Friday 6 May 2022

वाक्य प्रकार ,केवल वाक्य,मिश्र वाक्य,संयुक्त वाक्य

वाक्य

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे.

वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.

मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषतः नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).

हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.

_______________

केवल वाक्य --------

ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात

उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा.

२) तानाजी लढता लढता मेला.

वरील वाक्यात एकेकच विधान आहे.

म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.

_________________

मिश्र वाक्य --------

एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.

आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.

__________________

संयुक्त वाक्य ---------

दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा ----
आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.

वाक्यसंश्लेषण

(वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.

दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.

मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शस्त्र

मराठी व्याकरण
मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शस्त्र ------------

हा लेख मराठी व्याकरण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्याकरण.

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्याससुकर सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटातील भाषा आहे.

मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नियमांची भर पडली.

इतिहास ---------

मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो आर्यन भाषांशी साधर्म्य दाखवते. हिंदी, गुजराती, पंजाबी या त्या भाषा आहेत.

आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटासाठी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केले.

मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले असते. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग या तीन प्रकारांमध्ये असते. संख्या या एकवचनात वा अनेकवचनांत दर्शविल्या जातात, तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, साधन, स्थान आणि संबोधन यांसाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे,

ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ आदि काळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी सुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी सुसंगत होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना होते.

संस्कृतचा प्रभाव

मराठी भाषाशास्त्रावर संस्कृत भाषेतील तत्सम शब्दांचा प्रभाव दिसून येतो.

संस्कृत भाषेत तत्सम शब्दाच्या वाप्रासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम मराठी भाषेत हे शब्द वापरताना लागू होतात. संस्कृत भाषेतील समृद्ध शब्दसंपदा या शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेली अहे. आधुनिक तांत्रिक परिभाषेसाठीसुद्धा हे शब्द लागू पडतात.

मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्य इंडो-युरोपियन भाषांच्या तुलनेत मराठीमध्ये फारसी, द्राविडी, राजस्थानी आणि गुजराथी भाषांतील शब्दांचा अधिक समावेश होतो..

प्रसिद्ध मराठी व्याकरणकार

मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला.

नाम

नाम – सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत

A) सामान्य नाम
B) विशेष नाम
C) भाववाचक नाम

A) सामान्य नाम –

ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

उदा० – मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.

__
____________________


सामान्य नामाचे २ प्रकार :--------

1. पदार्थ वाचक – जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात

उदा० – दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी

2. समूह वाचक – ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

उदा – मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

B) विशेष नाम –

ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा० – शिवाजी, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी.

( टीप – विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा – सागर)

C) भाववाचक नाम/धर्म वाचक नाम –

ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात.

उदा – गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी.

__________________

भाववाचक नामाचे ३ प्रकार

1) गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई/चातुर्य

2) स्थितिदर्शक – गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य

3) कृतिदर्शक – चोरी, चळवळ, क्रांती

_________________

प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

य : सुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, शूर – शौर्य, नवीन – नावीन्य, चतुर – चातुर्य

त्व : शत्रू – शत्रुत्व, मित्र – मित्रत्व, प्रौढ – प्रौढत्व, नेता – नेतृत्व

पण / पणा : देव – देवपण, बाळ – बालपण, शहाणा – शहाणपण

ई : श्रीमंत – श्रीमंती, गरीब – गरिबी, गोड – गोडी

ता : नम्र – नम्रता, वीर – वीरता, बंधू – बंधुता

की : पाटील – पाटीलकी, माल – मालकी, गाव – गावकी

गिरी : गुलाम – गुलामगिरी, दादा – दादागिरी, फसवा – फसवेगिरी

वा : गोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा

आई : नवल – नवलाई, चपळ – चपळाई, चतुर – चतुराई

वी : थोर – थोरवी

_______________________

A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :-----

आमच्या पोपट कालच गावाला गेला.
आत्ताच तो नगरहून आला.
आमची बेबी नववीत आहे.

B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :------

आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.
आईचे सोळा गुरुवारचा व्रत आहे.

नाम म्हणजे- एखाद्या गोष्टीचे नाव :-

C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :----

शांती माझ्या भावाची मुलगी आहे.
माधुरी सामना जिंकली.
विश्वास परीक्षेत पास झाला.

D. धातुसाधित नाम :----
धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात

त्याचे वागणे चांगले नाही.
ते पाहून मला रडू आले.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.

