Saturday 28 September 2019

कलम 370 वरील याचिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळे घटनापीठ

◾️ जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, यावर आता न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

◾️सर्वोच्च न्यायालयानेच आज या घटनापीठाची स्थापना केली.

◾️ या घटनापीठामध्ये
📌 न्या. एस. के. कौल,
📌न्या. आर. सुभाष रेड्डी,
📌 न्या. बी. आर. गवई आणि
📌 न्या. सूर्यकांत यांचाही समावेश आहे. 

◾️या घटनापीठाची रीतसर सुनावणी ही 1 ऑक्‍टोबरपासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

◾️हे पाच सदस्यीय घटनापीठ केंद्र सरकारच्या 370 वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची घटनात्मक वैधता आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेला आदेश याची पडताळणी करणार आहे.

◾️तत्पूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 28 ऑगस्ट रोजी या संदर्भातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घेण्याचे निर्देश दिले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...