅.  - नाग. 

27.  पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅.  - वैनगंगा.

28.  वैनगंगा नदी कोठे उगम पावते?
✅.  - शिवणी.

29.  वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते?
✅.  - सातपुडा. 

30.  कंहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅. - वैनगंगा

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर

● केंद्र सरकारने सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर केला आहे. 

● या घोषणेसह सरदार पटेल यांच्या सन्मानार्थ पुरस्काराची अधिसूचनाही प्रकाशित  करण्यात आली आहे.

●  वास्तविक, हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रीय ऐक्यासाठी देण्यात येईल.

●©पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेला चालना देणारी व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

● गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालकांच्या परिषदेत पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर राष्ट्रीय एकात्मतेसाठी सरदार पटेल यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देण्याची सुरूवात केली.

● सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार कमळाच्या पानाप्रमाणे आकारास येईल, त्याची लांबी 6 सेमी, रुंदी 2 ते 6 सेमी आणि जाडी 4 मिमी असेल. हे चांदी व सोन्याचे बनलेले असेल. 

● त्यात हिंदीमध्ये लिहिलेला सरदार पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असेल.

● यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांची 182 मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधली होती. 

● आज जगातील सर्वात उंच पुतळा आहे. 

● नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रथम याची कल्पना केली होती.

●  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ने टाइम मासिकाच्या वर्षाच्या 2019 च्या सर्वोत्कृष्ट 100 ठिकाणांची यादी देखील केली.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?

   1) व्दितीया    2) तृतीया    3) षष्ठी      4) सप्तमी

उत्तर :- 2

2) ‘तू मुंबईला जाणार की नाही ? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

   1) उद्गारार्थी    2) प्रश्नार्थी    3) नकारार्थी    4) संकेतार्थी

उत्तर :- 2

3) ‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

   1) अद्यापिही          2) जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही
   3) लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर      4) लोकांना बाहेर काढू शकलेलो नाही

उत्तर :- 2

4) ‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

   1) भावकर्तरी प्रयोग  2) भावे प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) कर्म-भाव संकर प्रयोग

उत्तर :- 3

5) ‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?

   1) उपपद तत्पुरुष समास      2) कर्मधारय समास 
   3) अव्ययीभाव समास      4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 3

6) ‘अत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह –

   1) अती + आनंद    2) अत्य + अंत   
   3) अति + यंत      4) अति + अंत

उत्तर :- 4

7) ज्या नामामुळे पदार्थामधील / प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ................ नाम म्हणतात.

   1) सामान्य    2) विशेष      3) धातुसाधित    4) भाववाचक
उत्तर :- 4

8) मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?

   1) सात    2) नऊ      3) दहा      4) आठ

उत्तर :- 2

9) योग्य विधान निवडा.

   1) विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते.

   2) विशेषण हे अविकारी आहे.
   3) विशेषण हे अव्यय आहे.
   4) क्रियाविशेषण हे नामाला लागते.

उत्तर :- 1

10) ‘वादळात झाड सापडले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

   1) अकर्मक क्रियापद    2) सकर्मक क्रियापद   
   3) अकर्व्हक क्रियापद    4) सहाय्यक क्रियापद

उत्तर :- 1

2021ची जनगणना होणार मोबाईल अॅपद्वारे

🔰देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा  केली.

🔰जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे ते महत्त्वाचे साधन आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आधार, पासपोर्ट, बँक खाते, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र आदींसाठी एकच 'युनिव्हर्सल कार्ड' वापरणे शक्‍य आहे,

🔰मोबाईल ऍप सर्व अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असेल. कागदी प्रक्रियेकडून डिजिटल प्रक्रियेकडे होणारा हा प्रवास आधुनिक, सुटसुटीत व कमी वेळ लागणारा असेल,
राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) देशातील अनेक समस्या संपुष्टात आणण्यास मदत करेल, असे सांगून आसाममध्ये वादात सापडलेल्या या उपक्रमाचे ठाम समर्थन केले.

🔰'देशातील विविध सामाजिक प्रवाह, अखेरच्या पायरीवरील व्यक्तीचा विकास व भविष्यात देशाच्या विकासकार्यासाठीचा जनगणना हा आधार आहे. जनगणनेतूनच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखी योजना सुरू होते. बालिकांचा जन्मदर कमी असणाऱ्या राज्यांत जनजागृती करणे, गर्भपात कायदे कठोर करणे, यांसारखे अनेक प्रयत्न सुरू झाले. त्याचाही आधार जनगणना हाच आहे. सन 2021 मध्ये होणारी जनगणना ही भारताची 16वी जनगणना असेल.  देशाला समस्यामुक्त करण्याचे नियोजन 2014 मध्येच सुरू झाले आहे.'

प्रश्नसंच 24/09/2019

1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
✅.  - देवळाली नाशिक. 

2.  नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅.  - गोदावरी.

3.   गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - गोदावरी. 

4.   वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

5.   कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे?
✅. - द्राक्षे.

5.   नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे?
✅. - हिंदूचे. 

7.  संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक. 

8.   देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - लष्कर छावणी. 

