Saturday 24 August 2019

महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’

◼️पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार-2018-19’ चे वितरण करण्यात आले.

🔘 क्षमता संवर्धनात महाराष्ट्र देशात दुसरा 🔘

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीच्या आधारे ‘क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आयुक्त इंद्रा मालो आणि उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम 🔘

◼️ पोषण अभियानाच्या अंमलबजावणींतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने निश्चित उद्दीष्ट्ये पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये समुदाय विकास आधारित कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी झाली आहे. क्षमता बांधणी व विकासांतर्गत जिल्ह्यातील सर्व 2015 अंगणवाड्यांमध्ये 3 लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासोबतच पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, कुपोषण मुक्ती बालग्राम विकास केंद्र आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) बी.एच.निपानीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 नेवासा व नाशिक प्रकल्पांच्या सांघिक कार्याचा सन्मान 🔘

◼️पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि ए.एन.एम. कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक-2 (शहरी) या दोन प्रकल्पांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

◼️नेवासा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अलका पंडीत आणि योगिता गुजर, एएनएम कार्यकर्त्या राखी पंडीत, अंगणवाडी मदतनीस उषा टाके आणि पर्यवेक्षिका श्यामला गायधने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2 लाख 50 हजार रूपये, प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

◼️नाशिक-2 (शहरी) प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसूळे, एएनएम कार्यकर्त्या उषा लोंढे, अंगणवाडी मदतनीस मोहिनी इप्पर आणि पर्यवेक्षिका विद्या गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट 🔘

◼️राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बोरिस जॉन्सन: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ब्रिटनच्या (UK) पंतप्रधानपदाची सूत्रे

आता बोरीस जॉन्सन यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. थेरेसा मे यांच्या राजीनामानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत बोरीस जॉन्सन यांनी जेरमी हंट यांचा पराभव झाला. त्यामुळे बोरीस जॉन्सन हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. 55 वर्षांचे जॉन्सन यांच्यासमोर आता ब्रेग्झिटचा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान असेल.

वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर

कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारत 52 व्या क्रमांकावर आहे.

यादीमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ स्विडन, अमेरीका, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्राएल या देशांचा क्रम लागतो आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): भारतातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही पुन्हा एकदा देशातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनली. दिनांक 25 जुलै 2019 रोजी शेयर मार्केटचा व्यापार बंद झाला तेव्हा बाजारपेठेच्या मूल्याप्रमाणे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) याचे एकूण बाजार भांडवल (market capitalisation / m-cap) 7,98,620.04 कोटी रुपये होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे भांडवल 7,81,164.46 कोटी रुपये होते.

लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICCची मान्यता

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे.

ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.

📲 "डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट" अहवाल📲



-केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) जारी

-इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी

●2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल

●देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये
1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)
2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)
3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)
4. उत्तरप्रदेश (4 कोटी)
5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख)

◆भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.

◆3G चा वापर अजूनही - 12.19%वापरकर्ते करतात

पूरपरिस्थितीच्या अभ्यासासाठी जलसंपदातर्फे दहा जणांची समिती


👉भीमा व कृष्णा नदीच्या खोर्‍यामध्ये आलेल्या महापुराची कारणे शोधण्यासाठी व त्यावर उपायोजनात्मक अहवाल तयार करण्याकरिता जलसंपदा विभागाच्या वतीने दहा जणांची अभ्यास समिती स्थापन केली आहे.

👉जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

👉दहा सदस्यीय समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

👉जास्तीत तीन महिन्यात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्यावा.

👉यावर्षीच्या पावसाळ्यात कृष्णा नदीच्या खोर्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील गावे मोठ्या संख्येने बाधित झाली. त्याचप्रमाणे जीवित व वित्त हानीदेखील प्रचंड झाली.

👉पुराच्या कारणांबाबत विविध स्तरांवरून मतमतांतर व्यक्त होत आहेत. चालूवर्षीची पूरपरिस्थिती अधिकच गंभीर आहे.

👉अलमट्टी धरण तसेच दोन्ही राज्यांतील अन्य प्रकल्पही पूर्णत्वास आलेले आहेत. यात अनेक तांत्रिक गुंतागुंतीच्या बाबी आहेत. या सर्व बाबींचे सखोल तांत्रिक अन्वेषण करून पूरपरिस्थितीची कारणे शोधणे, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तज्ज्ञ अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

👉त्यामध्ये भारतीय हवामान खाते, भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जलक्षेत्रातील विश्लेषक अशा तज्ज्ञांचा समावेश आहे.