_________________

तीन लिंगे -----------

masculine– पुल्लिंग (')
feminine– स्त्रीलिंग (')
neuter– नपुंसकलिंग (')

_________________

वाक्यांचे प्रकार ------

वाक्याचे तीन प्रकार असतात. १ सरल वाक्य (केवळ वाक्य) २. संयुक्त वाक्य ३. मिश्र वाक्य

यशाचा राजमार्ग वर चालु घडामोडी चे काही प्रश्न

♦️ 
चालू घडामोडी

प्रश्न 01. अलीकडेच कोणत्या संस्थेसोबत NIOT प्रथमच OCEANS 2022 ची परिषद आणि प्रदर्शन आयोजित करत आहे?
उत्तर:- IIT मद्रास

प्रश्न 02. अलीकडेच कोणत्या शहरात प्लॅस्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन 2022 चे आयोजन करण्यात आले?
उत्तर :- नवी दिल्ली

प्रश्न 03. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारत आणि कोणता देश हवामान बदलास सर्वाधिक असुरक्षित आहे?
उत्तर :- पाकिस्तान

प्रश्न 04. कोणत्या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले?
उत्तर :- शेन वॉर्न

प्रश्न 05. अलीकडे कोणत्या मंत्रालयाने बेंगळुरूच्या सहकार्याने "स्त्री मनोरक्षा प्रकल्प" सुरू केला आहे?
उत्तर :- महिला आणि बाल विकास मंत्रालय

प्रश्न 06. नुकताच कोणत्या देशात ICC महिला विश्वचषक 2022 सुरु झाला आहे?
उत्तर :- न्यूझीलंड

प्रश्न 07. नुकताच सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटचा "भारताचा पर्यावरण अहवाल, 2022" हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे?
उत्तर :- भूपेंद्र यादव

प्रश्न 08. अलीकडेच जेट एअरवेजचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- संजीव कपूर

______________________

📕प्रश्न 01. कोणत्या भारतीय नेमबाजाने अलीकडे ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर :- सौरभ चौधरी

📕प्रश्न 02. अलीकडेच सोफिया, बल्गेरिया येथे झालेल्या 73व्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर :- निखत जरीन आणि नीतू

📕प्रश्न 03. अलीकडेच 35 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जाईल?
उत्तर :- फरीदाबाद

📕प्रश्न 04. अलीकडेच कोणत्या सरकारने संपूर्ण राज्याला "अशांत क्षेत्र" म्हणून घोषित केले आहे?
उत्तर :- आसाम

📕प्रश्न 05. अलीकडे कोणत्या देशाला युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी मान्यता मिळाली आहे?
उत्तर :- युक्रेन

📕प्रश्न 06. नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर :- श्री निवेथा, ईशा सिंग आणि रुचिता विनारकर

📕प्रश्न 07. अलीकडेच, भारतीय सुरक्षा दलांच्या सन्मानार्थ दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर :- ०४ मार्च

📕प्रश्न 08. अलीकडेच महाशिवरात्रीनिमित्त 'शिव ज्योती अर्पणम उत्सवा'मध्ये 10 मिनिटांत 11.71 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून कोणत्या शहराने गिनीज रेकॉर्ड बनवला आहे?
उत्तर :- उज्जैन

समुद्रगुप्त

समुद्रगुप्त ---------

 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

------
  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता.

समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते.

त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

-----------
  व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

1942 मध्ये येरवडा तुरुंगात असलेले आणि 9 ऑगस्ट 1942 : अटक झालेले नेते


🌺 1942 मध्ये येरवडा तुरुंगात असलेले :🌺

☘  महात्मा गांधी

☘  सरोजिनी नायडू

☘  महादेवभाई देसाई

☘  मीराबेन

☘  सुशीला नायर

☘  प्यारेलाल

________________________

9 ऑगस्ट 1942 : अटक झालेले नेते :

1) महात्मा गांधी  ,

(2)महादेवभाई,

(3) पंडित नेहरू  ,

(4) असफ अली ,

(5)गोविंद वल्लभपंत,

(6)सरदार पटेल,

(7)आचार्य कृपलानी ,

(8)मौलाना आझाद,

(9)स का पाटील   ,

(10) शंकरराव देव ,

(11)युसुफ मेहेरअली ,

(12)अशोक मेहता,

(13) सरोजिनी नायडू ,

(14) शांताबाई वेंगसरकर.

____________________________

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

​|| थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ ||

--–---------------------------------------------------

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
____________________________

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाराष्ट्रातील समाजसुधारक भाऊराव पायगोंडा पाटील

Mpsc History
महाराष्ट्रातील समाजसुधारक – भाऊराव पायगोंडा पाटील :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जन्म – 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.

मृत्यू – 9 मे 1959.

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.

22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.

भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.

22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.

ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संस्थात्मक योगदान :

1910 – स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना, (1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

4 ऑक्टोबर 1919 – काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

1924 – छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.

1932 – पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.

1935 – प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले..

1940 – महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).

1947 – छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.

स्वावलंबी शिक्षणासाठी ‘कमवा व शिका योजना‘.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैशिष्टे :

समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक.
वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न.

म. फुले, राजर्षी शाहू, म. गांधी यांचा प्रभाव. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.

श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.

तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा !

हा संदेश.

शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले.

महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन–ह. रा.महाजनी.
भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है – म. गांधी.

‘जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ‘ डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763) :-

1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.
फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.
दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.
खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.
युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Mpsc History

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-

इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.
पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.
इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.
इ.स. 1798 मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.
टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.
टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.
एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.
डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Latest post

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024

◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली. ...