Thursday 1 December 2022

प्रश्न मंजुषा



🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.

१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण ✔️✔️
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण
_____________________________

🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन
_____________________________

🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

१)छोटा नागपूर
२)अरवली ✔️✔️
३) मालवा
४) विध्य
_____________________________

🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस ✔️✔️
_____________________________

🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे ✔️✔️
_____________________________
🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

१) लॅडस्टयनर ✔️✔️
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे
_____________________________

⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी ✔️✔️
४) लोखंड
_____________________________
🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.

१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी
_____________________________

🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन ✔️✔️
_____________________________

🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४  ✔️✔️
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही

_____________________________

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरती प्रश्नसंच


1. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

लोकसभा सदस्य ✅

मंत्रिमंडळ

राज्यसभा सदस्य

राष्ट्रपती


2. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

विधानसभा ✅

विधानपरिषद

लोकसभा

राज्यसभा


3. भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

१९ ते २२ ✅

३१ ते ३५

२२ ते २४

३१ ते ५१


4. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत✅

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


 

5. महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सभासद संख्या किती आहे?

२७० 

२८८

२८९✅

२९०


6. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे ---------- मानले आहेत.

घटनात्मक प्रमुख 

कार्यकारी प्रमुख

तिन्ही दलाचे प्रमुख

यापैकी सर्व✅


7. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?

संसद 

मंत्रीमंडळ✅

सरन्यायाधिश

उपराष्ट्रपती


8. सरन्यायाधीशाला आपल्या पद व गोपनियतेची शपथ कोण देतो?

निवृत्त होणारे सरन्यायाधीशा 

राष्ट्रपती✅

सर्वोच्च न्यायालयातीला कार्यकारी न्यायाधीश

पंतप्रधान


 

9. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती ✅

पंतप्रधान

सरन्यायाधीश

लोकसभेचे सभापती


10. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

संरक्षण 

तार

पोस्ट

जमिनमहसूल✅


11. शेतकऱ्यांनी पेरणी केली.

अपूर्ण भूतकाळ 

साधा भूतकाळ ✅

पूर्ण वर्तमानकाळ 

भविष्यकाळ


12. पुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते? जयंतास घरी येण्यास उजाडले.

जयंतास  

घरी येण्यास ✅

घरी येण्यास उजाडले

उजाडले 


13. मोठ्या माणसाचा टिकाव कसा लागणार?

प्रश्नार्थक ✅

नकारार्थी

उद्गारार्थी

होकारार्थी


14. तुणतुणे वाजवणे-

तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे  ✅

स्तुती करणे

निंदा करणे

गाणे म्हणणे


 

15. ‘डोळ्यात अंजन घालणे’ म्हणजे –

 डोळ्यात काजळ घालणे  

चूक लक्षात आणून देणे ✅

डोळ्यात दुखापत होणे 

डोळे रागाने मोठे करून पाहणे 


16. पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?

स्वरूपदर्शक  ✅

हेतू दर्शक 

कारण दर्शक

संकेत दर्शक


17. सैनिकाने बंदूकीने शत्रुचा प्राण घेतला

प्रथमा 

व्दितीय

तृतीया✅

चतुर्थी


18. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)

भाटी ✅

बोकी 

बोके

यापैकी नाही


 

19. संकेतार्थी वाक्य ओळखा

पाऊस पडला आणि हवेत गारवा आला 

पाऊस पडला तर हवेत गारवा येईल✅

हवेत गारवा येण्यासाठी पाऊस पडावा

हवेत गारवा येण्यासाठी मेघा पाऊस पाड


20. कवी

कवयित्री ✅

कवित्री

कवियत्री

कवियित्री


21. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 11, 29 ____, 89.

46 

55✅

57

63


22.जर शिक्षक दिन दुधवारी आला असेल तर त्याच वर्षात गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

मंगळवार ✅

बुधवार

गुरुवार

शनिवार


23.  एका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?