9.  संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे?
✅.  - प्रवरा.

10.  भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अहमदनगर. 

11. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅.  - 55 सें.मी. 

12. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्‍यात वसला आहे?
✅.  - गोदावरी. 

13.  निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे?
✅. - अहमदनगर. 

14.  केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
✅.  - जळगाव. 

15.     वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

16.  चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅. - जळगाव. 

17.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
✅.  - जळगाव. 

18.  जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅. - 74 सें.मी. 

19.   पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा?
✅.  - धुळे. 

20.  सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे?
✅.  - नंदुरबार. 

21.  कोणत्या नदीच्या खोर्‍यात नंदुरबार जिल्हा वसला आहे?
✅.  - तापी. 

22.  नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे?
✅.  - 50%.

23.  धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
✅.  - सूरत-नागपूर.

24. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - जळगाव. 

25.   जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो?
✅. - धुळे-कलकत्ता. 

26.  जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्‍यात वसला आहे?
✅. - तापी. 

27.  महाराष्ट्रात दुसर्‍यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती?
✅. - तापी. 

28.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
✅. - नाशिक. 

29.  मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते?
✅.  - नाशिक. 

30. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - विडी उद्योग. 

राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कारः सय्यद नकवी यांना उत्कृष्टतेचा पुरस्कार, सोहिनी गांगुली यांना यंग सायंटिस्ट

◾️भौगोलिक विज्ञान, खाणकाम आणि संबंधित क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन 2018  साठीचा राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार देशभरातील बावीस शास्त्रज्ञांना सादर करण्यात आला. संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांनी पुरस्कार प्रदान करताना सांगितले की भू-विज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांमधील तालमेल आणखी मजबूत करणे ही काळाची गरज आहे.

◾️राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार खनिज अन्वेषण, भूजल अन्वेषण, खाण तंत्रज्ञान, खनिज लाभ, शाश्वत खनिज विकास, मूलभूत आणि उपयोजित भू-विज्ञान, भौगोलिक-पर्यावरण अभ्यास आणि नैसर्गिक धोकादायक तपासणी या दहा विषयांमध्ये देण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), प्रा. सय्यद वाजिह अहमद नकवी यांना जलचर जैव-रसायन संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जागतिक योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला. 

◾️2018 सालाचा  यंग सायंटिस्ट पुरस्कार गोवा विद्यापीठाच्या डॉ. सोहिनी गांगुली यांना पेट्रोलॉजी, ज्वालामुखीशास्त्र आणि भू-रसायनशास्त्र या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल  देण्यात आले.

वार्षिक राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात:

१. राष्ट्रीय भू- विज्ञान पुरस्कार उत्कृष्टतेसाठी: भू-विज्ञानशास्त्रज्ञ, अभियंता, तंत्रज्ञानज्ञ आणि शैक्षणिक शास्त्रज्ञांनी भू-विज्ञानातील क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल उल्लेखनीय आजीवन कृत्ये आणि त्यांचे योगदान ओळखून हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारात 50,000 / - चे रोख, प्रमाणपत्र, सन्मानपत्र आणि करंडक असे आहे.

२. राष्ट्रीय भौगोलिक विज्ञान पुरस्कार: खनिज, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि वायू हायड्रेट्ससाठी शोध आणि शोध यासारख्या क्षेत्रात त्यांचे योग्य योगदान ओळखण्यासाठी भू-शास्त्रज्ञ, अभियंता, तंत्रज्ञानज्ञ, शैक्षणिक किंवा वैयक्तिकरित्या 19 पुरस्कार देण्यात येतात. भूजल, खाण तंत्रज्ञान, खनिज लाभ, शाश्वत खनिज विकास, स्ट्रॅटिग्राफी, पॅलेऑन्टोलॉजी, स्ट्रक्चरल भूविज्ञान, भूगर्भीयशास्त्र, भूगर्भशास्त्र, आर्थिक भूगर्भशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि भू-रसायनशास्त्र, भू-भौतिकी / उपयोजित भूभौतिकी, लागू भूविज्ञान, भौगोलिक-पर्यावरण अभ्यास, समुद्री विकास, भू-माहिती प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन आणि हिमनदी आणि अंटार्क्टिक संशोधन. या पुरस्कारात 20,000 रुपये रोख, प्रमाणपत्र, सन्मानपत्र आणि करंडक असे आहे.

युवा संशोधक पुरस्कार: भू-विज्ञान क्षेत्रातील आपले संशोधन कार्य ओळखण्यासाठी पुरस्कार 31 डिसेंबर रोजी 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या संशोधक किंवा वैज्ञानिकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारामध्ये  5000 रुपये रोख, प्रमाणपत्र, मानपत्र व करंडक असे आहे.

राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार: पात्रता

विनियमाच्या कलम  3 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेले व्यावसायिक पात्र भू-वैज्ञानिक, अभियंता, तंत्रज्ञ किंवा शिक्षणतज्ज्ञ असलेला कोणताही भारतीय राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कारास पात्र असेल.

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...