Saturday 28 September 2019

भारतीय संघात रोहित शर्मा घेणार धोनीची जागा

📌महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत.

📌विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी अपेक्षा करत आहेत.

📌“मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सिनीअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे.

📌सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा असं सर्वांचं मत पडलं आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली._

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...