TPLBQVS 

MBQVSTP

TPMBSVQS

RPKBOVQ✅


24. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _, bca, _, abc

abbc 

cbca

cacb

cabc✅


 

25. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

3, 24, 81,192, ____.

348 

375✅

384

378


26.एका सांकेतिक लिपीत SUITINGS हा शब्द SGNITIUS असा लिहितात तर SHIRTING हा शब्द कसा लिहील?

GNIRHTSI 

GNITRISHII

SGNIRTHI

GNITRIHS✅


27.राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?

60 ✅

65

70

75


28.जर एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5 = C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13 = Y तर NEAR = ?

37911 ✅

11973

79113

97113


 

29. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 9, 25, 49,?

69 

64

81

100✅


30. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ad _, cdb _, adh _

a, a, cc 

bb, cc

bc, a, c✅

dd, cc

महाराष्ट्राचा इतिहास




⭕️ मौर्य ते यादव ⭕️


(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)



👉 मौर्य साम्राज्याचा काळ


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



👉 सातवाहन साम्राज्याचा काळ


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



👉 वाकाटकांचा काळ


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



👉 कलाचुरींचा काळ


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



👉 यादवांचा काळ


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

________________________________________

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात


 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
▪ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
▪ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
▪पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
▪ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
▪ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
▪ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
▪ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
▪ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
▪ पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
▪ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
▪ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
▪ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
▪ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
▪ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
▪ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
▪ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
▪ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
▪ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
▪ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
▪ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
▪ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
▪ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
▪ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट.

पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर 

आजचे प्रश्नसंच

 1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली  ? 

1) पाचवी 

2) तिसरी 

3) सातवीं ✅

4) यापैकी नाही


2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----

1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅

2) अनेक संस्थाने खालसा करणे 

3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे 

4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे


3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो. 

1) रोहू 

2) कटला 

3) मृगल ✅

4) तिलापिया


4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?

1) 0.19✅

2) 0.50

3) 0.75

4) 0.90


5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे . 

1) भाट्ये, रत्नागिरी 

2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग 

3) श्रीवर्धन, रायगड ✅

4) गणेशखिंड,पुणे


6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ? 

1) समाज सेवा 

2) शैक्षणिक गुणवत्ता 

3) शास्त्रीय संशोधन ✅

4) साहित्य


7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 

1) 29✅

2) 27

3) 31

4) 25


8) जर O + H + P = 39 

M + A + N = 28

तर M + C + H + I + N + E = ? 


1) 43 

2) 53✅

3) 64

4) 54


9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण? 

1) श्रीमंती किरण बेदी 

2) श्रीमती कविता करकरे 

3) श्रीमती स्मिता साळसकर 

4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅


10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो? 

1) राष्ट्रपती ✅

2) वित्तमंत्री 

3) पंतप्रधान 

4) गृहमंत्री


11) --------- is getting blurred.  I cannot see. Fill in the blank with the suitable option. 

1) Everything ✅

2) something 

3) Nothing 

4) ANYTHING


12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ? 

1) 15,17✅

2) 16,17

3) 19,16

4) 18,15


13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ? 

1) 250

2) 300

3) 200✅

4) 325


14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 

1) 660

2) 540✅

3) 630

4) 450


15) 0.004 x 0.5 = ? 

1) 0.00020

2) 0.0020✅

3) 0.0200

4) 0.2000


16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word 

AFFLUENCE 


1) Influence 

2) poverty ✅

3) Indifference 

4) Riches 


🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय. 


17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ".  - या वाक्यातील कर्ता कोण ? 

1) शोध 

2) लवकर 

3) तो ✅

4) परतला 


🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो


18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.

1) विधानार्थी - होकारार्थी ✅

2) नकारार्थी 

3) उद्गारवाचक

4) प्रश्नार्थक 


🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.


19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?

1) अफगाणिस्तान   ✅

2) इराण

3) श्रीलंका

4) बांग्लादेश


20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.

1) पाकिस्तान

2) बर्मा

3) भूतान

4) बांग्लादेश   ✅

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

दक्षिण भारतातील उठाव

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...