✅नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :

👉विनय कुलकर्णी (तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण),

👉संजय घाणेकर (सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग)

👉प्रा. रवी सिन्हा (आयआयटी, मुंबई),

👉नित्यानंद रॉय (मुख्य अभियंता, केंद्रीय जलआयोग, नवी दिल्ली),

👉संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर,

👉उपमहासंचालक, भारतीय हवामान विभाग,

👉संचालक, आय. आय. टी. एम. पुणे,

👉प्रदीप पुरंदरे (सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ),

👉राजेंद्र पवार (सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई)

श्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ चा दर्जा देण्यात आला

श्रीनगर आणि जम्मू नागरी संस्थांच्या महापौरांना केंद्र सरकारने राज्यमंत्रीचा (MoS) दर्जा दिला आहे. राज्याचे अतिरिक्त सचिव सुभाष छिब्बर म्हणाले की, आदरातिथ्य व प्रोटोकॉल विभाग सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने जम्मू-काश्मीर राज्य प्राधान्य वॉरंटमध्ये आवश्यक बदल समाविष्ट करेल.

• या आदेशानुसार, “त्यांच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रात SMC (श्रीनगर महानगरपालिका) आणि JMC (जम्मू महानगरपालिका) च्या महापौरांना राज्यमंत्री (एमओएस) च्या समान दर्जा मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.”

• जम्मू-काश्मीरच्या महानगरपालिकांनी 13 वर्षांच्या अंतरानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यात निवडणुका घेतल्या. 

• अनुक्रमे जेएमसी आणि एसएमसीचे महापौर म्हणून भाजप नेते चंदर मोहन गुप्ता आणि पीपल्स कॉन्फरन्सचे नेते जुनैद मट्टू हे आहेत.

🔸पार्श्वभूमी :

✍ 6 ऑगस्ट, 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. 

✍ केंद्र सरकारने राज्याला जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले. 

✍जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेचा अनुच्छेद 370 सरकारने रद्द केला असल्याचे अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केले. 

✍लडाख प्रदेश हा विधानसभेविना केंद्रशासित प्रदेश (यूटी) असेल. आणि, जम्मू-काश्मीर हा एक विधीमंडळ असलेला केंद्र शासित प्रदेश असेल.

कलम 370 बद्दल :

• अनुच्छेद 370 जम्मू आणि काश्मीर राज्याला एक विशेष दर्जा प्रदान करीत होता. 

• जेव्हा कलम 370 राज्यात सक्रिय होते तेव्हा राज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता इतर सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागत होती. 

• आता कलम 370 मधील कलम 1 वगळता इतर सर्व तरतुदी निरर्थक आहेत. 

• जम्मू-काश्मीरच्या जागा कमी होऊन 83 जागा कमी होतील कारण लडाख प्रदेशातील चार जागा कमी केल्या जातील.

UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान 🎇

🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🎯दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

🎯पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

🎯यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.

🎯या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.

🎯आमचे भारताबरोबर ऐतिहासिक आणि व्यापक रणनितीक संबंध आहेत. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

🎯 यूएई इस्लामिक देश असला तरी आज पाकिस्तानपेक्षा भारताबरोबर त्यांचे संबंध बळकट आहेत. जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने भारताचे समर्थन केले आहे.

🎯जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी यूएईची भूमिका आहे.

 

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं.



📚 दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत.

निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. "गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे.

माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये," असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

     लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |

   1) उपमा    2) दृष्टांत     
   3) उत्प्रेक्षा    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 2

2) परभाषी शब्द ओळखा.

   1) बक्षीस    2) इनाम      3) भेटवस्तू    4) दान

उत्तर :- 2

3) धन्वन्यर्थ करणे ......................

   1) ‘अभिधा’ शक्तीमुळे जाणवणारा अर्थ    2) ‘व्यंजना’ शब्दशक्तीमुळे सुचित होणार अर्थ
   3) ‘लक्षणा’ शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ    4) भाषेतील मूलध्वनीचा अर्थ

उत्तर :- 2

4) ‘वारा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

   1) शैल      2) अनल     
   3) अनिल    4) सलील

उत्तर  :- 2

5) ‘आवक’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) श्रावक    2) भावक     
   3) जावक    4) वाहक

उत्तर :- 3

6) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.

     शहाण्याला .................. मार.
   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

7) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

8) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

9) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

20) संयुक्त स्वर म्हणजे -

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...