Monday 12 December 2022

MPSC मुख्य परीक्षा पास झालं नाही तरी नोकरी! राज्य सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत

पुणे, 11 डिसेंबर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

' जे विद्यार्थी  एमपीएससी परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार आहे.  यामुळे सरकारचाही पैसाही वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला देखील मिळेल. ज्यांनी अशापद्धतीचे नोकर भरती कंत्राट घेतलेले असते तो कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यांना व्यवस्थित पगार देखील मिळत नाही. जर अशा पद्धतीने भरती झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. मात्र हा फक्त केवळ एक विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Basic Concepts of Economics :

🔶व्यापारतोल (Balance of Trade) :-

व्यापारतोल (BOT) म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यांमधील फरक होय.व्यापारतोलात फक्त वस्तूूच्या आयात-निर्यातीतून निर्माण होणा-या येणी व  देणीचा समावेश असतो.


🔶व्यवहार तोल  (Balance of Payment) :-

व्यवहारतोल (BOP) म्हणजे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड असते.

व्यवहारतोलात वस्तूंशिवाय सेवांच्या देवाण-घेवाणीतून तसेत कर्जे व गुंतवणुकीच्या व्यवहारांतून निर्माण होणा-या येणी आणि देणी यांचाही समावेश असतो.


🔶रुपयाची परिवर्तनियता :-

जगातील चलनेमध्ये परस्परांमध्ये विनिमयक्षम असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनामध्ये करता येते.   मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा टाकत असतात.


🔶 व्यवहारतोलाच्या चालू व भांडवली खात्यांवरील शेष/तुटीची तुलना 

 

चालू खात्यावरील शेष हा भांडवली खात्यावरील तुटी एवढा असावा किंवा चालू खात्यावरील तूट ही भांडवली खात्यावरील शेष एवढी असावी.




🔶अंदाजपत्रक :- 

" पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा-खर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरुपातील योजनांचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रांत केला असतो त्यास बजेट किंवा अंदाजपत्रक म्हणतात."१९२१ च्या अॅकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार १९२४ पासून रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो.


पोलीस भरती प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद


आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना


🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?

- चंपारण्य 


🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?

- अहमदाबाद गिरणी लढा 


🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?

- खेडा सत्याग्रह


🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?

- असहकार चळवळ


🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?

- 1906 रोजी नाताळ येथे


🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?

- यंग इंडिया 


🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?

- साबरमती


🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?

- 1924 चे बेळगाव अधिवेशन


🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?

- सविनय कायदेभंग चळवळ


🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?

- अवंतिकाबाई

मान्सूनचे स्वरूप



अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

स्नायू संस्था (Muscular System)

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,
मृदू स्नायू आणि
हृदय स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

🌷मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

🌷हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

🌷या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

🌷हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.
स्नायूंचे तीन प्रकार आहेत.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷1) हृदय स्नायू (Cardiac Muscles):🌷🌷

🌷हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.

🌷हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.

🌷आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷 या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles): 🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷3) अस्थी स्नायू (Skeletal Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात म्हणून त्यांना अस्थी स्नायू किंवा कंकांली स्नायू (Skeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेऊ शकतो. म्हणून यांना ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscles) असे म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येतात म्हणून यांना पट्टकी स्नायू  (Straited Muscles) म्हणतात.

🌷ऐच्छिक स्नायूंच्या पेशी लांबट, दंडाकृती, अशाखीय तसेच बहुकेंद्रकी असतात.
उदा. हात, पाय, इत्यादीमधील स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

🌷शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.

🌷हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.

🌷पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.

🌷 सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷

चेतापेशी


प्राण्यांच्या चेतासंस्थेतील पेशी. या विद्युत स्वरूपात माहिती साठवून ठेवतात, ती इकडून तिकडे पाठवतात व माहितीवर प्रक्रियासुद्धा करतात.

एका सर्वसाधारण चेतापेशीचे तीन अवयव असतात मुख्य शरीर (सोमा),चेतातंतू आणि चेताक्ष. चेतापेशीचा विकास होत असतानाच्या अवस्थेमध्ये चेतातंतू आणि चेताक्ष, हे वेगवेगळे दाखवता येत नाहीत त्या अवस्थेमध्ये त्यांना एकत्रितपणे "चेतागर्भ" असे म्हणतात. चेतातंतू हे नावाप्रमाणेच तंतूमय असतात आणि ते चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेले असतात. त्यांची लांबी शेकडो मायक्रोमिटर एवढी असू शकते. चेतातंतू हे एकसलग नसतात, त्यांचे अनेक ठिकाणी विभाजन झालेले असते, अशा विभाजनामुळे त्यांचा आकार एखाद्या वृक्षासारखा दिसतो. चेताक्ष हा चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेला दंडगोलाकार भाग असतो. मुख्य शरीर आणि चेताक्षाच्या जोडणीच्या जागेला चेताधार म्हणतात. चेताक्षाची लांबी मनुष्यामध्ये जास्तीत-जास्त १ मीटर एवढी असू शकते (इतर काही प्राण्यांमध्ये याहीपेक्षा लांब चेताक्ष सापडतात). चेतापेशीच्या मुख्य शरीराला अनेक चेतातंतू जोडलेले असतात, परंतू चेताक्ष एकच असतो. अर्थात या एकाच चेताक्षाच्या शेकडो शाखा असू शकतात. एका चेतापेशीच्या दुसरीशी असलेल्या विद्युत जोडणीला "चेतन बिंदू" असे म्हणतात. चेतापेशींमधील संदेशवहन चेतन बिंदू मार्फत होते, सहसा एका चेतापेशीच्या चेताक्षातून दुसरीच्या चेतातंतू मध्ये हे संदेश पाठवले जातात. अर्थात या नियमाला काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ काही चेतापेशींमध्ये चेतातंतू नसतात तसेच काहींमध्ये चेताक्ष नसतो, अशा परिस्थिती मध्ये "चेताक्ष ते चेताक्ष" किंवा "चेतातंतू ते चेतातंतू" अशी जोडणी असू शकते.



♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता
 विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


चेतापेशी :
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.

मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

सहयोगी पेशी:
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️

मध्यवर्ती चेतासंस्था

परीघवर्ती चेतासंस्था
▪️▪️▪️🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺
परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.

🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺🔺▪️▪️

प्रतिक्षेपी क्रिया

सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.

संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...