29 September 2019

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली?
✅. - रवींद्र नाथ टागोर

 

Q2. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
✅.  - लॉर्ड डफरीन

 

Q3. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते?
✅.  - महात्मा गांधी

 

Q4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
✅.  - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 

Q5. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत.
✅.  - युगांतर

 

Q6. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती?
✅.  - महात्मा गांधी

 

Q7. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता?
✅.  - लॉर्ड लिटन

 

Q8. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते?
✅.  - पंडित नेहरू

 

Q9. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले?
✅.  - 1953

 

Q10. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
✅.  - व्ही. के. कृष्ण मेनन

 

Q11. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले?
✅. -  रेसलिंग (wrestling)

 

Q12. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
✅ B-  महाराष्ट्र व गुजरात

 

Q13. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?
✅.  - सविनय कायदेभंग चळवळ

 

Q14. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length)
✅. - NH7

 

Q15. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती?
✅. - ललित कला अकादमी

 

Q16. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे ?
✅. - विजय मल्ला

 

Q17. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
✅. - 1989

 

Q18. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
✅.  - गोवा

 

Q19. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?
✅.  - सुकन्या

 

Q20. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?
✅. - शालीमार गार्डन

 

Q21. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते?
✅.  - गेलापॅगोस

 

Q22. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते?
✅. - प्रोटोकॉल

 

Q23. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?
✅. - दसरा

 

Q24. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?
✅.  - विजय अमृतराज

 

Q25. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे?
✅. - आंध्र प्रदेश

 

Q26. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती?
✅. - नर्मदा

 

Q27. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे?
✅.  - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

 

Q28. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
✅.  - कर्नाटक

 

Q29. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते?
✅. - भरतनाट्यम

 

Q30. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?
✅.  - अरुणाचल प्रदेश

मोबाईलची 5-जी सेवा वर्ष 2022 पासून भारतात

◾️सध्या भारतात 4-जी मोबाईल सेवेचा लाभ घेणारे कोट्यवधी ग्राहक आढळून येतात. मात्र जगभर आता 5-जी या अतिशय वेगवान आणि उत्तम बॅंडविडथ असलेल्या मोबाईल्सची चलती आहे.

◾️दूरसंचार क्षेत्रात भारतात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच नव्या टेलिकॉम धोरणाला मंजूरी दिली असून वर्ष 2022 पर्यंत देशात 5-जी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वेगवान तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मिती होणार आहे. याद्वारे दहा हजार कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

◾️या नव्या टेलिकॉम धोरणाचे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी) असे नामकरण करण्यात आले आहे.

◾️या धोरणाच्या मसुद्यानुसार, एनडीसीपीचे ध्येय फाईव्ह-जी तंत्रज्ञान आणि ऑप्टिकल फायबर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅण्ड सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे, असणार आहे.

◾️त्याचबरोबर टेलिकॉम कमिशनचे नाव बदलून डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशन, असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या धोरणानुसार, डिजिटल कम्युनिकेशनसाठी निरंतर आणि परवडणारी सेवा देण्यासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत मिळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. साडेसात लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या टेलिकॉम क्षेत्रासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत आणि त्यासंबंधीचे शुल्क ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.

◾️त्याचबरोबर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम सेक्‍टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्पेक्‍ट्रम शुल्काची तर्कशुद्ध आकारणी करण्यात येणार आहे.

◾️या नव्या धोरणानुसार, प्रत्येकाला 100 मेगाबाईट प्रति सेकंद या वेगाने ब्रॉडबॅण्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

◾️तसेच फाईव्ह-जी सेवा आणि 2022 पर्यंत 40 लाख नवे रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

2) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

3) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

4) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

5) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ?

   1) हसतमुख    2) पत्रव्यवहार   
   3) शोधग्राम    4) गृहसेवा

उत्तर :- 2

7) खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

   1) ?      2) !     
   3) :      4) ;

उत्तर :- 4

8) शब्द बनणे किंवा सिध्द होणे याला काय म्हणतात ?

   1) शब्दबंध    2) शब्दार्थ   
   3) शब्दसाध्य    4) शब्दसिध्दी

उत्तर :- 4

9) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
     ‘थंड’

   1) गार      2) किनारा 
   3) आधात    4) गर्दी

उत्तर :- 2

10) ‘विहंग’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :

   1) स्त्री      2) पक्षी     
   3) साप    4) आकाश

उत्तर :- 2

इराक भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश

भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या इराक, सौदी अरब, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे भारताचे मुख्य कच्चे तेल पुरवठादार देश आहेत. पश्चिम आशियातल्या या पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडेही तेलाच्या खरेदीत विविधता आणण्याची योजना भारताने आखलेली असून आता अमेरिकेकडूनही तेलाची आयात केली जात आहे.

अन्य ठळक बाबी

🔸एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका या देशांनी सुमारे 4.5 दशलक्ष टन कच्चे तेलाचा पुरवठा भारताला केला.

🔸इराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.

🔸एप्रिल-ऑगस्ट 2019 या कालावधीत भारताने 91.24 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, जेव्हा की गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 93.91 दशलक्ष टन एवढे होते.

🔸सौदी अरब हा देश पारंपारिकपणे भारताचा तेलासाठीचा सर्वोच्च स्रोत राहिला आहे, परंतु 2017-18 मध्ये त्याची जागा प्रथमच इराकने घेतली. सौदी अरब कडून भारताला 17.74 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा झाला.

🔸अमेरिकेने मे महिन्यात आर्थिक निर्बंध घातल्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविलेले असून तेथून केवळ 2 दशलक्ष टन तेलाचीच आयात केली गेली.

🔸नायजेरियाने इराणची जागा घेत भारताकडे तेल पुरवठा करणार्‍या देशांमध्ये तिसरे स्थान मिळविले. एप्रिल-ऑगस्टमध्ये त्याने 7.17 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. त्यापाठोपाठ UAE (6.4 दशलक्ष टन) आणि व्हेनेझुएला (6.17 दशलक्ष टन) या देशांचा क्रम लागतो.

कलम 370 वरील याचिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळे घटनापीठ

◾️ जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, यावर आता न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

◾️सर्वोच्च न्यायालयानेच आज या घटनापीठाची स्थापना केली.

◾️ या घटनापीठामध्ये
📌 न्या. एस. के. कौल,
📌न्या. आर. सुभाष रेड्डी,
📌 न्या. बी. आर. गवई आणि
📌 न्या. सूर्यकांत यांचाही समावेश आहे. 

◾️या घटनापीठाची रीतसर सुनावणी ही 1 ऑक्‍टोबरपासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

◾️हे पाच सदस्यीय घटनापीठ केंद्र सरकारच्या 370 वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची घटनात्मक वैधता आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेला आदेश याची पडताळणी करणार आहे.

◾️तत्पूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 28 ऑगस्ट रोजी या संदर्भातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घेण्याचे निर्देश दिले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